टाटा स्काय की इतर काही? काय घ्यावे?

Submitted by दक्षिणा on 22 January, 2019 - 08:36

मी सध्या टाटा स्काय वापरते आहे. (वर्षभराचे एकदम एच डी सहित) बरेच महाग पडते असे इतरांचे मत.
यातही माझ्याकडे इंग्रजी सिरियल आणि चित्रपटाचे सबस्क्रिपशन नाही. सध्या नेट्फ्लिक्स, अमॅझोन प्राईम च्या जमान्यात टाटा स्काय ठेवावे की बन्द करावे? मनोरंजनासाठी काय योग्य आहे?
इतर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची काहीही कल्पना मला नाही. जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.
कोण काय वापरते, किती खर्च येतो, सर्व्हिस कशी आहे त्याची ही माहिती द्यावी.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टाटा स्कायच्या साइटवर सुरुवातीपासूनच होती. ती पाहूनच तर मी मेक माय पॅक करतोय.
पण आता अख्खा बुके घेण्याऐवजी, लोकांनी हवी ती फुलं किंवा त्यांच्या पाकळ्यासुद्धा निवडून घ्याव्यात, असा ट्राइचा उद्देश दिसतोय.

Micro USB to HDMI केबल लागेल ती दुकानात सहज मिळेल.>>मानव मला ही हवी आहे. दुकानात मिळाली नाही. Online समजत नाहीये. लिंक देऊ शकाल का? आणि मग ते स्क्रीन मिररींगसाठी क्रोमकास्ट का वापरतात?

मी काही वर्षांपूर्वी मेक माय पॅक करायचा प्रयत्न केला होता.पण बेस चे पैसे सक्तीचे आणि वरचा मसाला मेक माय पॅक आणि वरचे पैसे असा काहीतरी प्रकार होता.
मग एक अगदी कमी पैश्याचा प्लॅन होता.पण वर योकू ने म्हटल्या प्रमाणे तो चालू करेपर्यंत दुसरा प्लॅन लागू होऊन पैसे कट झाले होते.मग कॉल सेंटर वर वेगवेगळ्या मॅक जॉन अब्दुल सार्थक मेरी शी भांडण करून त्यांना ट्विट केले.मग एका सुंदरी ने फोन करून धमाल पॅक करून दिला.मुलांचे सर्व चॅनल आणि मराठीचे चॅनल, हिंदी पिक्चर,बातम्या दिसतात.इंग्लिश काहीच दिसत नाही.ते हुक आणि प्राईम वरून मिळतं.

अरे काय निर्णय झाला बरे?

प्रयोग शील आय डी इथेच आहेत म्हणून इथेच लिहीते. सध्या कुंभ मेळा चालू आहे त्या निमित्ताने स्पिक मॅके नावाची एक संस्था आहे त्या तर्फे रोज शास्त्रीय गायन वादनाचे कार्य क्रम आहेत. रोज कायच्या काय वाद्ये होती म्हणून ऐकत नव्हते. आज रोनु मुजुमदार व एक जण बासरी वाजवत आहेत. हे सर्व स्पिक मॅजेच्या पेज वर फेसबुक वर लाइव्ह चालू आहे. हे मी फोन चार्जिंगला लावून त्यावर ऐकत आहे. हेडफोन पण नाही. इथे अगदी निरव शांतता आहे त्यामुळे मजपुरता आवाज आहे.

मधून मधुन रामायण मधील चौपाई, हनुमाना ची प्रार्थना वगिअरे आहे पण ते चालते. एक प्रकारचा प्रांजल सुर आहे.

असे अनेक गृप आहे त फेसबुक वर. माझ्याकडे बिनाका गीत माला , जुनी हिंदी गाणी, क्लासीकल संगीत असे गृपचे सभासदत्व मी घेतले आहे. रोजच्याला ते स्क्रॉल डाउन होते पण असे काही विशेष सापडले की लावून ठेवते.

लिहायचा उद्देश की तुमच्या खास स्पेसिफीक आवडीचे कार्यक्रम तुम्हाला फेसबुक, इस्टाग्राम वर पण सापडतील. नासा, नॅशनल जिओ ग्राफिक, डिस्कव्हरी ह्यांचे सर्व चॅनेल्स आणि अकाउंट्स आहेत. डेटा मजबूत व स्वस्त असला की झाले. डाउनलोड करायची पण गरज नाही.
मी पहिले गूगल म्युझीक वर पैसे देउन गाणी विकत घेत होते पण आता नुसते अ‍ॅड टु लायब्ररी करते व मोबाइल डाटा ऑन करून ऐकते.

