Submitted by DJ. on 13 December, 2018 - 09:45
लहाणपणी सर्वत्र चिमण्यांची चिव-चिव आणि कावळ्यांची काव-काव ऐकु यायची. कधितरी पोपट साद घालायचे. मैनाताई पण थुईथुई बागडताना दिसायच्या. पण या मराठमोळ्या पक्षांनी चिवचिवाट केला अथवा कावकाव केलं म्हणुन कधिही मस्तक उठले नाही.
हल्ली मात्र चिमण्या-कावळे-पोपट लांबुनच दर्शन देउन पसार होतात आणि अत्यंत घाणेरडी अशी परप्रांतीय कबुतरे कितीही हाकलली तरी त्रास द्यायला पुन्हा हजर होत आहेत. सोबत त्यांचे शेकडो सगे-सोयरे आणुन साफ-सफाईचे अगदी ३-१३ वाजवलेत.
गेल्या २-३ महिन्यांपासुन बिल्डिंगची डक्ट, बाल्कनी आणि खिडक्यांच्या ग्रिल्सवर कबुतरांनी उच्छाद मांडला आहे.
त्यांची पिसे, विष्ठा आणि सततची गुटर्रर्रर्र-गु यांमुळे अगदी हैराण झालो आहे.
कबुतरे कायमची हुसकावुन लावण्यासाठी, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यांच्या त्रासातुन सुटका होण्यासाठी काय उपाययोजना करता येतील..?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
घरात मांजर असेल तरी कबूतर असे
घरात मांजर असेल तरी कबूतर असे आत येतात का ?>> हो येतात. आमच्या डक्टमधे ४ मांजरे असूनही कबुतरे येतात आणि घाण करतात. शिवाय मांजरीच्या विष्ठेतून आणि केसांमुळे होणारे आजार वेगळे.
आजच एका मैत्रीणीला भेटुन आले.
आजच एका मैत्रीणीला भेटुन आले...तिच्या आईला नुकतीच देवाज्ञा झाली..
कारण....एक फुफुस पुर्णपणे खराब झाले होते..ईतके की गेले ३-४ महिने २४-७ ऑक्सिजन मशीन द्वारे ऑक्शिजन घ्यावे लागयचे.
फुफुस खराब होण्याचे डॉक्टरांनी सांगितलेले कारण ....बरीच आहेत पण कबुतर हे एक महत्वाचं कारण असु शकेल असं म्हणाले...
त्या काकुंचं घर अधुन मधुन ३-४ महिने बंद असायचं , त्यामुळे गॅलरीमद्धे कबुतरांनी प्रचंड घाण केलेली असायची...आणी घर उघडलं की हे सगळं स्वच्छ करणं आलं...त्यामुळे डॉकटर म्हणाले की कबुतरांमुळे फुफुसांना इन्फेक्शन झालेलं असु शकतं....किती भयानक आहे हे सगळं...
जर कबुतरांमुळे ईतके घातक परिणाम होउ शकतात/ होतात तर त्यांची संख्या कमी करण्यासाठी खरच युद्धपातळीवर काही करता येइइल का..? एखादा जालिम उपाय.
कबुतरे जैवसाखळीत नक्की कशी आणि काय भुमिका बजावतात...?
त्यांना नष्ट करण्यासाठी काही अघोरी उपाय खरच करता येतील का..?
जर कबुतरे खरच नष्ट / अत्यंत कमी झाली तर निसर्गावर त्याचा काय परिणाम होउ शकतो... ?
मी स्प्रे करायची एक बुधली
मी स्प्रे करायची एक बुधली आणली आहे त्यात लायझॉल किंवा तत्सम भरुन एकदम थंड पाण्याने विरळ करुन कबुतर बसले की त्याच्यावर फवारतो पुढची ४/५ दिवस सुट्टी.
घरात आलेच तर झाडुने बदडतो मग परत ४/५ दिवस सुट्टी.
Submitted by बागेश्री१५ on 17
Submitted by बागेश्री१५ on 17 December, 2018 - 17:4>>> धन्यवाद
भयानक आहे हे
--------------
Submitted by स्मिता श्रीपाद on 17 December, 2018 - 18:09>> कबुतर हे एक महत्वाचं कारण असु शकेल असं म्हणाले.>>> बापरे
जर कबुतरे खरच नष्ट / अत्यंत
जर कबुतरे खरच नष्ट / अत्यंत कमी झाली तर निसर्गावर त्याचा काय परिणाम होउ शकतो... ? >> काहि परिणाम होणार नाही, झाला तर फायदाच होईल.
बाकी उद्योग काय? पुर्वी पत्रं बित्रं पोहोचती करायचं माफक कार्य होतं, पण आता ते ही नाही. 
आहे काय उपयोग या पक्षांचा? नुसते खायचे आणि हागायचे.
