Submitted by दक्षिणा on 22 January, 2019 - 08:36
मी सध्या टाटा स्काय वापरते आहे. (वर्षभराचे एकदम एच डी सहित) बरेच महाग पडते असे इतरांचे मत.
यातही माझ्याकडे इंग्रजी सिरियल आणि चित्रपटाचे सबस्क्रिपशन नाही. सध्या नेट्फ्लिक्स, अमॅझोन प्राईम च्या जमान्यात टाटा स्काय ठेवावे की बन्द करावे? मनोरंजनासाठी काय योग्य आहे?
इतर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची काहीही कल्पना मला नाही. जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.
कोण काय वापरते, किती खर्च येतो, सर्व्हिस कशी आहे त्याची ही माहिती द्यावी.
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्रोमकास्ट म्हणजे काय?
क्रोमकास्ट म्हणजे काय?
अमितव, खरं सांगू तर टीव्ही नसेलच तर चालू शकेल असे आहे कारण तेच तेच सिनेमे, भिकार सिरियल्स पाहून कंटाळा आलाय, फक्त रात्री काम करताना समोर काहीतरी सुरू राहावे आणि सुट्टी दिवशी काहीतरी मनरंजन म्हणून. मग चांगले पाहावे हा विचार मनात डोकावू लागला म्हणून हा बीबी प्रपंच.
झी5 फुकट आहे ना? की ते पण चार्ज करतात?
अमेझॉन प्राईम नेट्फ्लिक्स
अमेझॉन प्राईम नेट्फ्लिक्स असेल तर खरच तशी टीवी ची गरज नाही. चांगलं नेट असेल (४ एम बी मिनिमम आणि अनलिमिटेड डेटा) आणि जिओ च सिम असेल तर तसेही सगळे चॅनेल फुकट पाहता येतात. फोन टीवी ला कनेक्ट करू शकत असाल तर सगळं मोठ्या स्क्रीन वर अगदी चकटफू पाहता येतं.
गेली ३ वर्षे आमच्या घरी टी वी कनेक्शन नाहीय पण कधी गरजच भासली नाही. अमेझॉन प्राईम नेट्फ्लिक्स मुळे अॅड्स शिवाय कार्यक्रम पाहायची इतकी सवय झालीय की चुकून कधी कोणाच्या घरी जाऊन टीवी पाहीला तर अॅड्स डोक्यात जातात आता.
टाटा स्काय महीन्याला ३०० रु
टाटा स्काय महीन्याला ३०० रु याप्रमाणे ३५०० किंवा ३००० उकळतात. केबलवाले स्वस्त देतात त्यामानाने. माझ्याकडे टाटा स्काय आहे. सुर्वातीला ऑफर होती आता महाग पडत आहे.
>> झी5 फुकट आहे ना? की ते पण
>> झी5 फुकट आहे ना? की ते पण चार्ज करतात?
झी5, हॉटस्टार, सोनी, इरॉस नाउ, अल्ट बालाजी सगळेच थोडं कंटेंट फुकट देतात तर काही "प्रिमियम" कंटेंट बघायला पैसे द्यावे लागतात.
नेट्फ्लिक्स आणि अॅमॅझॉन प्राईम मात्र सब्स्क्राईब केल्याशिवाय अजिबात दिसत नाही.
मी टाटा स्काय् सोडून चार
मी टाटा स्काय् सोडून चार वर्शे झाली.
घरी वायफाय कनेक्षन, स्मार्ट टीव्ही लॅप टोप व स्मार्ट फोन आहे. ह्यातील टीव्ही फक्त प्लेस्टेशन वर गेम खेळायला उपयोगात येतो. प्लेस्टेशन मधूनच ह्या टीव्हीव र अमेझॉ न प्राइम, नेट फ्लिक्स, युट्युब व इतर बघता येते. हे मी वापरत नाही.
लॅपटॉपला त्यासाठीची खास बोस सिस्टिम आहे ती घेतली. ही मूळ बोस पेक्षा स्वस्त आणि मस्त आहे. ही पण सध्या कधी कधीच लावली जाते.
