देव, महिला आणि मंदिरप्रवेश वगैरे ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 October, 2018 - 01:27

देशातल्या कुठल्यातरी मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. एका मित्राच्या फेसबूक वॉलवर या संदर्भात पोस्ट वाचली. तो या प्रवेशाच्या विरोधात होता. मी त्याच्या विचारांच्या विरोधात भलामोठा प्रतिसाद दिला. प्रतिसादाचा आशय साधारण असा होता - तुम्ही लोकांनी मुलींना शिक्षण घ्यायची आणि त्यानंतर कमवायला बाहेर पडायची, स्वत:च्या पायावर उभे राहायची परवानगी दिलीत ईथेच तुम्ही चुकलात. आता त्यांना जिथे जायचेय तिथे त्या जाणारच. भोगा आपल्या कर्माची फळे.
या प्रतिसादाला मूळ पोस्टपेक्षाही जास्त लाईक्स आले. मूळ पोस्टशी सहमत असलेल्यांनी सुद्धा लाईक केले. ज्यांन उपरोध कळत नाही अश्यांचे खरेच अवघड असते. पण गंमत म्हणजे त्यांच्यातील एकही जण असे नाही म्हणाला की येस्स मी आता माझ्या मुलींचे शिक्षणच थांबवतो!

पण मग त्याच दिवशी हाच विषय मी व्हॉटसपग्रूपवर पाहिला. तिथेही मी स्त्रीव्यक्तीस्वातंत्र्याचा आणि हक्काचा मुद्दा काढताच एका धार्मिक स्वभावाच्या मुलाने माहीती पुरवली की लहान मुलींना आणि वृद्ध महिलांना परवानगी आहे. फक्त मासिक पाळी चालू असणारया महिलांना परवानगी नाही. यामागचे शास्त्र विचारल्यास ते अपवित्र समजले जाते ईतकेच उत्तर आले. त्यावर मी म्हणालो, मग हस्तमैथुन करणारया पुरुषांना परवानगी का आहे? मासिक पाळी अपवित्र समजली जाते, तर वीर्य पवित्र का समजले जावे? ते गाळणारया पुरुषांना कश्याच्या आधारावर परवानगी आहे? शेवटी ते पुरुष आहेत म्हणूनच हा वेगळा न्याय ना...
यावर कोणाचेच काहीच उत्तर नाही आले. दोनचार टवाळांनी दात काढले पण मला ते अपेक्षित नव्हते.

असो, पुढल्याच दिवशी हा विषय ऑफिसमध्ये लंचब्रेकला निघाला. तिथे स्त्रिया आणि बहुसंख्य पुरुष सहकर्मचारी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतच करत होते. स्त्रियांच्या प्रवेशाच्या हक्काचीच बाजू घेत होते.

आता प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आणि दोन्ही बाजू कमीजास्त प्रमाणात योग्य असू शकतात. आपल्याला जी बाजू जास्त योग्य वाटते आपण तिची बाजू घेतो. अश्यात मला खोड आहे की बहुमताची विरुद्ध बाजू घेऊन विचार करायची. साहजिकच मी ईथे त्यांना विरोध केला,

मी नास्तिक आहे, धार्मिक जराही नाही. मी देव मानत नाही. त्यामुळे मी तुमच्या देवांच्या पौराणिक कथांची आणि तुम्ही मानत असलेल्या देवाची सहज टिंगल उडवू शकतो. आणि माझे म्हणने खोडून काढायला तुम्हाला देव असल्याचा एकही पुरावा देता येणार नाही. पण तरीही याने तुमच्या धार्मिक भावना मात्र दुखावतील.

हे देखील तसेच आहे.

एकदा तुम्ही देव आहे असे मानले की काही गोष्टी ओघाने मानाव्याच लागतात. अगदी साध्या साध्या गोष्टी जसे की सणाच्या दिवशी मांसाहार करू नये, आंघोळ केल्याशिवाय देवाची पूजा करू नये, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण खाऊ नये.. वगैरे वगैरे.. ईथे मग प्रत्येकवेळी लॉजिक शोधायचा वा व्यक्तीस्वातंत्र्य जपायचा हट्ट धरू नये.
एकवेळ माझी गोष्ट वेगळी आहे, धार्मिक भावना दुखावल्या जातात म्हणजे नेमके काय होते याचा मला अनुभव नाही, पण तुम्हाला त्या भावना समजू शकतात. तर समजून घ्या ना.. मंदिरात प्रवेश हवाच हा हट्ट का धरत आहात?

