टाटा स्काय की इतर काही? काय घ्यावे?

Submitted by दक्षिणा on 22 January, 2019 - 08:36

मी सध्या टाटा स्काय वापरते आहे. (वर्षभराचे एकदम एच डी सहित) बरेच महाग पडते असे इतरांचे मत.
यातही माझ्याकडे इंग्रजी सिरियल आणि चित्रपटाचे सबस्क्रिपशन नाही. सध्या नेट्फ्लिक्स, अमॅझोन प्राईम च्या जमान्यात टाटा स्काय ठेवावे की बन्द करावे? मनोरंजनासाठी काय योग्य आहे?
इतर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची काहीही कल्पना मला नाही. जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.
कोण काय वापरते, किती खर्च येतो, सर्व्हिस कशी आहे त्याची ही माहिती द्यावी.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.amazon.in/Fire-TV-Stick-with-all-new-Alexa-Voice-Remote/dp/B...

हे घेऊन टाका. पण तुमची डिश भंगारात विकावी लागेल. घरी वायफाय असेल तर किंवा हॉटस्पॉट असेल तर केबल काढून टाका.
कुठलाही कार्यक्रम आपल्या वेळेत आणि ते ही पॉज करत करत बघायची मजाच और आहे. जवळपास सगळ्या मालिका, स्पोर्ट्स, कार्टून्स इत्यादी टीव्ही कार्यक्रम जिओ देतं. नेफ्लि, अ‍ॅमेझॉनवर सुद्धा गाजलेले टीव्ही प्रोग्राम्स असतातच. आणि खरंच एव्हढ्या मालिका आपण पाहतो का ?

दर्जेदार कार्यक्रम ते ही आपल्या वेळेत आणि विनाजाहीरात पाहण्यासाठी नेफ्लिचे ५०० रूपये अधिक अ‍ॅमेझॉनचे १०० रूपये किंवा एखाद्या महीन्यात नेफ्लि पुढच्या महीन्यात प्राईम हे बरे पडते. बाकीचे जिओ वगैरे फुकट आहेत.

सटेलाइट माध्यमातून टेलीविज़न प्रसारण आणि टेलिफोन कम्युनिकेशन हे न वापरता इंटरनेट माध्यम वापरणे ( टॅावर किंवा केबल) हा इंटरनेटचा गैरवापर नाही का?
विकसन न झालेल्या देशांसाठी मग सटेलाइटस कोण संभाळणार?
तीनचार वर्षांनी जुने सटेलाइट मंद होतात तेव्हा तिथे दुसरे नसतील.

TRAI ने हे सगळॅ बदल ग्राहकांच्या हितार्थ केलेत अशी जाहिरात मी दिवसातून पाचसहा वेळा तरी ऐकतोय. नक्की काय समजायचं?

धन्यवाद अनु. पण मला स्पेसिफिकली भारतीय कलाकारांनी ट्रेनिंग द्वारा व अनुभव सिद्ध केलेले त्यांच्या कलांचे आविष्कार आवडतात. तेच बघायचे ऐकायचे आहेत. जुने जाणते दिग्गज गुरू व त्यांनी डेव्हलप केलेले शिष्य. अशी अगदी च नीश आवड असेल तरी तीही आपण भागवू शकतो नेट द्वारे जे रेडिमेड चॅनेल बुके मध्ये शक्य होत नाही. कोणाची तरी टुकार क्रिएटीव्ह व्हिजन विकत घ्यावी लागते. हे मला माझ्या वैचारिक स्वातंत्र्यावर बंधन आहे असे वाट्ते. म्हणून सॅटेलाइट टीव्ही मान्य नाही. काय बघायचे तो चॉइस प्रेक्षका स्थित हवा.

ओके ओके

हे चॅनल निवडा वगैरे प्रकार अजून केले नाहीयेत मी.ही बातमी ऐकायच्या आधी धमाल पॅकेज वर्षासाठी (वर्षा कोण विचारू नका) रिन्यू केलं होतं.आता ते काय गोंधळ गं
घालतील तो घालतील.कोणी सुंदरी किंवा सुंदरा फोन वर बोलला तर त्यांना डिस्कव्हरी, अनिमल प्लॅनेट, 2 बातम्या आणि 2कीड चॅनल मिळतील असं स्वस्तात स्वस्त दे सांगेन(जसं काय ते स्वस्तात स्वस्त देणारच आहेत ☺️☺️)

अनु, धमालला पर्याय म्हणून curated packs मध्ये "मराठी हिंदी फॅमिली किड्स" पॅक घेऊ शकता ₹ २१५ + ₹ १५३ नेटवर्क फी. त्यात किड्स आणि नॉलेज + लाईफ स्टाईल ची चॅनल्स येतील.