सुट्टीच्या दिवशी जरा निवांत उशिरापर्यंत झोपावं म्हटलं की बाल्कनीच्या पत्र्यावर यांची गुट्टर्गु आणि नखे घासणे सुरू होते.
मी लावलेली जाळी - डावीकडे
मी लावलेली जाळी - डावीकडे खराट्याच्या काड्यां बांधून केलेली. वीस रुपये खर्च. कबुतरे येत नाहीत, छोटे पक्षी येतात.
अगदी शेवटी माशाचे जाळे आहे.
अगोदर माशाचे जाळे संपूर्ण लावले होते पण त्यातून पक्षी ( मुनिया,चिमण्या,सनबर्ड ) आत येऊ शकत नाहीत म्हणून कमी केले. शिवाय वेल गुंततात फार.
फोटो इथे अपलोड करून पाहिला पण तो आडवा का होतोय? कबुतरांमुळे/
मला अगोदर वाटलं टाइमपास लेख
मला अगोदर वाटलं टाइमपास लेख आहे म्हणून फोटो द्यायला घाबरत होतो.
@ Srd : >>मला अगोदर वाटलं
@ Srd : >>मला अगोदर वाटलं टाइमपास लेख आहे म्हणून फोटो द्यायला घाबरत होतो.<<
अहो कबुतरांंमुळे प्रचंड त्रास होतोय.. आणि टाईमपास म्हणुन का लेख लिहिल कोण..?
(No subject)
पण आतापर्यंत एकंदरीत चांगल्या
पण आतापर्यंत एकंदरीत चांगल्या उपाययोजना समजल्या.. त्या योजल्या की ह्या कबुतर्ड्यांचा उच्छाद नक्की थांबेल असे वाटतंय..!
या वईतागी पक्श्यामुळे मला
या वईतागी पक्श्यामुळे मला श्वासाचा त्रास सुरु झालाय
मलाही टाईमपास धागा वाटला आणि
मलाही टाईमपास धागा वाटला आणि धमाल धाग्यात परिवर्तित होणारा. आज पाच दिवस झाले धागा येऊन... अजूनपर्यंत एकही उपाय केला नाहीत का ? मिरचीचा उपाय सहज करु शकला असता न ....
एकदा गच्चीवर गेलो तर एक मुलगा
एकदा गच्चीवर गेलो तर एक मुलगा अभ्यास करत बसला होता.
"इकडे शांतपणे अभ्यास होतो ना?"
"नाही काका, वाळवण राखायला बसलोय. जरा पुस्तक वाचतोय."
" हल्लीचे कावळे सांडगे खात नाहीत."
"मिरचा ठेवल्यात वाळवायला."
"कावळ्यांसाठी नाही,कबुतरांसाठी. ते मिरचा खातात. "
"मिरचा?"
"मिरचीचं बी खातात, मिरचा विसकटून टाकतात."
"आई म्हणाली तिखट कमी होतं बी गेलं की."
( ही सत्य गोष्ट आहे, टैमपास नाही. )
---
मिरचा वाळत घातल्या की पाटी ठेवायची -
- मिरचातले बी काढलेले आहे -
आमच्या पुण्याच्या
आमच्या पुण्याच्या सोसायटीमध्ये दर दोन वर्षानी फासेपारधी लोकाना काही पैसे देउन बोलवतात. ते कबुतराची संख्या कमी करुन जातात. पन मग हळुहळु परत कबुतराच्या संखेत वाढ होते. फासेपारधी लोकाना जर १०० कबुतर नाही मिळाली तर ते एक्स्ट्रा चार्ज करतात ते सोसायटीला परवडत नाही त्यामुळे त्याना सारखे सारखे बोलवणे होत नाही.
धाग्यावर असलेले बरेच उपाय करुन बघितले होते. दोन महिन्यापुर्वी सगळ्या बाल्कनी खिडक्या जाळीने पॅक करुन टाकल्या. ग्रील्स अश्या लावल्या की त्यावर बसता येणार नाही. बाल्कनीला वर पत्रा लावला. अता पत्र्यावर धुमाकुळ घालतात. आवाजाचा त्रास होतो पण घरी, ग्रीलवर घाण करत नाहीत. घरी घाण वास येत नाही.
@ मंजूताई : अहो मिरची पावडर
@ मंजूताई : अहो मिरची पावडर नाही टाकली पण काल सकाळी-सकाळीच ड्राय बाल्कनी मधे प्रायोगिक तत्त्वावर ५ रु. च्या काळपट हिरव्या मिरच्या वाटुन त्याचे सांडगे घातले होते.. ४-५ कबुतर्ड्यांंचे पाय त्या मिरच्यांत माखले आणि कालपासुन जरा जाणवेल इतपत त्यांची संख्या आणि गुटर्रर्रर्र्गु पण कमी वाटतेय..
