टाटा स्काय की इतर काही? काय घ्यावे?

Submitted by दक्षिणा on 22 January, 2019 - 08:36

मी सध्या टाटा स्काय वापरते आहे. (वर्षभराचे एकदम एच डी सहित) बरेच महाग पडते असे इतरांचे मत.
यातही माझ्याकडे इंग्रजी सिरियल आणि चित्रपटाचे सबस्क्रिपशन नाही. सध्या नेट्फ्लिक्स, अमॅझोन प्राईम च्या जमान्यात टाटा स्काय ठेवावे की बन्द करावे? मनोरंजनासाठी काय योग्य आहे?
इतर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची काहीही कल्पना मला नाही. जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.
कोण काय वापरते, किती खर्च येतो, सर्व्हिस कशी आहे त्याची ही माहिती द्यावी.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१३ तारखेच्या रात्रीपासून केबलवाल्याने सर्व बंद केलंय. फ्री चॅनेल्स दिसत नाहीत.>>>> देवकीताई, केबलवाल्यांना मुदत वाढवून मिळलीये, ३१ मार्च, तोपर्यंत सगळे चॅनेल्स दिसायला हवेत, बोलून बघा त्यांच्याशी

केबलवाल्यांना मुदत वाढवून मिळलीये, ३१ मार्च, तोपर्यंत सगळे चॅनेल्स दिसायला हवेत>>>>> हे झालंय सांगून.

आता कोणाकडूनही चानेल्स पाहिले तरी पैसे तेवढेच मोजावे लागणार आहेत ना? मग द्या केबलच्या डिपोझिटवर ( ४००?)पाणी सोडून. असेही नुकसान होतच आहे. चानलचे आगावू जादा भाडे भरले नसले तर बाहेर पडायला मोकळे.

टाटा/डिशटिवी/किंवा इतर कोणती डिटिएच घेऊन या.

फ्री चानेल्स पाहायलासुद्धा महिन्याचे डबाभाडे रु १५३ भरावे लागतातच. >>> का बरे? डीडी डायरेक्ट प्लस घ्या की.. आमची तीच आहे. सगळी फ्री चॅनेल्स, नो मंठली चार्जेस..

काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धूने पुलवामा हल्ल्याबद्दल केलेल्या वक्तव्याने लोक संतापले होते.
Fans have asked to remove Sidhu from the show, or else they won't watch The Kapil Sharma Show and will they will unsubscribe Sony TV. A few of them even unsubscribed Sony TV!

आता असा लगेच चॅनेल काढून टाकता येतो का? सोनीला बऱ्याच लोकांनी काढलं असावं कारण सिद्धूला खरोखरच sack केलं त्यांनी.

आता असा लगेच चॅनेल काढून टाकता येतो का? >>> हो >>>
आता मंडळींनी रंग दाखवायला सुरु केलेत ! काही चॅनल्स ३० दिवसाच्या लॉक इन वरच घ्यावे लागतात असं मला जाणवलं हल्लीच (डिश टिव्ही वर).

केबलवाल्यांची काय स्थिती आहे?>>>>>
आमच्याकडे ₹ १५० बेसिक चे + ₹२० चार्जेस २५ चॅनेल पर्यंत + जे काही चॅनेल चे पैसे असतील ते पूर्ण महिन्याचे घेतायत

या व्यतिरिक्त त्यांनी वेगवेगळे packages केलेत जसे गोल्ड, सिल्व्हर, diamond, रिजनल
आमचे आधी ३५० महिना होते जे आता फक्त २७७ झालेत

आमच्याकडे एक केबल चा अन एक Videocon चा सेट टॉप बॉक्स आहे, त्यापैकी सध्या फक्त केबल चा चालू केलाय. इकडे कोणाकडे Videocon असेल तर एक प्रश्न आहे की फ्री चॅनेल मधून नको असलेले चॅनेल वगळून २० ₹ हँडलिंग चार्जेस कमी करता येतात का?