ईथेही पुढे मग कोणी वाद वाढवला नाही..

नंतर घरी आल्यावर वाटले की हा वादच व्यर्थ आहे. ज्या महिला त्या देवाला आणि त्यासोबत चालून येणारया प्रथांना मानतात त्या मंदिराचे पावित्र्य जपायला स्वत:च तिथे जाणार नाहीत. आणि ज्या देवधर्माच्या कल्पना मानत नाहीत त्या मूळातच त्या मंदिरात जाणार नाहीत ... हट्टाने एकदोनदा काय जातील तेवढेच!

त्यामुळे अस्पृश्य समजले जाणारयांना एखादी पाण्याची विहीर उघडी केले आहे या धर्तीवर धार्मिक समज विरुद्ध व्यक्तीस्वातंत्र्य अशी लढाई उभारण्यात काही अर्थ नाही.

या विषयावर कोणाशी काहीही बोललो तरी मी नास्तिक आहे हे समोरच्या सगळ्यांना माहीत असल्याने आणि हा पटकन आपल्याच भावना दुखावून जायचा या भितीने या विषयावर माझ्याशी सहसा कोणी वाद घालत नाही. त्यामुळे कोणाशी तरी बोलावेसे वाटले ईतकेच Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टप्प्या टप्प्या ने जाऊ ना आजोबा,
आत्ता फालतू गोष्टी वर लढा देऊ दे, लढा देणारे पण स्ट्रॉंग होतील, आणि त्याला विरोध करणारी जुनी खोंडे एकतर हाय खाऊन मरून जातील किंवा कालौघात शहाणी होतील.

कालो अनंत:, विपुलाश्च पृथ्वी,
काळ अनंत आहे, आणि जग असीम आहे,
जे लढत आहेत त्यांना आत्ता या मुद्द्यावरून नको , त्या मुद्द्यावर लढा वगैरे सल्ले कशाला?
तुम्हाला एखादा मुद्दा महत्वाचा वाटत असेल तर तुम्ही (माबो वर धागा काढण्यापासून) तरी सुरवात करा, लोकांना पटले तर कदाचित वर्षभरात देशव्यापी आंदोलन उभे राहू शकेल.

टप्प्या टप्प्या ने जाऊ ना आजोबा,
आत्ता फालतू गोष्टी वर लढा देऊ दे, लढा देणारे पण स्ट्रॉंग होतील, आणि त्याला विरोध करणारी जुनी खोंडे एकतर हाय खाऊन मरून जातील किंवा कालौघात शहाणी होतील.

कालो अनंत:, विपुलाश्च पृथ्वी,
काळ अनंत आहे, आणि जग असीम आहे,
एक एक करून सगळ्या मुद्द्यांची पाळी (नो पन इंटेनडेड) येईल.
जे लढत आहेत त्यांना आत्ता या मुद्द्यावरून नको , त्या मुद्द्यावर लढा वगैरे सल्ले कशाला?
तुम्हाला एखादा मुद्दा महत्वाचा वाटत असेल तर तुम्ही (माबो वर धागा काढण्यापासून) तरी सुरवात करा, लोकांना पटले तर कदाचित वर्षभरात देशव्यापी आंदोलन उभे राहू शकेल.

ख्रिश्चन स्त्रिया धर्मगुरु बनू शकत नाहीत
>>>>

येस्स याविरोधात नक्की लढावे. हे कुठल्या श्रद्धेच्या धार्मिक समजातून नही तर पुरुषजातच श्रेष्ठ या अहंकारातून आलेला भेद आहे.

@ सिंबा, तुम्ही जे सारखे दलितांचे उदाहरण देत आहात ते ईथे लागू. ईथे लढा. ईथे मी सुद्धा सोबत आहे.

जे लढत आहेत त्यांना आत्ता या मुद्द्यावरून नको , त्या मुद्द्यावर लढा वगैरे सल्ले कशाला?
>>>

आणि एक क्लीअर करतो.
मी लढू नका बोलत आहे ते हा मुद्दा कमी महत्वाचा आहे म्हणून नाही तर चुकीचाच आहे म्हणून अर्थ नाही असे म्हणत आहे.

