Submitted by DJ. on 13 December, 2018 - 09:45
लहाणपणी सर्वत्र चिमण्यांची चिव-चिव आणि कावळ्यांची काव-काव ऐकु यायची. कधितरी पोपट साद घालायचे. मैनाताई पण थुईथुई बागडताना दिसायच्या. पण या मराठमोळ्या पक्षांनी चिवचिवाट केला अथवा कावकाव केलं म्हणुन कधिही मस्तक उठले नाही.
हल्ली मात्र चिमण्या-कावळे-पोपट लांबुनच दर्शन देउन पसार होतात आणि अत्यंत घाणेरडी अशी परप्रांतीय कबुतरे कितीही हाकलली तरी त्रास द्यायला पुन्हा हजर होत आहेत. सोबत त्यांचे शेकडो सगे-सोयरे आणुन साफ-सफाईचे अगदी ३-१३ वाजवलेत.
गेल्या २-३ महिन्यांपासुन बिल्डिंगची डक्ट, बाल्कनी आणि खिडक्यांच्या ग्रिल्सवर कबुतरांनी उच्छाद मांडला आहे.
त्यांची पिसे, विष्ठा आणि सततची गुटर्रर्रर्र-गु यांमुळे अगदी हैराण झालो आहे.
कबुतरे कायमची हुसकावुन लावण्यासाठी, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यांच्या त्रासातुन सुटका होण्यासाठी काय उपाययोजना करता येतील..?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सगळी मांजरे हाताने कबुतराला
सगळी मांजरे हाताने कबुतराला उलट सुलट करून 'अरे पडलास का असा, ऊठ की' म्हणत असल्याचे लक्षात आले.->>>
मांजराया :फिदीफिदी:
मांजराया
बेबे तुझी पोस्ट एकदम भारी आहे
बेबे तुझी पोस्ट एकदम भारी आहे

वडगाव शेरी (पुणे) : दारूच्या
Irrelevant post...
म्हणूनच ऋन्मेष किती कळकळीने
म्हणूनच ऋन्मेष किती कळकळीने सांगत असतात दारू पिऊ नका आयुष्य ऊद्धस्त करून घेऊ नका, दारूच्या थेंबाला स्पर्श करू नका संसार ऊध्वस्त करून घेऊ नका.
हे असे होते दारू पिल्यावर आणि आळ गरीब बिचार्या कबूतरांवर येतो.
आता कुठे तुम्हाला ऋन्मेषच्या दारू न पिण्या संदर्भातल्या आवाहनाचे महत्व पटायला लागले.
आता आपले ते हे आले तर दारु
आता आपले ते हे आले तर दारु वाईट असा निष्कर्ष काढतील.
) म्हणतील, विषयाला धरुन बोला.
ही खाजगी जागा आहे. ही शेवटची वॉर्निंग आहे.
दुसर्या त्या ह्यांचा भटकता आत्मा आला तर ऑम्लेट पक्षि नॉन व्हेज वाईट असा काढतील.
त्यांचे ते हे आले तर परप्रांतीय वर घसरतील,
त्या ह्या आल्यातर प्राण्यांच्या हत्येचं कलम लावून पेटस्मार्ट/पेटकोच्या कुठल्या आएल मध्ये आता कबुतरांची अंडी मिळतात आणि अंड्यांबरोबर पिंजरा कसा त्यांनी आणला आणि हल्ली दाणे भरवताना आSSSओ आSSSओ हा अमरीश मंत्र कसा जुना झाला आहे आणि जस्टिन बीबरचं कुठलं गाणं लावलं की कबुतरांना परसाकडला साफ होतं तो सल्ला की देउन जातील.
त्या ह्यांचे ते हे आले तर कबुतराच्या अंड्यांतील प्रोटिन रक्तातील मायक्रोमॉलेक्युलच्या बाईंडिंग साईट्स वर जाऊन कन्फर्मेशनल चेंजेस कसे घडवुन आणतं आणि एंझाईम कॅटालिसिस, मॉलेक्युलर पाथवे सिग्नलिंग या प्रक्रिया घडल्याने कॅसकेड ऑफ सेल्युलर इंटरॅक्शन कसे होते ते सांगतील. ज्याचा आठव्या (का नवन्या) मजल्यावरुन उडी मारण्याशी दूरान्वये ही संबंध असणार नाही हे चाणाक्ष वाचकांनी ओळखलंच असेल.
