देव, महिला आणि मंदिरप्रवेश वगैरे ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 October, 2018 - 01:27

देशातल्या कुठल्यातरी मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. एका मित्राच्या फेसबूक वॉलवर या संदर्भात पोस्ट वाचली. तो या प्रवेशाच्या विरोधात होता. मी त्याच्या विचारांच्या विरोधात भलामोठा प्रतिसाद दिला. प्रतिसादाचा आशय साधारण असा होता - तुम्ही लोकांनी मुलींना शिक्षण घ्यायची आणि त्यानंतर कमवायला बाहेर पडायची, स्वत:च्या पायावर उभे राहायची परवानगी दिलीत ईथेच तुम्ही चुकलात. आता त्यांना जिथे जायचेय तिथे त्या जाणारच. भोगा आपल्या कर्माची फळे.
या प्रतिसादाला मूळ पोस्टपेक्षाही जास्त लाईक्स आले. मूळ पोस्टशी सहमत असलेल्यांनी सुद्धा लाईक केले. ज्यांन उपरोध कळत नाही अश्यांचे खरेच अवघड असते. पण गंमत म्हणजे त्यांच्यातील एकही जण असे नाही म्हणाला की येस्स मी आता माझ्या मुलींचे शिक्षणच थांबवतो!

पण मग त्याच दिवशी हाच विषय मी व्हॉटसपग्रूपवर पाहिला. तिथेही मी स्त्रीव्यक्तीस्वातंत्र्याचा आणि हक्काचा मुद्दा काढताच एका धार्मिक स्वभावाच्या मुलाने माहीती पुरवली की लहान मुलींना आणि वृद्ध महिलांना परवानगी आहे. फक्त मासिक पाळी चालू असणारया महिलांना परवानगी नाही. यामागचे शास्त्र विचारल्यास ते अपवित्र समजले जाते ईतकेच उत्तर आले. त्यावर मी म्हणालो, मग हस्तमैथुन करणारया पुरुषांना परवानगी का आहे? मासिक पाळी अपवित्र समजली जाते, तर वीर्य पवित्र का समजले जावे? ते गाळणारया पुरुषांना कश्याच्या आधारावर परवानगी आहे? शेवटी ते पुरुष आहेत म्हणूनच हा वेगळा न्याय ना...
यावर कोणाचेच काहीच उत्तर नाही आले. दोनचार टवाळांनी दात काढले पण मला ते अपेक्षित नव्हते.

असो, पुढल्याच दिवशी हा विषय ऑफिसमध्ये लंचब्रेकला निघाला. तिथे स्त्रिया आणि बहुसंख्य पुरुष सहकर्मचारी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतच करत होते. स्त्रियांच्या प्रवेशाच्या हक्काचीच बाजू घेत होते.

आता प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आणि दोन्ही बाजू कमीजास्त प्रमाणात योग्य असू शकतात. आपल्याला जी बाजू जास्त योग्य वाटते आपण तिची बाजू घेतो. अश्यात मला खोड आहे की बहुमताची विरुद्ध बाजू घेऊन विचार करायची. साहजिकच मी ईथे त्यांना विरोध केला,

मी नास्तिक आहे, धार्मिक जराही नाही. मी देव मानत नाही. त्यामुळे मी तुमच्या देवांच्या पौराणिक कथांची आणि तुम्ही मानत असलेल्या देवाची सहज टिंगल उडवू शकतो. आणि माझे म्हणने खोडून काढायला तुम्हाला देव असल्याचा एकही पुरावा देता येणार नाही. पण तरीही याने तुमच्या धार्मिक भावना मात्र दुखावतील.

हे देखील तसेच आहे.

एकदा तुम्ही देव आहे असे मानले की काही गोष्टी ओघाने मानाव्याच लागतात. अगदी साध्या साध्या गोष्टी जसे की सणाच्या दिवशी मांसाहार करू नये, आंघोळ केल्याशिवाय देवाची पूजा करू नये, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण खाऊ नये.. वगैरे वगैरे.. ईथे मग प्रत्येकवेळी लॉजिक शोधायचा वा व्यक्तीस्वातंत्र्य जपायचा हट्ट धरू नये.
एकवेळ माझी गोष्ट वेगळी आहे, धार्मिक भावना दुखावल्या जातात म्हणजे नेमके काय होते याचा मला अनुभव नाही, पण तुम्हाला त्या भावना समजू शकतात. तर समजून घ्या ना.. मंदिरात प्रवेश हवाच हा हट्ट का धरत आहात?

