Submitted by टवणे सर on 10 December, 2018 - 17:21
२०१९च्या लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी म्हणून बघितल्या जाणार्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम या राज्यांतील निवडणुकांचे निकाल आज ११ डिसें (भाप्रवे) रोजी जाहीर होतील. त्याबद्दल चर्चा (लाथाळी) करण्यासाठी उघडलेला हा धागा.
माझा होरा:
राजस्थान, मप्र, छत्तीसगढ -काँग्रेस (मध्यप्रदेशात लहान पक्षांबरोबर युती करून, इतर दोन ठिकाणी बहुमताने)
तेलंगणा - टीआरएस
मिझोरामः माहिती नाही. सध्या तिकडे भाजपाचे वारे असल्याने कुठल्यातरी आघाडीत भाजपा असेलच
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हाब, सामान्य माणसांनी केलेली
हाब, सामान्य माणसांनी केलेली प्रेडिक्शन्स कशी खरी ठरत गेली वाचायचे असेल तर माबोवर धागे उपलब्ध आहेत,
अगदी डे 1 पासून चे.
भक्तांचे tantrms सोडले तर अड्डेकरांनी बरेच चांगले लिहिले आहे
<< उदयजी जरा तुमच्याच
<< उदयजी जरा तुमच्याच कंपूतल्या इतर लोकांचीही भाषा बघा >>
------- मानसी माझा कुठलाही कंपू नाही आहे. तुमचा तसा समज झाला असेल तर तो पुर्णपणे चुकीचा आहे. माझे स्वतः चे विचार आहेत. चुकीचे/ बरोबर असतील... पण माझे आहेत. चुकीचे आहेत असे समजले तर दुरुस्त करण्याचे धारिष्ट्य बाळगतो.
प्रत्येकाच्या मर्यादा आहेत. राहुल गांधी यांच्या आहेत.. तसेच मोदी यांच्यापण आहेत. मी कधीच राहुल गांधी यांचा उल्लेख पप्पू असे करत नाही किंवा मोदी यांचा उल्लेख फेकू, जुमलेबाज असा करत नाही.
टिका त्यांच्या धोरणांवर करा, त्यांनी घेतलेल्या भुमिकांवर करा
त्यांचे आई कोण, वडिल कोण, जानवे, गोत्र यांना दुर ठेवतो.
मी काल (२०१४ च्या आधी) काँग्रेसवर खरमरित टिका केलीच होती. पण जेव्हा मनमोहन सिंग यांनी प्रथम अण्वस्त्र करार केला त्यावेळी त्यांच्या निर्णयाची स्तुतीच केली होती.
२०१४ नंतर दोन वर्षे कुठलिही टिका केली नाही... (काम करण्यासाठी काही वेळ द्यावा... असेच काहीसे लिहीले होते)...
स्वच्छता अभियान, मुलींसाठी (त्यांच्या शिक्षणासाठी) आर्थिक गुंतवणुक याबद्दल चांगले लिहीले आहेच.
जातियवादी टिका, टोकाचा जात्यंधपणा बघुन "विकास नको पण जातियवाद आवर" असे म्हणायची पाळी आली आहे.
@jamewils हा हँडल चे ट्विटर
@jamewils हा हँडल चे ट्विटर वरचे धागे पण बरेच माहितीपूर्ण होते, RBI ,फायनान्स मिन यांचा पब्लिक डोमेन मधला डेटा वापरून सरकारचा प्रत्येक क्लेम खोटा आहे हे हा मानुस दाखवून द्यायचा
Ok Uday.... my bad!
Ok Uday.... my bad!
Respect that
बिचाऱ्याचं गाढवही गेलं आणि
बिचाऱ्याचं गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं.
नवीन Submitted by भरत. on 18 December, 2018 - 19:45
<<
नोटबंदी हा फसलेला निर्णय असेल तर असे बरेच फसलेले निर्णय वेगळवेगळ्या सरकारांनी गेल्या ७० वर्षात घेतलेले आहेत. ज्या निर्णयांनी देशासमोर नोटबंदीपेक्षाही कितीतरी मोठे प्रश्न उभे राहिले.
उदाहरणच घ्यायचे झाले तर,
१. काश्मिर प्रश्न संयुक्त राष्ट्र संघात नेणे.
२. हिंदी-चिनी भाई भाई म्हणत संपूर्ण अक्साईचीन, चीनला देणे.
३. १९८४ मधे भारतीय सैन्य सुवर्ण मंदीरात घुसवणे.