पण युट्युब वरऊन मी मॅकेनाज गोल्ड रेंट केलेला. त्यातील सुरुवातीचे शॉट्स मस्त ऐकू येतात व आपली नाचाची गाणी भांगडा, शारुक गीते वगैरे. मेन व्युइंग लॅपटोप वरूनच. पण ह्याला रिमोट नाही ज्याचा मला फार वैताग येतो.
कुत्रे बुटके आहे म्हणून मी त्यासोबत अश्याने जमिनीवरच गाद्या टाकल्या आहेत. त्यामुळे उटून चालू बंद करायचे तर वैताग येतो. तो आपण हून
बंद होईल तेव्हा होतो. ह्यामुळेच माझे सोफा व डायनिंग टेबल पण फारसे वापरले जात नाही. कुत्र्याला फार उंच उड्या मारल्या वर चढले तर आयव्ही डीडी रोग होउ शकतो म्हणून ही सर्व खबरदारी.
माझ्याकडे व्हूट, हॉट स्टार प्रीमीअम ( गेम ऑफ थ्रोन साठी) प्राइम व नेटफ्लिक्स जी फाइव व युट्युब आहे. हे फार विचित्र पद्धतीने मनाला येइल तसे वापरले जाते. पण सलग बसून काही ही बघायची व जाहिराती बघ्यायची सवय एकदम गेली आहे.
पहाटे उठल्याव र फोन वर जी फाइव वर तुपारे. २० मिनिटे जनरल उठून पूर्ण जागे व्हायला लागतात. तेव्हा गुरफटून ऐकते. हा हा ही ही करून मग उठून राधाक्का लावते व तयार होउन चहा बनवते. चहा पीताना लॅप टोप वर स्टीवन कोलबर्ट व सेथ मायर बघते. मग फिरून येतो
घर साफ करताना व्हूट वर घाडगे सून. हे फोन वर.
मग ऑफिस साठी तयार होताना आपली प्लेलिस्ट यु ट्युब वर लावते. निघताना बिनाका गीत माला रेडिओ वर लावुन जाते
संध्याकाळी, चला हवा येउद्या, नाहीतर तत्सम, नेट फ्लिक्स वरील कुकरी शो वगैरे. लॅप टॉपवर . तेव्हा फोन वर इतर सर्फिम्ग.
वीकांताला नेट फ्लिक्स वर प्रैम वर बिंज वॉच. सीरीअल्स मुव्हीज शोज. प्राइम वर जुने सिनेमे खूप आहेत व नवे येत राहतात. जरा मिडल क्लास पक्षी माझी चॉइस चे सिनेमे असतात. रवीवारी सकाळी बहुत करू न एका रविवारची सकाळ पुलंचे ऐकतेच. पेपर वाचताना.
रविवारी दुपारी जेवुन झोपताना प्राइम वर धूम टू. ह्याचे संगीत फार सूधिन्ग आहे मस्त झोप येते. रविवारी संध्याकाळी नो मीडिआ.
पुस्तक वाचन व लवकर झोप. नेट सर्फिंग फोन वर.
गूगल म्युझिक पण खूप वापरते. सावन रिलायन्स ने घेतल्यापासून. ह्यातही ऑडिओ गाणे सापडले नाही तर लगेच युट्युब येते. मग ते बघितले
जाते ऐकण्या ऐवजी.
बिंज वॉच करता येणे हा नेट्फ्लिक्स वगैरेचा एक महत्वाचा फायदा आहे. सी झन सीझन संपवता येतात.
माझ्या मते टीव्ही व लॅप टॉपची पण गरज राहिलेली नाही. स्मार्ट फोन वर सर्व काम होते. चांगले नेट व डेटा हवा मात्र.
मी रिटायर होईन तेव्हा हीच क्वालिटी ऑफ लाइफ स्वस्तात कशी मेंटेन करता येइल ह्यावर माझा विचार चालू अस्तो. त्याचे हे फलित आहे.
