टाटा स्काय की इतर काही? काय घ्यावे?

Submitted by दक्षिणा on 22 January, 2019 - 08:36

मी सध्या टाटा स्काय वापरते आहे. (वर्षभराचे एकदम एच डी सहित) बरेच महाग पडते असे इतरांचे मत.
यातही माझ्याकडे इंग्रजी सिरियल आणि चित्रपटाचे सबस्क्रिपशन नाही. सध्या नेट्फ्लिक्स, अमॅझोन प्राईम च्या जमान्यात टाटा स्काय ठेवावे की बन्द करावे? मनोरंजनासाठी काय योग्य आहे?
इतर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची काहीही कल्पना मला नाही. जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.
कोण काय वापरते, किती खर्च येतो, सर्व्हिस कशी आहे त्याची ही माहिती द्यावी.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी माझे टाटा स्काय बदलुन एअरटेल घेतले आठ दिवसांपुर्वी आणि पश्चाताप झाला. दोन दिवसात पुन्हा टाटा स्काय ॲक्टिव्हेट करतोय. एअरटेलकडे हजार रुपये असुनही.

घरात वाय फाय घ्या, चान्ग्ल्या स्पीड च..
स्मार्ट टीवी असेल तर अप वरून सगळ बघता येत
टाटा स्काय ची गरज नाही,

(अर्थात वैयक्तिक मत आहे, मी टी व्ही च बघत नाही, सो मला यपुढे काही बोलायचा नैतिक अधिकार नाही Proud )

टाटा स्काय महाग आहे.आम्ही धमाल कीड असा काहीतरी पॅक कॉल सेंटर सुंदरी ने सर्वात बरा पडेल सांगितला म्हणून.काहीतरी 1900 रु वर्षाला पडतो.
एकही इंग्लिश एंटरटेनमेंट चॅनल या पॅक मध्ये नाही.पण बाकीचं प्राईम आणि युट्युब आणि हुक वर बघते.
एअरटेल हॉटेल्स मध्ये पाहिलं आहे.यु आय थोडा कीचकट आहे.

दक्षिणा मी स्वतः टाटा स्कायचा subscriber आहे. बेसिक पॅक २२० (धमाल मिक्स पॅक) रुपयांपासून चालू होतं. स्टॅंडर्ड क्वालिटी पिक्चर अजिबात चांगलं दिसत नाही (अर्थात ५५ इंची ४k टीवीवर ही अपेक्षा करणंच चुकीचं आहे, पण इतरांनाही सेम अनुभव) HD मात्र लार्जर डॅन लाईफ दिसत. त्याचे १९५ रु चार्जेस वेगळे पडतात.
टीव्ही ३२ इंची आसपास असेल, तर SD कंटेंट वर टाटा स्काय बेसिक पॅकवर बऱ्यापैकी स्वस्त पडत! मात्र बेसिक मध्ये इंग्लिश पॅक नसल्याने लोचा होतो.
घरी वायफाय असेल, तर एकटं नेटफ्लिक्स सगळ्यांना भारी पडेल.
बाकी tv चॅनेल बघायला jiotv, airtel tv आशा तत्सम अप आहेतच.
होप धिस विल हेल्प यु!

स्टॅंडर्ड क्वालिटी पिक्चर अजिबात चांगलं दिसत नाही (अर्थात ५५ इंची ४k टीवीवर ही अपेक्षा करणंच चुकीचं आहे, पण इतरांनाही सेम अनुभव) >>>
अगदी.
मी जे चॅनेल पहातो ते बहुतेक एचडी आहेत. बाकी हिंदी मराठी चॅनेल पहात नाही. एअरटेलची HD क्वालिटी मला आवडली नाही. हा माझा अनुभव आहे हे सांगायला विसरलो.

यु आय थोडा कीचकट आहे.>> हो. त्यात अगोदर मला टाटा स्कायची सवय असल्याने जास्तच किचकट वाटते आहे.

अजून जिओटिवि डबडं आलं नाहीये, ते किंवा जिओफाइबर आल्यावर पुन्हा उलटापुलटा होणार मार्केट. जिओ४जी आल्यावर जसं तीसपट नेट स्वस्त झालं तसं.
पण सध्या डिशडिशटिडबडं वापरतो कारण पेनड्राइव रेकॅार्डिंग फीचर.