५. शहाबानो खटल्यात, सर्वौच्च न्यायालयाचा निर्णय बहुमताच्या ज ओरावर फिरवणे.
६. वादग्रस्त व खटला न्यायालयात सुरु असताना अयोद्धेतील मंदीराचे टाळे उघडणे.
७ श्रीलंका प्रश्न.
अश्या अनेक निर्णयात अनेकांचे "गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं" आहे. तेंव्हा मोदींच्या कारकिर्दीला या निर्णयाने काही धक्का बसेल याची शक्यता शून्य आहे व अशी पुस्तके अनेकांनी लिहून, अनेकांची अब्रु चव्हाट्यावर मांडली आहे मात्र त्यात तथ्थ किती होते याचा पाठपुरावा कोणी ही केला नाही.
मुद्देसूद आणि विधायक विरोध
मुद्देसूद आणि विधायक विरोध करणारी माणसे मला पण आवडतात पण इथले ठरावीक आयडी फक्त दंगा घालायला येतात आणि आपले पॉलिटीकल अजेंडे राबवत असतात
आणि यांच्याशी वादावादी करत बसण्यात काही अर्थ नाही आहे हे कळून चुकलेय पण मग कधीकधी रहावत नाही मग दोन चार पोस्टी टाकून जाते
धन्यवाद सिंबा.
धन्यवाद सिंबा.
मला कामासंदर्भातल्या रिसर्च पेपरसाठी क्रेडिबल सोर्सेस कडून ऑफिशिअली ऊपलब्ध झालेली माहिती (फायनन्शिअल जर्नल्स, एडिटोरिअल्स वगैरे) हवी आहे.
रिसर्च पेपरचा विषय वेगळा आहे पण माझ्या मते डीमॉन एक ईन्फ्लुएन्सिंग फॅक्टर होता आणि त्यासंदर्भातला डेटा माझ्या रिसर्च मध्ये घेण्याआधी मला त्याचे प्री-पोस्ट ईवेंट अॅनालिसिस पडताळून बघायचे आहे.
>>नोटबंदी हा फसलेला निर्णय
>>नोटबंदी हा फसलेला निर्णय असेल तर
फसलेला नाहीये. फसलेला असता तर त्यावरुन
आता दोन तीन वर्षानंतरही हे काही आयडी कण्हत बसले नसते.... फक्त मायबोलीवर active असणाऱ्या हजार पाचशेतले आठ दहा जणच आरडाओरडा करतायत यावरुन काय ते समजा
फक्त मायबोलीवर active
फक्त मायबोलीवर active असणाऱ्या हजार पाचशेतले आठ दहा जणच आरडाओरडा करतायत यावरुन काय ते समजा
नवीन Submitted by मानसी वैद्य on 18 December, 2018 - 20:13
<<
आठ दहा ??
तुम्हाला एकाच आयडीच्या, आठ..दहा डुआयड्या. असे म्हणायचे आहे का ?
<< >>नोटबंदी हा फसलेला निर्णय
<< >>नोटबंदी हा फसलेला निर्णय असेल तर
फसलेला नाहीये. फसलेला असता तर त्यावरुन
आता दोन तीन वर्षानंतरही हे काही आयडी कण्हत बसले नसते.... फक्त मायबोलीवर active असणाऱ्या हजार पाचशेतले आठ दहा जणच आरडाओरडा करतायत यावरुन काय ते समजा >>
--------- याच न्यायाने बुलंदशहरात झालेल्या पोलिस अधिकार्याच्या ( गणवेशातील व्यक्ती) हत्ये बद्दल मीच केवळ एक व्यक्ती/ आयडी लिहीतो आहे. काय समजायचे ? या प्रश्नावर शांतता/ मौन का आहे?
मोठा निर्णय घ्यायच्या आधी सर्व बाजू का नाही विचारात घेतल्या? नोटबंदीचा निर्णय फसलेला नसेल तर फायदे काय हे पण कृपया सांगा.
मध्य प्रदेशात जाहीर झालेल्या
मध्य प्रदेशात जाहीर झालेल्या कर्जमाफीबद्दल एक जेन्युईन शंका आहे. अजून ज्या सरकारचं बहुमत विधानसभेत सिद्ध व्हायचय, अशा सरकारच्या मुख्यमंत्र्यानं, मंत्रीमंडळाची बैठक सुद्धा न घेता, सभागृहात विधेयक न मांडता, अशी घोषणा करणं संविधानात्मक आहे का? आणी ही घोषणा प्रत्यक्षात येऊ शकेल का? का एक पब्लिसिटी स्टंट ठरेल?
