२०१९च्या लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी - राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम

Submitted by टवणे सर on 10 December, 2018 - 17:21

२०१९च्या लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी म्हणून बघितल्या जाणार्‍या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम या राज्यांतील निवडणुकांचे निकाल आज ११ डिसें (भाप्रवे) रोजी जाहीर होतील. त्याबद्दल चर्चा (लाथाळी) करण्यासाठी उघडलेला हा धागा.

माझा होरा:
राजस्थान, मप्र, छत्तीसगढ -काँग्रेस (मध्यप्रदेशात लहान पक्षांबरोबर युती करून, इतर दोन ठिकाणी बहुमताने)
तेलंगणा - टीआरएस
मिझोरामः माहिती नाही. सध्या तिकडे भाजपाचे वारे असल्याने कुठल्यातरी आघाडीत भाजपा असेलच

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एचडीव्हिज्युअल्सच्या जमान्यात जर का 'पप्पू' टॅग पूर्णपणे गेला तर रागाचे नुसते डिम्पल्स पाचेक टक्के मतं घेऊन जातील.

>>

ह्या न्यायाने चिराग पासवानची पार्टी तर पूर्ण बहुमत मिळवेल

भारतात असताना मी भाजपा समर्थक होतो. कॅनडा/ अमेरिकेत आल्यावर लिबरल विरुद्ध कॉन्झर्वेटिव्ह मुद्दे आणि माझा कल समजल्यावर आपण ज्या कॉग्रेसचा राग करायचो ते भारतातले त्यातल्या त्यात लिबरल आहेत आणि भाजपा अगदीच टोकाची धर्मसत्ताक आहे याचा साक्षात्कार झाला. आणि यावेळी मोदी हरले (भाजपा हरलीच पण ... मोदी सपाटून तोडघशी पडून नक्कीच हरले) याचा पराकोटीचा आनंद झाला आहे.
इतके दिवस महाराष्ट्रात देवेंद फडणविसांची सत्ता आहे ते चांगलं वाटत होतं. तो एक सेन माणूस वाटायचा. अर्थात महाराष्ट्रात योगी सारख्या माथेफिरूची सत्ता येणार नाही असं भाबडा विश्वास अजुनही वाटतो. पण हल्ली मराठा आरक्षण मुद्दा वर काढून ते आरक्षण दिल्याने दे.फ. बद्दलचा सॉफ्ट कॉर्नर गेला.
येत्या लोकसभेला भाजपाच सर्वात मोठा पक्ष असेल पण मोदींना प्रादेशिक पक्षांच्या नाकदुर्‍या काढून त्यांच्या हातातले बाहुले झालेले बघायला खूप आवडेल. कॉंग्रेस अजुनही जेत्याच्या मानसिकतेत दिसत नाहीये. आणि कधी अंतर्गत बंडाळी वर येईल... त्यात परत प्रादेशिक पक्षांशी संबंध ठेवणे कॉंग्रेसला पक्षि रागालाही कितपत जमेल शंका वाटते.
विजया नंतरचे रागाचे वक्तव्य आणि एकूणच देहबोली मात्र फारच आवडली. हुषार माणूस आहे. रागाला शुभेच्छा. Happy

राजस्थानात मुख्यमंत्रीपदावरून झालेला हिंसाचार पाहता काँग्रेस पुन्हा ये रे माझ्या मागल्या मोड मधेच आहे हे दिसून आले. २०१४ साली मोदींना खूप मोठी संधी होती. निवडणूकपूर्व भाषणे आणि आश्वासने यामुळे देशभरात एक वातावरण तयार झाले होते. काँग्रेसबद्दल असलेली प्रचंड नाराजी आणि दिसलेला पर्याय यामुळे भाजपला बहुमत मिळाले पण ..

उद्योगपतींची कर्जे माफ करणे, त्यांचे कर माफ करणे. उद्योगपती मित्रांना खिरापतीप्रमाणे कंत्राटे वाटत राहणे. विकासाच्या नावाखाली मित्रांना मोठमोठी कामे देत फिरणे आणि गरज नसलेल्या योजना (बुलेट ट्रेन) वर अवाढव्य खर्च करणे यातच त्यांनी धन्यता मानली. देशाची आर्थिक हालत नाजूक आहे. यावर मोदींनी व्यापलेल्या ९०% मीडीयाच्या भागात चर्चा होत नाही.