शिवाय सामान कमी. कॉन मारी.
कारण तेच तेच सिनेमे, भिकार
कारण तेच तेच सिनेमे, भिकार सिरियल्स पाहून कंटाळा आलाय, फक्त रात्री काम करताना समोर काहीतरी सुरू राहावे आणि सुट्टी दिवशी काहीतरी मनरंजन म्हणून. मग चांगले पाहावे हा विचार मनात डोकावू लागला म्हणून हा बीबी प्रपंच.>>
असं असेल तर सरळ टाटा स्कायला टाटा करा आणि फायर स्टिक घ्या.
Zee5 मोफत नाहीये, वर्षाला ₹९९९ पण ते ५ डिव्हाइसेस साठी, म्हणजे ५ जणात शेअर करता येईल, बहुतेक. तिघात केलं तरी महिन्याला ३०₹ .
Zee5, Hotstar चे 2 ऑपशन्स
Zee5, Hotstar चे 2 ऑपशन्स असतात..free आणि प्रीमियम. झी नेटवर्कच्या सगळ्या शिरेली (मराठी, हिंदी आणि इतर प्रादेशिक) फ्री मध्ये आहेत झी5 वर. शिवाय बरेच सिनेमेसुद्धा आहेत. नवीन सिनेमे, इंग्लिश मालिका आणि झी5 ओरिजिनल कन्टेन्ट साठी प्रीमियम subscription घ्यावे लागेल.
Same applies to Hotstar.
तसे तर sony liv App मध्ये पण
तसे तर sony liv App मध्ये पण सिरियल्स, शोज (हिंदी मराठी) फ्री आहेत.
पण एवढा खटाटोप करून काय परत त्याच शिरेली बघायच्या!
are sony liv has season 2 of
are sony liv has season 2 of the handmaids tale. you cant see such stuff in India otherwise. hotstar has good selection of documentaries. all apps have non sansaari non sanskaari content. netflix has cosmos. just the narrators soothing English helps destress. i love the way Netflix asks are you still watching ke mar gaye.
अमा, हो पण त्यासाठी sony liv
अमा, हो पण त्यासाठी sony liv प्रीमियमचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागते ना. मी फ्री बद्दल बोलत होतो.
पण sony liv premium चे वार्षिक चार्जेस कमी आहेत, ₹ ५००.
Handmaid's tale चा पहिला सिझन
Handmaid's tale चा पहिला सिझन कुठे आहे? कुठे फ्री असेल तर उत्तम! मला आता नवीन subscription सर्विस घ्यायची नाहीये. Prime, Netflix आणि Hotstar आहे.
Sony Liv वर पहिला सिझनपण आहे.
Sony Liv वर पहिला सिझनपण आहे. जर इतर कुठे मोफत उपलब्ध नसेल तर महिन्याचे सबस्क्रिप्शन घेऊन बघता येईल,
दक्षिणा,
दक्षिणा,
मला सर्वांचे प्रतिसाद वाचता आले नाहीत. त्यामुळे द्विरुक्ती होत असेल तर माफ कर,
तुझा प्रश्न मला आवडला आणि मनातलं लिहीलंस असं वाटलं. माझ्याकडे टाटा स्काय आणि व्हिडीओकॉन दोन्ही आहेत. टाटा स्कायच्या एचडी पॅकची क्वालिटी चांगली आहे. मात्र कार्यक्रम बकवास असल्याने हे घेतलं काय नि ते घेतलं काय. जर तुला बायकांच्या सिरीयल्स आवडत असतील तर मग हे मस्ट आहे.
तरीही एक ऑप्शन आहे. रिलायन्स गिगा फाय येतंय. फायबर ऑप्टीक. पुण्यात सगळीकडे केबल्स टाकून झालेल्या आहेत. इतक्याच सुरू होईल. अगदी कमी पैशात गिगाबाईट्सचा स्पीड मिळणार आहे. एकाच कनेक्शन मधे सर्व चॅनेल्स, वेबसिरीज, नेट मिळणार आहे. फोनही मिळणार आहे,.