सरकारी असेल तर कोणालाच अडवता येणार नाही.
>>>>

हे चूक आहे.
धार्मिक समजूतींबाबत हे निकष नाही लावता येत.
सरकारी उद्यानात मी आंघोळ न करता मॉर्निंग वॉल्कला रोज जातो.
मंदिरात आंघोळ न करता जाण्यापासून मला माझ्या घरचेच अडवतात.

प्रसाद नेहमी उजव्या हातानेच घ्यावा लागतो. डाव्यात देतच नाहीत. डावखुरे असलेल्यांनाही नाही हे पाहिले आहे. हा अन्याय नाही का?

Happy
Happy

ख्रिश्चन स्त्रिया धर्मगुरु बनू शकत नाहीत
>>>>

येस्स याविरोधात नक्की लढावे.

>>>>

मंदिरात स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून ज्या मुस्लिम व ख्रिस्ती स्त्रिया स्त्रियांची भिंत उभी करून निदर्शने करताहेत त्यांनी हा विषय यानंतर लगेच हाती घेतलेला एकदा पाहिला की मी समाधानाने डोळे मिटायला मोकळी.

तृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यात अगदी आतपर्यंत प्रवेश करणार असे खूप वाचले होते पण शेवटच्या मिनिटाला काय झाले माहीत नाही.. तिला मध्यरात्री गुपचूप पोलीस मदतीने प्रवेश करायची बुद्धीही झाली नाही. बहुतेक तिच्यातली भक्ती कमी पडली.

पण तसे इतर हिंदू धर्मस्थळांबाबत न होवो. देवस्थान परवानगी देत नसेल तर रात्री बेरात्री कायतरी उचापती करून प्रवेश मिळो व भक्तिमार्गाला लागलेल्या जनतेला ईश्वर प्राप्ती होऊन दोघांचेही कल्याण होवो हीच ईश्चरचरणी प्रार्थना.

जग मंगळावर राहायची व्यवस्था होतेय का ह्याचा मागे असताना भारतीय जनता एकेक अनोखे मंदिर शोधून तिथे धाव घेऊन प्रभुचरणी विलीन व्हायला धडपडतेय हे बघून सनातन धर्म जनमाणसात किती रुजलाय याची प्रचिती येते. भारतीय जनतेला मंगळ बिंगळ शोधायची गरज नाही. सगळे थेट स्वर्गात प्रभुचरणी विलीन होणार आहेत. (उगाच मंगळयानावर खर्च केला, तेवढ्या पैशात अजून एक मंदिर उभे राहिले असते)

प्रसाद नेहमी उजव्या हातानेच घ्यावा लागतो. डाव्यात देतच नाहीत. डावखुरे असलेल्यांनाही नाही हे पाहिले आहे. हा अन्याय नाही का
>>>>>>>>>>>
तुम्ही हातांच काय घेऊन बसलात?
स्त्रीला आवर्जुन पुरुषांच्या डाव्या हाताला धार्मिक कार्यात बसायला सांगितले जाते,त्याच काय हो?

मंगळावर राहायची व्यवस्था होतेय का ह्याचा मागे असताना भारतीय जनता एकेक अनोखे मंदिर शोधून तिथे धाव घेऊन प्रभुचरणी विलीन व्हायला धडपडतेय हे बघून सनातन धर्म जनमाणसात किती रुजलाय याची प्रचिती येते. >>>>>

आणि उरलेली जनता, त्यांनी तसे करू नये म्हणून धडपडतेय... कारण आमचा धर्म (!!) बुडेल हे पाहून पण धन्य वाटतेय

मंदिर कोणाच्या मालकीचे आहे हा मुद्दा न्यायालयाने सुनावणीदरम्यान निकालात काढला होता.
Chief Justice Dipak Misra during the hearing said that there is no principle of private temple in the country. "Temple is not a private property, it is a public property," he said.

