Submitted by DJ. on 13 December, 2018 - 09:45
लहाणपणी सर्वत्र चिमण्यांची चिव-चिव आणि कावळ्यांची काव-काव ऐकु यायची. कधितरी पोपट साद घालायचे. मैनाताई पण थुईथुई बागडताना दिसायच्या. पण या मराठमोळ्या पक्षांनी चिवचिवाट केला अथवा कावकाव केलं म्हणुन कधिही मस्तक उठले नाही.
हल्ली मात्र चिमण्या-कावळे-पोपट लांबुनच दर्शन देउन पसार होतात आणि अत्यंत घाणेरडी अशी परप्रांतीय कबुतरे कितीही हाकलली तरी त्रास द्यायला पुन्हा हजर होत आहेत. सोबत त्यांचे शेकडो सगे-सोयरे आणुन साफ-सफाईचे अगदी ३-१३ वाजवलेत.
गेल्या २-३ महिन्यांपासुन बिल्डिंगची डक्ट, बाल्कनी आणि खिडक्यांच्या ग्रिल्सवर कबुतरांनी उच्छाद मांडला आहे.
त्यांची पिसे, विष्ठा आणि सततची गुटर्रर्रर्र-गु यांमुळे अगदी हैराण झालो आहे.
कबुतरे कायमची हुसकावुन लावण्यासाठी, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यांच्या त्रासातुन सुटका होण्यासाठी काय उपाययोजना करता येतील..?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
चैत्रगंधा आणि स्निग्धा, लहान
चैत्रगंधा आणि स्निग्धा, लहान मुलांच्या डोळ्यात तिखट जाउ शकेल म्हणुनच मी त्या काळापट हिरव्या तिखट्जाळ मिरच्या गिर्रर्रर्र वाटुन ठेवण्याचा विचार केला. तसेही मिरची पावडर पेक्षा तिखट्जाळ मिरच्यांचे गिर्रर्रर्र वाटण कबुतरांच्या पायाला-पिसांना चिकटले की त्यांना जन्माची अद्दल घडेल अशी आशा वाटते.
@ Srd - जर कबुतर गँग मिरच्यांना बधली नाही तर मी तुमचा स्वस्तात-मस्त पर्याय नक्कि वापरेन. फुकट्या, गलिच्छ, टुकार परप्रांतिय कबुतरांसाठी तसेही फार खार्चिक उपाय करण्यास मन धजावत नाहीच.
मिरचीच्या ओल्या वाटणा बद्दल
मिरचीच्या ओल्या वाटणा बद्दल काहीच म्हणण नाही. फक्त तिखट पावडर टाकणं पटल नाही म्हणून...........
कुंकू टाकून बघायचे. कबूतरांना
कुंकू टाकून बघायचे. कबूतरांना लाल रंग दिसला की थांबतील. ते कुठे जवळ येऊन तिखटाची परीक्षा आय मीन चव घेणार
लहानपणी ही घाणेरडी जमात कधीही
लहानपणी ही घाणेरडी जमात कधीही पाहिली नव्हती.. २००० सालानंतर अचानक ते दिसु लागले आणि आता चांगलेच फोफावलेत.>>>
कबुतरे इथे आधीपासून होती. त्यांची संख्या मर्यादित होती , मी तर लोकांना कबुतरे पाळतानाही पाहिलेय.
मुंबईतून मांजरे हद्दपार झाल्यावर कबुतरांना नैसर्गिक शत्रू उरले नाहीत. कबुतरे खूप आळशी असल्याने मांजरे सहज त्यांचा फडशा पाडत. भटकी मांजरे कमी झाली, जी काही आहेत त्यांना मानवी अन्न वाढणारे दयाळू लोक वाढले, ज्यामुळे मांजरांना स्वतः शिकार करायची गरज राहिली नाही. त्यात पक्षांना चारा घातला की आपल्याला लाभ होतो ह्या विश्वासामुळे कबुतरांना फुकट खायला घालणारे वाढले. या सगळ्याचा एकत्रित परिणाम मुंबईतील वाढती काबूतरसंख्या हा आहे. ही संख्या इतकी वाढलीय की श्वसनमार्गाचे काही विकार या कबूतरांमुळे वाढायला लागले.
तुमच्या आजूबाजूला कुणी कबुतरखाने उघडले असतील तर ते आधी बंद करा. शक्य असेल तर मांजर पाळा. काहीच शक्य नसेल तर पीजननेट लावून घ्या.
>> बाल्कनीसाठी चाळीस रुपयांचे
>> बाल्कनीसाठी चाळीस रुपयांचे जाळं लागतं.
