Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रुमाल आणि पेन काढून ठेवणं यात
रुमाल आणि पेन काढून ठेवणं यात काय डोंबल सरप्राईज? आणि अगदी हात धरून आणलं तेव्हा तिच्या आणि त्याच्या चेहऱ्यावर असे भाव होते की लहान मुलगी बाबांना आपली भातुकली दाखवायला नेते आहे आणि बाबा कौतुकाने बरोबर जाताहेत. ती इनोसंट न वाटता डोक्याने कमी /मंद वाटते.
तिने चेहरा आणि केसांचं तेल धुवून स्वच्छ राहिलं तर नवऱ्यासाठी ते मोठं प्लेझंट सरप्राईज ठरेल. Disgusting !
जयदीप सर आता दीर झालेत म्हणुन
जयदीप सर आता दीर झालेत म्हणुन त्यांना भाऊजी बोलायचं कळतंय तर विक्रांत सर नवरा झालाय म्हणुन विक्रांत, अहो, ओ, आवो इइ म्हणायचं न सुचायला काय अकलेवर दगड पडलेत?
https://youtu.be/EqlcUE0FRSI
https://youtu.be/EqlcUE0FRSI
हे बघितल का? इशा आणि विस on romantic date
Submitted by मनिम्याऊ on 19
Submitted by मनिम्याऊ on 19 January, 2019 - 10:59 >>>>> अरे काय घाणेरडे आवाज करून हसते ही गायत्री दातार
तिचे हसण्याचे आवाज ऐकून मला हसू येत होतं. पण नॉर्मल लाईफ मध्ये चांगली दिसते आहे.
जेव्हा केव्हा ह्यांचे रोमँटिक
जेव्हा केव्हा ह्यांचे रोमँटिक सीन्स दाखवतील तेव्हा बॅकग्राउंडला
तुमसा कोई प्यारा कोई मासुम नही है
क्या चीज हो तुम खुद तुम्हे मालुम नही है
लाखो है मगर तुमसा यहा कौन हसी है
तुम जान हो मेरी तुम्हे मालुम नही है
हे गाणं वाजवायला छान आहे. हे मा वै म आहे
सस्मित
सस्मित
सस्मित
सस्मित
मीरा घाणेरडे आवाज कसले, ती
मीरा
घाणेरडे आवाज कसले, ती तर चक्क मतीमंदासारखी हसतीय. सॉरी इथे मतीमंद लोकांचा अपमान करायचा नाहीये, तर उलट ही येडीच असे चाळे करुन त्या लोकांचा अपमान करतीय. ते बिचारे तर नशीबाचे दान कमी पडल्याने असहाय आहेत, पण हिला काय धाड भरलीय असे वागायला? कोणीतरी पोहोचवा रे हा धागा त्या केड्या आणी विकीशा पर्यंत. लाज वाटेल मग थोडी तरी.
रश्मी
रश्मी
विस कुठल्याही रन्गाच्या
विस कुठल्याही रन्गाच्या शर्टावर कुठलाही सूट घालतो हे ईशाला माहित होत, म्हणून ईशाने तिच्या चॉईस(?)चा सूट त्याला दिला.
त्या बॉबीला सुद्दा लाडू वळवायला बसवल.
ईशा लाडू बनवते म्हणून सॉनयाने सुद्दा लाडू बनवावे ही अपेक्षा का करायला हवी जयदीपने? ईशाने घराला घरपण आणल, म्हणून सॉनया वाईट्ट!
ईशा म्हणते की जी गम्मत हाताने बनवलेल्या पदार्थात असते ती ऑर्डर केलेल्या पदार्थात नसते. अग बाई, मग तु आईला ऑर्डरीच्या चकल्या बनवायला का लावतेस ?
जयदीप सर आता दीर झालेत म्हणुन त्यांना भाऊजी बोलायचं कळतंय तर विक्रांत सर नवरा झालाय म्हणुन विक्रांत, अहो, ओ, आवो इइ म्हणायचं न सुचायला काय अकलेवर दगड पडलेत? >>>>>>>> अगदी अगदी. ती तर आईसाहेबान्समोर सुद्दा विक्रांतसर , विक्रांतसर करत असते आणि ते त्यान्ना खटकत सुद्दा नाही. तिला जर विक्रांत म्हणायला एवढी लाज वाटते तर जशी तिची आई ' अहो निमकर' म्हणते, तस 'अहो सरन्जामे ' म्हणाव की.
ईशाचे बाबाही तसेच. बिपिनशी लग्न मोडल तरीही त्याला ' बिपिनराव' म्हणतात. ऑफिशियल जावयाला मात्र विक्रांतसर
हा बेबीला रात्री झोपवून नंतर नौदूच्या खोलीत जातो का,सकाळी त्याच खोलीतून बाहेर येताना दाखवला. >>>>>> पण परवा तर आरतीच्या वेळी तो त्याच्या खोलीत झोपलेला दाखवला.