सध्या डेटा मजबूत स्पीड नं आणि तुलनेनं स्वस्त आहेच. मी तर गेले कित्येक महिने काहीही डाऊनलोड असं करत नाही. जे काय आहे ते सरळ स्ट्रीम करायचं गाणी असोत, व्हिडिओ असो की अजून काही.

मी सध्या ठाम आहे की टाटा स्काय चे सबस्क्रिप्शन रिन्यु करणार नाही.
नेट्फ्लिक्स किंवा अमॅझॉन प्राईम घेईन.

@दक्षिणा
सध्याचे वाढलेले दर बघता, लवकरच मीही त्या विचाराला येईल बहुतेक!!!

हे चॅनेल निवडीचं प्रकरण नेमकं कुणाच्या फायद्यासाठी आहे काही कळायला मार्ग नाही. मासिक ४२६ रुपये आकारून एअरटेल आम्हाला इंग्रजी चित्रपट आणि इंग्रजी एंटरटेनमेंट सोडून असतील नसतील तेवढे सगळे म्हणजे हिंदी, मराठी व उर्दू सह बंगाली, नेपाळी, कानडी, मद्राशी वगैरे वगैरे चॅनेल SD आणि HD अश्या दोन्ही स्वरूपात दाखवतोय.

आता घरातील एकूण लोकसंख्या, त्यांच्या आवडी निवडी आणि घरात नेहमी बघितले जाणारे चॅनेल्स अशी सांगड घातली तर बजेट ४२६ पेक्षा बरंच वर जातंय

@जावेद, खरंच आहे. ४०० च्या आत काहीही केलं तरी चांगलं पॅक बनत नाहीये.
आमच्या लिस्ट मधून तर सोनी, सब, स्टार प्लस, कलर्स मराठी आणि झी टीव्ही हेसुद्धा कट झाले, कारण चॅनेल निवडताना कळलं, की या चॅनेलवर आम्ही एकही प्रोग्रॅम बघत नव्हतो.

मी तर काहीही सिलेक्ट केलेलं नाहिये अजून.
३१ जानेवारी शेवटची तारिख आहे ना? उगीच टाटा स्काय वाले कटकटायला लागले तर सांगेन आजच बंद करून टाका
आणि जा तुमची थाळी उचकटून घेऊन.

दक्शे, तसं नाहीय ना हे. तुम्ही काहीही सिलेक्ट केलं नाही, तर तुमच्या आताच्या पॅक शी मिळताजुळता पॅक ऑटो - अ‍ॅक्टीवेट होणारच आहे ना.
मी टाटा स्काय च्या साईट वर फिल्टर लावून एक्लूझिवली मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषा आधी निवडल्या आणि नेक्स्ट फिल्टर फक्त एचडी चॅनल्स चं लावलं आणि मग मला हव्या त्या वाहीन्या निवडल्या तर पॅक ची किंमत ४००/- झाली आता यावर अधिकचे मला १५५/- वेगळे पडणार! बबौ! मी ही हे प्रकरण रिचार्ज नाही करणार. प्राईम व्हिडिओ जिंदाबाद आणि ४ लोक्स मिळून २००/- प्र्तिमहिना नेटफ्लिक्स ते पण ४के मध्ये. मज्जानु लैफ. फुटकळ/ टैमपास विडिओ करता युट्युब आहेच.

नंतर जरा लिस्ट नीट पाहीली तर... सगळ्या नॉर्मली आपल्या आवडीच्या सगळ्या वाहिन्या २२ रुपये / महिना वाल्या आहेत. सो तुम्ही ४/५ जरी वाहिन्या निवडल्या तरी १५५ + १००/- रुपडे इथच झाले की. बरं आता हे रेट्स टाटा स्काय चे नाहीयेत , डायरेक्ट ब्रॉडकास्टर चे आहेत सो टाटा स्काय बदलून दुसरं काही घेऊ हा पर्यायही नाहीच. कारण सगळीचकडे हेच रेट्स असणार.

हे माझं पॅक -

Sony Six 60 / Monthly
Sony Ten 2 60 / Monthly
NDTV India 10 / Monthly
NDTV 24x7 15 / Monthly
ET Now 8 / Monthly
BBC World 15 / Monthly
CNN 10 / Monthly
Mirror Now 7 / Monthly
ABP Majha 7 / Monthly
Star Sports 1- 60 / Monthly
HD Channels & Services
Star World HD 50 / Monthly
Zee Cafe HD 50 / Monthly
HD Access Fee 175 / Monthly
Specials
Star World Premiere 60 / Monthly
महिन्याचे ५८७ होताहेत. यातली दोन किंवा तीन स्पोर्ट्स चॅनेल आज वगळेन. १२० किंवा १८० कमी होतील. ४६७ किंवा ४०७. झी कॅफेही सध्या पाहिलं जात नाही. मध्ये विल & ग्रेस रिरन होतं ते पाहत होतो.

