देशातल्या कुठल्यातरी मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. एका मित्राच्या फेसबूक वॉलवर या संदर्भात पोस्ट वाचली. तो या प्रवेशाच्या विरोधात होता. मी त्याच्या विचारांच्या विरोधात भलामोठा प्रतिसाद दिला. प्रतिसादाचा आशय साधारण असा होता - तुम्ही लोकांनी मुलींना शिक्षण घ्यायची आणि त्यानंतर कमवायला बाहेर पडायची, स्वत:च्या पायावर उभे राहायची परवानगी दिलीत ईथेच तुम्ही चुकलात. आता त्यांना जिथे जायचेय तिथे त्या जाणारच. भोगा आपल्या कर्माची फळे.
या प्रतिसादाला मूळ पोस्टपेक्षाही जास्त लाईक्स आले. मूळ पोस्टशी सहमत असलेल्यांनी सुद्धा लाईक केले. ज्यांन उपरोध कळत नाही अश्यांचे खरेच अवघड असते. पण गंमत म्हणजे त्यांच्यातील एकही जण असे नाही म्हणाला की येस्स मी आता माझ्या मुलींचे शिक्षणच थांबवतो!
पण मग त्याच दिवशी हाच विषय मी व्हॉटसपग्रूपवर पाहिला. तिथेही मी स्त्रीव्यक्तीस्वातंत्र्याचा आणि हक्काचा मुद्दा काढताच एका धार्मिक स्वभावाच्या मुलाने माहीती पुरवली की लहान मुलींना आणि वृद्ध महिलांना परवानगी आहे. फक्त मासिक पाळी चालू असणारया महिलांना परवानगी नाही. यामागचे शास्त्र विचारल्यास ते अपवित्र समजले जाते ईतकेच उत्तर आले. त्यावर मी म्हणालो, मग हस्तमैथुन करणारया पुरुषांना परवानगी का आहे? मासिक पाळी अपवित्र समजली जाते, तर वीर्य पवित्र का समजले जावे? ते गाळणारया पुरुषांना कश्याच्या आधारावर परवानगी आहे? शेवटी ते पुरुष आहेत म्हणूनच हा वेगळा न्याय ना...
यावर कोणाचेच काहीच उत्तर नाही आले. दोनचार टवाळांनी दात काढले पण मला ते अपेक्षित नव्हते.
असो, पुढल्याच दिवशी हा विषय ऑफिसमध्ये लंचब्रेकला निघाला. तिथे स्त्रिया आणि बहुसंख्य पुरुष सहकर्मचारी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतच करत होते. स्त्रियांच्या प्रवेशाच्या हक्काचीच बाजू घेत होते.
आता प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आणि दोन्ही बाजू कमीजास्त प्रमाणात योग्य असू शकतात. आपल्याला जी बाजू जास्त योग्य वाटते आपण तिची बाजू घेतो. अश्यात मला खोड आहे की बहुमताची विरुद्ध बाजू घेऊन विचार करायची. साहजिकच मी ईथे त्यांना विरोध केला,
मी नास्तिक आहे, धार्मिक जराही नाही. मी देव मानत नाही. त्यामुळे मी तुमच्या देवांच्या पौराणिक कथांची आणि तुम्ही मानत असलेल्या देवाची सहज टिंगल उडवू शकतो. आणि माझे म्हणने खोडून काढायला तुम्हाला देव असल्याचा एकही पुरावा देता येणार नाही. पण तरीही याने तुमच्या धार्मिक भावना मात्र दुखावतील.
हे देखील तसेच आहे.
एकदा तुम्ही देव आहे असे मानले की काही गोष्टी ओघाने मानाव्याच लागतात. अगदी साध्या साध्या गोष्टी जसे की सणाच्या दिवशी मांसाहार करू नये, आंघोळ केल्याशिवाय देवाची पूजा करू नये, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण खाऊ नये.. वगैरे वगैरे.. ईथे मग प्रत्येकवेळी लॉजिक शोधायचा वा व्यक्तीस्वातंत्र्य जपायचा हट्ट धरू नये.