फक्त चाळीस रुपये?? मी अॅमॅझॉन वरुन १२x8 फुटांच ७०० रुपयाला घेतलं
Easyshoppingbazaar Anti Bird Net सर्च करा अॅमॅझॉन वर. क्वालिटी मात्र एकदम बेस्ट.
तुम्ही मुबंईत राहता का?
तुम्ही मुबंईत राहता का? मुंबईत राहत असाल तर सगळ्या कबुतरांना एका खोलीत डांबून ठेवा. आणि विग लावलेल्या महागुरुंचं आमची मुंबई सबकी मुंबई गाणं दाखवा. महागुरुंच्या नृत्याच्या एकेक लीला आणि त्या गाण्याचे बोल आणि चाल कबुतरांनी ऐकलं कि तुमचं काम झालंच म्हणून समजा.
महागुरू जोमात,
कबुतरं कोमात.
@ बोकलत :
@ व्यत्यय : अहो, त्या फुकट्या, गलिच्छ, टुकार कबुतरांसाठी एवढा खर्च करणे पटत नाही

@ बोकलत :
अहो, त्या फुकट्या, गलिच्छ,
अहो, त्या फुकट्या, गलिच्छ, टुकार कबुतरांसाठी एवढा खर्च करणे पटत नाही >>>>>
मग महागुरुंसाठी म्हणून तरी करा.
कबूतर वाढीचे मूळकारण नेहरू
कबूतर वाढीचे मूळकारण नेहरू असे म्हणत अखेर हां धागा राजकारणात हलवा
------------
पक्ष्याना ध्वनि लहरिचा त्रास होतो आणि म्हणून जसे मोबाईल टॉवर्स वाढले तश्या महानगरातील विविध चिमण्या गायब झाल्या पण कबूतर का नाही ? ह्यावर कोणी प्रकाश टाकेल का कृपया !
२००० सालानंतर अचानक ते दिसु
२००० सालानंतर अचानक ते दिसु लागले आणि आता चांगलेच फोफावलेत.>>>
कबुतरे इथे आधीपासून होती.
>>.>>
येस्स कबूतरे फार्र आधीपासून होती.
कबूतरांची गाणी ऐकतच माझी आणि माझ्या दादा लोकांची पिढी मोठी झालीय.
उदाहरणार्थ, कबूतर जाजा मैने प्यार किया, छत के उपर दो कबूतर निचे मैय और तू, चढ गया उपर रे अटरईया पे लौटन कबूयर रे.. वगैरे.. वगैरे..
मुंबईचे म्हणाल तर कबूतर्रखाना माझ्या जन्माआधीपासून बांधला गेलाय. कबूतरांना दाणे टाकणे फार जुनी प्रथा आहे. डीडीएलजे विसरलात का? आऊ आऊ, आओ आओ, शाहरूख आणि अमरीशपुरी.
प्रॉब्लेम असा झालाय की जंगले तोडली जाताहेत आणि सिमेंट काँक्रीटची घरे चढली जाताहेत. त्यामुळे जंगलातले पारवे शहरात येताहेत. त्यात आणखी त्रास म्हणजे मोबाईल लहरी आणि रेडीयेशन. त्यात काऊचिऊंना टिकाव धरने अवघड होतेय. नडतोय तो एकटा कब्बू. मग त्याला गोड मानून घेण्याऐवजी पर्यायच नाहीये आपल्याकडे.
न्यू यॉर्क शहराने कबूतरांचा
न्यू यॉर्क शहराने कबूतरांचा हा प्रॉब्लेम यशस्वीरित्या सोडवला आहे.
नुसता सोडवलाच नाही एका दगडात एक पक्षी मारून दुसरा वाचवला आहे.
नॅट जिओ वर ह्या संदर्भात एक गाजलेली डॉक्यू आहे. कुठलाही नॅचरल प्रीडेटर नसल्याने कबूतरांची संख्या मर्यादेबाहेर वाढली असेल बहिरी ससाणा (peregrine falcon ) हे प्रश्नाचे ऊत्तर आहे पण त्यासाठी शासनाने प्रयत्न जरूरी आहे. भारतात Shaheen Falcon नावाची ब्रीड ऊपलब्ध आहे.
Submitted by हायझेनबर्ग on 14
Submitted by हायझेनबर्ग on 14 December, 2018 - 23:16 >> +१११
प्लास्टिकचे खोटे ससाणे ठेवले
प्लास्टिकचे खोटे ससाणे ठेवले तर?
प्लास्टिकचे खोटे ससाणे ठेवले
प्लास्टिकचे खोटे ससाणे ठेवले तर?
<<
त्याने प्लॅस्टीकची खोटी कबुतरे पळून जातील.
