टाटा स्काय की इतर काही? काय घ्यावे?

Submitted by दक्षिणा on 22 January, 2019 - 08:36

मी सध्या टाटा स्काय वापरते आहे. (वर्षभराचे एकदम एच डी सहित) बरेच महाग पडते असे इतरांचे मत.
यातही माझ्याकडे इंग्रजी सिरियल आणि चित्रपटाचे सबस्क्रिपशन नाही. सध्या नेट्फ्लिक्स, अमॅझोन प्राईम च्या जमान्यात टाटा स्काय ठेवावे की बन्द करावे? मनोरंजनासाठी काय योग्य आहे?
इतर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची काहीही कल्पना मला नाही. जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.
कोण काय वापरते, किती खर्च येतो, सर्व्हिस कशी आहे त्याची ही माहिती द्यावी.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल टाटा स्काय वर मी मोजुन चार चॅनल्स निवडले. १९२/- झाले. आई बाबांसाठी झीचे दोन मराठी चॅनल्स आणि कलर्स मराठी, मुलासाठी निक. ते तिघे सोडले तर बाकी सगळे youtube, netflix, amazon prime, hotstar वाले आहेत.

लगेच तासाभरात पॅक चालू झाला आणि आज बाकी पैसे परत आले.

आता बाकी चकटफू चॅनल दिसत नसतील तर विकांताला ॲड करेन.

Are amcha Videocon d2h ahe. Customer care la call lagat nahi . Pls kahi link asel tar dya

मी आधी व्यक्त केलेले मत मटा ने देखिल दिले!!

https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/science-technology/r...

पुर्वी मला जे चॅनेल दिसत होते तेवढया रकमेत माझे १०-१२ चॅनेल कमी झाले आहेत.. एकहि चॅनेल वाढला नाही...

जर तुम्ही एकाच चॅनेलवरचे बरेच कार्यक्रम पाहत असाल, तर ते चॅनेल घेणं स्वस्त पडेल.
पण प्रत्येक चॅनेलवरचे एक दोन कार्यक्रम पाहिले जात असतील, तर नेटवर पाहणं स्वस्त पडेल.
घरात जास्त मेंबर असल्याने प्रत्येकाच्या आवडीचे म्हणून जास्त चॅनेल घ्यावी लागत असतील, तर दरडोई खर्च कमीच येईल की.

ह्या निर्णयामुळे पुर्वी पेक्षा स्वस्त होईल हा ट्रायचा दावा चुकिचा आहे.. एवढेच म्हणणे..
तुम्ही जे बहुतेकवेळा ७-८ चॅनेल पाहता तेवढेच तुम्हाला सध्या देता त्या पैश्यात बघता येतील ह्या १०० फुकट चॅनेल व्यतिरिक्त.
माझे स्पोर्टस ३ एचडी बंद झाले सोनीचे सगळे चॅनेल बंद झाले जे पुर्वी मला दिसत होते. मराठी बातम्यांचे २ चॅनेल बंद झाले जे मी नियमित पहात होतो. दुसरा एकही चॅनेल वाढला नाही जो पुर्वी मला बघता येत नव्हता.. निव्वळ तोटा..

बरोबर.

Finally, the Application attempts to optimise your bill by checking if there are bouquets on offer which will reduce your total monthly bill without reducing the channels you have selected.Provision has also been made to download or take print out of your channel selection along with optimized price of TV selection
वर आणखी एक डिसरप्शन

अनेक 'कंडिशन्स अप्लाय' ऑफर्स असतात त्याप्रमाणे ही पण म्हटली तर किफायतशीर म्हटली तर पूर्वीईतकी किंवा थोडी महाग ऑफर आहे.आमची आधीची धमाल कीड अधिक रिजनल मराठी पॅक होती.ती आम्हाला 358 रु महिना पडायची(ती फार विचार न करता कॉल सुंदऱ्या म्हणतील त्याला हो म्हणून घेतली होती.)
आता चॅनल निवडताना जाणवलं की यातले बरेच आपण गेली अनेक महिने लावले नाहीत.घरात फक्त बातम्या, पोगो,निक,कार्टून नेटवर्क, डिस्कव्हरी आणि सिनियर सिटीझन असल्यास मराठी इतके चॅनल लागतात.कलर्स हिंदी 22 रु चा होता त्याला बायबाय केले.अजून एक हिंदी सिनेमाचा चॅनल 17 रु चा होता त्याला टाटा केले.बर्याच महाग चॅनल ला बायबाय केले.फुकट वाले बरेच ऍड केले.शेवटी 358 चे काहीतरी 251 होऊन बाकी पैसे बॅलन्स ला आले.जे नाहीत त्याची उणीव भासणार नाही.हुक आणि प्राईम आहेतच.