अमितव - छान प्रतिसाद. ३०,००० फूट व्ह्यू वरून बर्यापैकी स्वतंत्र मतं बनवता येतात हे खरय. सरकारचे पटलेले, न पटलेले निर्णय ह्याची स्वतःशी मिमांसा करणं सोपं जातं.
Future impact analysis done
Future impact analysis done immediately post announcement आडवत नाही.
पण काळा पैसा नगदीत मोठ्या प्रमाणात नसतो आणि फेक करन्सीचं प्रमाण नगण्य आहे हे लगेच सांगितलं गेलेलं.
Raghuram Rajan is on record saying that he had told the government that it is not a good idea., while he was in office. Whether he had done a detailed analysis, is not known.
मानसी वैद्य, तुमच्या
मानसी वैद्य, तुमच्या मुद्देसूद पोस्ट्स शोधून तरी सापडतील का?
असल्यास लिंक द्या.
नोटाबंदी -
नोटाबंदी -
इतक्या टक्के नोटा परत येणारच नाहीत असा sbi चा report होता. Immediately post demo.
स्क्रीनशॉट नाही घेउन ठेवले का
स्क्रीनशॉट नाही घेउन ठेवले का तुम्ही?
तुमच्याकडे नसतील तर तुमच्या कंपूला विचारा
हायझेनबर्ग,
हायझेनबर्ग,
कोणाला काय विचारावे हे तुम्हाला तरी नक्की माहीत असेल असे वाटायचे
म्हणूनच तुम्हाला विचारले नाही
म्हणूनच तुम्हाला विचारले नाही बेफि
गुजरातमध्ये काँग्रेसच्या
गुजरातमध्ये काँग्रेसच्या लोकांनी migrants विरुद्ध आंदोलन करून त्यांना हाकलले होते आता कमलनाथनी पण स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं म्हटलंय.
दुसरीकडे कॉग्रेसच्याच निरुपम यांनी फडनवीसांकडे मागणी केली आहे कि युपीबिहारच्या लोकांना महाराष्ट्रात आरक्षण द्यावं. फडणवीसनी ही मागणी मान्य केली तरी मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही!
धन्यवाद भरत..
धन्यवाद भरत..
आता शोधत बसण्याचे काम आले. मी रघुराम राजन ह्यांचाच रेफरंस घेऊन न्यूज आर्काईव्ज शोधत होतो पण नुसते मतांशिवाय फार काही मिळाले नाही. त्यांचा अमेरिकेतल्या सबप्राईम मॉर्टगेज क्राईसेसच्या काळातले रिसर्च पेपर्स ऊपलब्ध आहेत पण डीमॉन बद्दल त्यांचे किंवा ईतर कोणाचे फार काही मिळाले नाही.
बेफी.. मला नका ओढू हो ह्या वादात मी फक्त माहितीच्या शोधात ईथवर आलो आणि पडत्या
फळाचीपोस्टीची आज्ञा घेत भरत ह्यांना विचारले. तुम्हाला किंवा अजून कोणाला ह्या संदर्भात काही लिंक सापडल्यास जरूर शेअर करा.हायझेनबर्ग,
हायझेनबर्ग,
तुम्हाला मी काय ओढणार ह्या वादात? मी स्वतःच इथे केव्हाच माझी मते मांडून मोकळा झालो आहे
तुम्हाला ही महत्वाची माहिती विचारायला हा धागा योग्य वाटला तर वाटो बापडा
इथे पूर्वी एक अर्थ-इतिहास
इथे पूर्वी एक अर्थ-इतिहास-पुराण-फिटनेस-अमेरिका-एसयूव्ही तत्वज्ञानी होते, ते संतुलीत ही होते त्यांना नक्की माहिती असतील डीमोनटायझेशनचे फायदे
कॅशलेस वरून लेस कॅश वर जेव्हा
कॅशलेस वरून लेस कॅश वर जेव्हा अर्थमंत्री आले, तेव्हाच नोटबंदी किती तकलादू निर्णय होता हे लक्षात आलं. बाकीचा चोथा अजून पाडत नाही इथे, पण नोट बंदीचं समर्थन करणाऱ्यांनी जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी, अशी माफक अपेक्षा.
फक्त मोदींनी नोटबंदी केली म्हणून त्याचा विरोध नाहीये, परंतु त्याची अंमलबजावणी करताना जो गलथानपणा बघितला, त्यानंतर तर खात्री झाली की हा अगदी बिनडोक पणाचा निर्णय होता.
