देव, महिला आणि मंदिरप्रवेश वगैरे ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 October, 2018 - 01:27

देशातल्या कुठल्यातरी मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. एका मित्राच्या फेसबूक वॉलवर या संदर्भात पोस्ट वाचली. तो या प्रवेशाच्या विरोधात होता. मी त्याच्या विचारांच्या विरोधात भलामोठा प्रतिसाद दिला. प्रतिसादाचा आशय साधारण असा होता - तुम्ही लोकांनी मुलींना शिक्षण घ्यायची आणि त्यानंतर कमवायला बाहेर पडायची, स्वत:च्या पायावर उभे राहायची परवानगी दिलीत ईथेच तुम्ही चुकलात. आता त्यांना जिथे जायचेय तिथे त्या जाणारच. भोगा आपल्या कर्माची फळे.
या प्रतिसादाला मूळ पोस्टपेक्षाही जास्त लाईक्स आले. मूळ पोस्टशी सहमत असलेल्यांनी सुद्धा लाईक केले. ज्यांन उपरोध कळत नाही अश्यांचे खरेच अवघड असते. पण गंमत म्हणजे त्यांच्यातील एकही जण असे नाही म्हणाला की येस्स मी आता माझ्या मुलींचे शिक्षणच थांबवतो!

पण मग त्याच दिवशी हाच विषय मी व्हॉटसपग्रूपवर पाहिला. तिथेही मी स्त्रीव्यक्तीस्वातंत्र्याचा आणि हक्काचा मुद्दा काढताच एका धार्मिक स्वभावाच्या मुलाने माहीती पुरवली की लहान मुलींना आणि वृद्ध महिलांना परवानगी आहे. फक्त मासिक पाळी चालू असणारया महिलांना परवानगी नाही. यामागचे शास्त्र विचारल्यास ते अपवित्र समजले जाते ईतकेच उत्तर आले. त्यावर मी म्हणालो, मग हस्तमैथुन करणारया पुरुषांना परवानगी का आहे? मासिक पाळी अपवित्र समजली जाते, तर वीर्य पवित्र का समजले जावे? ते गाळणारया पुरुषांना कश्याच्या आधारावर परवानगी आहे? शेवटी ते पुरुष आहेत म्हणूनच हा वेगळा न्याय ना...
यावर कोणाचेच काहीच उत्तर नाही आले. दोनचार टवाळांनी दात काढले पण मला ते अपेक्षित नव्हते.

असो, पुढल्याच दिवशी हा विषय ऑफिसमध्ये लंचब्रेकला निघाला. तिथे स्त्रिया आणि बहुसंख्य पुरुष सहकर्मचारी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतच करत होते. स्त्रियांच्या प्रवेशाच्या हक्काचीच बाजू घेत होते.

आता प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आणि दोन्ही बाजू कमीजास्त प्रमाणात योग्य असू शकतात. आपल्याला जी बाजू जास्त योग्य वाटते आपण तिची बाजू घेतो. अश्यात मला खोड आहे की बहुमताची विरुद्ध बाजू घेऊन विचार करायची. साहजिकच मी ईथे त्यांना विरोध केला,

मी नास्तिक आहे, धार्मिक जराही नाही. मी देव मानत नाही. त्यामुळे मी तुमच्या देवांच्या पौराणिक कथांची आणि तुम्ही मानत असलेल्या देवाची सहज टिंगल उडवू शकतो. आणि माझे म्हणने खोडून काढायला तुम्हाला देव असल्याचा एकही पुरावा देता येणार नाही. पण तरीही याने तुमच्या धार्मिक भावना मात्र दुखावतील.

हे देखील तसेच आहे.

एकदा तुम्ही देव आहे असे मानले की काही गोष्टी ओघाने मानाव्याच लागतात. अगदी साध्या साध्या गोष्टी जसे की सणाच्या दिवशी मांसाहार करू नये, आंघोळ केल्याशिवाय देवाची पूजा करू नये, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण खाऊ नये.. वगैरे वगैरे.. ईथे मग प्रत्येकवेळी लॉजिक शोधायचा वा व्यक्तीस्वातंत्र्य जपायचा हट्ट धरू नये.
एकवेळ माझी गोष्ट वेगळी आहे, धार्मिक भावना दुखावल्या जातात म्हणजे नेमके काय होते याचा मला अनुभव नाही, पण तुम्हाला त्या भावना समजू शकतात. तर समजून घ्या ना.. मंदिरात प्रवेश हवाच हा हट्ट का धरत आहात?