माझ्याकडे टाटा स्काय एच डी विथ रेकॉर्डर आहे.
सुरुवातीपासून आधी सगळी इंग्रजी आणि हिंदी चॅनेल्स देणारं पॅक घेतलं होतं.+ मराठी चॅनेल्स. यात करमणूक +सिनेमा+ बातम्या+ मुलांची चॅनेल्स+ लाइफस्टाइल+ माहितीपर +स्पोर्ट्स अशी चॅनेल्स होती. वर्षाला दहाबारा हजार.
मग लक्षात आलं की इतक्या सगळ्या चॅनेल्सची गरज नाही. पैसे वाया जातात.शिवाय सर्फिंगमुळे वेळ वाया जातो तो वेगळा.

गेली दोन वर्षं मेक माय पॅकमध्ये निवडून चॅनेल्स घेतो.
एकूण दहा-बारा चॅनेल्स आहेत. स्पोर्ट्स चॅनेल त्या त्या वेळेपुरतं सब्स्क्राइब करतो. सध्या ऑस्ट्रेलियन ओपनसाठी सोनी टेन घेतलंय. ऑ. ओ. संपलंय की ते काढणार.
माझा सेट टॉप बॉक्स विथ रेकॉर्डर असल्याने कार्यक्रम रेकॉर्ड करून आपल्या सोयीने, तेही फाफॉ.पॉज/रिवाइंड करत बघता येतात.
स्पोर्ट्स पाहताना रिवाइंडमुळे मजा वाढते. करमणुकीच्या कार्यक्रमांत ब्रेक्स झरकन संपतात. शिवाय एच डी चॅनेल्स असल्याने अर्ध्या तासांची मालिका २२ मिनिटांत आटोपायची. स्पोर्ट्स चॅनेल वगळता महिन्याचे ४०० रुपये होतात.

दोन वर्षांपूर्वीपर्यंत पावसाळ्यात सिग्नल मिळत नसे. पाऊस पडायच्या आधीच सिग्नल बंद पडे. तोही प्रॉब्लेम आता मिटलाय. अगदी काही मिनिटेच सिग्नल जाऊन मुसळधार पावसातही पुन्हा मिळतोय.

@शाली
आमच्याकडे टाटा स्काय आणि ऐरतेल दोन्ही आहेत. घरी टाटा स्काय, आणि शेतातल्या घरी (हो आमचंही वावर आहे, पण त्यात जास्त वावर असत नाही Wink ऐरतेल. पण तुलनेने टाटा स्काय चा यु आय छान आहे. चॅनल बॅनरही ऐरतेल पेक्षा डोळ्याला सुखद वाटतं.

एच डी चॅनेल्स असल्याने अर्ध्या तासांची मालिका २२ मिनिटांत आटोपायची. >>>>>
याचसाठी मीही एच डी घेतो.

मी पूर्वी टाटा स्काय वापरायचो. ग्रँड स्पोर्ट की काहीतरी पॅक होता. बेसिकली सगळेच चॅनल हवे असायचे. महिन्याला ७५० द्यायचो.
आता गेली दीड वर्ष टाटा स्काय ला डिच्चू देऊन फक्त स्ट्रीमिंग करतोय. परवा बहिणीकडे गेलो असताना मधेच जाहिराती लागलेल्या बघून चकित झालो कारण आमच्याकडे जाहिराती दिसतच नाहीत.

नेटफ्लिक्स : महिन्याला २०० (४ मित्रांबरोबर शेअर करतो)
अमेझॉन प्राईम : वर्षाला १००० (प्राईम व्हिडीओ नसताना देखील मी प्राईम मेम्बर होतो. म्हणून हा माझ्यासाठी एक्सट्रा खर्च नाही)
हॉटस्टार : वर्षाला ५०० (फुटबॉल वर्ल्डकप च्या वेळी ५०% डिस्काउंट मध्ये सबस्क्राईब केलेलं)
झी५: वर्षाला ५००
Voot: फुकट
सोनी लिव्ह: फुकट (३ महिने ट्रायल पिरियड. घरातल्या ७ मोबाईल नंबर वापरतोय एकामागून एक) तसंही फक्त स्पोर्ट्स साठी बघतो.
जिओ सिनेमा: जिओ चा नंबर असलयामुळे फुकट
You Tube: फुकट
Ted : फुकट

