तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुभा सांगेल की त्या खोलीत बुवा आहे म्हणुन.. मग नाही जाणार ती तिकडे >>> Rofl
होम मिनिस्टरगिरी करावी लागणार काय?>>> Proud
ईशाला शोधताना "८०० खिडक्या ९०० दारं, कुण्या वाटंनं बा गेली ही नारं" सुरू आहे.>>> Happy
वीणा वर्ल्ड honeymoon sponsor करत नाही का >> हो ना good question

काही दिवसांनी अगदी गाणं रचुन वेगवेगळे कॉस्च्युम (हा शब्द बरोबर आहे ना Happy ) घालुन डोंगरदर्‍यात नदीतलावात फिरतात. मग घरात ज्येना आणि मुलांसोबत बघ्ताना ऑड फीलिंगा यावं इतपत एक दोन जवळीक दाखवणारे सीन दाखवतात. मग समजायचं झाला हनिमून.>>> सस्मित हसुन हसुन गाल दुखले माझे

आता खरोखरच्या सरानाही सर म्हणून हाक मारायची भीती वाटत आहे,
अर्थच बदलला आहे तुपारे मुळे
डोक्यात ते ईशाच्या आवजातलं "काय हो सर्र्र्र " वाजत राहतं Proud

वरच्या सगळ्या कंमेंट्स शी सहमत !! कालचा भाग आणि प्रसंग अतिशय गंडलेले होते , काहीही लॉजिकल नव्हतं कपडेपट तर अतिशय बोर Angry
आणि बाबांचा प्रॉब्लेम काय आह़े? घर गहाण पण ठेवू शकले असते ना, कितीही स्वाभिमानी माणूस असेल तरी असा मूर्खपणा करणार नाही>> हो ना .. आणि उद्या इशा माहेरपणासाठी यायचं म्हणाली तर?(नव्या नवसाची भरल्या चुड्याची) पोरगी माहेरपणात कुठे राहील ?एकदा लग्न झालं कि झालं का ?गेली का मुलगी ?१००% सासरची झाली का ? लग्नाचा खर्च अगदी उद्याच्या उद्या द्या असं कोणी सांगितलंय का ? हळू हळू पण देऊ शकत होते ना ? आणि अश्या मोठ्या डिसिजन च्या वेळी बायकोला नको का विश्वासात घ्यायला ?त्यांनी नाही घेतलं कारण त्यांना माहित होतं कि हि विरोध करेल ..
आधी दुसरं घर शोधावं आणि मग हे विकावं ना ?!सारासार विचार करायचाच नाही .. Angry आणि हे सगळं जेव्हा सुभा ला कळेल तेव्हा तो शेवटी घेईलच सोडवून घर किंवा करेलच दुसरी तजवीज Uhoh

आणि असं कसं काय दाखवू शकतात कि इशा वाट बघून त्याच निळ्या शरारा कि काय होता त्यात झोपलीये !? असले कपडे आणि इतके दागिने घालून झोपता येणं शक्यच नाही रात्रभर ..
अजून एकदाही संरंजामे चं किचन दाखवलेलं नाहीये, कि इशा अंदाज घेतेय कसं आहे किचन? कुठे काय आहे? घरात कश्या पद्धतीचं जेवण असतं ?आणि घरात आहेत का पोळ्या शिल्लक ? काssssही नाही आणि चाल्ली हि फोडणीची पोळी करायला ? Uhoh त्या ब्रेकफास्ट च्या सीन मध्ये मुळात सुभा आला तरी होता का बेफा करायला ? Uhoh