एकवेळ माझी गोष्ट वेगळी आहे, धार्मिक भावना दुखावल्या जातात म्हणजे नेमके काय होते याचा मला अनुभव नाही, पण तुम्हाला त्या भावना समजू शकतात. तर समजून घ्या ना.. मंदिरात प्रवेश हवाच हा हट्ट का धरत आहात?
ईथेही पुढे मग कोणी वाद वाढवला नाही..
नंतर घरी आल्यावर वाटले की हा वादच व्यर्थ आहे. ज्या महिला त्या देवाला आणि त्यासोबत चालून येणारया प्रथांना मानतात त्या मंदिराचे पावित्र्य जपायला स्वत:च तिथे जाणार नाहीत. आणि ज्या देवधर्माच्या कल्पना मानत नाहीत त्या मूळातच त्या मंदिरात जाणार नाहीत ... हट्टाने एकदोनदा काय जातील तेवढेच!
त्यामुळे अस्पृश्य समजले जाणारयांना एखादी पाण्याची विहीर उघडी केले आहे या धर्तीवर धार्मिक समज विरुद्ध व्यक्तीस्वातंत्र्य अशी लढाई उभारण्यात काही अर्थ नाही.
या विषयावर कोणाशी काहीही बोललो तरी मी नास्तिक आहे हे समोरच्या सगळ्यांना माहीत असल्याने आणि हा पटकन आपल्याच भावना दुखावून जायचा या भितीने या विषयावर माझ्याशी सहसा कोणी वाद घालत नाही. त्यामुळे कोणाशी तरी बोलावेसे वाटले ईतकेच
{{{ हा वादच व्यर्थ आहे. ज्या
{{{ हा वादच व्यर्थ आहे. ज्या महिला त्या देवाला आणि त्यासोबत चालून येणारया प्रथांना मानतात त्या मंदिराचे पावित्र्य जपायला स्वत:च तिथे जाणार नाहीत. आणि ज्या देवधर्माच्या कल्पना मानत नाहीत त्या मूळातच त्या मंदिरात जाणार नाहीत ... हट्टाने एकदोनदा काय जातील तेवढेच! }}}
हीच काय ती लेखातली महत्त्वाची वाक्ये आहेत. हे समजले की वादाला कारणच राहत नाही.
तरीही नास्तिकाचार्य ऋन्मेषब्वांच्या माहितीकरिता -
सबब मासिकधर्मातील स्त्रियांना मंदिर प्रवेश वर्ज्य होता.
अर्थात जिथे "मानला तर देव" अशी परिस्थिती आहे तिथे वरच्या सर्व समजुती तुमच्या मानण्यावर आहेत. त्यांना खरे धरुन चालण्याची कुणावरच सक्ती नाही. फक्त ह्या अशा समजुती का होत्या? या प्रश्नाचे हे स्पष्टीकरण आहे.
वेलकम बॅक ऋ
वेलकम बॅक ऋ
धगधगत्या विषयावरील या धाग्याला शुभेच्छा.
एकदा तुम्ही देव आहे असे मानले
एकदा तुम्ही देव आहे असे मानले की काही गोष्टी ओघाने मानाव्याच लागतात. >>>>
"आम्ही सगळे देव मानतो आणि त्याच बरोबर त्याच्या सोबत काळाच्या ओघात जोडल्या गेलेल्या सर्व संकल्पनाही मानतो," या टोका पासून ते " देव ही एक शक्ती आहे, ती सर्वत्र असते, तिचे मनात केलेले स्मरणही पुरेसे ( देवळात जायची गरज नाही)" असे मानणाऱ्या पर्यंत विविध स्तरावरील संकल्पना बाळगणारे आस्तिक असतात.