वेगवेगळ्या आकाराचे साचे म्हणे
वेगवेगळ्या आकाराचे साचे म्हणे ... बेबीने एवढ्या मोठ्या डब्यातून ३ साचे आणि एक कातणी काढली .ते पण सगळे बदामाच्या शेपचे .
पहिल्या खणात ठेवलेले.. आणि फार पूर्वी होते आता सापडणार नाही म्हणे जूनेपूराणे साचे दाखवण्यासाठी काळे पडलेले दाखवले आहेत .
स्टीलचे साचे ईतके काळे पडतात ???
एवढं थाटामाटात लग्न केलं , नव्या जोडप्याने सत्यनारायण नाही घातला?
बेबीचे डायलॉग खरच बाळ्बोध आहेत.
निळ्या शर्टवर चॉकलेटी कोट .. तो विसं पण जरा गप्पच झाला . कुठून हीला घेउन आलो असे काहीतरी भाव आले त्याच्या चेहर्यावर.
ईतका वाईट नाही दिसला शेवटी कोट .
ईशाने घराला घरपण आणल,>>>>>>>>
ईशाने घराला घरपण आणल,>>>>>>>>
?
सुलू टाइपिंगमध्ये चूक झाली आहे का?
सुलू टाइपिंगमध्ये चूक झाली
सुलू टाइपिंगमध्ये चूक झाली आहे का? >>>>>>> नाही, आईसाहेब तश्या म्हणाल्या.
विक्या तर टी शर्टावर कोट
विक्या तर टी शर्टावर कोट घालतो. त्याला काय फरक पडतोय? वेळ भरायला असंबद्ध संवाद लिहीलेत. त्या लाॅजवर घातलेला कोट नंतर कधी धुतला नसावा इतका मळलाय हो सरंजामे...बदला की आता.
इशुच्या बाबांनी गंमत म्हणून घर विकलंय असं वाटलं. आता काही एक्साईटमेंट उरली नाही म्हणून आयड्या केल्यासारखं.
ते स्वैपाकघर पण खोटं वाटलं. तेवढ्यापुरतं उभं केल्यासारखं.
तेच म्हटलं,
तेच म्हटलं,

नाहीतर इथे कुणी तसं म्हणण्याची चूक करणार नाही.
ती आईसाहेबही एक हॉरर शोच आहे, सदानकदा दिवसरात्र भुतासारखा मेकअप करून घरभर तसेच एक्सप्रेशन देत फिरते!!!
भरती कधी होती ओहोटी लागायला?
भरती कधी होती ओहोटी लागायला? >>>
आज पतंग पतंग खेळताना जयदीप
आज पतंग पतंग खेळताना जयदीप माय फ्रेंड वहिनीला काहीतरी सरप्राईज देणार आहे,यांची सरप्राईजेस म्हणजे पोटात गोळाच येतो पण त्याचा संबंध नंदूशी असावा बहुतेक.म्हणजे परत आईसाहेबांच्या चेहरा शॉक बसल्यासारखा.
अजून निमकरांनी काय दिवे लावले आहेत हे बेबीला कळलेल नाही,म्हणजे भोकाड पसरायला अजून एक संधी,की विस आहेच.
पण एक आहे,त्या बंद खोलीत काय आहे हे जर लवकरात लवकर पाहायच असेल तर निदान काही दिवस बेबीच्या आईला सरंजामे जंगलात आणाच,कारण नाही विचारायच अस सांगूनही विचारण्याचा आणि सरळ रुममध्ये जाण्याचा भोचकपणा करायची वेळ आता आली आहे आणि तो फक्त पुष्पाच करू शकते.
कारण नाही विचारायच अस
कारण नाही विचारायच अस सांगूनही विचारण्याचा आणि सरळ रुममध्ये जाण्याचा भोचकपणा करायची वेळ आता आली आहे आणि तो फक्त पुष्पाच करू शकते.>>>>
तुम्ही पिंकीला विसरलात वाटतं!
मायराचा कटीपतंग झाला आहे
मायराचा कटीपतंग झाला आहे
अज्ञातवासी.........पिंकी
अज्ञातवासी.........पिंकी लक्षात आहे,पण झीवाल्यांनी तिला कायमच पुण्याला पाठवून दिल असाव,म्हणून पुष्पा
जालिंदर आला एकदाचा.आता परत गोंधळ घातलाच केड्याने
जेव्हा लग्न झाल नव्हत तेव्हा हा तिला फोन करत होता.,लपाछपी खेळत होता आणि आता लग्न झाल तर डिरेक्टली विसच्या घरी.
केड्या विसरला की काय की काय आधी त्याने काय दाखवल होत?
बेबी आणि जयदीपचा बॉंंड बघून नॉर्मल नात वाटत आहे,पुनर्जन्माची शक्यता कमी आहे.
केड्या काय दाखवतो काय माहित
बाकी मला तर बेबी आणि जयदीपचीच जोडी आवडली.