CJI also said if a man is allowed to enter the temple then a woman should also be allowed. "Once you open the temple, then anyone can go to it."

https://www.youtube.com/watch?v=mD1eJGkYaT8
Activist Trupti Desai enters Mumbai's Haji Ali dargah

https://indianexpress.com/article/cities/mumbai/mumbai-haji-ali-dargah-w...
A group of young women assembled to take a selfie outside the sanctum sanctorum at Haji Ali Thursday evening while others, their heads covered, went inside to pray. Even as protests rocked Kerala where Sabarimala temple opened its doors to women for the first time following a Supreme Court order, a little over two years since the Bombay High Court permitted women to enter the sanctum sanctorum of the Haji Ali shrine, fraught emotions and tension amid Mumbai litigation are now a thing of the past.

माझ्या देवा, माझ्या डोळ्यांना, कानांना आणि मेंदूला लागलेली झापडं कधीही सुटू देऊ नको. मला जन्मोजन्मी ही झापडं दे.

At the center of the politicking, the two women who first entered the temple have been forced into hiding. On the evening of Jan. 4, the night they are allowed to turn their phones on, Bindu calls her 12-year-old daughter, Olga, named for the revolutionary Olga Benario Prestes killed in the Holocaust. As protesters and the media surrounded their home in Kozhikode, a district in north Kerala, Olga has had to move in with her mother’s friend. She is unfazed. “Amma, you don’t forget the aravana payasam, okay?” the girl says chirpily, reminding Bindu about the sacred rice and molasses sweet Sabarimala devotees always bring back after prayers. “I’m so proud of my wife, and of Kanakadurga,” Bindu’s husband Hariharan tells TIME over the phone. “They have paved a way for many other women to express their faith.”

Kanakadurga has no such support. Her family have not spoken to her since Dec. 24, when the pair made their first, failed attempt to enter Sabarimala. A police officer in her home district says her family received several death threats and have left to an undisclosed relatives’ house. In the car, Kanakadurga sends rapid voice messages on Whatsapp to friends and neighbors, letting them know she is fine, and if they can find out where her family is. “They’re angry with me because I risked my life, and now, theirs,” she says. “But I know that when I return home, we will sort things out.” Bindu touches her friend’s knee; the women who met just two weeks earlier now finish each other’s’ sentences.

ख्रिश्चन स्त्रिया धर्मगुरु बनू शकत नाहीत
>>>>

येस्स याविरोधात नक्की लढावे.

>>>>

मंदिरात स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून ज्या मुस्लिम व ख्रिस्ती स्त्रिया स्त्रियांची भिंत उभी करून निदर्शने करताहेत त्यांनी हा विषय यानंतर लगेच हाती घेतलेला एकदा पाहिला की मी समाधानाने डोळे मिटायला मोकळी.

तृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यात अगदी आतपर्यंत प्रवेश करणार असे खूप वाचले होते पण शेवटच्या मिनिटाला काय झाले माहीत नाही.. तिला मध्यरात्री गुपचूप पोलीस मदतीने प्रवेश करायची बुद्धीही झाली नाही. बहुतेक तिच्यातली भक्ती कमी पडली.

पण तसे इतर हिंदू धर्मस्थळांबाबत न होवो. देवस्थान परवानगी देत नसेल तर रात्री बेरात्री कायतरी उचापती करून प्रवेश मिळो व भक्तिमार्गाला लागलेल्या जनतेला ईश्वर प्राप्ती होऊन दोघांचेही कल्याण होवो हीच ईश्चरचरणी प्रार्थना.

जग मंगळावर राहायची व्यवस्था होतेय का ह्याचा मागे असताना भारतीय जनता एकेक अनोखे मंदिर शोधून तिथे धाव घेऊन प्रभुचरणी विलीन व्हायला धडपडतेय हे बघून सनातन धर्म जनमाणसात किती रुजलाय याची प्रचिती येते. भारतीय जनतेला मंगळ बिंगळ शोधायची गरज नाही. सगळे थेट स्वर्गात प्रभुचरणी विलीन होणार आहेत. (उगाच मंगळयानावर खर्च केला, तेवढ्या पैशात अजून एक मंदिर उभे राहिले असते)

<<

बरं, पण एक १०-ते५० वयाची महिला म्हणून तुमचा या मंदिरप्रवेशाला पाठिंबा आहे, की विरोध, हे जरा सांगता का?