ईथेही पुढे मग कोणी वाद वाढवला नाही..

नंतर घरी आल्यावर वाटले की हा वादच व्यर्थ आहे. ज्या महिला त्या देवाला आणि त्यासोबत चालून येणारया प्रथांना मानतात त्या मंदिराचे पावित्र्य जपायला स्वत:च तिथे जाणार नाहीत. आणि ज्या देवधर्माच्या कल्पना मानत नाहीत त्या मूळातच त्या मंदिरात जाणार नाहीत ... हट्टाने एकदोनदा काय जातील तेवढेच!

त्यामुळे अस्पृश्य समजले जाणारयांना एखादी पाण्याची विहीर उघडी केले आहे या धर्तीवर धार्मिक समज विरुद्ध व्यक्तीस्वातंत्र्य अशी लढाई उभारण्यात काही अर्थ नाही.

या विषयावर कोणाशी काहीही बोललो तरी मी नास्तिक आहे हे समोरच्या सगळ्यांना माहीत असल्याने आणि हा पटकन आपल्याच भावना दुखावून जायचा या भितीने या विषयावर माझ्याशी सहसा कोणी वाद घालत नाही. त्यामुळे कोणाशी तरी बोलावेसे वाटले ईतकेच Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखादी बाई मंदिरप्रवेशासाठी योग्य काळात आहे की नाही, हे तपासणार्‍या यंत्राचा शोध लागेपर्यंत बायकांना मंदिरप्रवेश नाही
>>>>>>

एकीकडे हे असले कमी डोक्याचे कर्मठ लोकं तर एकीकडे चालाक डोक्याचे आपली पोळी भाजणारे सो कॉल्ड समाजसुधारक.
यांच्यात आपले प्यादे होऊ देऊ नका. जगात ईतरही प्रश्न आहेत. ईथली प्रवेशबंदी उठवण्याऐवजी जमल्यास दारूबंदीची मागणी करा. कित्येक स्त्रियांचे त्यांच्या पोराबाळांसह भले होईल.

१. त्या महिला भगवान आयप्पांच्या खूप मोठ्या भक्त आहेत. देवाशिवाय त्या राहूच शकत नाही, म्हणून त्या जीवावर उदार होऊन मंदिरात जात आहेत.
>>>>

जर त्या स्त्रियांना लहनपणापासून त्या देवापासून दूर ठेवण्यात येत असेल तर त्या स्त्रिया त्या देवाच्या खूप मोठ्या भक्त वगैरे बनणे अशक्य वाटते. एखाददुसरी बनेलही. पण फार नाही.

पाळी येत असलेल्या स्त्रियांना मंदिर प्रवेश यात कसली आलीय धर्मांधता? ती नाकारण्यात धर्मांधता आणि त्याला आता देव मानला तर हे सगळे मानावेच लागेल म्हणत दिलेला दुजोरा ही नास्तिकांधता.

२. त्यांना देवाशी काहीही घेणं देणं नाही, पण इतके वर्ष त्यांच्यामते स्त्रीला दुय्यम लेखणारी प्रथा तोडायचीय.
>>>>

याचीही शक्यता कमीच.
कारण मंदिरात प्रवेश नाकारल्याने त्यांचे काही अडले नाही तर मला नाही वाटत स्त्रियांच्या डोक्यात काही राग वगैरे खदखदत असेल.
लग्नानंतर स्वताची ओळख पुसून नवरयाचे नाव लावणे आणि नवरयाच्या घरी राहणे हे जिथे आजही स्त्रिया दुय्यमपणाची भावना मनात न आणता पाळतात तिथे काय कुठले मंदिर प्रवेश द्या किंवा नका देऊ यात काही दुय्यम दर्जा दिल्यासारखे त्यांच्या मनातही नसेल.
पण येस्स, ते तसे ब्रेनवॉश करून वेगळ्या पद्धतीने डोक्यात भरून भडकावले गेले तर मात्र त्या या प्रथेच्या विरोधात येऊ शकतात.