पूर्वी मासिकपाळीत स्त्रियांना देवपूजा वगैरेच नव्हे तर जेवणातही कशात हात लावू देत नसत, हळदीकुंकू वगैरेंना जाण्यास मनाई असे. आता स्त्रीया हे पाळत नाहीत, ते त्या आता नास्तिक झाल्या म्हणून नव्हे, तर आस्तिक असुनही त्यांना मासिकपाळीतील कुठलीही अथवा काही बंधने पाळायची नाहीत.
त्याचप्रमाणे आमची अमुक देवतेवर श्रद्धा आहे आणि तिला मनात अथवा देवळात जाऊन आम्ही मासिकपाळीची बंधने न पाळता पूजू इच्छितो अशी मागणी पूर्णतः खरी असू शकते.
तेव्हा देवाला मानता तर त्यासोबत जोडल्या गेलेल्या इतर सर्व गोष्टीही मानल्याच पाहीजे हा अट्टाहास / गृहीतक चुकीचे आहे, व त्यावरून काढलेला निष्कर्षही.
मूत्र,शौच, यासारखाच मासिकपाळी
मूत्र,शौच, यासारखाच मासिकपाळी हा स्त्राव आहे.फक्त तो महिन्यानंतर वहातो.जसा नाकातला म्यूकस तसाच हा स्त्राव.
मला एक प्रश्न पडलाय
मला एक प्रश्न पडलाय
जर का स्त्रियां ह्या काळात गेल्याच मंदिरात तर खरेच काही कोप वगैरे होतो का????
काय आहे ना एखाद् स्त्रिला मासिक पाळी आलिये की नाही हे तिने न सांगता मंदिरात कुणाला कळणार्च नाही
मग तिला, तिच्या घरच्यान्ना किंवा मंदिरात तिला स्पर्श केलेल्या कुणाला किंवा कुणालाही देवाचा काही कोप झालाय का जानुन घ्यायची ईच्छा झाली.
ही पोष्ट मी खुप गांभिर्यान्नी लिहीली आहे तेव्हा योग्य उत्तराची अपेक्षा आहे
जर का स्त्रियां ह्या काळात
जर का स्त्रियां ह्या काळात गेल्याच मंदिरात तर खरेच काही कोप वगैरे होतो का????>>>> अजिबात नाही.तिरुपतीला माझ्या आईची मैत्रिण आईला विचरत होती की तिला पाळी आली आहे,तर काय करू.आई म्हणाली इतक्या दूर तू आली आहेस.परत येशील न येशील.पाळी तुझ्या हातातली नाही.आलीच आहेच्,तर पाहून घे.त्याप्रमाणे मैत्रिणीने केले.तिचे काहीही वाईट झाले नाही.