<< तुम्हाला ही महत्वाची
<< तुम्हाला ही महत्वाची माहिती विचारायला हा धागा योग्य वाटला तर वाटो बापडा >>
------ कोणाला काय विचारावे हे तुम्हाला तरी नक्की माहीत असेल असा पहिला प्रतिसाद होता. आधी आपत्ती कोणा एका आय डी (व्यक्ती) बद्दल होती आणि आता धागा योग्य/ अयोग्य गप्पा.
त्यांनी भरत यांना प्रश्न विचारला होता पण शेवटी 'माहिती कोणीही दिली तरी चालेल' असे पण लिहीलेले आहे... तुमच्याकडे असेल तर द्या.
>>नोटबंदी हा फसलेला निर्णय
>>नोटबंदी हा फसलेला निर्णय असेल तर असे बरेच फसलेले निर्णय वेगळवेगळ्या सरकारांनी गेल्या ७० वर्षात घेतलेले आहेत >> ही जर तर ची का होईना भाषा एका भाजप समर्थका कडून येऊ लागलेली बघुन बरं वाटलं. वरचे सगळे फसलेले निर्णय एका प्रांतापुरते, एका समुदायाला अफेक्ट करणारे होते. नोटबंदीने समस्त नागरिकांची समान ससेहोलपट झाली. लोकशाहीत वाईट करायचं असलं तरी मोटाभाय सगळ्यांचं समान करतो. तो भष्टाचार करतो पण त्याला फॅमिली नसल्याने सगळेच्या सगळे खाल्लेले पैसे पार्टीफंड मध्ये जमा करतो. बायकोला दागिने कर, मुलाला शिकायला पाठव असलं काही नाहीच. सगळं पार्टीसाठी.!!!
<< कॅशलेस वरून लेस कॅश वर
<< कॅशलेस वरून लेस कॅश वर जेव्हा अर्थमंत्री आले, >>
------- लेस कॅश असा पण प्रकार नाही आहे. मागच्या पानावर दिलेली माहिती पुन्हा येथे देतो. RBI चा 2017-18 चा वार्षिक अहवालात
currency in circulation ३७ % नी वाढल्याचा उल्लेख आहे. १३५ कोटी लोकांच्या जगात नगद कागदी नोटा हाताळणारी कमी झालेली नाही.
पान क्र. २६० वर APPENDIX TABLE 4
https://rbi.org.in/Scripts/AnnualReportPublications.aspx?year=2018
राहू द्या हो ते नोटबंदीपुराण.
राहू द्या हो ते नोटबंदीपुराण. स्वतःला कितीही चटके बसले असतील तरी समर्थन करणारे करतीलच.
२००४ मधे India shining
२००४ मधे India shining सामान्य भारतीयांची क्रुर चेष्टा होती तशीच चेष्टा नोटबंदीमुळे काही नुकसान झाले नाही या विचारांत आहे. ज्यांचे नुकसान झाले ते सर्व-सामान्य भारतीयच आहेत.
दोन्ही मधे एक साम्य जरुर आहे... प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती आणि आभासी जग यांत मोठे अंतर आहे...
लोकशाहीत वाईट करायचं असलं तरी
लोकशाहीत वाईट करायचं असलं तरी मोटाभाय सगळ्यांचं समान करतो. तो भष्टाचार करतो पण त्याला फॅमिली नसल्याने सगळेच्या सगळे खाल्लेले पैसे पार्टीफंड मध्ये जमा करतो. बायकोला दागिने कर, मुलाला शिकायला पाठव असलं काही नाहीच. सगळं पार्टीसाठी.!!!
पार्टी मनीचा वापर पुन्हा सत्तेत यायलाच असणार ना. पण सत्ता कशासाठी हवी आहे? लालू किंवा राणे भुजबळ प्रमाणे पुढील पिढयांची सोय करणे शक्य तितका पैसा जमवणे हा उद्देश नाही. अटलजींप्रमाणे देशाची सेवा, working for the greater good of society हा प्रकार नाही, मतदारांशीच दुष्मनी असल्यागत वागत आहेत. म्हणजे वैयक्तिक स्वार्थ नकोय, लोकांची सेवा करायची नाहीये मग सत्ता हवीय तरी कशाला- totally puzzles me!
ओय संतुलित रुग्ण पुरे ते
ओय संतुलित रुग्ण पुरे ते कण्हणं
म्हणूनच तुम्हाला विचारले नाही
म्हणूनच तुम्हाला विचारले नाही बेफि >> तेवढं कळत असतं तर ...
Pages