ईथेही पुढे मग कोणी वाद वाढवला नाही..

नंतर घरी आल्यावर वाटले की हा वादच व्यर्थ आहे. ज्या महिला त्या देवाला आणि त्यासोबत चालून येणारया प्रथांना मानतात त्या मंदिराचे पावित्र्य जपायला स्वत:च तिथे जाणार नाहीत. आणि ज्या देवधर्माच्या कल्पना मानत नाहीत त्या मूळातच त्या मंदिरात जाणार नाहीत ... हट्टाने एकदोनदा काय जातील तेवढेच!

त्यामुळे अस्पृश्य समजले जाणारयांना एखादी पाण्याची विहीर उघडी केले आहे या धर्तीवर धार्मिक समज विरुद्ध व्यक्तीस्वातंत्र्य अशी लढाई उभारण्यात काही अर्थ नाही.

या विषयावर कोणाशी काहीही बोललो तरी मी नास्तिक आहे हे समोरच्या सगळ्यांना माहीत असल्याने आणि हा पटकन आपल्याच भावना दुखावून जायचा या भितीने या विषयावर माझ्याशी सहसा कोणी वाद घालत नाही. त्यामुळे कोणाशी तरी बोलावेसे वाटले ईतकेच Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवळात येऊ द्यायचे कि नाही हा एक फार लहान भाग आहे. लोकांनी मोठ्या प्रॉब्लेम वर लक्ष देऊ नये म्हणून. त्यामुळे लोकांनी जास्त महत्व देऊ नये. पुणेकर असाल तर स्मार्ट सिटी मध्ये फूटपाथ सोडून काही आहे का असे काहीतरी प्रश्न विचारावे.

सध्या 'चार दिवस' तुला भरपूर वेळ दिसतोय रुणम्या. ऑफिसला गेला नाहिस?
>>>>
हो सध्या जरा आजारी आहे. म्हणून घरी आहे. ईथली चर्चा माझे टॉनिक आहे. काळजीबद्दल धन्यवाद Happy

सिम्बा, जी लाखो लोकं मंदिर प्रवेशासाठी पाठींबा देताहेत त्या पैकी किती लोकं त्या मंदीरात (अगदी भक्तीभावाने नाही तरी) गेली होती? तिथं जी लोकं वर्षानुवर्षे जात आहेत, त्यांच्या साठी एक रुढी म्हणून ही प्रथा पाळायला काय हरकत आहे? आणि समजा स्त्रियांना नाही जाता आलं, काय नुकसान होणार आहे? देशातले इतर सगळे प्रश्न संपलेत काय?

>>>>>>>लाखो लोकं मंदिर प्रवेशासाठी पाठींबा देताहेत त्या पैकी किती लोकं त्या मंदीरात (अगदी भक्तीभावाने नाही तरी) गेली होती?>>>>>>>>
हे आपण कसे सांगणार?? कदाचित त्यातल्या मेजोरीटी स्त्रिया अय्यपा भक्त असतील आणि त्यांना दर्शनाची आस लागली असेल,

>>>>>>तिथं जी लोकं वर्षानुवर्षे जात आहेत, त्यांच्या साठी एक रुढी म्हणून ही प्रथा पाळायला काय हरकत आहे?>>>>>>
वरच्या वाक्याचा "कोणाला एखादी रूढी पटत नसेल तर त्यात भाग घेऊ नये, पण इतरांना पाळायची असेल तर मज्जाव करू नये " असा अर्थ काढला तर ते किती डिझास्टर्स आहे याची कल्पना येईल,
तुम्हाला बायकांचे केशवपन/सती पसंत नाही, मग तुमच्या कुटुंबापूरते थांबवा, बाकी समाजाला करू द्या
तुम्हाला शिवाशिव पसंत नाही, तुमच्या पुरती थांबवा बाकी समाजाला करू द्या.
अशा विचाराने सामाजिक बदलांचा वेग प्रचंड मंदावेल.

>>>>>>>>>आणि समजा स्त्रियांना नाही जाता आलं, काय नुकसान होणार आहे? >>>>>>
तुमच्या वरच्या प्रश्नात "स्त्रिया" शब्दा ऐवजी "दलित" शब्द घालून तोच प्रश्न परत विचारा
किंबहुना " जन्माधारित असणाऱ्या" कोणत्याही गोष्टीचे नाव घाला.
आता तुम्हाला तो प्रश्न बरोबर वाटतोय का?