मी स्वतः आस्तिक आहे. देव
मी स्वतः आस्तिक आहे. देव मानते, तरीही शबरीमाला देवळात विशिष्ट वयोगटातील स्त्रियांना बंदी आहे हे काही पटलेले नाही. मासिक पाळी येणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. त्यात वाईट असे काहीही नाही. पूर्वीच्या काळी काही बंधने घातली असतीलही पण आता काळानुसार बदलणे गरजेचे आहे. पूर्वी स्त्रियांचे रहाणीमान, मुलभूत साधन सुविधांचा अभाव, (टाॅयलेट्स, नळ, वीज) सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या जागा असल्याने त्याठिकाणी हात लावायला बंदी असे( स्वच्छतेच्या दृष्टीने ) पाळी असतांना अंगमेहनतीच्या कामापासून सुटका व थोडा आराम म्हणून बायकांना चार दिवस बाजूला बसवले जाई. म्हणून त्याचा विपर्यास करून बंधने घालणे चुकीचे आहे. आजही बायका (हिंदू ) ते चार दिवस सहसा देवळात जात नाहीत. बाकी ख्रिश्चन बायका आपल्या चर्च मधे जातात.(तिथे देवाला प्राॅबलेम नाही. ) आता डोंगरावर किंवा दाट जंगलात असलेली देवालये व तिथे मासिक पाळीत असतांना स्त्रियांनी जावू नये हे पटण्याजोगे आहे कारण जंगली प्राणी स्त्रावाच्या वासाने तिथे ओढले जावू शकतात. पण ते दिवस सोडून बाकी दिवसात बंदीचे काहीही कारण नाही. शबरीमाला पुजारी सांगतात की देव ब्रम्हचारी आहे म्हणून विशिष्ट वयाच्या बायकांना प्रवेश नाही. पण हे कारण पटण्याजोगे नाही, तो जर ब्रम्हचारी असेल तर प्रत्येक स्त्रीला तो मातृ रूपातच बघेल ना? त्याला कशाला बायकांची भीती? आपला मारुतीही ब्रम्हचारी आहेच की. नासिक त्र्यंबकेश्वरलाही गाभाऱ्यात फक्त पुरुषांनाच प्रवेश दिला जातो. खरंतर शिवलिंग काॅनसेप्टच मुळी नुसता शिव नसून लिंग व शाळुंका (योनी) शिव शक्तीचे एकत्रित प्रतीक आहे. तरीही बायकांना प्रवेश नाही मग ह्याच कायद्याने महालक्ष्मी किंवा इतर देवींच्या मंदिरात पुरूष पुजारी कसा काय चालतो? देवीला स्नानापासून ते वस्त्रे हेच पुरुष पुजारी नेसवतात की. तिथे कुठे घेतलाय कुठल्या देवीने आक्षेप? खरंतर कुठल्याही देवळात न जाता आपण आपल्या घरीही पुजा अर्चना करू शकतो पण स्थान महात्म्य व एकत्रितपणे केलेल्या प्रार्थनेतील ऊर्जा मिळवण्यासाठी आपण देवळात जातो.
म्हणजे अंगाला खरचटले असेल तर
म्हणजे अंगाला खरचटले असेल तर अशा व्यक्तीनेही जाऊ नये का मंदिरात.
काहीही हा च्रप्स, एवढुसं
काहीही हा च्रप्स,
एवढुसं खरचटलेलं असलं तर त्यातून कितीसा रक्क्तस्राव होणारे? बरं जखम जर बरीच मोठी असेल , मंदिर जंगलात असेल आजूबाजूला हिंस्र श्वापदांची भिती असेल तर त्या व्यक्तीने न जाणेच योग्य नं? मग ती व्यक्ती कोणीही का असेना? हिंस्त्र प्राणी डिसक्र्मिनेशन थोडेच करतील.
महिलान्ना, मुलीन्ना आपण आजही
महिलान्ना, मुलीन्ना आपण आजही २०१८ मधे समानतेने वागवत नाही आहोत...., खुप मोठा पल्ला अजुनही गाढायचा आहे. जन्माच्या आधीपासुनच त्यान्ची लढाई सुरु होते... आणि पुढे प्रत्येक दिवशी त्यान्ना जगण्यासाठी, आत्म सन्मानासाठी लढावे लागते.
ज्या महिला त्या देवाला आणि
ज्या महिला त्या देवाला आणि त्यासोबत चालून येणारया प्रथांना मानतात त्या मंदिराचे पावित्र्य जपायला स्वत:च तिथे जाणार नाहीत. आणि ज्या देवधर्माच्या कल्पना मानत नाहीत त्या मूळातच त्या मंदिरात जाणार नाहीत ... हट्टाने एकदोनदा काय जातील तेवढेच!
-------- हे दिसते तितके सोपे नाही. येल्लमा देवी बद्दल हेच म्हणायचे का? मुलींना देवदासी म्हणून म्हणून गावाला भोगायला सोडतात तेही याच लॉजिकमध्ये बसवावे लागेल मग. तिथे धर्माचे ठेकेदार काय म्हणतात?