भेद श्रद्धेतून नाही तर पुरुषी अहंकारातून आले आहेत आणि लढायचे तर अश्या भेदांविरुद्ध लढा हेच>>>>>

रूनमू,
हे भेद धर्मग्रंथातून / धार्मिक विधीतून आपल्या पर्यंत पोहोचला आहे की नाही?

त्याला आता देव मानला तर हे सगळे मानावेच लागेल म्हणत दिलेला दुजोरा ही नास्तिकांधता.
>>>>>

आपला वेगळा देव माना. किंवा त्याच देवाचे वेगळे मंदिर काढा. तिथे सर्वांना प्रवेश ठेवा किंवा आपले नियम लावा. पण आधीच्या देवाबाबतच्या लोकांच्या श्रद्धा आपल्याला काही त्रास होत नसताना बदलयचा हट्ट का?
मूळात देव ही एक संकल्पना आहे. एखादा देव ज्या गृहीतकांवर आधरला आहे ते मान्य नसल्यास त्या देवाचे नवे आपल्याला हवे तसे वर्जन आपल्यापुरते काढा आणि पूजा ईतके सिंपल आहे.

महिलांना प्रवेशबंदी ही फक्त शबरीमला येथीलच मंदिरात होती की अय्यपा स्वामींची जेथे जेथे मंदिरे आहेत त्या सर्वच ठिकाणी अशी महिलांना बंदी असते ???

रूनमू,
हे भेद धर्मग्रंथातून / धार्मिक विधीतून आपल्या पर्यंत पोहोचला आहे की नाही?
>>>

मार्ग एक असेना. भेदामागची भावना श्रद्धा वा अहंकार काय आहे हे बघा.

आणि मूळात हे भेद देवधर्माच्या माध्यमातून का पोहोचले याचा विचार केला आहे का?
कारण देव ही एक पॉवरफुल्ल संकल्पना आहे जिला मानणारा एकूण एक जण तिला घाबरतो. सोबतीला धर्म म्ह्णणजे आपले अस्तित्व आणि ते सर्वात आधी हे लोकांच्या मनात घट्ट रुजलेले आहे. त्यामुळेच यांच्या नावावर चांगल्या लोकांनी चांगल्या गोष्टी खपवल्या तर वाईट लोकांनी जाचक नियम राबवले.
यापैकी सती विधवा निपुत्रिक वगैरे बरेच जाचक नियमांना बदलले गेले आहे. कित्येक येत्या काळात झपाट्याने बदलले जातील. कारण शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे सुधारणांचाही वेग वाढला आहे. अश्यात एखाद्या निरुपद्रवी भेदाशी लढून समाजातील एका गटाच्या भावना दुखावून ते निस्तरण्यात निरर्थक वेळ घालवण्याऐवजी जिथे बदलाची गरज आहे तिथे लक्ष केंद्रित करायला हवे. पण मुळातच हे फॅड देशभरात जाणीवपूर्वक आपापल्या फायद्यासाठी पसरवले जात आहे. त्याला उगाच एंटरटेन करू नका. अन्यथा गरजेचे प्रश्न राहिले बाजूला आणि मंदीर वही बनायेंगे सारखे यातच अडकून बसाल.

. एखादा देव ज्या गृहीतकांवर आधरला आहे ते मान्य नसल्यास त्या देवाचे नवे आपल्याला हवे तसे वर्जन आपल्यापुरते काढा आणि पूजा ईतके सिंपल आहे. >>>>>

आहेत त्या शाळा कॉलेजात ऍडमिशन हवी हा अट्टाहास का?
दलितांनी त्यांची वेगळी शाळा कॉलेजेस काढावीत आणि तिकडे ऍडमिशन घ्यावी/ वेगळी देवळे बांधावीत आणि तिकडे जावे, आहेत त्या देवळातच जावे हा अट्टाहास का?