केबलवाल्यांनी प्रचंड लूट माजवली आहे. त्यांनी त्यांच्या मनाने पॅक बनवून दिले आहेत. एक तर ते तरी घ्या नाही तर हँड पिक करा. ते एका चॅनल हाउसचा पॅक (जसे की झी ची सगळी चॅनल्स) देत नाहीत. मी आधी एच.डी. करता ५०० रु भरायचो आता किमान ७०० रु लागणार आहेत मला हवी असलेली चॅनल्स पहायला. (ही माहिती इन केबल बाबतची आहे आणि एक महिन्यापूर्वीची आहे. सध्या कही बदल असतील तर कल्पना नाही).

मालिका बघणारा प्रेक्षकवर्ग नसल्यामुळे मी केबल बंदच केली. सिनेमा बघायला प्राइम आहेच. आणि काही ठराविक कार्यक्रम त्या त्या चॅनल्सच्या अ‍ॅपमधून बघता येतातच. एक दिवस उशीरा येतात पण त्याने मला काही फरक पडत नाही.

ए काय आहे परिस्थिती? काल आईशी फोन वर बोलत होते. थकली आहे. पण सारखा टीव्ही लागतो. ये इकडे म्हण णार होते पण इथले प्रतिसाद वाचून टीव्ही परत घेणे काही शक्य नाही हे लक्षात आले. अ‍ॅप तिला जमेल असे वाटत नाही.

https://bestmediainfo.com/2023/02/cable-operators-vs-broadcasters-fight-...

आज केबलवर झी आणि स्टारची चॅनेल्स दिसत नाहीएत. त्यांनी / ट्राइने दर खूप वाढवलेत आणि केबलवाले 'ग्राहकहितासाठी' ते भरायला तयार नाहीत.

आमच्याकडे सोसायटीचं मेजर रिपेयर काम चालू असताना कामगारांनी टाटा स्कायच्या डिशला काहीतरी केलं. एकदा दुरुस्त केल्यावर काही दिवसांनी पुन्हा तोच प्रकार. म्हणून तेव्हा केबल घेतलं . आता रिपेयर काम संपलंय. टाटा वाल्यांना बोलवायला हवं.
मी केबलवरही मला हवी तेवढीच मोज की चॅनेल्स घेतली आहेत. मी स्पोर्ट्स चॅनेल्स ग्रँड स्लॅम इ. पुरती घ्यायचो.
- एक चॅनेल घेतलं की ते महिनाभरासाठी ठेवलंच पाहिजे.
बरं आता महिना झाला - ड्रॉप करा.
-असं सारखं सारखं चॅनेल अ‍ॅड ड्रॉप केल्याने सेट टॉप बॉक्स हँग होतो असं उत्तर मिळालं.

टाटा वाल्यांना बोलवायला हवं.

A) कोणतीही डिश ( टाटा, डिशटीवी ,सरकारी फ्री वगैरे )सटेलाईटकडे वळणे फारसे अवघड नाही.
तुमच्या टीव्हीवर सिग्नल स्ट्रेंथ(१) आणि सिग्नल क्वालिटी(२) दाखवणारा आलेख सेटिंग्ज मधून पाहता येईल. तर क्र(१) ९५%च्या पुढे आणि क्र(२) ९०%च्यापुढे असेल तर डिश बरोबर सेट/अलाईन आहे. तसं नसेल तर (हे आकडे कमी असले) तर सेटटॉप बॉक्स पर्यंत सिग्नल पोहोचायला वेळ लागतो आणि बॉक्स हँग झाल्यासारखा होतो.
DIY