माझ्याकडे व्हिडिओकॉन डीटीएच आहे.. मी कुठलेही कॉम्बीनेशन निवडले तरी आधी पेक्षा जास्त महिना भाडे व बरेच कमी चॅनेल होतायेत... मग ट्राय म्हणते त्याप्रमाणे ग्राहकाचा काय फायदा नक्की समजले नाही!!

>>माझ्याकडे व्हिडिओकॉन डीटीएच आहे

Same here..... व्हिडिओकॉन च्या साईटवर पण ती प्रक्रिया जरा किचकट वाटतीय.... आज घरी गेल्यावर निवांत बघेन!

मी पण ते डीटीएच वगैरे काढून टाकावे आणि सरळ ऑनलाईन जे पाहिजे ते बघावे या मताचा आहे..... पण एकंदर याबाबतीत घरात मी मायनॉरिटीत आहे!

घरी हा विषय झाला. १५३/- नेटवर्क फी चे आणि २२ रुपडे झी मराठी एचडी चे असं सध्या ठरवलंय. बाकी सगळं फायर टीव्ही च्या माध्यमातून पाहाणे सध्यातरी. मला स्वतः ला २००-२५०/- च्या वर त्या टिव्ही च्या बोडक्यावर खर्चायला नको आहेत. त्यापेक्शा मी नेफ्ली चं ४के चं पॅकेज घ्यायला तयार आहे...

Mobiron Premium Quality MHL Kit Supported in All MHL Smartphones 6.5 Feet (2M)
ही केबल उपलब्ध आहे ऍमेझॉनवर ₹ ५४९.
फोन MHL सपोर्ट करत असेल तरच ही वापरता येइल.
आपल्या फोनच्या मॉडेलने गुगल सर्च करून कळेल MHL सपोर्ट आहे की नाही ते.

उपयुक्त धागा काढल्याबद्द्ल धन्यवाद.
माझ्याकडे डिश टिव्ही आहे . काल पर्यंत काहीच सिलेक्शन वगैरे केलं नव्हतं. फार फार तर काय होईल ? आहे ते पॅकेज ऑटोमॅटिकली सुरु राहिल असा होईल असा विचार करुन Happy तसंच झालं. आज १ फेब्रुवारी, काही बंद वगैरे झालं नाही , होतं तेच तसं चालू आहे. एक्स्पायरी डेट सुद्धा बदलली नाही.
तरीही आता डिश टिव्ही वर लॉग इन करुन नेहमी पाहिले जाणारे चॅनल्स सिलेक्ट केले आणि पॅकेज मॉडिफाय केलं. हे सगळे बदल सेव्ह झाले असा मेसेज स्क्रीन वर दिसला. लगेचच काही बदल झाल्याचे प्रत्यक्षात दिसले नाही. कदाचित २४ तासात होईल. पाहूया !

मित मी पण काही बदल केले नाहित आणि टिव्ही लावला तर मी सबस्क्राईब न केलेले चॅनल्स पण आज दिसतायत. शिवाय मज्जा म्हणजे माझी नेक्स्ट रिचार्ज डेट दिसतेय १८ ऑक्टोबर २०१८.
आणि मन्थली चार्जेस - रुपये ३५ Uhoh

माझी नेक्स्ट रिचार्ज डेट दिसतेय १८ ऑक्टोबर २०१८.>>>
दक्षिणा, काही तरी अमानविय असावे!! Wink

मी काल माझे चॅनेल निवडले तरी जुनेच सुरु असावे बहुतेक अजून काही बदल झालेला नाही. माझे आधी उलट स्वस्त पडत होते आता जे निवडलयं त्यापेक्षा!

माझे आधी उलट स्वस्त पडत होते आता जे निवडलयं त्यापेक्षा! >> हा अनुभव बहुतेक सर्वांचा आहे सध्या. त्यामुळे मी आता टिव्ही बघणे बन्दच करणार आहे.

माझे पण डिशटिवी आहे परंतू इमारत रंगकामामुळे डिश काढून ठेवली आहे. ट्राइचे सिलेक्शन मुद्दामच केले नव्हते. म्हटलं बंद पडल्यावर बघू. समजा बदल झाला असता तर रजि मो नंबरला मेसेज आला असता. जेव्हा बॅलन्स संपेल तेव्हा रिचार्ज मारणारच नाही.
एकूण सर्व ग्राहकांनी किडूकमिडुक चार चानेलस सिलेक्ट केले किंवा काहीच केले नाही तर जाहिरातदार बडगा काढतील आणि मालिका कलाकारांची अवस्था वाइट होईल.

माझे सगळे channels अजून चालू आहेत. आणि मासिक भाडं अजून सुद्धा मागच्या इतकेच दाखवतोय. मी channel selection वगैरे काही केलं नाही. बंद पडेल तेव्हा बघू.