ते येईपर्यंत जिओचे कनेक्शन घे. जिओटीव्ही तुला मोबाईलवर पाहता येईल. लाईव्ह शोजही पाहता येतात. तसेच जिओसिनेमावर वेबसिरीज आहेत. अॅमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, आल्ट बालाजी वगैरेही तोपर्यंत तू घेऊ शकतेस.
किरणुद्दिन ये हुई ना बात?
किरणुद्दिन ये हुई ना बात? मला अशा काहिश्या प्रतिसादाची गरज होती. वरचे सुद्धा चान्गलेच आहेत पण मी खूप कन्फ्युज झाले हे नक्की.
(सॉरी फारच अडाणी प्रश्न आहे)
मी आता खालिल गोष्टी विचारायला आले होते.
* माझा टिव्हि स्मार्ट नसेल तर तर स्मार्ट कसा करायचा? काय मार्ग आहेत?
* माझ्याकडे जिओ चा नम्बर आहे, त्याच्या मदतीने टिव्हि सिरियल्स कश्या पाहता येतील? कोणते अॅप डालो करायचे?
* अमॅझोन आणि नेट्फ्लिक्स च्या फायरस्टिक्स वेगवेगळ्या असतात ना?
जिओ नंबर असेल तर लॅपटॉपवर
जिओ नंबर असेल तर लॅपटॉपवर वेबसिरीज पाहू शकशील पण जिओटीव्ही हे अॅप फक्त मोबाईलवर चालतं. त्यासाठी फक्त नेट कनेक्शन लागतं. आयडियाचं असेल तरी चालेल. जिओनंबरने साईन करायचं आणि सुरूवातीला येईल तो ओटीपी एकदाच घालायचा.
तसं तर आयडियानेही अॅप दिलंय. त्यातही वेबसीरीज आहेत. पण टीव्ही नाही.
मोबाईल किंवा लॅपटॉम तुला टीव्हीला जोडता येतो. एचडीएमआय केबलने. टीव्ही फक्त एचडी पाहीजे. स्मार्ट टीव्ही असण्याची गरज नाही.
स्मार्ट टीव्ही नसेल तर अॅमेझॉन आणि प्राईमसाठी तुला फायर स्टिक घ्यावी लागेल. ती ऑनलाईन पण मिळेल.
Amazon prime is one thing.
Amazon & prime is one thing. Fire stick is useful purchase if you like watching broadcasts on TV. If you like watching on phone or tab then firestick not required. You can watch all app based broadcast with firestick on TV. Now some android tv is also in market then firestick not required( in case you are contemplating changing TV also). If you buy fire stick during amazon sale then the prices are down and you get cashback...
फायर स्टिकने टीव्ही स्मार्ट
फायर स्टिकने टीव्ही स्मार्ट टीव्ही मध्ये कन्व्हर्ट झाल्या सारखे आहे. ऍमेझॉन प्राईम, नेटफलिक्स, टेड आणि सगळं काही जे स्मार्ट टीव्हीवर बघता येतं ते बघता येईल.
जर तुम्हाला वैयक्तिक वापरा करता हवं असेल तर किरणूद्दीन यांनी सांगितल्या प्रमाणे फोनवरच सगळे ऍप्स वापरून टीव्हीवर बघता येईल. त्यासाठी Micro USB to HDMI केबल लागेल ती दुकानात सहज मिळेल.
पण कॉल आला की तुम्ही बोलणार, इतर कुणी बघणारे असेल त्यांना तोपर्यंत थांबावे लागेल. व तुम्ही बाहेर गेल्या तर त्यांना त्यांच्या फोनवर हे सगळे करावे लागेल. हा इश्यू होत नसेल तर हा सुद्धा छान ऑप्शन आहे.