Bear grylls बोलवा. दररोज एक
Bear grylls बोलवा. दररोज एक एक कबुतर पकडून खाईल तो. नाहीतर एखाद्या रविवारी मित्राला घरी बोलवा आणि घाला त्याला खायला.
आणि तसे पण कबुतर खाल्ले की वाताचा त्रास होत नाही
हे बघा. स्प्रे आहे. मी
हे बघा. स्प्रे आहे. मी वापरला नाहीय. चौकशी करून बघा.
माझ्या घरी पण कबुतरांचा ञास
माझ्या घरी पण कबुतरांचा ञास आहे. एका मित्राने सांगितले
तिखट लाल मिरच्या तोडुन कबुतरे बसत असतील तिथे पसरून ठेवा . ४-६ दिवसांनि नवीन मिरच्या टाकाव्यात, कबुतरे येणे बंद झाली.
मिरच्या नको, राघू जमायला
मिरच्या नको, राघू जमायला लागतील मग. ते आणखीच डेंजर..
पेपर्मिंट आणि लवंग तेल वासाने
पेपर्मिंट आणि लवंग तेल वासाने येत नाहित.
काही वर्षांपूर्वी (बहुतेक
काही वर्षांपूर्वी (बहुतेक २००० सालापासून) मुंबईच्या लोकल, बस, रिक्षा, काही विशेष समाजाच्या दुकानांत "पुण्यवान बनने के ५ रास्ते" अश्या हेडिंग खाली १. कुत्राला रोटी द्या, शत्रुनाश होईल २. कबुतरला दाना द्या, धंदा वाढेल ३. मछलीला आटा ४. मुंग्यांना साखर ५. गाईला चारा असे काही उपाय आणि त्यांचे फल अशी पोस्टर, स्टिकर लावले गेले.
तेव्हापासून कबुतरांना धान्य घालणारे, कुत्र्याला बिस्किटं घालणारी जनता वाढली, परिणामतः कबुतर, भटके कुत्रे पण वाढले. गायिका चारा देऊन पुण्य मिळवणारे वाढले. शेणाने सारवालेले फूटपाथ दिसू लागले.
माश्यांना खाऊ घालणारे दिसत नाहीत, पण सीगल पक्षांना कुरकुरे वगैरे खायला देणारे दिसू लागले.
मुंबईत हजारो किलो ज्वारी, मका या कबुतरांना रस्त्यावर खायला टाकलेली असते. त्यांनी खाऊन उरलेले धान्य लोक पायदळी तुडवत असतात नाहीतर उंदीर, घुसू खात असतात. हे लोक गरीबांना उपाशी मरु देतील पण त्या ज्वारीची भाकरी नाही खाऊ देणार. उलट कबुतरांना खायला घालतील
कबुतर हा पक्षी झाडावर घरटे
कबुतर हा पक्षी झाडावर घरटे बांधत नाही. तो माणासाच्या घरात आसरा घेतो. तेव्हा सर्व सोसायटीने मिळून कबुतररोधक जाळी बसवून घ्यावीत.
@ हायझेनबर्ग - बहिरी ससाणा
@ हायझेनबर्ग - बहिरी ससाणा पाळणे चांगली आयडिया आहे.. एका दगडात ५-५० कबुतरे खलास.
@ sarikasarika - मिरच्या तोडुन ठेवतो.. बघु काय होतं ते.
@ मानव पृथ्वीकर - हे भन्नाट प्रकरण दिसतंय.. बघायला पाहिजे.
@ राहुल१२३ - ते आहेच.. पण सोसायटी डक्ट २०-२५ किलो विष्ठेने भरली तरिही सोसायटी मेंबर्सना अजुनही वाटते की कबुतर ही काय त्रासदायक गोष्ट आहे का?
हे लोक गरीबांना उपाशी मरु
हे लोक गरीबांना उपाशी मरु देतील पण त्या ज्वारीची भाकरी नाही खाऊ देणार. उलट कबुतरांना खायला घालतील
<<
गरीबांनी कबुतरे खावीत अशी त्यांची आयडिया असेल बहुतेक.
पण सोसायटी डक्ट २०-२५ किलो
पण सोसायटी डक्ट २०-२५ किलो विष्ठेने भरली तरिही सोसायटी मेंबर्सना अजुनही वाटते की कबुतर ही काय त्रासदायक गोष्ट आहे का?
<<
४० किलोची गोणी असते. तितके होऊ द्या. ग्वानो खत म्हणून चांगली असते. पैसे मिळतील सोसायटीला.