दक्षिणा, असा धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद.

जरा लिस्ट नीट पाहीली तर... सगळ्या नॉर्मली आपल्या आवडीच्या सगळ्या वाहिन्या २२ रुपये / महिना वाल्या आहेत. सो तुम्ही ४/५ जरी वाहिन्या निवडल्या तरी १५५ + १००/- रुपडे इथच झाले की. बरं आता हे रेट्स टाटा स्काय चे नाहीयेत , डायरेक्ट ब्रॉडकास्टर चे आहेत सो टाटा स्काय बदलून दुसरं काही घेऊ हा पर्यायही नाहीच. कारण सगळीचकडे हेच रेट्स असणार. >>>>
योकु +१
फक्त सिलेक्टेड चॅनल्स बघणार्यांचा फायदा होईल कदाचित.
आमच्या सारख्या एका चॅनेलवर चार कार्यक्रम बघण्याऐवजी चार चॅनल्स वर प्रत्येकी एक बरा कार्यक्रम बघणार्यांचा तोटाच.
डीटीएच बंद करून नेटफ्लिक्स, प्राईम घ्यावे असा विचार सुरू आहे. किंवा 'सब मोह माया है' म्हणत काहीच बघू नये. Wink

एबीपी माझा ००.५०
झी २४ तास ००.१०
असे डिशटिविवर आहे.

टाटावाले एबीपी ७रु?
---------
एक तारखेला फक्त कलर्स मराठी, वरचे दोन, हिस्ट्री (३रु/) ठेवून बाकीना डच्चू देणार.
स्पोर्ट्स आणि मुविज पकाव आहेत ते कधीच पाहात नाही.

टीव्हीवर चॅनेल लावलं की जे दर दिसताहेत, ते वेबसाइटपेक्षा वेगळे आहेत एनडीटीव्ही २ आणि १ रुपया आणि एबीपी माझा फ्री दिसतंय. काय कळंना.

एन डी टीव्ही न्युज काढता आले तर बघा. साइट चांगली आहे. चॅनेल वरचे व्हिडीओ असतात तिथे.

बरं स्पिक मॅकेचे प्रोग्राम संध्याकाळी पाच ला सुरू होउन साडे आठाला संपतात रात्री. फेस्बुक लाइव्ह रोज पहा.

मी चॅनेल निवडक घेऊन पाहिले तर माझे सध्या पेक्षा जास्त १०० रु. चार्जेस होतायेत आणि सध्या पेक्षा चॅनेल्स ची संख्या बरीच घटली...
हे असे का व्हावे? कारण सेवा देणार्‍याला १३० रु फिक्स तो त्यात तुम्हाला १०० चॅनेल देणार त्यात बहुतांशी दुरदर्शनचे.. मग प्रत्येक चॅनेलचे भाडे वर प्रत्येक चॅनेल मागे सेवा देणर्‍याचा १ रु. त्यावर १८ % कर म्हणजे रु. १.१८ म्हणजे १० पैसेवाल्या झी २४ ताससाठी तुम्हाला १.३० पैसे द्यावे लागतात.
जर तुम्ही एच डी चॅनेल घेतला तर त्यांची संख्या दोन धरणार म्हणजे सेवा देणार्‍याला करासह रु. २.३६ द्यावे लागणार.
उदा. झी मराठी एच डी १९ रु त्यावर सेवा देणार्‍याचे २ रु एकूण २१ रु आणि वर १८% कर म्हणजे रु. २४.७८ द्यावे लागणार!
हे गणीत पहाता माझे मी सध्या दिसणारे आणि नको असणारे किमान १५-२० चॅनेल्स कमी केले तरी माझे रु ५०-६० वाढतायेत!! म्हणजे पैसे कमी होतच नाहीत ह्या प्रकारात!!!
आणि त्यांचे बुके निवडले तर १००-१२० रु वाढत आहेत!!

मी जिथे उपलब्ध आहेत, तिथे फक्त एचडी चॅनेल्स घेतलीत. मला नॉन एचडी चॅनेल्सचे पैसे लागलेले नाहीत. ती दिसत असावीत बहुधा. पण मी निवडलेली चॅनेल्स फेव्हरिट मार्क करून तेवढीच बघतो. किंवा त्यांचे नंबर लक्षात असतात. त्यामुळे लक्ष गेले नाही.