एकंदरीत काय तर तुम्ही सगळे
एकंदरीत काय तर तुम्ही सगळे मिळून जे काबूतरांचे हाल करताय त्यामुळे रोबोट 2.0 मधला अक्षयकुमार खरोखर अवतार घेऊ शकतो आणि आपल्या सगळ्यांचे मोबाईल उडून एकच मोठा गरुड पक्षी तयार होऊ शकतो, मग बघू कुठले फासेपारधी आणि जाळ्या आणताय ते.
अहो जाळी लावली आहे, हाल नाही
अहो जाळी लावली आहे, हाल नाही करत. फोटो जालावरचा फुकटचा नाही, घरातला आहे.
सगळी कबुतरे बोकलत याम्चे घरी
सगळी कबुतरे बोकलत याम्चे घरी पाठवावीत
कबुतरांचा त्रास खरंच वाढला आहे सध्या
>>सगळी कबुतरे बोकलत याम्चे
>>सगळी कबुतरे बोकलत याम्चे घरी पाठवावीत<<
@ बोकलत : पत्ता द्या..

अहो ते भुत हडळ ह्यांना घाबरत
अहो ते भुत हडळ ह्यांना घाबरत नसतील एक्वेळ पण कबूतराला खूप भितात
त्यामुळे ह्या आयडियेचा काय बी उपेग नाही बघा !
झाला टाइमपास सुरू.
झाला टाइमपास सुरू.
घरात मांजरे पाळली की कबुतरे
घरात मांजरे पाळली की कबुतरे येत नाहीत हे खरे आहे. माझ्याकडची कबुतरे बंद झाली.
पण हल्लीच्या नेक्स्ट जनरेशन मांजरांना कबुतरांचे काय करावे हे कळत नाही हे माझे निरीक्षण आहे. साधारण सात आठ वर्षांपूर्वी आई मांजर व चार पिल्ले अशी गॅंग माझ्याकडे होती. कबुतर कसे पकडून खायचे याचा डेमो व नंतर 1 प्रॅक्टिकल असे सेशन्स आई मांजर रोज सकाळी ठेवायची. कबुतर पंखांचा व उरलेल्या हाडकांचा कचरा झाडून काढायचे काम मला औटसोर्स केले होते. मी नंतर वैतागून सगळ्यांना तडीपार केले. पण मांजरे घरी येत राहिली. आधीचे मांजर तडीपार व नंतर दुसरे येणे यामधल्या गॅपमध्ये कबुतरे परत यायची.
गेल्या 4 वर्षात 3 पिल्ले येऊन जाऊन राहिली. त्या सगळ्यांना कबुतरे दिसली की त्यांच्या अंगावर धावून जायचे माहीत होते. पण चुकून एखादे कबुतर हाताला लागलेच व त्याची मान तोंडात जाऊन ते गतप्राण झालेच तर पुढे काय याची केटी एकाही मांजराला मिळालेली नसल्याचे लक्षात आले. सगळी मांजरे हाताने कबुतराला उलट सुलट करून 'अरे पडलास का असा, ऊठ की' म्हणत असल्याचे लक्षात आले. ती कबुतरे उचलून कचऱ्यात टाकायचे काम परत माझ्या गळ्यात. हल्ली कबुतरे येत नाहीतच त्यामुळे सध्याचे मांजर कावळ्यांच्या अंगावर धावून जाते. पण केटी न द्यायची पद्धत मांजर आयांनी अशीच चालू ठेवली तर काही वर्षांनी मांजरे कॅटफुडची वाट पाहत ढिम्म बसून राहतील व घरात कबुतरे परत हैदोस घालतील अशी भीती वाटते.
(No subject)
इथे वाचून मी लाल मिरच्या
इथे वाचून मी लाल मिरच्या ठेवल्या तरी ती @%ची कबुतरी त्यावर बसली अंडी घालायला.
मिरचा १२० ते २४० रु किलो!
मिरचा १२० ते २४० रु किलो!
साधना जी
साधना जी
Submitted by साधना on 19
Submitted by साधना on 19 December, 2018 - 14:23
साधना, झ्कास!
साधना, झ्कास!
सगळी मांजरे हाताने कबुतराला उलट सुलट करून 'अरे पडलास का असा, ऊठ की' म्हणत असल्याचे लक्षात आले.>>>> अगदी नजरेसमोर दृश्य उभे राहिले.
@ साधना :
@ साधना :

@ गुगु : अहो मिर्च्या वाटुन त्या वाटणाचे सांडगे घाला गॅलरीच्या कट्ट्यावर.. ते बरोबर चिकटतात कबुतर्ड्यांना..
भयंकर जबरदस्त लिहिलंय साधना.
भयंकर जबरदस्त लिहिलंय साधना.
या हल्लीच्या मांजरायाना अजिबात मेहनत नको करायला मुलांवर.सगळं रेडिमेड द्यायचं त्यांना ☺️☺️☺️☺️
Pages