दलितांना समान न्याय देणे नाकारणारा धर्म मान्य नसेल तर नवा धर्म काढावा,
ते सुद्धा झाले,
पण जो पर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही तो पर्यंत ही सगळी नवी लेबले वर वरच्या मलम पट्ट्या ठरतात

१ <आपल्याला काही त्रास होत नसताना बदलयचा हट्ट का?>
त्रास म्हणजे नक्की काय? पाळीच्या चार दिवसांत अपवित्र असतेस असा शिक्का बसणं हा त्रास नाही का? पाळी येणारी स्त्री ही पुरुषांच्या मार्गातली धोंड असा समज हा त्रास नाही का?

२. इतरांच्या श्रद्धांना धक्का - प्रत्येकानी स्वतःच्या श्रद्धा स्वत्तः आणि तो देव यांपुरत्या मर्यादित ठेवाव्यात, अमुक एका गोष्टीमुळे आमचा देव्/देऊळ बाटतो, असे तुम्हांला वाटत असेल, तर तुमची श्रद्धा पोकळ आहे. खरंच देव्/देऊळ बाटत असेल, तर त्यांना त्याची शिक्षा देव देईल. तुम्ही ती शिक्षा द्या असा आदेश देवाने तुम्हांला दिलाय का?

३ स्वतःपुरता दुसरा देव /देऊळ स्थापणं ही पळवाट आहे. सावरकरांनी पतितपावनमंदिराच्या वेळी स्वीकारलेली. याने प्रश्न सुटत नाहीत. हा लढा श्रद्धेचा आहे का मला माहीत नाही. त्याने मला फरक पडत नाही. पण हा समानतेचा लढा आहे. सगळीकडे समानता हवी, देवाच्या दारातही.

त्रास म्हणजे नक्की काय? पाळीच्या चार दिवसांत अपवित्र असतेस असा शिक्का बसणं हा त्रास नाही का?
>>>>

मलाही माझ्या घरचे आंघोळ केल्याशिवाय देवळात नेत नाहीत.
माझाही त्यांना हाच प्रश्न असतो की एक दिवस नाही केली आंघोळ तर आपण अपवित्र होतो का?

देशाच्या कित्येक दुर्गम भागात रोज लोकांना आंघोळ करायची इच्छा असूनही पाण्याच्या कमतरतेमुळे आंघोळ करता येत नाही. तर ते सारे देवाच्या दारी अपवित्र झाले का?

आता काय कराल अश्यांसाठी आवाज उठवाल की आणखी काही सल्ला द्याल?

लोक अंघोळ करून आले आहेत की नाही हे तपासायचे मशीन बनवून देवळांच्या दारांत बसवले पाहिजे.
देवळा येऊ पाहणारी स्त्री योग्य काळात आहे की नाही, हे तपासणार्‍या मशीनसारखेच.

>>> सगळीकडे समानता हवी, देवाच्या दारातही.
सहमत. देवाच्या दारीतर हवीच हवी.

ज्या देवाला मद्यपान/धूम्रपान/शिविगाळ करणारे पुरुष भक्त चालतात, त्याला प्रजननक्षम स्त्रियांचं दर्शन का चालू नये?
आजारी / जखमी पुरुषांनाही मंदिरात प्रवेश करायला बंदी आहे का?

तुळजापुरला पण गाभार्‍यात महिलाना प्रवेश नाही पण कुठेही लिखित नसल्याने २ दिव्सापुर्वी ७-८ महिलानी गाभार्‍यात प्रवेश करुन मुर्तिला चरण स्पर्श केल्याची बातमी बाचली ( एवढच नाही तर तिथे गाभार्‍यात ब्राम्हण पुजार्‍याना सुद्धा प्रवेश नाही मुर्तीची पुजा अभिषेक फक्त फक्त मराठा पुजारी करतात )

आजारी / जखमी पुरुषांनाही मंदिरात प्रवेश करायला बंदी आहे का?>> पुरुषाना भारतात कशावरही बन्दी नाही ते सगळे नियम फक्त महिलाना लागु
सब्रिमलाचा इतिहास फार जुना आहे याच्यावर ब्र्टिश काळात सुद्धा काही उठाव झाले पण तेव्हाही ते हाणून पाडले गेले, १९९० मधे कुणी व्हिआयपी ( म्हणजे काय ते माहित नाही) महिलानी जबरदस्तिने दर्शन घेतले म्हणून त्याविरुद्धा कोर्टात अपिल करुन हा कायदा समत केला गेला होता.