आपले ते हे आले तर कबुतराच्या अंड्यांत सोडिअम खूप असतं, त्यामुळे मीठ वरुन घेउ नये, पण पोटदुखी वर कसा तो राम्बाण इलाज आहे, आणि टरफलं कुटुन कशा पुर्वी साबण नसताना बायका डोक्याला लावायच्या आणि त्याने केस आणि कांती तजेलदार होते. आणि कबुतराची अंडी खाणे कसे भाग्याचे समजले जायचे आणि त्यांनी त्या ह्या देशांत... हुश्श
आणि शेवटी आपले सगळ्यांचे लाडके ते हे (ज्यांना ते हे म्हटलेलं आवडंत नाही... त्यांनाच नाही.. कोणालाच म्हटलेलं .. तेच ते ... विषयाची गाढ आसक्ती असलेले... सारखं मेलं विषयाला धरुन बोलणारे..
हॅपी हॉलिडेज
हो ना हाब अगदीच हो.
हो ना हाब अगदीच हो.
पाप (गालावर थपडा मारून घेणारी भावली)
अरेरे दक्षिणाजी,
अरेरे दक्षिणाजी,
खरे पापक्षालन आपण सर्वांनी ऋन्मेषचा विचार अंमलात आणणे आणि निदान आपल्या सोशल सर्कमधल्या (मायबोली वगैरे) मित्र मैत्रिणींमध्ये त्या विचाराचा प्रचार केल्याने होईल. आपण आपल्या पश्चातापाकडे ताकद/एनर्जी म्हणून बघितले पाहिजे आणि त्या एनर्जीचा सकारात्मक ऊपयोग केला पाहिजे.
चला तर मग दारूबंदीची शपथ घेऊन मायबोलीवरील दारूबंदीच्या प्रचारकार्याला हातभार लाऊ या... एक दारूमुक्त मायबोली, समाज आणि राष्ट्र घडवू या.
धागा भरकटवण्याच्या उच्छादाला
धागा भरकटवण्याच्या उच्छादाला आवर म्हणुन माझा वरील प्रतिसाद delete.
धागा भरकटवण्याच्या उच्छादाला
धागा भरकटवण्याच्या उच्छादाला आवर म्हणुन माझा वरील प्रतिसाद थोडा बदलला... >> कबूतराची अंडी खाल्ली म्हणून कबुतराच्या भुताने झपाटले आणि त्या झपाटलेपणातून त्याने गॅलरीतून ऊडी मारली ह्या विषयाला धरून चर्चा करायची आहे का?
बोकलतजी ह्या अमानवीय विषयातले तज्ञ आहेत. ते नक्की चर्चेला योग्य खाद्य पुरवू शकतील... कॉलिंग बोकलतजी.
कबुतरांशी पंगा घेत त्यांचे हालहाल करण्याआधी हा अमानवीय अँगल नक्की विचारात घ्या लोकहो... नाहीतर जीवावर बेतायचे हे कबूतर प्रकरण.
पण एक जरूर लक्षात ठेवा दारूएवढे वाईट काहीच नसते... ना कबूतर ना त्याचे भूत.
धागा भरकटवण्याच्या उच्छादाला
You carry on.
कबूतर दारू पितात ?
कबूतर दारू पितात ?
नक्की मुद्दा काय ? हां काय मध्येच विषय आला इकडे
मेजर काय तरी मिसलं का मी !
:कनफूझ भावला:
काल रात्री इथे कबुतर-आम्लेट
काल रात्री इथे कबुतर-आम्लेट आणि दारू पार्टी झाली... त्याचे पडसाद आहेत हे.
आता धागा भरकटतच आहे तर हे
आता धागा भरकटतच आहे तर हे वाचा.
कबुतराची अंडी तळून खाल्ल्यानंतर तरुणाची आत्महत्या https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/man-commit...
कबुतराची अंडी तळून खाल्ल्यावर
कबुतराची अंडी तळून खाल्ल्यावर नशा येते ही अफवा पसरवल्यास कबुतरे गुंड पळवून पिंजऱ्यात ठेवतील आणि ती आपोआप कमी होतील.
माझ्या घरी ३ महिन्यापूर्वी
माझ्या घरी ३ महिन्यापूर्वी माऊचे पिल्लू आणले. (वय अंदाजे ४ महिने) मागच्याच आठवड्यात त्याने टेरेसवर झोपलेल्या कबुतराचा फडशा पाडला. आणि शब्दशः फडशा कारण डोकं आणि पंख सोडून सगळं कबुतर त्याने एका बैठकीत संपवले. (आईने कुठलेही ट्रेनिंग देण्याच्या आधीच पिल्लू अमच्याकडे दाखल झाले होते)
हे पिल्लू मांजरांमधले
हे पिल्लू मांजरांमधले प्रोडीजी मूल असावे.