मजेदार चर्चा आहे.
देशी कंपन्यांना, टुकार अभिनेत्या लेखक निर्मात्यांना बुडवून विदेशी नेफ्लि ऍमेझॉनला गब्बर करण्याचे हे कुटिल कारस्थान आहे. असले व्हॉट्स ऍप फॉरवर्ड यायची वाट बघावी का आता!!

नेफ्लि ऍमेझॉनला गब्बर!!
---
लोखंडी रोबोटांची मारामारी एवढ्च वर्णन करता येईल त्या पिच्चरांना.

@मेधावी: मी ऑनलाईन चेक केले, पण आता ती केबल उपलब्ध नाही असे दिसतेय, सगळीकडेच.
ही त्या केबलची लिंक. पण अशी केबल वापरायला आपला फोन MHL enabled हवा. हे फोनचे स्पेक्स ऑनलाईन बघितले की कळेल. पण ऑनलाईन पेक्षा दुकानात मिळाली तर तिथेच पोर्ट मॅच होते की नाही, आपल्या फोनला चालेल की नाही याची खात्री करून घेता आली असती.

क्रोमकास्ट हा पण एक ऑप्शन आहे, टीव्ही स्मार्ट नसेल पण HDMi पोर्ट असेल तर त्याला स्मार्ट बनवायचा. ते HDMi पोर्टला लावायचे डाँगल आहे: वायफाय अडॅप्टर + स्ट्रीमिंग मीडिया प्लेयर, फायरस्टिक प्रमाणेच. हे आपल्या घरच्या वायफाय वरून परस्पर इंटरनेटला कनेक्ट होते, त्यात इन बिल्ट ऍप्स असतात + आपण त्यात डाउनलोड करू शकतो.
फायरस्टिक सोबत त्यांचा रिमोट कंट्रोल येतो तर क्रोमकास्ट मध्ये आपला सेलफोन/लॅपटॉप रिमोट कंट्रोल म्हणून वापरावा लागतो.

या व्यतिरिक्त वर सांगितलेल्या केबलला पर्याय म्हणून
anycast adapter मिळते ₹९०० ते १२००. हे फक्त HDMI to Wifi adapter आहे, याशिवाय त्यात इनबिल्ट काही नाही. सगळे ऍप्स फोनवरुन चालवायचे आणि केबल ऐवजी वायफायने स्क्रीन मिरर करायचा. पण याचे बरेच चांगले/वाईट फीडबॅक आहेत ऑनलाइन. दुकानातून खात्री मिळत असेल - नाही चालले तर परत घेणार - तरच घ्यावे.

हायला इथली सगळी तांत्रिक (हायफाय) चर्चा वाचून मला धडकी भरून माझा रक्तदाब वाढू लागलाय.
मी टाटा स्काय ला लवकरच टाटा करून काही दिवस "टिव्ही उपास" किंवा 'टिव्ही संन्यास' घेण्याची शक्यता वाढत चालली आहे.

आमच्याकडे डेन केबलवर साडेतीनशे मध्ये जवळजवळ सर्व दिसायची, आता माफक channels निवडून तीनशेपर्यंत जाणार. मी पुढच्या महिन्यात झी मराठी नको सांगितलं कारण मी काहीच बघत नाही त्यावर. ते सोडून सर्व मराठी मनोरंजन channels घेतली. बघते सध्या फक्त सोनी मराठी आणि स्टार प्रवाह. लिविंग फूड आणि फूड फूड घेणार आहे आणि मराठी बातम्यांची तीन मेन आणि नवऱ्याने इंग्लिश मुवीज ची निवडली आहेत. बाकी जी फ्री असतील ती.

आमचा केबल दर माफक होता तसा, असं वाटतंय आता.

"टिव्ही उपास" किंवा 'टिव्ही संन्यास' घेण्याची शक्यता वाढत चालली आहे>>>>>
ते बेस्ट Proud
सरळ मोबाईल वर बघायच काय मिळतय ते करमणूक का काय ते Light 1
अप अस्तातच की

hii hit jackpot on Spic macay fb live today. one artiste is dancing Bharatnatyam navarasamohna at the kumbh mela this evening. i am watching full screen on laptop . amazing experience. Some 15 people are watching. now she is doing ardhanarishwar ashtakam . brings back the old days when we used to watch such programmes in black white on doordarshan. None of the commercial channels show amy good quality indian classical music or dance. ♡

छान, अमा, रशिया मयुरी डान्स ग्रुप म्हणून युट्युब वर सर्च करून त्यांचे नाच नक्की बघा.अत्यंत सुंदर सफाईदार नाचतात त्या मुली.अप्सरा आली वर पण नाचल्यात.
हा एक उदाहरणा दाखल.
https://youtu.be/mKVqK8gzc8s

Pages