नाशिकला मुक्तिधाम मधे अनेक देवाच्या मुर्ती आहेत तसच एक स्वतत्र दालनात एक ब्रम्हचारी देवाची मुर्ती आहे तिथे पण स्त्रीयाना प्रवेश बन्दी आहे तिथे एक माणूस कायम बसलेला असतो हा नियम पाळला जातो की नाही ते पाहायला... पण तिथे कुठल्याच स्त्रियाना प्रवेश नाही ( वयाची काय अट नाही)

शबरीमालाच्या मंदीरात प्रवेशासाठी केरळातल्या ख्रिश्चनधर्मिय स्त्रिया मानवी साखळी आंदोलन करणार असल्याची बातमी वाचनात आली होती. केरळातल्याच काही चर्चेसच्या अंतर्भागात स्त्रियांना प्रवेश नाही आणि त्याबद्दल या स्त्रियांनी किंवा शबरीमालात प्रवेशाचा अट्टाहास करणार्‍या केरळमधल्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याबद्दल एक चकार शब्दही काढल्याचे ऐकीवात आलेले नाही. ख्रिश्चनांप्रमाणेच मुस्लिम स्त्रियांना मशिदीत प्रवेश वर्ज्य आहे आणि त्याबद्दलही केरळात कोणतेही आंदोलन झाल्याचे ऐकलेले नाही. असे असताना केवळ शबरीमालातच प्रवेशाचा अट्टाहास का धरण्यात येत आहे?

स्त्री - पुरुष समानता ही केवळ हिंदू धर्मालाच लागू आहे का इतर धर्मियांनाही?
स्त्री - पुरुष समानतेचा पुरस्कार करणार्‍यांचे याबाबत काय मत आहे?

<शबरीमालाच्या मंदीरात प्रवेशासाठी केरळातल्या ख्रिश्चनधर्मिय स्त्रिया मानवी साखळी आंदोलन करणार असल्याची बातमी वाचनात आली होती. >
. मी वाचलेल्या बातमीत ३५ लाख स्त्रियांनी ६२० किलोमीटर लांब मानवी साखळी बनवली होती. काही ख्रिस्ती आणि मुस्लिम स्त्रियाही त्यात सामील झाल्या होत्या असे म्हटले आहे.

स्त्रीपुरुष समानता अर्थातच सगळ्याच धर्मांत हवी. मुंबईतल्या हाजीअली दर्ग्यातही न्यायालयाच्या आदेशानंतर स्त्रियांना कबरीपर्यंत प्रवेश मिळाला आहे.

स्त्री - पुरुष समानता ही केवळ हिंदू धर्मालाच लागू आहे का इतर धर्मियांनाही?
स्त्री - पुरुष समानतेचा पुरस्कार करणार्‍यांचे याबाबत काय मत आहे?

- आधी आपले घर स्वच्छ करावे या उक्तीनुसार आधी सबरीमाला प्रवेशाबद्दल काय होतं ते पहावं.
ख्रिस्ती, मुस्लिम स्त्रिया जर हिंदू स्त्रियांच्या साठी लढत असतील तर ते प्रशन्सनीय आहे
स्पेसीफिकली ख्रिस्ती धर्माबद्दल बोलायचं तर ख्रिस्तीबहुल यूएस , युरोप इथे स्त्रिया खूप जास्त स्वतन्त्र , सुरक्षित आहेत, त्यांच्या तुलनेत हिंदू धर्मीय अजून मध्ययुगीन मानसिकतेत आहेत.

लोक अंघोळ करून आले आहेत की नाही हे तपासायचे मशीन बनवून देवळांच्या दारांत बसवले पाहिजे.
>>>>>

मुद्दा खोडता आला नाही तर माझा Happy

आंघोळ न केलेली व्यक्ती अपवित्र झाली का?
आता प्रश्न सोपा केला आहे. विचार करा...

आंघोळ आणि मेन्स्ट्रुअल डिटेक्षन मशीन करतील ती करोत, सध्या भरत आणि सिंबाला नॉनसेन्स आणि ट्रोल डिटेक्षन शिकण्याची रादर शिककेले फॉलो करून उड्या मारायला शिकण्याची नितांत गरज आहे.