@ आ.रा.रा. : >>४० किलोची गोणी
@ आ.रा.रा. : >>पैसे मिळतील सोसायटीला.<<++१

कबुतर शी खत पेक्षा ओला कचरा
कबुतर शी खत पेक्षा ओला कचरा कंपोस्ट खत विकून जास्त उत्पन्न मिळेल.शिवाय शी मध्ये लिस्टरीया सालमोनेला वगैरे तत्सम काय काय प्रेग्ननट्याना हानीकारक रिया असेल.कचऱ्यात फक्त शिपाई माश्या आणि गॉगलगायी होतील ☺️☺️
(कबुतरांना 3 दिवसा आड शी व्हावी म्हणून रोज 3 वेळा कॅडॅक एक्सप्रेसो प्यायची सवय लावावी.)
मी पण कबुतरांच्या उच्छादाला
मी पण कबुतरांच्या उच्छादाला कंटाळले होते खूप. घर अगदी नविन होते तेव्हा कोणतेही मॉडिफिकेशन करायला (पहिली ३ वर्ष) बंदी होती. पहिल्यांदा कुणीतरी सांगितलं की सीडीज असतात त्या लटकवा... करून पाहिलं, मग कुणितरी सांगितलं की प्लॅस्टिकच्या काळ्या कॅरिबॅग्ज अडकवायच्या.. त्या फडफडतात म्हणून कबुतरे येत नाहित. मग अगदीच त्रास कमी होइना म्हणून सोसायटीने काढायला लावली तर काढू म्हणून एक लोखंडाची जाळी (पातळ आणि स्वस्त) लावली होती बाल्कनीला, ती इतकी घाण दिसायची. पण इलाज नव्ह्ता.
) पण इलाज नव्हता. आणि मग जिथे गॅप होता तिथे रद्दीचे कागद चोळामोळा करून त्याचे बोळे ठेवले आता कबुतरी आत येत नाही. पण तरिही जशी जाळी मी बाल्कनी ला बसवली आहे तशी खिडकिला पण लावणार आहे.
त्यात हॉल च्या खिडकिला पण सोसायटिच्या नॉर्म्स प्रमाणेच ग्रिल बसवायचे होते ते ही असे फासटे त्यामुळे कबुतरी त्यावर बसून हागली की खिडकीवर ओघळ दिसायचे बाहेरून
फायनली (३ वर्ष पुर्ण झाल्यावर) ही बर्याच काळाने बाल्कनी वरून पत्रा घालून क्लोज करून नायलॉन ची कबुतर रोधक जाळी बसवली. आणि हॉलचे ग्रिल संपुर्ण काढून त्यात कमी कमी गॅप राहिल अशी व्यवस्था करून बॉक्स ग्रिल करून घेतले. पण तरिहि कबुतरी त्यातून येऊन बसे आणि मग एक दिवशी तिने अंडी घातलीच. तिथे मी माझी हार्मोनियम, जास्तीची बॅग, काही पुस्तके असे ठेवले होते. जिथे गॅप होती तिथे तिने हा उद्योग करून ठेवला होता. मी निर्दयीपणे ती अंडी उचलून कचर्यात टाकली (वाईट वाटले
@ mi_anu : >>कबुतरांना 3
@ mi_anu : >>कबुतरांना 3 दिवसा आड शी व्हावी म्हणून रोज 3 वेळा कॅडॅक एक्सप्रेसो प्यायची सवय लावावी <<

@ दक्षिणा तै, अहो अगदी तुमच्या इतकाच मिही वैतागलो आहे... तुम्ही पण ह्या वाईट्ट पक्षांना हाकलुन देण्यास अज्जिबात हयगय करु नका.. कुठे त्यांची अंडी दिसली तर कावळ्या-कुत्र्यांना दिसेल अशी ठेवा.. आजिबात वाईट वाटुन घेउ नका..
ह्या असल्या फडतुस कबुतर्यांना रोखण्यासाठी जालीम उपाय मिळावा म्हणुन इथे धागा काढला.. चांगले स्वस्तातले आउट्पुट्स मिळालेत.. मिरच्या, मासे पकडायचे जाळे, स्प्रे, पुदीना वगैरे एकेक वापरुन बघेन आणि इथेही अपडेट्स देईन..
घरात मांजर असेल तरी कबूतर असे
घरात मांजर असेल तरी कबूतर असे आत येतात का ?
कोणाचा काही अनुभव ?
घरात मांजर असेल तरी कबूतर असे
घरात मांजर असेल तरी कबूतर असे आत येतात का ?>> मी अनु ह्यांना माहित असेल,


ती कुत्री मा़ंजर आणि त्याण्चा साथ्विक संताप...
Pages