पण हाती रिमोट नसेल, फॉरवर्ड, पॉज करणे, सर्च करणे सगळं टिव्हीजवळ जाऊन फोनवर करावे लागेल.
https://channel.trai.gov.in/
https://channel.trai.gov.in/
टाटा स्काय वाले लबाडी करतात.
टाटा स्काय वाले लबाडी करतात. https://www.misalpav.com/node/31338
धन्यवाद भरत
धन्यवाद भरत
प्रकाश घाटपांडे, तुम्ही "ठीक
प्रकाश घाटपांडे, तुम्ही "ठीक आहे," असे सांगितले त्याचा अर्थ त्यांनी तुम्ही जावेद अखत अॅक्टिव्ह साठी रुकार दिलात असा घेतला असेल का?
वेबसाइटवर चॅटची सोय चॅट सेव्हही करता येते. मी चॅट वरूनच मल हवे /नको ते चॅनेल अॅड /रिमुव्ह करत असतो आणि प्रत्येक वेळी ते मी आता हे असं करणार आहे, करू ना? अशी पुन्हा कन्सेंट घेतात.
टाटा स्कायचं माहीत नाही, पण जिथे फोन करून असं पॅकेज विकलं जातं तिथे फोन कॉल्स रेकॉर्ड केले जात असावेत. अॅक्सिसडायरेक्ट वाल्यांचा अनुभव.
भरत, आता नुकताच टाटा स्काय
भरत, आता नुकताच टाटा स्काय मराठी सिनेमा संमती नसताना माझ्या गळ्यात मारला होता. असाच फोन. परत मानभावीपणे तुमच्या विनंतीवरुन हे चॆनल ड्रॊप करीत आहे असे म्हणुन मग काढून टाकले. संमती नसताना तुम्ही ते ऎड कसे केलेत या मुद्द्यावर मी ठाम राहिलो. मी वार्षिक पॅक घेत असल्याने त्याच वेळि हे लोक गडबड करतात.
हं.
हं.
या विषयावर म्हणजे टिवि/सर्विस
या विषयावर म्हणजे टिवि/सर्विस/वर्गणी इ सविस्तर लेख अपेक्षित आहे.
पण जिओ नेट आल्यावर हे सर्व उलट होणार हे नक्की.
दक्शे सध्या एकदम बदलू नको, ते
दक्शे सध्या एकदम बदलू नको, ते चॅनल पॅक वालं झेंगट आलंय ऑलरेडी. आणि ईट लूक्स लाईक लई म्हाग. टाटा स्काय करता तरी. त्यांची साईट चेक कर एकदा.
माझं मत वर अमित म्हणालाय तसं करून पाहा. लॅपटॉप, फोन वर सगळे अॅप्स घेऊन तिथे पाहाता येईल. नंतर फायर स्टीक घेऊन टिव्हीवरही पाहाता येइल. तोवर हे चॅनल चं तुणतुणं सेटल होईल.
अरे.. जेनुयीन धागा निघाला,
अरे.. जेनुयीन धागा निघाला, मला वाटलेला भारंभार मधला एक अडडिशन आहे की काय.☺️
माझ्या पोस्ट्सवरून मी टाटा
माझ्या पोस्ट्सवरून मी टाटा स्कायचं मार्केटिंग करतोय, असं वाटू शकेल. पण तसं नाही.
बर्याच जणांनी पॅकेज महाग आहे, मेक माय पॅक भलतंच महाग आहे, असं म्हटलंय.
मी सुरुवातीपासून , वर व्यत्यय यांनी म्हटलेलं अॅन्युअल ग्रँड पॅक घ्यायचो. सगळी हिंदी ,इंग्रजी मनोंजन, चित्रपट आणि बातम्यांची चॅनेल्स, परत मुलांची , लाइफस्टाइल आणि माहितीपर चॅनेल्स यायची. बघितली जाणारी चॅनेल्स मात्र मोजकीच होती. शिवाय नेहमी बघायचे प्रोग्राम सोडले सर्फिंग करत राहिलं तर कुठे ना कुठे , हे इंटरेस्टिंग वाटतंय, करून काहीतरी पाहिलं जायचं. ते पाहिलं नसतं, तर काही फरक पडला नसता, असंही तेव्हा नाही तरी पुढे वाटलं.