शनिदेवाच्या चोथर्यावर चढून नमस्कार केल्याने कोणाचे भले झाले नाही की कोणावर संकटांचे पहाड कोसळले नाहीत. लोकांना या गोष्टी दिसत राहतील तेव्हा ते धर्म/देव या संकल्पनांकडे डोळसपणे बघू लागतील, आणि या जोखडापासून मुक्त होण्याची प्रक्रिया वेग घेईल.

सगळे प्रश्न संपले का? >>>>
समाजाचे कुठलेच प्रश्न एकामागून एक हाताळता येत नाहीत, तिकडे parallel प्रोसेससिंग च लागते.
अगदी हाच प्रश्न #मिटु च्या वेळेस विचारला जायचा,
त्यामुळे हा प्रश्न माझ्या दृष्टीने तरी गैरलागू आहे.

सगळे प्रश्न संपले का हे स्त्रियांच्या मंदिरप्रवेशाच्या विरोधात हिंसक आंदोलने करणार्‍या आणि त्या स्त्रियांच्या समोर नवे नवे प्रश्न निर्माण् करणार्‍यांना विचारला पाहिजे.

तुर्रमखान
माझ्या पोस्ट कॉपीपेस्ट करून टाका. बघा उत्तरे मिळताहेत का तुम्हाला Happy

माझा एकुणच आक्षेप बाकिच्यांचं नुकसान होत नसताना समानतेचा, विज्ञानवादी वगैरे झेंडा घेउन ढवळाढवळ करण्याला आहे. बरं एव्हडी रडारड करून गेल्या स्त्रिया मंदिरात, मग काय फरक पडणार आहे? उद्या मशिदीमध्ये मुस्लिम स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून नाचाल. नंतर अंदमान मधल्या आदिवासींच्या मुलांना पकडून शाळेत पाठवाल. मुळात बाहेरचे ठरवणारे कोण?

स्त्रिया मंदिरात गेल्याने फरक पडत नाही, तर एवढी रडारड कशाला?

कोण बाहेरचे, कोण आतले हे ठरवणार कोण?देशभक्तीची सर्टफुकटं वाटून संपली आता देवभक्तीची वाटणार का?

स्त्रियांनी बुरखा घालून फिरले तरी काय फरक पडतो?
तसंही बुरखा न घालणाऱ्या स्त्रियाही काही उन्हात फिरत नाहीत, उन्हात जावेच लागले तर अगदी हातपाय तोंड झाकूनच फिरतात की, त्यांनाही ड जीवनसत्वाची कमतरता जाणवतेच आणि त्यांनाही गोळ्या घ्यावाच लागतात.

मुळात बाहेरचे ठरवणारे कोण>>>>>
हिंदू स्त्रियांनी हिंदू देवळात जावे/जाऊ नये या बद्दल हिंदू स्त्रिया बोलत आहेत तर त्या बाहेरच्या कशा झाल्या?

शबरीमालाच्या मंदीरात प्रवेशासाठी केरळातल्या ख्रिश्चनधर्मिय स्त्रिया मानवी साखळी आंदोलन करणार असल्याची बातमी वाचनात आली होती.
<<
Lol
देशातील काही बाटगे हिंदू व अर्बन नक्षली, हिंदूची सर्व मंदीरे बाटवायच्या तयारीत आहेत असे दिसतेय.

ख्रिश्चनधर्मिय स्त्रिया मानवी साखळी आंदोलन करणार असल्याची बातमी वाचनात आली होती.>>>>
पुढे त्याचे खरे खोटे केलेत का?
मंदीरात शिरलेल्या स्त्रिया हिंदूच होत्या ना?

स्त्रिया मंदिरात गेल्याने फरक पडत नाही, तर एवढी रडारड कशाला?
>>>>

आंघोळ न करता गेलो तर काय फरक पडतो?
मला का आंघोळ न करता जाऊ देत नाहीत?
माझ्यासाठी वेगळा न्याय का? मी का अन्याय सहन करू?
आंघोळ न करता मी कित्येकदा शाळा कॉलेज अगदी ऑफिसलाही गेलोय. मग मंदिरातच का मला नेत नाहीत??

अजूनही उत्तर नाहीच ना Happy

स्त्रिया , दलित देवळात गेल्याने देवळे बाटतात.
जयतु हिंदु राष्ट्रम्|
>>>>

स्त्रिया आणि दलित यांना पुन्हा पुन्हा एकाच मुद्द्यात गुंफायचा प्रयत्न चालू आहे.

मी स्त्री नाही पुरुष आहे.
पण मलाही आंघोळ केल्याशिवाय मंदिरात नेत नाहीत.