सुभा रोमान्टिक होण्याचा चांगला प्रयत्न करतोय. पण समोर इशा असल्याने जास्त आतुन येत नाहीये रोमॅ.पणा>> हो मला पण वाटलं असं .. बिचारा
सुभा उशीरा आल्यावर फ्रेश होणं-हात धुणं वैगेरे काही नाही. लगेच जेवायला-भरवायला सुरुवात>> एक्साक्टली हेच मी म्हंटलं ;निदान हात तरी धुवायचे
इशा तिचा घरात अनेकदा टॉवेल ने हात पुसत बाहेर आलेली दाखवलीय .. तसं सुभा चं घरात पण दाखवता आलं असतं !!
मला वाटतंय कि या आलिशान बंगल्याचा फक्त हॉल, देवघर, जिना, वरचा पॅसेज आणि बेडरूम एवढंच वापराची परवानगी मिळालीये आणि तेवढ्याचंच भाडं देतायत बहुतेक झी वाले.
वॉव आपलं लग्न झालय आपण एकत्र आहोत.. आपलं स्वप्न पुर्ण झालं.. टाईप काही नाही.. सगळं एकदम कोरडं..>> तेच कि Angry
एकंदरीत फार्फार कंटाळवाणे आणि लॉजिकलेस चालू आहे .. आपल्याला पिसं काढायला भरपूर वाव आहे

आता खरोखरच्या सरानाही सर म्हणून हाक मारायची भीती वाटत आहे> >>>> सरांना वाटतेय का भिती? सssssर असं घासलेल्या आवाजात Lol

आता खरोखरच्या सरानाही सर म्हणून हाक मारायची भीती वाटत आहे>>> आई गं !
पण किल्ली तू घाबरू नको त्यासाठी घश्यात घासणी ठेवायला लागते त्याशिवाय असा आवाज नाही यायचा!! Light 1

मला सर ह्या शब्दाची भीती वाटत आहेग" सस्मित ताई", आता फक्त आणि फक्त एमेन्सी कल्चर!! नो सर बीझीनेस्स..

फ्रेशर पोरापोरीनी सर, सर म्हणून टीम मधील सीनीयर्स ना हैराण केलय...

पण किल्ली तू घाबरू नको त्यासाठी घश्यात घासणी ठेवायला लागते त्याशिवाय असा आवाज नाही यायचा>> Lol Rofl

सकाळी नाश्त्याला फोडणीची पोळी खायला लागणार या भितीने बहुतेक विस लवकर सटकतो घरातून. आणि घरी आल्यावर वांग्याचं भरीत (गाजर का हलवा टाईप्स!) म्हणून ऊशीराने येत असावा.
निमकर कॅरॅक्टर एकूणात स्वाभिमानी कमी बिंडोक जास्ती वाटतय.. जयदीप ला तेव्हडीच काँपिटीशन. आता सगळे बहुतेक सरंजामे महालावर येणार रहायला. आणि मग बिंडोक निमकरांचा अपमान... ईआईचे आधाशी वागणे.. या मसाल्या सहित सासू सून नाणंद भावजय मालिका सुरू होईल बहुतेक. त्या रोजच्या त्रासाला वैतागून विस त्याच्या शनाया कडे (मायरा) आकर्षित होणार.. कदाचित तोपर्यंत ईशा चा अभिनय सुधारला असेल..
जालिंदर व टील्लू कुटूंबीय ही पात्रे आता मारायला हवीत...
रच्याकने: विस व ईशा मध्ये कितीही केमिस्ट्री रंगवली तरिही 'तसले' सीन्स बघायला देखिल झेपत नाही... का कुणास ठावूक.. विचार करा सुभा ला किती त्रास होत असेल Wink job compulsions!

पण विस त्या बंद खोलीबद्दल बाळाला काय सांगेल याची उत्सुकता मात्र आहे.>>>"आत्ता तू या घरात नवीन आहेस. या गोष्टींमध्ये लक्ष घालू नकोस. परत कधितरी सांगेन तुला त्याबद्दल " असलं काहितरी थातूरमातूर उत्तर देईल तो. Episode चा घसरत चाल्लेला trp वाढावा म्हणून हा असला precap दाखवतात.. Uhoh

मराठी सिरीयल्स मधे फक्त कपाळ किंवा तेथून वर किस करणे अलाउड दिसते. बडजात्याचा "हम साथ साथ है" जिच्यापुढे थिल्लर वाटेल इतकी संस्कारी सिरीज दिसतीय. >>>>>>>>>>>> तो लग्नाच्या आधी 'तसला' किस करणार होता, पण हि ईशाच महासंस्कारी निघाली. म्हणून विसने लग्नानन्तर फक्त कपाळावर किस करुन त्याचा बदला घेता. लग्नानन्तर घरात थाम्बला नाही हा सुद्दा त्याचा रिवेन्ज होता.