(AirTel DTH)

वरच्या पोस्ट मधे एक गोष्ट लिहायची राहुन गेली. हवे असलेले HD/SD चॅनल्स सिलेक्ट केले तर त्याची किंमत २८५/- आली ! व्वा जवळजवळ अर्ध्या किमतीत काम होतंय. आपण फार पैसे वाचवणार असं वाटत असतानाच पुढच्या पानावर,
+ NCF (Network Capacity Fee) - १९०/-
+ GST १८% -
Total ५६०/- !!! म्हणजे थोडंफार पूर्वीच्या इतकंच असं जाणवलं ! Happy
अजून काल केलेल्या सिलेक्शन नुसार चॅनल्स दिसायला सुरुवात झाली नाही. एकदा ते झालं की परत एकदा HD/SD चॅनल्स कमी जास्त करुन मासिक खर्च गरजेनुसार कमी-जास्त करावा असं सध्या ठरवलंय.

माझे नविन पॅक्स लाईव्ह झाल्याचा sms आला tatasky कडून. हे पॅक्स डेली बेसिसवर add delete करता येतायत. त्यामुळे सगळी चॅनेल्स महिनाभर घ्यायची गरज नाही. वीकएंडला फक्त मूव्ही चॅनेल घेतली तरी चालतील किंवा जेव्हा मॅच असेल तेवढ्या पुरतं स्पोर्ट्स चॅनेल घेता येईल. उत्तम आहे हा प्रकार. आज add झाल्याने आज delete करता येत नाहियेत कुठलीही चॅनेल्स. माझे long term साठी भरलेले पैसे माझ्या tatasky account ला जमा झाले व नविन selection ला लागू झाले. जुन्या पेक्षा २ महिने जास्त मिळाले आहेत त्याच पैश्यांत. TRAI चा decision उत्तम आहे.

0-100 चॅनेल्स फी कमी आहे. १०० च्या वर गेलं की २०-३० रुपये वाढतायत. साधारणपणे कुठल्याही कुटुंबाला १०० चॅनेल more than enough असावीत.

हो ना. मोफत आहेत म्हणून घेऊन टाकली आणि एकूण चॅनल्सची संख्या १०० च्या वर गेली की नेटवर्क फी वाढेल.
आधी पेड चॅनल्स घेऊन मग मोफत ऍड करावीत आणि एकूण ९० च्या आसपास ठेवावीत. म्हणजे पुढे पेड चॅनल ऍड केले तर लगेच नेटवर्क फी वाढणार नाही.

या धाग्याचा उपयोग होणार आहे. इतर डिटिएच ग्राहकांनीही अनुभव लिहावेत.
---
एक प्रश्न इथे विचारून घेतो - नेटफ्लिक्स मोबाइलवर(अँड्राइड) पाहायचे आहे. रोज १.४ जिबी नेट प्लान आहे. तर कोणते अॅप, किती फी आणि काय पाहता येईल?

Srd नेटफ्लिक्स बघायला नेटफ्लिक्स हेच आणि एकच ऍप आहे. ते डाउनलोड करा. रजिस्टर करा, एक महिना फ्री ट्रायल, त्यासाठी आधीच क्रेडिट कार्ड डिटेल्स द्यावे लागतील. नसेल बघायचे तर महिना संपायच्या आत नेटफ्लिक्सवर लॉगिन करून मेम्बरशीप कॅन्सल करता येते अगदी शेवटल्या दिवशीही. जर एक दिवस उशीर केला तर एक महिन्याचा चार्ज पडेल.
त्याचे महिन्याचे सबस्क्रिप्शन SD ५००, HD ६५० आहे. यात दोन डिव्हाईसवर एकाचवेळी वापरता येते (दोघात शेअर करता येईल अर्ध्या किमतीत). आणि ८०० चा ऑप्शन आहे त्यात चार डिव्हाइसेसवर एकाचवेळी वापरता येईल.

धन्यवाद मानव पृथ्वीकर.

टाटा स्काइने सर्व पॅक्स काढूनच टाकलीत का? माझ्याकडे टाटा आणि डिशटीवी दोन्ही पेड डिश आहेत. एका जुन्या टिवीला बेस ९९ + मराठी पॅक ४० असे ठेवले होते. ते नंतर बंद केले. त्यावर फ्री डिश चालू(१३ वर्षं) ठेवली आहे.
डिशटीवीचे सुपर फॅम्ली पॅक चालू आहे. ट्राइचे पॅकेज ३१ च्या अगोदर सुरू करायचा मेसेज आलेला होता. पण बंद नाही. मार्चमध्ये बॅलन्स संपेल तेव्हा पकडतील बहुतेक.

( पूर्व / दक्शिण दिशेला बॅल्कनी असल्यास डिश तिथे लावता येते व त्याची फिरवाफिरवी आपणच सहज कधीही करू शकतो. सर्व सटेलाइट्स श्रीलंकेच्यावर आकाशात आहेत तिथूनच सोन्याचा वर्षाव होत असतो. )

Pages