त्यामुळे जरा वाक्य बदलता येईल का?

स्त्रिया, पुरुष , दलित देवळात गेल्याने देवळे बाटतात.
जयतु हिंदु राष्ट्रम्|

हे योग्य आहे.

आणि म्हणूनच मी कुठलाच धर्म आणि देव मानत नाही. झंजटच नाही Happy

स्त्रियांनी बुरखा घालून फिरले तरी काय फरक पडतो?
>>>>

फरक पडतो.

कालच एका एटीएमजवळ राडा पाहिला. मुस्लिम महिला बुरखा काढायला तयार नव्हती. आणि वॉचमन आत सोडत नव्हता.

मुळात एखाद्या स्त्री ला बुरख्यात टाकणारे तुम्ही पुरुष कोण? तिचे मालक?

मला एका प्रश्नाचे उत्तर द्याल का कोणी?

मुळात आपल्या देशात वा समाजात एखाद्या जन्म घेतलेल्या मुलाला स्वत:च्या मर्जीने धर्म निवडायची तरी सवलत आहे का? त्यावर त्याच्या आईबाबांचा धर्म चक्क लादला जातो. गंमत म्हणजे त्या आईबाबांनीही तो स्वत: निवडलेला नसून त्यांच्यावरही तो लादला गेलेला असतो.

तर हे चूक कि बरोबर?

<< सिम्बा, जी लाखो लोकं मंदिर प्रवेशासाठी पाठींबा देताहेत त्या पैकी किती लोकं त्या मंदीरात (अगदी भक्तीभावाने नाही तरी) गेली होती? >>
--------- मंदिर प्रवेशासाठी समर्थन देण्यासाठी मंदिरात भक्तीभावाने जाणारेच असायला पाहिजे असे नाही.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे आणि मला समानता हवी आहे. महिलांना प्रवेशाचा हक्क असायला हवा. त्यांनी तिथे जायला हवे अथवा नाही याची निवड त्यांनी करायची.

<<< तिथं जी लोकं वर्षानुवर्षे जात आहेत, त्यांच्या साठी एक रुढी म्हणून ही प्रथा पाळायला काय हरकत आहे? आणि समजा स्त्रियांना नाही जाता आलं, काय नुकसान होणार आहे? देशातले इतर सगळे प्रश्न संपलेत काय? >>
----------- वर्षानुवर्षे महिलाना प्रवेश नाकारणारी आणि टोकाची असामनता जोपासणारी चुकीची प्रथा केवळ तशी प्रथा आहे म्हणुन पाळायला हवी हा कर्मठपणा कशाला ?
देशात समानतेचे, सौहार्दतेचे आणि प्रत्येकाला सुरक्षित वाटेल असे वातावरण असणे महत्वाचे आहे. स्त्रीयांना त्या केवळ स्त्रिया आहेत म्हणुन मंदिरात प्रवेश नाकारणे, त्यांना पदोपदी असमान वागणुक देणे हे अत्यंत लाजिरवाणे आहे आणि अशी अनिष्ट प्रथा नष्ट व्हायलाच हव्यात.

<< शबरीमालाच्या मंदीरात प्रवेशासाठी केरळातल्या ख्रिश्चनधर्मिय स्त्रिया मानवी साखळी आंदोलन करणार असल्याची बातमी वाचनात आली होती. >>
---------- मंदिर प्रवेशासाठी समर्थन देणार्‍यांचे धर्म हुडकत बसण्यापेक्षा त्यांचा आक्षेप नक्की कशासाठी आहे हे महत्वाचे आहे. मानवी साखळीत भाग घेणार्‍यांचा एकच धर्म होता... मानवता आणि त्यांना समानता हवी आहे.

मानवी साखळीत भाग घेणार्‍यांचा एकच धर्म होता... मानवता आणि त्यांना समानता हवी आहे.
√√√

थोडंसं अवांतर होईल,
पण जोपर्यत तुम्ही हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन यापैकी एखादा धर्म कवटाळून बसता तोपर्यंत मानवता वगैरे धर्म जोपासणे अवघड असते.
मुळात माणसामाणसांमध्ये भेद निर्माण करणारे जात आणि धर्म जे आपल्या नावासमोर चिकटले आहेत त्यांना ओरबाडून फेकून द्यायला हवे. त्यानंतरच मी मानव आहे आणि मानवता हा माझा धर्म आहे वगैरे आदर्शवादी वाक्ये शोभतील.