घरात २ tv, २ टॅब, ६ मोबाईल पैकी कशावरही प्रोग्रॅम बघत असतो. आमच्याकडे ४०mbps अनलिमिटेड ब्रॉडबँड आधीपासून होतं त्यामुळे तो खर्च धरला नाहीये. जर कधी इंटरनेट बंद असेल तर टीव्ही ऐवजी मोबाईलचा दिवसाचा दीड जीबी पॅक संपवतो.

There is no way we are going back to tata sky or equivalent.

मुंबईत टाटा स्काय ( महिना २२० पासुन सुर्वात, कधीही चालु बंद करता येते). आणि पुण्यात डीश HD साठी ४०० रुपये महिना. दोन्हीचा अनुभव चांगला आहे. १ फेब्रुवारी पसुन दोन्हीचे दर बदलणार आहेत.

आमेझॉन प्राईम एक महीना झाले वाप्रन आहे ९९९ रुपये वर्षाला मराठी/ हिंदी चांगले चित्रपट आहेत. जर अ‍ॅमेझॉन वर सेट झाले तर केबल बंद करायचा विचार आहे. मात्र पुढचे तीन महिने दोन्ही चालु राहिल. अ‍ॅमेझॉन दोन्ही ठिकाणी चालत असल्याने डीश आणि टाटा स्काय ला टाटा बाय बाय करता येईल.

सर्वांना धन्यवाद. खूपच माहिती मिळाली आहे पण थोडी संभ्रमात पडली आहे.
* माझ्याकडे samsung LED ३२ इंच आहे. २०१२ साली घेतला, स्मार्ट टीव्ही आहे की नाही माहिती नाही. तो कसा ओळखायचा?
* घरी वायफाय आहे ६ एम बी चा स्पीड आहे पण ८ मिळतोच मिनिमम.
* यु आय म्हणजे युजर इंटरफेस का? ओके.
* माझ्याकडे जिओ चा एक नंबर आहे. जिओ टीव्ही असाही काही प्रकार आहे का? Uhoh तो कसा पहायचा? अ‍ॅप आहे का?
* टेड काय आहे?
* नेटफ्लिक्स घेतले तर जिओ च्या मोबाईल कनेक्शन वर चालेल का?
* नेटफ्लिक्स वर जुने हिन्दि, मराठी किंवा इंग्रजी सिनेमे पण असतात का?
* नेटफ्लिक्स आणि अमॅझोन प्राईम दोन्ही घेतले तर टाटा स्काय पेक्षा स्वस्त पडेल का?
* हे दोन्ही टिव्हिवर कसे पहावे? (टेक्निकली खूप अडाणी आहे मी)

माझे ही टाटा स्काय चे सबस्क्रिप्शन एप्रिल पर्यंत आहे. त्या अगोदर मला "स्मार्ट" निर्णय घ्यायचा आहे.

दक्शे माझा चा ड्यू आहे. मला बोलीव. सगळं सेट करून देतो पा... Wink
सध्या माझ्यामते टाटास्काय बेस्ट आहे. जरा महाग पडतं पण बाकी सर्वीस प्रोव्हायडर्स पेक्षा २ पैसे गेलेले परवडले.