ज्या महिला त्या देवाला आणि
ज्या महिला त्या देवाला आणि त्यासोबत चालून येणारया प्रथांना मानतात त्या मंदिराचे पावित्र्य जपायला स्वत:च तिथे जाणार नाहीत. आणि ज्या देवधर्माच्या कल्पना मानत नाहीत त्या मूळातच त्या मंदिरात जाणार नाहीत ... हट्टाने एकदोनदा काय जातील तेवढेच>>>>हे म्हणजे जगात एकतर पूर्ण चांगलीच माणसे आहेत किंवा पूर्ण वाईट माणसेच आहेत असे म्हटल्यासारखे आहे ,अरे ग्रे शेडेड लोक खूप जास्त आहेत
तसेच pure आस्तिक किंवा pure नास्तिक पेक्षा डोळस आस्तिक असू शकत नाहीत का?म्हणजे फक्त दैवावर विसंबून न राहता स्वतः पूर्ण प्रयन्त मेहनत करणारी आणि यश किंवा अपयश काहीही दिले तरी फक्त दोन्हीही पेलू शकण्याची ताकद देवाकडे मागणारेही असतातच की
अनेकांना पटतं हे चुकीचं आहे
अनेकांना पटतं हे चुकीचं आहे तरीही विरोध केला जात नाही. कारण संभ्रम असतो मनात काही वाईट झालं तर इ. भितीचा पगडा असतो. त्यापेक्षा जाऊ द्याना पाळुया आपण पण अशी मानसिकता या सर्व गोष्टींना कारणीभूत आहे.
बदल व्हावा पण तो दुसर्या पासून, हेच नडतं..
अनामिका >> अगदी बरोबर!
अनामिका >> अगदी बरोबर!
पाळी आल्यावर देवळात गेल्याने
पाळी आल्यावर देवळात गेल्याने काहीही वाईट होत नाही. नैसर्गिक प्रक्रिया आहे ती. चुकून पाळी आली आणि नेमकी तीच देवदर्शनाची वेळ आहे तर मागे वळण्यात काही पाॅईंट नाही. करावं दर्शन. यावं घरी.
पण मुद्दाम पाळी आलेली असतानाच देवळात जायचा हट्ट बाळगणार्या मुली/ स्त्रिया इतरवेळी दररोज न चुकता देवळात जातात का?
शेवटी इच्छा आणि हट्ट यात बराच फरक आहे.
आदू, बरोबर, हाच माझा मुद्दा.
आदू, बरोबर. हाच माझा मुद्दा की आस्तिक म्हणजे त्यांचा अमुक एक सॅलीयंट फीचर्स सेट असलाच पाहिजे, असे नव्हे.
पाळी आल्यावर देवळात गेल्याने काहीही वाईट होत नाही. नैसर्गिक प्रक्रिया आहे ती. चुकून पाळी आली आणि नेमकी तीच देवदर्शनाची वेळ आहे तर मागे वळण्यात काही पाॅईंट नाही. करावं दर्शन. यावं घरी.>>>
अगदी बरोबर.
पण मुद्दाम पाळी आलेली असतानाच देवळात जायचा हट्ट बाळगणार्या मुली/ स्त्रिया इतरवेळी दररोज न चुकता देवळात जातात का?>>>
ज्या दररोज न चुकता जात असतील, (किंवा ठरावीक वारी/ ठरावीक तिथीला/ ठरावीक मनःस्थितीत किंवा जेव्हा शक्य होईल तेव्हा जात असतील) त्यांनी नेमकी त्यावेळी पाळी आलीय म्हणून देवळात जाणे टाळावे का?
का?
देवी प्रकारातल्या स्त्री
देवी प्रकारातल्या स्त्री लोकांना पाळी येत नाही का?