"येस ऑर नो"?? Wink

Temple is not a private property, it is a public property
>>>>

पण तिथे आंघोळ न केलेल्यांना प्रवेश मिळतो का? याचे उत्तर नाही असेल तर हा मुद्दा बाद आहे Happy

प्रतिसादांची संख्या अचानक वाढलेली दिसली की ऋन्म्याने धागा धरलाय असे खुशाल समजावे!
>>>>

उलट मी अडचणीत टाकणारे प्रश्न उपस्थित करून प्रतिसाद संख्या आटोक्यात ठेवतोय Happy

आज ईशा आणि विक्रांतच्या लग्नात एक नवीन प्रथा समजली,
मुलीच्या आईने लग्न बघायचे नाही. आता बोला Happy

आजही एक सून सासूसासरयांच्या घरी राहण्यात कसलाही कमीपणा मानत नाही पण घरजावई हे काहीतरी लज्जास्पद समजले जाते.
असे का?

लोकं मंदिरप्रवेशाच्या हक्काचे घेऊन बसले आहेत, ईथे लग्नानंतर आईवडीलांचे घरात राहण्याचा हक्क मुलीला मिळायची बोंब आहे.

<< आणि सरकारी नियम लावायचेच असतील तर मंदिरात विशिष्ट वयोगटाच्या महिलांना प्रवेश द्यायच्या फालतू मुद्द्याबाबत लढण्यापेक्षा पद्मनाभन आणि इतर सर्वच देवस्थानांची संपत्ती सरकारी कोषागारात जमा करण्याकरिता लढा द्या. आपल्या राष्ट्राची गरिबी दूर होऊन त्वरीत अच्छे दिन येतील. >>
------- मुद्दा फालतू अजिबातच नाही आहे. त्यांना प्रवेशाचा हक्क हवा आहे तो द्या. १९४७ मधे देश स्वातंत्र झाला, आज ७०+ वर्षानंतरही महिलांना त्यांच्या न्याय हक्कांसाठी झगडावे लागावे हेच लांच्छनास्पद आहे.

मुद्दा फालतू असता तर सर्वोच्च न्यायालयाने दखलही घेतली नसती.

अनेकांचे प्रतिसादकर्त्यांचे या मुद्यापेक्षा 'इतर' अनेक महत्वाचे मुद्दे आहेत त्यावर लक्ष का केंद्रित होत नाही असे आहे. मला तो युक्तिवाद म्हणजे समोर असलेल्या प्रश्नाला टाळण्याचा प्रयत्न करणे आहे असे वाटणे.

१९४७ मधे देश स्वातंत्र झाला,
>>>>>

देशाचे स्वातंत्र्य वा पारतंत्र्य आणि धार्मिक समजूती यांचा आपसात काही संबंध नसतो. ज्यांनी आपल्याला पारतंत्रात ढकलले आणि आपल्यावर राज्य केले त्यांच्याकडेही कैक धार्मिक समजूती श्रद्धेने पाळल्या जात असतीलच. आजच नाही तर बावीसावे शतक उजाडले तरी कुठल्या तरी देव नावाच्या अज्ञात शक्तीवरची लोकांची श्रद्धा कायम राहणारच. आणि कित्येक धार्मिक प्रथापरंपरा पाळल्या जाणारच.

मला एक प्रश्न पडला आहे -

मारुती हा देव ब्रह्मचारी समजला जातो. तर त्याच्या मंदिरात स्त्री पुजारी असते का? असू शकते का?

जर असेल तर ओके. पण नसेल तर तिथेही समान हक्कासाठी भांडायचे का?

झोपता झोपता अजून एक प्रश्न -

बरेच ठिकाणी स्त्रियांना स्मशानात जायला आणि अग्नी द्यायला परवानगी नसते. त्याविरुद्ध भांडायची गरज वाटत नाही का?

<< देशाचे स्वातंत्र्य वा पारतंत्र्य आणि धार्मिक समजूती यांचा आपसात काही संबंध नसतो. ज्यांनी आपल्याला पारतंत्रात ढकलले आणि आपल्यावर राज्य केले त्यांच्याकडेही कैक धार्मिक समजूती श्रद्धेने पाळल्या जात असतीलच. >>
------ देश स्वातंत्र झाला पण स्त्री जातीला मंदिरात जाण्याचे स्वतंत्र नाही हा मुद्दा आहे.