अनेक फालतू चॅनेल्स बंद होतील.... जी टिकतील त्यांना बऱ्यापैकी दर्जा राखावा लागेल.... काही काळ लोटता मोजके आणि दर्जेदारच पर्याय उरतील... हाच काय तो एक फायदा दिसतोय मलातरी!

मोटो जी५ प्लस स्मार्ट टीव्हीला कसा जोडायचा. कास्ट करण्यासाठी गूगलचे ते काहीतरी छोटे उपकरण मिळते ते घ्यावे लागेल का. HDMI हा काय प्रकार आहे. स्र्कीन मिररींगचे अनेक अॅप डाऊनलोड करून बघितले पण ते काही होत नाही. माझ्या चार वर्ष जुन्या HTC वरून स्र्कीन मिररींग आरामात होते मग यावरून का नाही, हा तर लेटेस्ट फोन आहे ना नोगाटवाला.

स्मार्ट टीव्ही असेल तर क्रोम कास्ट उपकरणाची आवश्यकता नाही. मोटो g५ फोनच्या सेटिंग मध्ये डिस्प्ले मध्ये गेल्यावर त्यात कास्ट हा ऑप्शन आहे का? असल्यास तिथे जाऊन तिथे काय सेटिंग्ज असतील तर बघा.

सो काल चॅनल्स निवडले. काही ठीकाणी लक्ष्यात आले की एचडी ची किंमत एस डी पेक्षा कैच्या कै महाग आहे, फॉर नो रिझन. उदा. झी टॉकिज एचडी १९/- ला आहे पण हेच एसडी मध्ये केवळ २/- ला Uhoh

दुसरं म्हणजे झी मराठी, हे एचडी आणि एसडी दोन्हीत १९/-

आता पुन्हा सॉर्ट करणार लिस्ट आणि जे अगदी नेहेमी पाह्यल्या जातात ते एचडी घेणार (२०/२२ रुपड्यांवाले) बाकी जे स्वस्त एचडी आहेत ते ऑलरेडी घेतलेत उदा. आजतक एचडी केवळ १ रुपयांत आहे, तसंच फॉक्स लाईफ एचडी हे ही केवळ दीड रुपयांत!

लाईफस्टाईल ग्रूप मध्ये काही तरी १०/- मध्ये १० एचडी आहेत, पण मग त्याला पॅक ब्रॉडकास्टर नुसार निवडायला लागणार. हुश्य...
बघू अजून एक्सप्लोअर करतोय...

बाकी उरलेल्या महिन्यांचे पैसे अकाउंट ला परत आलेत आणि काल निवडलेल्या पॅक नुसार चॅनल्स दिसायला लागलेत.

@मानव- कास्टचा पर्याय आहे पण त्यात पुढे काही सेटिंग नाही आणि आपोआप कास्टही होत नाही. हे गौडबंगाल काही सुटत नाही.

नियमावलीमुळे केबल-डीटीएच शुल्कात १५ टक्के कपात , ट्रायचा दावा

http://m.lokmat.com/business/rule-15-reduction-cable-dth-fee-trat-claim/

कुणाचे कमी झाले असतील तर आनंदच आहे, पण बहुतांशी ते वाढलेलेच आहेत असं मला तरी वाटतं.

डीटीएच वाल्यांच्या कॉल सेंटर्समधल्या लोकांची अवस्था नोटाबंदीच्या वेळच्या बँक कर्मचार्‍यांसारखी झाली असावी.

मी आताच अ‍ॅड केलेली चॅनेल्स ड्र्रॉप केल्याचे सुटे सुटे एसेमेस सकाळीच आले.साइट वर पाहिलं तर सगळी चॅनेल्स आहेत पॅकमध्ये . चॅट केलं तर एक म्हणतो परत अ‍ॅड करा.
टीव्ही लावून पाहिला तर चॅनेल्स चालू आहेत. हे दुसर्‍याला सांगितल्यावर तो म्हणतो एसेमेस इग्नोर करा.