सिंबा अजूनही यात दलित उच्चनीच जातीय भेद आणून बुद्धीभेद करत आहेत.

एखाद्या महिलेला त्या चार दिवसांत मंदिरात यायला परवानगी नाकारणे आणि ऑफिसला यायला परवानगी नाकारणे यातला फरक कोणाला समजूनच घ्यायचा नसेल तर काय समजवणार...

एखाद्या महिलेला त्या चार दिवसांत मंदिरात यायला परवानगी नाकारणे >>>>>

रुन्मू, नक्की ओब्जेक्ष्ण कशाला आहे ते कळत नाहीये का तुला?
त्या चार दिवसा पुरत्या मंदिर प्रवेशाबद्दल बोलत नाहीयोत आपण.
बाई ला १६ ते ५० वर्षात पाळी येते , म्हणून सरसकट - त्या वयातील - सर्व बायकांना-वर्ष भर मंदिर प्रवेश नाकारणे या बद्दल बोलतो आहोत आपण.

कुणीतरी कधीतरी आंघोळ करत नाहीस म्हणून आयुष्यभर त्याने देवळात येऊ नको म्हणण्या सारखे आहे.

* अमितव चा सल्ला मानून मी कु ऋ ला उत्तर देणे थांबवत आहे.

ज्या बायकांचं घरच त्यांचं ऑफिस असतं, अशा बायकांना चार दिवस ऑफिसमध्ये येण्यापासून मज्जाव केला जातो.
पण हे समजून घ्यायचंच नसेल.
अंघोळ न केलेला पुरुष अपवित्र नाही पण ती स्त्री मात्र अपवित्र असा फंडा दिसतोय.
असो, यापुढे या व्यक्तीशी संवाद नाही.

अच्छा मला एक सांगा,
आपल्याकडे किती स्त्रिया स्वत:हून मासिक पाळीच्या चार दिवसात घरच्या देव्हारयापासूनही दूर राहतात वा मंदिरात जायचे टाळतात?

आमच्या घरी असे होत नाही टाईप्स उत्तरे नको. प्रश्नही कोणाला वैयक्तिक नाही तर ओवरऑल समाजाबद्दल विचारला आहे.

माझ्या माहितीतील तरी ऑलमोस्ट सर्व स्त्रिया पाळीच्या दिवसांत देवधर्म टाळतात.

अंघोळ न केलेला पुरुष अपवित्र नाही पण ती स्त्री मात्र अपवित्र असा फंडा दिसतोय.
>>>>

असं कोण म्हणाले?
मी स्पष्ट वर लिहिले आहे की "मला" आंघोळ केल्याशिवाय मंदिरात नेत नाहीत.

कि आता मी पुरुष आहे यावर तुम्हाला शंका आहे Happy

ज्या बायकांचं घरच त्यांचं ऑफिस असतं, अशा बायकांना चार दिवस ऑफिसमध्ये येण्यापासून मज्जाव केला जातो.
>>>>>

मी ज्या गोष्टीचे समर्थन करत नाही ते मुद्दे तुम्ही मला प्रत्युत्तर म्हणून का मांडत आहात?

जर एखाद्या घरात पाळीच्या दिवसात बाईला चार दिवस वाळीत टाकत असतील वा अस्पृश्य वागणूक देत असतील. तर त्याला माझा विरोधच आहे.

थोड्यावेळाने ऋन्मेष हा सती विधवा पांढरी साडी बुरखा तीन तलाक वगैरे गोष्टींचे समर्थन करतो वगैरे अफवा उठल्या तरी नवल वाटणार नाही Happy

त्या चार दिवसा पुरत्या मंदिर प्रवेशाबद्दल बोलत नाहीयोत आपण.
बाई ला १६ ते ५० वर्षात पाळी येते , म्हणून सरसकट - त्या वयातील - सर्व बायकांना-वर्ष भर मंदिर प्रवेश नाकारणे या बद्दल बोलतो आहोत आपण.
>>>>>

सिंबा तुम्ही आता ही पोस्ट बोल्ड केलीत म्हणून विचारतोय.
याचा अर्थ पाळीच्या चार दिवसांत प्रवेश नाकारला तर तुमची हरकत नाही असे समजायचे का?

याचे उत्तर ईतरांनीही द्यावे

Pages