इतर धर्मातही स्त्रीजातीला बरोबरीने वागवले जात नाही हे मान्य पण ते बरोबरीने वागवत नसतील हे काही मंदिरप्रवेश नाकारण्याचे कारण नको व्हायला. ते आधी सुधरतील मग आम्ही.... हा उरफाटा न्याय नको.

< झोपता झोपता अजून एक प्रश्न -
बरेच ठिकाणी स्त्रियांना स्मशानात जायला आणि अग्नी द्यायला परवानगी नसते. त्याविरुद्ध भांडायची गरज वाटत नाही का? >>
------- आहे ना... तुम्ही सुरवात करा... मुलीने अग्नी दिल्याचे अनेक उदाहरणे आहेत, खुप नसतील पण सुरवात होत आहे.

देश स्वातंत्र झाला पण स्त्री जातीला मंदिरात जाण्याचे स्वतंत्र नाही हा मुद्दा आहे.
>>>>>
काही विशिष्ट वयोगटाच्या स्त्रियांना असे लिहा. सबंध स्त्री जातीला अटकाव नाही. याचाच अर्थ केचळ स्त्री आहे म्हणून कोणाचे स्वातंत्र्य रोखले नाही. तर काही धार्मिक समजूतीमुळे एका ठराविक वयोगटाला देवापासून दूर ठेवलेय.

इतर धर्मातही स्त्रीजातीला बरोबरीने वागवले जात नाही हे मान्य पण ते बरोबरीने वागवत नसतील हे काही मंदिरप्रवेश नाकारण्याचे कारण नको व्हायला.
>>>>
माझे कारण हे नाहीयेच मुळी. ते तर मी तुमचा स्वातंत्र्य मिळालेल्याच्या मुद्द्याबाबत त्याचा काही संबंध नसतो हे दाखवायला म्हटलेय ईतकेच.

मुलीने अग्नी दिल्याचे अनेक उदाहरणे आहेत, खुप नसतील पण सुरवात होत आहे.
>>>>

सुरुवात का?
या प्रश्नासारखेच कायद्याने सोक्षमोक्ष का लावला जात नाही?

आणि हो, ते मारुतीच्या देवळात स्त्री पुजारी याबद्दल काही माहीत आहे का?

<< देश स्वातंत्र झाला पण स्त्री जातीला मंदिरात जाण्याचे स्वतंत्र नाही हा मुद्दा आहे.
>>>>>
काही विशिष्ट वयोगटाच्या स्त्रियांना असे लिहा. सबंध स्त्री जातीला अटकाव नाही. याचाच अर्थ केचळ स्त्री आहे म्हणून कोणाचे स्वातंत्र्य रोखले नाही. तर काही धार्मिक समजूतीमुळे एका ठराविक वयोगटाला देवापासून दूर ठेवलेय. >>

------------ एका ठराविक वयोगटाला देवापासून दूर का ठेवले आहे ? देवाला त्यांची अ‍ॅलर्जी आहे का ? असे दुर ठेवणे सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही.

चला एक तर मान्य केवळ स्त्री आहे म्हणून हलके लेखून दूर ठेवले नाही. अन्यथा सरसकट स्त्रियांनाच बॅन असते.

आता राहिला प्रश्न देवाच्या एलर्जीचा. तर हेच लॉजिक आंघोळ न केलेल्या पुरुषांना लावा.

किंवा देवाला मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याला लावा.

देवाला मांसाहार चालत नाही वा देवाला मांसाहाराची एलर्जी आहे हा जावईशोध कोणी लावला?
म्हणजे शाकाहार करणारे सात्विक आणि आम्ही मांसाहार करणारे अपवित्र का?

मांसाहारी, डावखुरे, आंघोळ न करणारे, विशिष्ट वयोगटातील स्त्रिया ...
म्हटले तर अश्या किती लोकांना देवाच्या दारात अपमानित केले जातेय !!!.....
म्हटले तर हू केअर्स ???

देवाला मांसाहार चालत नाही वा देवाला मांसाहाराची एलर्जी आहे हा जावईशोध कोणी लावला?
>>> पुजारी लोकांनी पसरवल्या आहेत या अफवा.