"कोणाच्याही रूम मधे शिरताना नॉक करायचे" अशी सॉन्या सांगत आहे. अरे आत्ता दोन मिनीटांपूर्वी नवीन सुनेच्या रूम मधे पहिल्याच रात्रीनंतर डायरेक्ट घुसल्या ना आईसाहेब? >>>>>>> +++++++++१११११११११

जयदीप विचार करतोय आता मला रोज संध्याकाळी मुंबईच्या उपनगरांत "पदरावरती जरतारीचा...." करत होम मिनिस्टरगिरी करावी लागणार काय? >>>>>>>> Rofl

मला तरी लग्नानंतरची इशा आधीपेक्षा सहणेबल वाटतेय. जास्त मेकपचा परीणाम असेल पण चेहरा गोड वाटतोय. अभिनयाची बोंब आहेच. >>>>>>>> ++++++++ २२२२२२२

सुभा, जयदीप-सॉन्या सकाळी लगेच बेडमधुब उठुन देवघरात. >>>>>>>> आज विस चक्क उशिरा उठला. Wink

आणि आता लग्न झालं तर काय करायच? सकाळी पहिल्यांदा उठुन ऑफिसला जायच? ...
आपलं लग्न झालय आपण एकत्र आहोत.. आपलं स्वप्न पुर्ण झालं.. टाईप काही नाही.. सगळं एकदम कोरडं.. >>>>>>>>>>> हो ना. लन्गानन्तर हे नवीन लग्न झालेले तर अगदीच फॉर्मल वागतायत एकमेकान्शी. आपल्या बायकोला 'तु खुप सुन्दर दिसतेस' हे कोणी फॉर्मल बोलत का? काय तर म्हणे, " मिसेस सरन्जामे, तुम्ही खुप सुन्दर दिसताय.' हाउ अनरोमॅन्टिक! अरे देवघरात उभा आहे म्हणून एवढी फॉर्मलिटी?

आणि बाबांचा प्रॉब्लेम काय आह़े? घर गहाण पण ठेवू शकले असते ना, कितीही स्वाभिमानी माणूस असेल तरी असा मूर्खपणा करणार नाही >>>>>> अगदी अगदी. ती मायरा एवढ कधी नव्हे ते जेन्युली सान्गतेय की तुम्ही पैसे भरण्याची काही गरज नाही. पण नाही, हयान्ना स्वाभिमानी बाणा दाखवायचय ना.

जसा बाप तशी मुलगी. जयदीप आणि सॉनया एवढे सान्गतायत की या घरात सुनान्नी काम केल नाही तरी चालत, तरी हिच मात्र ' हे घर सगळयान्च आहे, तर सगळयान्नी कामात मदत करायला नको का' पुराण चालू. घरात कुणाला काय आवडत, काय नाही आवडत हयाचा जरासुद्दा विचार न करता पोळी भाजी करुन मोकळी झाली. अग एवढा आराम करायला मिळतो इथे तर कर ना. उगाच इथे तिथे नाक कशाला खुपसते.

आता बाबा पण घर विकून तेथे राहायला जातील >>>>>> अस नाही होणार. विसला हे कळेल आणि त्यान्च घर सोडवून आणेल.

सॉन्या म्हणते की हया घरात विस सान्गेल तस सगळयान्नी वागायच म्हणे. पण विस कधीच डॉमिनेटिन्ग वाटला नाही. बिच्चारा, तिला वयाने लहान असूनही वहिनी म्हणून मान देतोय, आता तर काय नवीन बायकोचाही छळ सहन करतोय.

घासणी >> Lol
इशा लग्न करून घरात घुसली आता बाबा पण घर विकून तेथे राहायला जातील, एकुणात बनेल दिसतात सारे ....>> अगदी तसेच वाटले. घरात नाही जाता आले तर विस कडून नवीन घर तर नक्कीच घेतील.

रच्याकने: विस व ईशा मध्ये कितीही केमिस्ट्री रंगवली तरिही 'तसले' सीन्स बघायला देखिल झेपत नाही.>>+१
माय फ्रेंड वहिनी, सर, मि. सरंजामे...... ऐकायला नको वाटते.