माझ्याकडे samsung LED ३२ इंच आहे. २०१२ साली घेतला, स्मार्ट टीव्ही आहे की नाही माहिती नाही. तो कसा ओळखायचा?>>>>
बऱ्याच टेस्ट आहेत, पण सगळ्यात सोपी टेस्ट, त्याला डायरेक्ट वायफाय ने नेट जोडता येत असेल, तर स्मार्ट, अन्यथा नाही (फक्त बेसिक)
* माझ्याकडे जिओ चा एक नंबर आहे. जिओ टीव्ही असाही काही प्रकार आहे का? >>>>>
जिओ टीव्ही ही एक अप आहे, आपल्या मोबाईलमध्ये जिओच कार्ड असल्यास ही अप डाउनलोड करावी. अप आपोआप सिंक होऊन चालू होईल. यात अलमोस्ट सगळे चॅनेल बघता येतात.
* टेड काय आहे?>>>> जाणकारांनी प्रकाश टाकावा
* नेटफ्लिक्स घेतले तर जिओ च्या मोबाईल कनेक्शन वर चालेल का?>>>> जिओ काय, कुठल्याही नेट कनेक्शनवर चालेल
* नेटफ्लिक्स वर जुने हिन्दि, मराठी किंवा इंग्रजी सिनेमे पण असतात का?>>>> जाणकारांनी प्रकाश टाकावा
* नेटफ्लिक्स आणि अमॅझोन प्राईम दोन्ही घेतले तर टाटा स्काय पेक्षा स्वस्त पडेल का?>>>>> तूलनेने होय
* हे दोन्ही टिव्हिवर कसे पहावे? (टेक्निकली खूप अडाणी आहे मी)>>>>>
स्मार्ट tv नसल्यास, क्रोमकास्ट किंवा फायर स्टिक वापरता येईल.

>> (अर्थात वैयक्तिक मत आहे, मी टी व्ही च बघत नाही, सो मला यपुढे काही बोलायचा नैतिक अधिकार नाही Proud )
>> Submitted by किल्ली on 22 January, 2019 - 19:10

+१ अगदी अगदी. सेम टू सेम. टीव्ही वरच्या सिरीयल आणि बातम्या या दोन्हीत आजकाल शून्य इंटरेस्ट! राहता राहिले चित्रपट. ते सुद्धा कधीतरी. त्यासाठी नेट इज द बेस्ट.

बऱ्याच टेस्ट आहेत, पण सगळ्यात सोपी टेस्ट, त्याला डायरेक्ट वायफाय ने नेट जोडता येत असेल, तर स्मार्ट, अन्यथा नाही (फक्त बेसिक) >> ते कसे जोडायचे? Uhoh
(अडाण्यांची महाराणी आहे मी)

योक्या चा काय जेवायला ये. ते सेटिंग फिटिंग राहू दे तिकडं. (आलास की त्यावर गप्पा होणार हे नक्कीच)
आणि तु ह्या धाग्यावर आला नसतात तर माझा धागा फेल गेला असता Happy

* माझ्याकडे samsung LED ३२ इंच आहे. २०१२ साली घेतला, स्मार्ट टीव्ही आहे की नाही माहिती नाही. तो कसा ओळखायचा?
>>तुमच्या TV मध्ये अ‍ॅप्स इन्स्टॉल करता येतात का? किंवा त्यात आधीच काही अ‍ॅप्स इन्स्टॉल केलेली आहेत का? तुम्ही हा प्रश्न विचारता आहात म्हणाजे बहुतेक तुमचा टीव्ही स्मार्ट नसावा

* घरी वायफाय आहे ६ एम बी चा स्पीड आहे पण ८ मिळतोच मिनिमम.
>>पुरेसा स्पीड आहे. पण ५ GB-10 GB वगैरे डाउनलोड लिमिट आहे का ते चेक करा.

* माझ्याकडे जिओ चा एक नंबर आहे. जिओ टीव्ही असाही काही प्रकार आहे का? Uhoh तो कसा पहायचा? अ‍ॅप आहे का?
>>हो हे एक अ‍ॅप आहे

* टेड काय आहे?
>>टेड (https://www.ted.com/) ही एक वेब्साईट आहे जिथे वेगवेगळ्या विषयांवर माहीतीपुर्ण्/मनोरंजक व्हिडीओ बघायला मिळतात. यांचं अ‍ॅप पण आहे

* नेटफ्लिक्स घेतले तर जिओ च्या मोबाईल कनेक्शन वर चालेल का?
>>इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कोणीही असला तरी नेटफ्लिक्स चालेल.

* नेटफ्लिक्स वर जुने हिन्दि, मराठी किंवा इंग्रजी सिनेमे पण असतात का?
>>इंग्रजी सगळ्यात जास्त, मग हिंदी आणि मराठी सगळ्यात कमी. रच्याकने "जुने" ही रिलेटीव टर्म आहे.