नमस्कार, मी हि पोस्ट तशी फार म्हणजे फारच उशीरा पाहिली पण ते महत्त्वाचं नाहीये कारण या पोस्टमध्ये लेखकाने सरळ मुद्दा मांडण्यापेक्षा स्वतःचा अहंकारच जास्त मांडला आहे.
सर्व प्रथम, मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो आणि मला वाटतं की प्रत्येक धार्मिक स्थळी प्रत्येक जीवाला प्रवेश मिळायला हवा. प्रत्येक जीवाला भक्ती करण्याचा अधिकार आहे. त्यात शब्रिमाला हे भगवान अय्यप्पाचे मंदीर आहे जे शिव आणि विष्णूंच्या मोहिनी अवताराचे संतान आहेत, त्याअर्थी ते दोन देवांची एकात्मता, समता दर्शवतात आणि म्हणूनच अशा मंदिरात सर्वांना समान प्रवेश मिळालाच पाहिजे. या मागे फार अभ्यास नाही तर फक्त थोड्या मोकळ्या विचारांची गरज आहे. परमेश्वराला सर्व सारखे आहेत, सर्व त्याला प्रिय आहेत मग त्यात सूक्ष्मजीवांपासून ते मनुष्यांपर्यंत सर्वच. मंदिरात प्रवेश नाकारणे, कुठल्या जातीने मंदिरात जायचं ते ठरवणे, स्त्रियांना मंदिरात जाण्यापासून रोखणे हे मानवाने स्वतःच्या मनानेच ठरवायला सुरुवात केली. ईश्वराने कुठेही असे म्हटलेले नाही की त्याला फार अमुक अमुक लोकांनाच दर्शन द्यावयाचे आहे, परमेश्वर त्याच्या सर्व संतांनांवर समान प्रेम करतो.

दुसरी गोष्ट, तुम्ही असं म्हणत आहात की लोकांना देव असल्याचा एकही पुरावा देता येणार नाही तर एक लक्षात घ्या की तुम्हाला देव नसल्याचासुद्धा एकही पुरावा देता येणार नाही. मला स्वतःला परमेश्वराच्या कृपेचा अनुभव आला आहे, त्यामुळे मला तुम्ही कुठल्याही पुस्तकी वाक्यांनी निरीश्वरवादी विचारसरणी पटवून देऊ शकणार नाही आणि हो, "नास्तिक" याचा अर्थ ज्याला वेदादी कर्मकांड मान्य नाही असा होतो, जो ईश्वरच मानत नाही असा होत नाही. नास्तिक मनुष्य अध्यात्माला मानू शकतो.
एक गोष्ट तर नक्कीच आहे की तुम्हाला असं फक्त वाटतं की ईश्वर नाहीये आणि मला माहितीये कि ईश्वर आहे, तुमच्या अंदाजासमोर माझा अनुभव जास्त वरचढ आहे. नंतर तुम्ही असं म्हणाला आहात कि तुमच्याशी वाद कुणी घालत नाही, तर त्याचं कारण तुम्हीच दिलं आहे, "मी तुम्ही मानत असलेल्या देवांची सहज टिंगल उडवू शकतो" बरोबर आहे, तुम्ही फक्त टिंगलच उडवू शकतात, वाद नाही घालू शकत कारण वाद घालायला अभ्यास लागतो. एखादा खरा अभ्यासू जेव्हा एखादी गोष्ट नाकारतो तेव्हा तो त्याचा सर्व दृष्टिकोनांतून अभ्यास करूनच आपलं मत मांडतो, तुमच्यासारखी हवेत टिंगल उडवत नाही. तुम्हाला नास्तिक या शब्दाचाही अर्थ माहित नाही त्यावरूनच दिसतं कि तुमचं या बाबतीत ज्ञान किती आहे ते. जर आकलन करून घ्यायचं असेल आणि स्वतःच्या तत्वांशी ठाम रहायचं असेल तर निरीश्वरवादी तत्व आणि परमेश्वर, अध्यात्म, पुराण, धर्म या दोन्ही टोकांचा सखोल अभ्यास करा, अनुभव घ्या आणि मग वाद घाला. तुम्ही प्रश्न चांगले विचारतात पण त्यांची उत्तरेसुद्धा शांत मनाने शोधण्याचे कष्ट उचला. टिंगल तर लहान मुलेही उडवतात पण तीही मोठी होऊन शहाणी होतात, तसे तुम्हीही शहाणे व्हा. God bless you!

Pages