<< पण जोपर्यत तुम्ही हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन यापैकी एखादा धर्म कवटाळून बसता तोपर्यंत मानवता वगैरे धर्म जोपासणे अवघड असते.
मुळात माणसामाणसांमध्ये भेद निर्माण करणारे जात आणि धर्म जे आपल्या नावासमोर चिकटले आहेत त्यांना ओरबाडून फेकून द्यायला हवे. त्यानंतरच मी मानव आहे आणि मानवता हा माझा धर्म आहे वगैरे आदर्शवादी वाक्ये शोभतील. >>
-------- तुम्ही वर उल्लेखलेले सर्व धर्म आपणच म्हणजे मानवाने तयार केलेले आहेत. वयाने हे सर्व धर्म मानवाच्या जन्माच्या (साधारण ३००,००० वर्षे) तुलनेने अगदी नजिकच्या काळातले (५००० वर्षे) आहेत. मानायचे, नाही मानायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी माझ्यापुरते झुगारणे शक्य आहे आणि प्रत्येकाला तेव्हढेच शक्य आहे.

मानवता हा सर्व समावेशक धर्म आहे त्या मधे धर्म मानणारे, न मानणारे सर्व आलेच. तोच धर्म सर्वात जुना आहे आणि सर्व काळ टिकणारा आहे.

जेव्हा तुम्ही म्हणता की मी अमुकतमुक जातीधर्माचा आहे तेव्हा या वर्गीकरणने तुम्ही स्वताला ईतर परजातीय आणि परधर्मीय मानवांपेक्षा वेगळे करता. मानवता धर्माच्या मूळ गृहीतकालाच धक्का Happy

मानवता धर्माच्या मूळ गृहीतकालाच धक्का >>>>>>>
काय सांगता, खरच की काय?
ये धक्का जोरसे लगा!!!!!!

ज्या ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मिय स्त्रिया मानवता आणि समान हक्क म्हणून शबरीमालाच्या मंदिरात प्रवेशाला पाठींबा देत आहेत त्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचं पोप महाशयांच्या ख्रिश्चन स्त्रिया धर्मगुरु बनू शकत नाहीत या वक्तव्यावर काय मत आहे?

https://cruxnow.com/vatican/2018/06/20/pope-reaffirms-women-cant-be-prie...

समानतेच्या तत्वानुसार ख्रिश्चन स्त्रियांना धर्मगुरु बनण्याचा हक्क का डावलला जात आहे?

या वरच्या प्रश्नावरून हेच सिद्ध होतं की सगळे धर्म स्त्रियांना दुय्यम लेखतात.(इतर बाबतीत एकमेकांना नावे ठेवणारे अशा वेळी मात्र एकमेकांचे दाखले देतात, हेही लक्षणीय आहे)
त्यातल्या एका धर्मात समानता हवी आणि दुसर्‍यात नको, अशी भूमिका घेणार्‍यांना तो प्रश्न विचारणं उचित ठरेल.
काही कॅथलिक्सही स्त्रियांना प्रीस्टहूडची मागणी करू लागलेत, हे स्वागतार्ह आहे. त्यांचीही भुमिका समानतेचीच आहे.
“The Church that preaches the equality of women but does nothing to demonstrate it within its own structures … is … dangerously close to repeating the theological errors that underlay centuries of Church-sanctioned slavery.”

प्रिव्हिलेज आणि राईट्स यांत गल्लत होत चालली आहे.

उदाहरणार्थ,

फुटपाथवरुन चालता येणे हा हक्क (राईट) आहे.

रस्त्यावरुन वाहन चालवता येणे हा विशेषाधिकार (प्रिविलेज) आहे.

मंदिर कोणाच्या मालकीचे आहे? खाजगी, सरकारी की धर्मादाय संस्थेच्या? जर खासगी असेल तर कोणाला आत येऊ द्यायचे ते मालक ठरवतील. इतरांचे मत ग्राह्य धरले जाणार नाही. सरकारी असेल तर कोणालाच अडवता येणार नाही.

पण जर धर्मादाय संस्थेचे असेल त्याला खासगी नियम लावणार की सरकारी? आणि सरकारी नियम लावायचेच असतील तर मंदिरात विशिष्ट वयोगटाच्या महिलांना प्रवेश द्यायच्या फालतू मुद्द्याबाबत लढण्यापेक्षा पद्मनाभन आणि इतर सर्वच देवस्थानांची संपत्ती सरकारी कोषागारात जमा करण्याकरिता लढा द्या. आपल्या राष्ट्राची गरिबी दूर होऊन त्वरीत अच्छे दिन येतील.

Pages