Prodigy.
<कबुतरे गुंड पळवून पिंजऱ्यात
<कबुतरे गुंड पळवून पिंजऱ्यात ठेवतील>
नक्की कोण कोणाला पळवेल?
कबुतरे गुंडांना की गुंड कबुतरांना?
(No subject)
आरारारा
संपादित(आता बसा उत्सुकतेच्या आगीत जळत, की संपादित करण्याआधी इथे काय होतं ☺️☺️☺️)
काही विशेष नाही त्यात,
काही विशेष नाही त्यात, करेक्शन केली की खालची दुरुस्तीवाली कॉमेंट गायब होते.
हे पिल्लू मांजरांमधले
हे पिल्लू मांजरांमधले प्रोजीडी मूल असावे.>>:G

संपादित(आता बसा उत्सुकतेच्या
संपादित(आता बसा उत्सुकतेच्या आगीत जळत, की संपादित करण्याआधी इथे काय होतं ☺️☺️☺️)
Submitted by mi_anu on 20 December, 2018 - 16:15
>>
लॉगिन न केलेल्या ब्राउझरमधून लगेच या, मग कळेल काय म्हटलं होतं ते.

हे पिल्लू मांजरांमधले
हे पिल्लू मांजरांमधले प्रोजीडी मूल असावे>>>>
बरोबर. असेच असावे.
नैतर आगाऊ असावे. काहींना हौस असते इतर टीममेट्स केटी मिळायची वाट पाहत असताना आपण कामाला सुरुवात करून टीम लीड समोर स्वतःची लाल करून घ्यायची.
>> शक्य असेल तर मांजर पाळा.
>> शक्य असेल तर मांजर पाळा. काहीच शक्य नसेल तर पीजननेट लावून घ्या.
>> Submitted by साधना on 14 December, 2018 - 16:26
मी हेच लिहायला येथे डोकावलो. शक्य असल्यास मांजर पाळणे.
>> घरात मांजर असेल तरी कबूतर असे आत येतात का ? कोणाचा काही अनुभव ?
>> Submitted by डूडायडू on 17 December, 2018 - 15:56
मांजर असल्यास कबुतर येत नाहीत. आमच्या इथे सोसायटीमध्ये बरीच फिरस्ती मांजरे आहेत. त्यामुळे उंदीर कबुतरे यांचा फार त्रास नाही. डक्ट मध्ये मांजराचा वावर राहिल्यास कालांतराने कबुतरे फिरकत नाहीत हा अनुभव आहे.
आमच्याकडे दुपारी घरात शांतता
आमच्याकडे दुपारी घरात शांतता असेल तर जी रूम रिकामी आहे तिथे सुद्धा कबुतर फडफडायची, बेडवर शी करायची. पण जेव्हापासून घरात कुत्रा आणला आहे, तेव्हापासून घरातच काय तर टेरेसमध्ये सुद्धा कबुतर येत नाही. टेरेस पिसं आणि शी मुक्त झालं आहे
हा सहज अनुभव सांगितला, कारण हा उपाय म्हणून अत्यंत खर्चिक आहे (महिन्याला अंदाजे 5000₹ डॉगफूड लागतं ) त्यापेक्षा एकदाच नेट लावलेलं परवडेल.
आणि भुभु टॉयलेट ट्रेन
आणि भुभु टॉयलेट ट्रेन होईपर्यंत भुभु ची शी कोण आवरणार? ☺️☺️☺️
नैतर आगाऊ असावे. काहींना हौस
नैतर आगाऊ असावे. काहींना हौस असते इतर टीममेट्स केटी मिळायची वाट पाहत असताना आपण कामाला सुरुवात करून टीम लीड समोर स्वतःची लाल करून घ्यायची.>>:हाहा:
माऊ घरी येण्याअधी (वर कुणीतरी लिहिले आहे तसे) प्लॅस्टिक्चे स्पाइक्स आम्ही टेरेसच्या कठड्यावर बसवले आहेत. ९०% कबुतरे कमी झाली.
राहिलेल्या १०% मधल्या एकाला
राहिलेल्या १०% मधल्या एकाला माऊने खाल्लं
Pages