* नेटफ्लिक्स आणि अमॅझोन प्राईम दोन्ही घेतले तर टाटा स्काय पेक्षा स्वस्त पडेल का?
>>नेटफ्लिक्स मित्रांबरोबर शेअर केले तर स्वस्त (महीन्याला २०० रु.) होते. while this is legal, some consider it unethical. But that is topic for a separate thread. प्राईम महीन्याला साधारण ८४ रु.

* हे दोन्ही टिव्हिवर कसे पहावे? (टेक्निकली खूप अडाणी आहे मी)
>>जर तुमचा सध्याचा टीव्ही स्मार्ट नसेल, तर तुम्ही अ‍ॅमॅझॉन फायर स्टीक (नॉर्मल किंमत ४००० रु. पण बरेचदा २५००-३००० रु. ला मिळते) विकत घ्या. गुगल क्रोमकास्ट हा पण एक ऑप्शन आहे पण मला फायर स्टीक जास्त आवडते. ही स्टीक तुमच्या टीव्हीच्या HDMI पोर्ट मधे लावावी लागते त्यामुळे टीव्हीला HDMI पोर्ट आहे याची खात्री करुन घ्या. (बहुतेक असेलच)

* माझ्याकडे samsung LED ३२ इंच आहे. २०१२ साली घेतला, स्मार्ट टीव्ही आहे की नाही माहिती नाही. तो कसा ओळखायचा?>>
म्हणजे स्मार्ट टीव्ही नसावा.
टाटा स्काय प्लस रेकॉर्डिंग बॉक्स घेतला की त्याला वायफाय अडॅप्टर येते वेगळे, usb. वायफाय कनेक्ट केले की टीव्ही जरा स्मार्ट होतो. On demand मध्ये म्युझिक व्हिडीओज, बॉलिवूड - हॉलीवूड मुव्हीज, रिजनल मुव्हीज मध्ये मराठी असे थोडेफार चित्रपट बघता येतात काही सिरीज बघता येतात.

अमेझॉन फायर स्टिक मस्त ऑप्शन आहे. २०१२ चा LED टीव्ही म्हणजे HDMI पोर्ट्स असतीलच.

सगळे खर्चिक ऑप्शन्स आहेत दक्षिणा, पण घ्या, इट्स वर्थ इट. आज ना उद्या करावेच लागेल.

आधी फायर स्टिक घ्या. नेटफलिक्स एक महिना फ्री असते व व्यत्यय यांनी सांगितलेले इतर चॅनेल्स वापरून बघा (बरेच एक महिना फ्री असतात.) त्या महिन्याभरात टाटा स्कायचा किती वापर होतो बघा आणि मग ठरवा बंद करायचे की नाही, केव्हा करायचे ते.

दक्षिण मुंबई केबलवाला झिंदाबाद
नव्वदच्या दशकापासून केबल होती घरात.
२००० सालापासून गेले काही वर्षांपर्यंत तर केबलवाला पैसेच घ्यायला यायचा नाही तर फुकट बघायचो.
आता केबलवाल्याने सेटटॉप बॉक्स बसवून दिलाय. एच डी वगैरे. महिन्याचे तीनशे घेतो. जगातले सर्व चॅनेल दिसतात. प्लस नवीन पिक्चर आल्या आल्या लागतो. अर्थात पिक्चर आमच्याकडे कोणी बघत नाही आतासे ती गोष्ट वेगळी.

आमच्या दुसरया घरात मात्र टाटास्काय आहे. तुलनेत चिक्कार लुटले जातोय.

नक्की रिक्वायरमेंट काय आहे?
मराठी/ हिंदी/ इंग्रजी टीव्ही चॅनल असता तसले चॅनल हवे का? का कॉर्ड कट करायची आहे? फक्त नेटफ्लिक्स / प्राईम/ एच बी ओ/ युट्युब आणि इंडिअन इक्विवॅलंट ऑफ हुलु/ युट्युब टीव्ही असं जे काही असेल ते पुरेसं वाटतं का? इंटरनेट कनेक्शन उत्तम आहे ना?
यातील ओव्हर द एअर जे काही बघितलं नाहीये त्याची १-२ महिने ट्रायला घेतली आहे का? तुम्हाला जो कंटेंट हवा तो पुरेसा आहे का? या प्रश्नांची उत्तरे अनुभवल्याशिवाय मिळतील असं वाटत नाही. ट्राय करा आणि नाही आवडलं तर बदला. लॉंग टर्म कॉंट्रॅक्ट मध्ये सध्या जाऊ नका.
सध्या हार्डवेअर मध्ये लगेच पैसे घालयचे नसतील तर या सर्व सर्विसेस लॅपटॉप, मोबाईल वरही दिसतात. त्यातुन महिनाभर बघा. क्रोमकास्ट असेल तर कास्टही करता येईल. ते टेक्नॉलॉजीकली कठिण वाटत असेल तर काही हरकत नाही. लॅपटॉपवर बघा आणि आवडतंय वाटलं तर फायर स्टिक/ अ‍ॅपल टीव्ही/ रोकू घ्या.