बफे सिस्टिममध्ये ताटात भरभरून वाढून घ्यावं आणि त्यातलं बरचसं वाया जावं, त्यातला प्रकार . आपण यात पैसे आणि वेळ वाया घालवतोय (बफे सिस्टिममध्ये ताटात भरभरून वाढून घ्यावं आणि त्यातलं बरचसं वाया जावं, त्यातला प्रकार ) असं लक्षात आल्यावर मेक माय पॅकमध्ये अगदी काटेकोरपणे, पाहायचीच आहेत अशी चॅनेल्स निवडायचं ठरवलं तेव्हा त्यांचं मिनिमम बिलही भरेना. मग काही चॅनेल्स भरीला घेतली.
आताही तीन पाच भारतीय न्यूज चॅनेल्स, बीबीसी, सीएनेन , तीन इंग्रजी मनोरंजन चॅनेल्स आणि २-३ स्पोर्ट्स चॅनेल्स आहेत.
एखाद्या चित्रपटाचा प्रिमियर असला तर त्या दिवसापुरतं ते चॅनेल घेतो. मध्ये टाटा हिंदी सिनेमा क्लासिक आणि प्रिमियरही घेतलेले.पण तेही बंद केले.
इथे व्यत्यय इ.नी म्हटलंय तसं डिशला टाटा करून नेटवरून हवं तेच पाहणं अशक्य नाही. पण जोवर हे गाडं चालतंय, तोवर दुसरं घेऊ नये अशी माझी थोडी जुनाट मानसिकता आहे,
आजची टाटा स्काय अपडेट, सगळ्या
आजची टाटा स्काय अपडेट, सगळ्या चॅनेल ची लिस्ट साईटवर अपडेट झाली आहे आणि ग्राहक म्हणून आपल्याला 1 फेब पर्यंत जे जे चॅनेल्स हवेत ते निवडायचेत.
जर आपण ते निवडले नाहीत तर एक फेब नंतर तुमच्या आता असलेल्या चॅनेल पॅक शी मिळताजुळता पॅक ऑटो ऍक्टिवेट होईल आणि त्यानुसार चार्जेस लागतील.
तुम्ही जर वार्षिक पॅकवर असाल तर बाकी राहिलेल्या महिन्यांचे पैसे तुमच्या टाटा स्काय अकाउंट ला परत येतील आणि वर म्हटल्याप्रमाणे मिळताजुळता पॅक चालू होईल.
यापुढे कुठलेही लॉंग ड्युरेशन पॅक राहणार नाहीत.
मिळताजुळता पॅक मे बी महाग पडू शकेल, सो तुम्हाला हवे असलेले चॅनेल्स निवड करून लिस्टून घ्या आणि साईटवर जाऊन चेंजस करा,
यापुढे कॉल सेंटर वरून कुठलेही पॅक किंवा कसल्याही प्रकारचं ऍक्टिव्हशन होणार नाही, ग्राहकाला स्वतः ते साईट किंवा अँप वरून करायला लागेलं किंवा डीलर कडून करून घ्यावे लागेल
हे सगळ्या सर्विस प्रोव्हायडर्स ला लागू आहे
ही माहिती मी आज कॉल सेंटर ला फोनून घेतलीय
मी वर trai ची एक लिंक दिलीय.
मी वर trai ची एक लिंक दिलीय. एकट्या जावेद यांनी ती वाचलेली दिसतेय.
आज टीव्हीवर कोणतंही channel की त्याची मासिक फीही काही क्षण दाखवली जातेय.
भरत हीच लीस्ट आणि किंमत टाटा
भरत हीच लीस्ट आणि किंमत टाटा स्काय च्या साईटवर ही आहे. आय मीन सगळ्यांच सर्वीस प्रोव्हायडर च्या साईटसवर ही असेल...
Pages