ती तर चक्क मतीमंदासारखी हसतीय
ती तर चक्क मतीमंदासारखी हसतीय. सॉरी इथे मतीमंद लोकांचा अपमान करायचा नाहीये, तर उलट ही येडीच असे चाळे करुन त्या लोकांचा अपमान करतीय. ते बिचारे तर नशीबाचे दान कमी पडल्याने असहाय आहेत, पण हिला काय धाड भरलीय असे वागायला? >>>>> अगदीच! शी काय भयाण हसणे आणि मालिकेत लाजणे.काय म्हणून हिला हिरॉईन म्हणून घेतली?अत्याचार अत्याचार!
झीवाल्यांचा प्रसिद्ध हनीमून
झीवाल्यांचा प्रसिद्ध हनीमून सिन झाला का नाही?
ईशाच्या मांडीवर डोकं ठेवून सुभाने अगम्य संवाद म्हटले?
कोहराची स्टोरी असावी अस वाटतय.
सुबोध वर संशयाची सुई १००- १५० एपिसोड्स गरागरा फिरतील आणि आईला दोषी ठरवून पुढे करतिल
Normally घरी कोणी पाहुणे आले
Normally घरी कोणी पाहुणे आले तरी आपण घरचे कपडे बदलून तयार होतो ईथे तर उत्सव असून सगळे त्याच कपड्यांमध्ये. आईसाहेबांचा नवीन साड्यांची सक्त गरज आहे.
Zee5 वर next एपिसोड preview upload नाही झाला आहे. काय होणार आहे सोमवारी?
बेबी पडलेला पतंग उचलायला जाते
बेबी पडलेला पतंग उचलायला जाते ,समोर जालिंदर असतो,तो सांगतो की तुला सांगूनही लग्न केलस धगैरे ,मग ही जोरात विक्रांत सर करून ओरडते,मग विस फूलटू हीरो ईश्टाईल मध्ये हिरवीणीला वाचवण्यासाठी जालिंदरच्या मागे धावतो.
आणि जालिंदर विस च्या
आणि जालिंदर विस च्या बऱ्यापैकी रीच मध्ये असताना झाडाला धडकून पडतो/ अडकतो.. आगे की स्टोरी मंडे को
जालिंदर हा विस चा मेहुणा
जालिंदर हा विस चा मेहुणा असणार आणि राजनंदिनी त्याची बहीण वीस मुळे अपघातात कोमा मध्ये गेली असणार आणि म्हणून ती त्या खोलीत असणार ठेवलेली.
या अपघाताला विसला जबाबदार ठरवून जालिंदर त्याच्या जीवावर उठला असणार आणि झेंडे त्याचा जीव वाचवल्याने मित्र झाला असणार
मायरा ही जालिंदर ची मुलगी असणार आणि ती बाजीगर सारखी वीस शी लग्न करून इस्टेट बलकवणार असते पण नेमकी इशाबाळ मधल्या काळात जन्माला आल्याने प्लॅन फिस्कटले
ह्यात रुपालीबद्दल वाचते मी,
ह्यात रुपालीबद्दल वाचते मी, ती आवडते त्यांच्यासाठी हा व्हिडीओ.
https://www.youtube.com/watch?v=-SaxMKKRaDU
सोन्याचा पतंग म्हणजे मला
सोन्याचा पतंग म्हणजे मला वाटले साॅन्यासाठी आणलेला पतंग. काय तो सोनेरी कागद लावलेला पतंग, अगदीच दरिद्री कल्पना. जालिंदर कर्जतलाच रहात असेल आणि आला असेल फिरत फिरत भेटायला. मायराचा का जीव अडकला आहे विसंमध्ये. मायरा सरंजामे कुटुंबाची केअरटेकर, हेरड्रेसर, काॅस्चुम डिझायनर, ईव्हेेंट मॅनेजर, ईंटीरीअर डिझायनर, बिझनेस कोआॅर्डीनेटर आणि काय काय आहे.
चहयेद्यामध्ये परत विकिशाची एवढी टर उडवली आणि सुभाने ते सगळे ईतके एंजाॅय केले की माझी खात्रीच पटली आहे की तो हे काम पैशासाठीच करत असावा. नंतर काढेल परत एखादा बायोपिक.
चहयेद्यामध्ये परत विकिशाची
चहयेद्यामध्ये परत विकिशाची एवढी टर उडवली आणि सुभाने ते सगळे ईतके एंजाॅय केले >> अगदिच! स्पेशली इशाच्या भोकाड पसरायची तर इतकी उडवली..
अगदिच! स्पेशली इशाच्या भोकाड
अगदिच! स्पेशली इशाच्या भोकाड पसरायची तर इतकी उडवली>>>>>
तो भाऊ कदम जेव्हा म्हणतो ना, अनिमेशन आहे ते, ऐकूनच हसून पडलो!
Pages