विस-मिस एकदम फुस्स्!!

>>विस-मिस एकदम फुस्स्!!
अगदीच मिस्ड अपरच्युनिटी/ऑपॉर्च्युनिटी

हे म्हणजे पोरला हवे त्या शाळेत, हवे त्या वर्गात, हवे ते शिक्षक, हवे ते मित्र, हवा तो बाक ही मिळाला तेही डोनेशन न देता.. पण पोरगं काय अभ्यासाचं मनावर घेत नाही अशी गत आहे.

छे छे आता तो चाळ विकत घेईल. >>>> आणि रीडेव्हलपमेन्टला टाकेल Happy
त्या मायराला , विस ने मोकळं सोडलं होतं का , लग्नाच्या खर्चासाठी ??/१० कोटी खर्च झाला .
कुणाच्या परवानगीने तिने दीड लाखाची पत्रिक बनवली ??
ते हेलिकॉप्टर खरच विकलं का ? खर्च भागवण्यासाठी ?
बेबी दूसर्यादिवशी झोपून उठली तर मेकप , कपडे , दागिने , केस एवढच काय केसातले गजरे पण जस्सेच्या तस्से होते .
तेही कोमेजले नव्हते .

Surprise शब्दाचा अर्थ बदलला आहे का? पेरूचापापा मध्ये कसल डोंबलाच surprise. Script writer च्या विचारशक्तीला ओहोटी लागली आहे. त्या सूट वर मस्तं रोमँटिक सीन झाला असता पण त्या दोघांचे डायलॉग ऐकून कीव आली.
सुभा बेढब दिसतोय आजकाल. मिशी नाहिये म्हणुन आणि पोट सुद्धा सुटलं आहे.

पेरुचापापा जाऊदे इबाळाने भातुकली मांडून दाखविली तरी विस कौतुक करेल त्याचेही काही वाटणार नाही. इतक्या कमी अपेक्षा उरल्या आहेत.

जावयाच्या खर्चात लग्न मला पटत नाही म्हणे....दिड लाखाची पत्रिका वाटली तेव्हा गप्प, नविन कपडे घेतले तेव्हा गप्प, मेव्हणीच्या साडीपायी नविन कंपनी घेतली तेव्हा गप्प, त्यांच्या वर्‍हाडाची सगळी व्यवस्था केली तेव्हा गप्प, सगळा सोहळा नीट पार पडून बाळ तिकडे बागडायला लागल्यावर इबाबांना जाग आली Uhoh ते पण इबाळा सारखेच येडा बनके पेडा खाणारे वाटतात.

नंदूने मायक्रोवेव्ह्च्या बाजूच्या पहिल्या ड्रॉवर मधे सहज दिसणार्‍या डब्यात ठेवलेले साचे, ती मरून दुसरा जन्म घेऊन लग्न करून घरात येऊन शोधून लगेच आणून दिले. तोपर्यंत ते कुठे आहेत ते कोणालाच माहित नव्हते. Lol

कदाचित ते साचे नंदूचे फेवरिट असावेत. स्पेशल असे. म्हणून ते कोणी वापरत नसावेत. त्याचसाठी मंदानी माहित असूनही ते ईबाळाला दिले नाहीत. असं मला वाटतं. कारण ते सापडल्यावर त्या सर्वांची जी नजरानजर झाली ती बरीच सजेस्टीव वाटली.

Script writer च्या विचारशक्तीला ओहोटी लागली आहे. >>> भरती कधी होती ओहोटी लागायला? Proud