पार्वतीला गणपती मड बाथ नंतर झाला. कार्तिकेय कसा काय झाला होता?
अन मग त्याच कार्तिकेयाला बायकांची अल्लेर्जि कशी काय?
ओ.. विसरलोच.
ओहं.. विसरलोच.
अक्कल गहाण ठेवल्याशिवाय आस्तिक बनता येत नाही
आरारा,
देवी प्रकारातल्या स्त्री लोकांना पाळी येत नाही का?>>>>>
आरारा,
Don't give them ideas,
हे मूर्ख लोक उद्यापासून सगळी देवीची मंदिरे महिनुयातून 4 दिवस बंद ठेवायला लागतील,
आणि "देवी पण पाळतेय, तर बाकी बायांना पाळायला काय होते?" असे वर विचारतील.
सिम्बा, अशा आयडिया
सिम्बा, अशा आयडिया संस्कृतीरक्षक लोकांच्या डोक्यात ऑलरेडी आल्या आहेत. भारतात अशी मंदिरं आहेत जी बंद ठेवतात असं ऐकलं आहे.
चिन्मयी, देवळात जायचा हक्क
चिन्मयी, देवळात जायचा हक्क असणे आणि देवळात जाणे या दोन गोष्टी एकच आहेत का?
पाळी येत असलेली स्त्री अपवित्र असते किंवा तत्सम कारणांनी तिच्या देवळात जाण्यावरची बंदी तुम्हांला मान्य आहे का?
पाळी येत असलेल्या वयाच्या सगळ्याच स्त्रियांवर तिथे बंदी आहे.
देवाला मानता तर त्यासोबत
देवाला मानता तर त्यासोबत जोडल्या गेलेल्या इतर सर्व गोष्टीही मानल्याच पाहीजे हा अट्टाहास / गृहीतक चुकीचे आहे, व त्यावरून काढलेला निष्कर्षही. >>
U nailed it.
I trust in God. But these rules r manmade. I dont want to abide by them.
There is a maruti temple in nigdi. My mom has been visiting it ever since she was a kid. Last time when she went, they said "bayka chalat nahit". Really?
Since when? And why? To brahmachari ahe asali pakau uttar deu naka. we worship him, we know him better than that.
If its a tantrik devta, blood/sacrifice etc was involved - so may b d reason u shldnt visit while menstruating ha norm aala asava.
Baykanvaril bandi ani asprushyanna mandir bandi hyaat kahich farak nahi. Its a discrimination against a few people in society and hence a very wrong thing.
If women decide, if men r allowed inside gabhara, but they r not, then they would not visit temple itself, temple's revenues will b impacted, one running d temple will b impacted.
Kuthehi bagha, gardi bayakanchich asate max.
देवळात अनेक प्राणी सुद्धा
देवळात अनेक प्राणी सुद्धा असतात नं ! मग त्यांच्यात पण असतील ना हे ४ दिवस... त्यांना पण हे पुजारी/विश्वस्त/गुरव/वगैरे तेवढ़या काळासाठी देवळाबाहेर नेवून ठेवत असावेत का ?
लेखकाने आपले मत व्हॉट्स अॅप
लेखकाने आपले मत व्हॉट्स अॅप ग्रुप मधे मांडले आहे. इथे फक्त त्या क्रियेची माहिती दिली आहे. त्यामुळे ज्यांना मत मांडायचे आहे त्यांनी त्या व्हॉट्स अॅप ग्रुप मधे मांडले पाहीजे ना ?
स्टार लेखक उघड़ती मायबोली धागा
स्टार लेखक उघड़ती मायबोली धागा
तोचि आपुला दिवाळी दसरा
उगा तुम्ही करुन राहिले की त्रागा
आता ते फेबु व्हाट्सप्प इकडे विसरा
देवी प्रकारातल्या स्त्री
देवी प्रकारातल्या स्त्री लोकांना पाळी येत नाही का?>>>> येस्स.जर देवी बाई जातीची तर तिलाही पाळी येतच असेल ना.परत ती शंकराची कथा पाळी संबंधात आहे.