१) >> अजून जिओटिवि डबडं आलं नाहीये, ते किंवा जिओफाइबर आल्यावर पुन्हा उलटापुलटा होणार मार्केट.>>
- संपूर्ण नवीन प्रकार आहे. एक छोटी डबी घराबाहेर लावायची त्यातून ५० एमबीपीएस नेटकनेक्शन येणार त्यावर घरातला कोणताही जुना डब्बा टिविसुद्धा लागणार ( त्याचा अडाप्टरही देणारेत. ) ,मोबाइलसाठीही नेट. म्हणजे सर्व इंटरनेट आधारित होणार.
हे १५ अगस्ट २०१८ ला चालू व्हायचे होते, दोन लाख नोंदणी अगोदरच झाली आहे.
पणपण केबलवाल्यांनी घाबरून विरोध केलाय.
हे आताचे जिओअॅप नव्हे. या वायरलेस इंटरनेट सर्विसशि्वाय ओप्टिकल फायबर वायर्ड सर्विसही घेता येणार आहे ३००+ एमबिपीस स्पीड. डोंबिवलील्या गल्लीबोळातूनही केबल्स टाकलेल्या आहेत तर इतर प्रसिद्ध मोठ्या शहरांत असणारच.

थोडक्यात आहे ती सर्विस / टिवी जेमतेम चालू ठेवणे.

-----
२) सध्या दोन घरे असतील तर डिशटिवि( पेन ड्राइव रेकॅार्डिंगसह) उत्तम. कारण सरकारी फ्री डिश आणि यांचा सॅटेलाइट एकच आहे. एकाच डिशवर दोन्ही डबे चालतात.
शेतातल्या घरात जुना टिवि आणि फ्री डिटिएचचे डबडे (५००-७०० रुचे) लावून ठेवायचे. बक्कळ करमणूक फ्री चालू राहाते. किंवा शहरातून तिकडे जाताना इकडचे घरातले डिशटिविचे डबडे ( यालाच कुणी सेटटॅाप बॅाक्स म्हणतात) घेऊन तिथे लावले की तिकडे चालू, परत येताना आणायचे.
-----

३) हाथवे केबल स्वस्त मस्त असली तरी प्रत्येक एअरिआत ती केबलवाले त्यांचीच घ्यायला लावतात.

लोकल केबलवाले चॅनेलवाल्यांना लुबाडतात. जेवढी कनेक्शन्स आहेत, त्यापेक्षा कमी कनेक्शन्स दाखवून चॅनेल्सना कमी पैसे देतात. कमी कर भरतात.
त्यामुळे ग्राहकांना कमी पैसे लावतात.
एका अन्य शहरात भाडेकरू म्हणून राहताना केबलवाल्याच्या माणसानेच, तुम्ही नवे कनेक्शन घेण्यापेक्षा, जोडून असलेल्या घरमालकाच्या घरातलेच कनेक्शन तुम्हांलाही जोडून देतो. एका कनेक्शनचे दोनशे असतील, तर दोघे प्रत्येकी दीडशे द्या. अशी स्कीम दिलेली. शंभर रुपये त्याच्या खिशात. फक्त काही प्रॉब्लेम आला तर केबलवाल्याच्या ऑफिसात फोन करायचा नाही, नाहीतर पितळ उघडं पडेल.

सेट टॉप बॉक्स अनिवार्य झाल्यावरही त्यांचे रेट्स डिशच्या तुलनेत बरेच कमी आहेत. म्हणजे अजूनही यात काहे पळवाटा काढल्या असतील.

Pages