सुभाचा शिरियलीतला इंटरेस्ट संपला की काय? काही जानच राहिली नाही."काय म्हणे,वेडी आहे माझी बायको"(अर्थात आम्हाला हे आधीपासूनच माहित होत) असो
हा बेबीला रात्री झोपवून नंतर नौदूच्या खोलीत जातो का,सकाळी त्याच खोलीतून बाहेर येताना दाखवला.
आणि त्यांचा सो कॉल्ड रोमान्स म्हणजे लष्कराची परेड वाटते.
"सा......वधान,वि.....श्राम,दहिने......मूड,बाहें......मूड"
म्हणजे विस काही बोलला की लगेच हिची मान त्याच ठरलेलःया अँगलने खाली.
संवाद पण काय चपखल आहे,ते कपाळावर कीस करण ,हे चुकणार नाही.आहे की नाही परेड.
आणि ते साचे शोधून आणून देण्याची कल्पना,केड्याच्या निर्बुध्दपणाला कोपरापासून नमस्कार
बेबी सरळपणे ते साचे आणून देते,शोधण्याचा अभिनय पण तिला जमला नाही.आता यात बेबीचा संबंध जर नंदूशी दाखवायचा असेल,तर केड्या ,अरे हे असली दळभद्री कल्पना कशी येते रे तुझ्या डोस्क्यात,अरे कुठे फेडशील ही पाप,किती छळतोस प्रेक्षकांना.आम्ही तुझ्या चुका पोटात घालतोय या मालिकेच्या बाबतीत ते सुभासाठी आणि कथेसाठी.
पण हे काय चालवल आहेस....असो
आता प्रीकँप.बेबी विसला प्रेम ही हिंट देऊन स्पेशल लाडू न बघता शोधायला सांगते.
अग भवाने,हार्ट शेप असलेला लाडू न बघता शेंबड पोर पण शोधून देईल ग.हे प्रेम नाही ग,याला स्वत:च्या बुध्दीचे वाभाडे काढण म्हणतात
स्टोरी चांगलीच गंडलेली दिसते.सुभा बाहेर नाही पडणार ना?

कुठे फेडशील ही पाप,किती छळतोस प्रेक्षकांना.आम्ही तुझ्या चुका पोटात घालतोय या मालिकेच्या बाबतीत ते सुभासाठी आणि कथेसाठी.>>>>>>>>++11111 "वा up .....

फेबु की youtube लाईव्ह वर सुभा म्हणाला की अजून काही महिने सिरीयल सुरू राहील.
पण आता 'काही महिने' ची व्याख्या केड्या आणि चॅनेल वाले काय करतात काय माहीत. ३ वर्षं सुरू राहिली तरी म्हणतील ३६ च महिने झालेत

म्हणजे विस काही बोलला की लगेच हिची मान त्याच ठरलेलःया अँगलने खाली.>>>>+++११११

असेल,तर केड्या ,अरे हे असली दळभद्री कल्पना कशी येते रे तुझ्या डोस्क्यात,अरे कुठे फेडशील ही पाप,किती छळतोस प्रेक्षकांना.आम्ही तुझ्या चुका पोटात घालतोय या मालिकेच्या बाबतीत ते सुभासाठी आणि कथेसा+++++++३३३३३४४४४ अगदी अगदी

आता प्रीकँप.बेबी विसला प्रेम ही हिंट देऊन स्पेशल लाडू न बघता शोधायला सांगते.
अग भवाने,हार्ट शेप असलेला लाडू न बघता शेंबड पोर पण शोधून देईल ग.हे प्रेम नाही ग,याला स्वत:च्या बुध्दीचे वाभाडे काढण म्हणतात >>>>> Rofl Rofl Rofl Rofl

सुभा आहे तर खुप्प्प नाही लांबायची सिरिअल.. सध्या तो खुप पकल्यासार्खा वाटतो.. तेच तेच डायलॉग..
दोन दिवसात 'वेडी आहे माझी बायको' २ वेळा म्हणुन झालं..
ते किसची सवय मोडायची नाही २ वेळा म्हणुन झालं..
मिसेस सरंजामे खुप वेळा म्हणुन झालं..
कल्प्कता कमी आहे.. सुभाच्या एजला सुटेबल रोमँटिक काही सापडत नाही त्याना..
त्यात सुभा त्याच्या वयाची अ‍ॅक्टिंग करतोय पण इशा ३-४ वर्षाची असल्याची अ‍ॅक्टिंग करतेय.. त्यामुळे एजगॅप अजुनच वाढलाय.. सुभाचा मॅच्युअर लूक आणि चार्म परतण्याच्या प्रतिक्शेत..

Pages