ज्या महिला त्या देवाला आणि
ज्या महिला त्या देवाला आणि त्यासोबत चालून येणारया प्रथांना मानतात त्या मंदिराचे पावित्र्य जपायला स्वत:च तिथे जाणार नाहीत. आणि ज्या देवधर्माच्या कल्पना मानत नाहीत त्या मूळातच त्या मंदिरात जाणार नाहीत ... >>>> मला तरी हे सेन्सिबल स्टेटमेंट वाटतं कारण माझं हेच मत आहे. बाकी स्त्रियांचे इतके महत्वाचे इस्श्यूज दुर्लक्षित आहेत, कित्येक महत्वाचे विषय जे खरंच लावून धरायला हवेत, ते बाजूलाच राहिले आहेत, ते सोडून मंदिरात जाण्यासारखा नगण्य विषय किती पकडून ठेवायचा? किती वेळ आणि श्रम वाया घालवायचे? ज्या देवाला तुम्ही चालत नाही, त्याला तुम्ही पण इग्नोर करा की. आणि जे आडकाठी करणारे आहेत, त्यांचा रेव्हेन्यू करा कमी.
बाकी ज्या विषयावर जोर लावायचा ( स्त्रीशिक्षण, डोमेस्टीक व्हायोलन्स, बलात्काराच्या गुन्हेगारांसाठी कडक कायदे) ते विषय सोडून भलतीकडेच का फोकस आहे. बाकी महत्वाचे मुद्दे संपवून असल्या फुटकळ विषयांवर लक्ष दिलं जायला हवं.
तो प्रश्न पाळीमुळे स्त्रिया
तो प्रश्न पाळीमुळे स्त्रिया अपवित्र असल्याने त्यांना मंदिर प्रवेश नाकारण्याचा आहे.
मूळ कारण वेगवेगळे मुखवटे लावून मांडण्यात येतात.
आपल्या मंदिरात जाण्याने मंदिराचं पावित्र्य धोक्यात येईल असं मानण्यातले अनेक अंतर्विरोध लक्षात घ्या.
पाळी आल्याने स्त्री अपवित्र होते , हे मान्य.
तिच्या जाण्याने देऊळ बाटतं म्हणजे देवळापेक्षा स्त्री जास्त पॉवरफुल ठरते.
देवळात गेल्याने त्या स्त्रीचं तथाकथित अपावित्र्य दूर व्हायला हवं ना? कोण अधिक पॉवरफुल आहे?
बाकीचे प्रश्न सोडून दिलेत असं कुठे दिसतंय?
बाकीचे प्रश्न सोडून दिलेत असं
बाकीचे प्रश्न सोडून दिलेत असं कुठे दिसतंय? >>> कुठे दिसताहेत बाकीच्या प्रश्नांवर धागे? कुठे चालू आहेत चर्चा? बाकी सगळे मुद्दे साईड ट्रॅक करून न्यूज पेपर्स कोणत्या बातमीने भरले आहेत सध्या?
ऑं? तात्कालिक घटनेबद्दलच अधिक
ऑं? तात्कालिक घटनेबद्दलच अधिक बोललं जाणार ना?
सबरीमाला प्रकरणी कायदेशीर लढाईचा निकाल आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात रूढीपरंपरावादी उभे ठाकलेत. यात कायदा सर्वोच्च असण्याचाही प्रश्न आहे.
मला वाटतं पाळी, विटाळ, स्त्री ही पुरुषाच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा हे मुद्देही महत्त्वाचे आहेत. स्त्रियांना दुय्यम मानलं जाण्याचं आणि त्यांच्या क़ंडिशनिंगचं हे एक ढळढळीत उदाहरण आहे.
Pages