B) dish align करणे.
B _1)माझ्या बाल्कनीलाच डिश लावली असल्याने ( पूर्व आणि दक्षिण दिशेच्या बाल्कनीला हा फायदा मिळतो) मी एकटाच अलाईनमेंट करू शकतो. सिग्नल वाढेल अशी फिरवतो.
B_2) connecters साफ करून पुन्हा लावणे.
B_3) dish गच्चीवर असेल तर मात्र दोन माणसांची गरज लागते. एकाने वरून फिरवणे व दुसऱ्याने मोबाईलवरून सिग्नल वाढतो का कमी होतो सांगणे.
यासाठी डिशवाले एक मिटर वापरतात व ते जागेवरच max signal adjust करतात. तीनशे रुपये घेतात.
बाकी वरची क्र (A)चाचणी करून पाहू शकता. सिग्नल किती कसा आहे.
___________________
असं सारखं सारखं चॅनेल अ‍ॅड ड्रॉप केल्याने सेट टॉप बॉक्स हँग होतो

Box switch off करून एक मिनिटाने ओन करा. क्याश निघून जाईल. शिवाय सेटिंग्ज मध्येही काही रिसेट सोयी असतात त्या वापरता आल्या पाहिजेत.

Tata dish माझ्याकडे आहे पण वापरत नाही. ( त्यात रेकॉर्डींग करायचा डबा महागडा घ्यावा लागतो.) डिशटिवीने पेनड्राईव वाला स्वस्तात दिला म्हणून तो घेऊन तोच वापरतो. पण डिशटीवीपेक्षा टाटाची पिक्चर क्वालिटी उजवी आहे.

<असं सारखं सारखं चॅनेल अ‍ॅड ड्रॉप केल्याने सेट टॉप बॉक्स हँग होतो> एकदा अ‍ॅड केलेले चॅनेल ड्रॉप करायला सांगितलं की केबलवाल्याकडून अशी उत्तरं मिळतात. सेट टॉप बॉक्स किंवा त्यांच्याकडची सिग्नल यंत्रणा चॅनेल अ‍ॅड / रिमुव्ह न करताही मध्ये मध्ये हँग होते.

टाटाचा विदाउट रेकॉडिंग वाला सेट टॉप बॉक्सही असतो ना? माझ्याकडे आधी तोच होता. रेकॉर्डिंगवाला सोयीचा पडतो. कार्यक्रम हवा तेव्हा बघता येतो. मध्ये थांबता येतं. रिवाइंड करून पुन्हा पाहता येतं. जाहिराती / कंटाळवाणा भाग पळवता येतो.
--------------
मी आता इथे लिहिण्याचं कारण ती वर लिंक दिलेली बातमी आहे.

माझ्याकडे टाटाचा विदाउट रेकॉडिंग वाला सेट टॉप बॉक्सच आहे. पण रेकॉडिंग हवे होते आणि ते डिशटीवीत स्वस्तात देत होते. कारण पेन ड्राईव फक्त लावायचा. आणि ते साठवलेले कार्यक्रम वेळ मिळेल तेव्हा बघून डिलीट करणे एवढीच सोय हवी होती/आहे. टाटा देते ती पाचशे जिबी इनबॉक्स नको.

ट्राय वाल्यांनी दर वाढवले आहेत ५ रुपये वरुन एकदम १९ रुपये. म्हणुन केबल बंद आहे सगळीकडे. झी, प्रवाह अन सोनी.

जे लोक (जेष्ठ नागरिक) फक्त काहीच बातम्या चानेल आणि मराठी मालिका बघतात त्यांना केबल महाग पडते. केबलवाले एकच फिक्स्ड भाडे लावतात.

आप ल्याला हवी तेवढीच चॅनेल निवडून तेवढ्याचेच पैसे भरायची सोय आहे. पण त्याने फार फरक पडत नाही. सुट्या सुट्या चॅनेलसाठी दर जास्त आहे.

त्यात एक पळवाट आहे. सर्वीस प्रवाईडरचे एक तरी बेसीक पॅकेज घ्यावे लागते. मग निवडलेले चानेल्स आणि १५३ रु सरकारी टॅक्स आहे.

मला वीस रुपयांचे दोनच चानेलस हवे आहेत ,चाळीस रु देईन - तसं करता येत नाही.

Pages