दोघांनीही चॅट मध्येच कट केले. आधी अगदी फुरसतीत, आता आला आहात तर जेवूनच जा अशा गप्पा मारायचे.

मराठी चॅनेल्सच्या यादीत एबीपी माझा दिसत नाही, पण टीव्हीवर अजूनही चालू आहे. मी आधीसबस्क्राइब केलेली पण आता ड्रॉप केलेली चॅनेल्स दिसत नाहीएत.
ड्यु डेटही सारखी बदलतेय असं वाटतंय.

@चंपा:
कास्टच्या पर्याय मध्ये जा. मग स्क्रीनवर उजवीकडे वर तीन उभे डॉट दिसतात त्यावर क्लिक करा आणि wireless adapter वर क्लिक करा. मग त्यात near by devices मध्ये तुमचा टीव्ही सिलेक्ट करा.
हे करण्यापूर्वी तुमच्या टीव्हीवर screen mirroring सुरू ठेवा.

भरत, हो, टाटास्काय च्या १, २, ३ या स्टेप्स मधून निवडलेले चॅनल्स लागू होतात. पण नंतर येणारे SMS आणि Home मध्ये जाऊन manage my packs मध्ये दिसणारे आपले सिलेक्टेड पॅक्स यात तफावत / खूप टाइमलॅग आहे - दिवसांचा.
मी तीन दिवसांपूर्वी तक्रार नोंदवली, अजून रिप्लाय नाही.

मला वाटते लोकांचा टीव्हीचा नाद तोडायचा कट रचलाय हा! Wink

सगळेच जन परेशान...
मी काल सर्व हिंदी करमणूक चॅनेल काढून टाकले सर्व मुव्ही चॅनेल काढून टाकले.
मराठी चॅनेल सर्व बातम्या आणि स्टार स्पोर्ट एच डी १ एवढेच ठेवले. तरी पैसे कमी नाही झाले की दिवसही वाढले नाही...
आता एवढा महिना बघायचे नाही तर टीव्हीला राम राम! ते शंभर फुकट चॅनेल वगळता केवळ २४ चॅनेल निवडले त्यातही १८ चॅनेल फ्री किंवा १० पैश्या पेक्षा कमी वाले (बहुतांशी बातम्यांचे) निवडले.
लगेच बदल झाला चॅनेलमध्ये परंतु अंतीम तारीख बदलली नाही.. कुछ तो गडबड है दयाला बोलावायला हवे...

मी पण काल हा चॅनल चा व्यायाम केला. नेहमी पाहते ती एच डी चॅनल्स ठेवली आणि बाकी उडवली.
महिन्याचे ३७१ रु दाखवतेय. एस डी चॅनल्स जी फुकट आहेत तीच. मी सगळी एच डी घेतल्याने किंमत वाढली असली तरिही जितके आधी पे करत होते त्यापेक्षा कमीच आहेत. आधी वर्षाला ६६०० भरून ठेवले होते आता ३७१ ने ४५०० वगैरे होतायत. प्लॅन बदलल्यावर व्हॅलिडीटी मे पर्यंत गेली आहे, तोवर काहीही करणार नाही. पुढचं पुढे बघू.

hd चॅनल साठी hd सेट टॉप बॉक्स हवा कि sd सेट टॉप बॉक्स कनेक्ट करुन hd कनटेन्ट पाहता येतं.
of course, टि व्ही hd आहे.

आमच्या केबलवाल्याने आधीची सगळी चॅनेल्स अजूनही ठेवली आहेत आणि नवऱ्याने स्टार मुवीज, HBO हवी आहेत म्हणून सांगितलेलं, ती काढून टाकली आहेत Lol

एबीपी माझा आजपासून फ्रीमध्ये नेलाय ( ०.५० >>फ्री!!) म्हणून दिसतो.
>>>>>>> हे मी अजून एकाकडून ऐकलं. १३ तारखेच्या रात्रीपासून केबलवाल्याने सर्व बंद केलंय. फ्री चॅनेल्स दिसत नाहीत.

Pages