शेतक-यांच्या समस्या किमान मोदी सोडवतील अशी आशा त्यांना होती. त्याचप्रमाणे जागतिकीकरणाचा फटका बसलेल्या असंघटीत, आणि अल्प उत्पन्न असलेल्या कामगारवर्गाला तसेच बेरोजगारांनाही प्रचंड आशा होत्या. कारण मोदींनी भाषणे करताना निव्वळ आश्वासनेच दिली नाहीत तर हे कसे शक्य आहे यावर लंब्याचौड्या फेकल्या. अर्थात हे सर्व दिवास्वप्न त्यांनी उभे केले होते ते समजायला लागल्याने भ्रमनिरास झाला.

या काळात काँग्रेसने नीतीमत्तेचे पाठ घ्यायला सुरूवात केली. भाजपच्या चुका दाखवून द्यायच्या आणि काय असायला हवे यावर मीडीयातले मित्र, तटस्थ विचारवंत आणि तत्त्ववेत्ते यांच्या माध्यमातून काँग्रेसने वातावरणनिर्मितीला सुरूवात केली. त्यांचा भर आक्रमकतेवर नसून चुका दाखवून आदर्श काय असायला पाहीजे याचे लोकशिक्षण करण्यावर होता. यात काँग्रेसचे नाव कुठेच येत नव्हते. मात्र सातत्याने मोदींनी मागच्या साठ वर्षात ही टेप वाजवल्याने आपोआपच काँग्रेसचे काम सोपे होत गेले.

गेल्या साडेचार वर्षात भाजपच्या कर्माने आणि काँग्रेसच्या हुषारीने देशात अराजक आहे असे वातावरण निर्माण झाले. तर शेतकरी, कामगार, बेरोजगार यांच्यात फसवणुकीची भावना जोर धरू लागली. याचा फायदा उचलून डाव्या चळवळीतील आपल्या मित्रांच्या सहाय्याने काँग्रेसने महामोर्चे काढायला सुरूवात केली. जरी मीडीयाने या महामोर्च्यांना , जंतरमंतर वरील शेतक-यांच्या संपाला, धरण्यांना अनुल्लेखाने मारले असले तरीही मोबाईलवरून या बातम्या पोहोचत होत्या. लोकआंदोलने दडपता येत नाहीत.

या वातावरणातून पुन्हा काँग्रेसकडे लोक वळाले. काँग्रेसकडून लोक अपेक्षा ठेवत नाहीत. मात्र यावेळी काँग्रेसच्या अप्रत्यक्ष प्रचारातून भाजपच्या चुका ती दुरूस्त करेल असे वातावरण होते.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदावरून झालेला हिंसाचार खूपच लवकर लोकांचा अपेक्षाभंग करायला पुरेसा आहे. तेच तेच चेहरे बघायला कंटाळलेल्या लोकांना सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यकर्ते म्हणून पहायला आवडले असते. कदाचित बथ्थड राजकारणात नवे वारे वाहीले असते. पण कदाचित शेवटच्या टप्प्यात भाजपमधे ज्येष्ठांचा अनादर कसा होतो आणि आम्ही कसा सम्मान करतो हे दाखवून द्यायचे असेल म्हणून कदाचित १९८४ चे दागी असलेले कमलनाथ यांना पुन्हा संधी मिळाली आहे. अशोक गेहलोत हे चांगले राज्यकर्ते आहेत. पण त्यांना जनतेने नाकारले आहे. यावेळी पायलट यांच्यामुळे राजस्थानात यश मिळालेले आहे.

तरी देखील मोदींना संधी द्यायला पाहीजे असे म्हटले जायचे त्याच चालीवर काँग्रेसला (अनुभवी पक्ष असला तरी) संधी द्यायला पाहीजे असे गुळमुळीत विधान केले पाहीजे. जरी हवेचा अंदाज येत असेल तरीही..

एके काळी मंत्र्यांना खडे बोल सुनावण्यासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ हे नव्या माध्यमातून लोकांसमोर आले आहेत. कालच्या एपिसोडमधे त्यांनी नरेंद्र मोदींना आगाऊ सल्ला दिला होता.
आज राहुल गांधींना त्यांनी न मागता सल्ला दिलेला आहे. ऐकण्यासारखे आहे.

https://www.youtube.com/watch?v=YU5CgkNC5BE

राहुल गांधी आणि त्यांचे कुळ हिंदू नसल्याचा मुद्दा कॉंग्रेसच्या विरोधात वारंवार पुढे आणला जातो. समजा सध्याचे गांधी कुटुंब हिंदू नाही; पण एकीकडे हिंदुमहासभा, बजरंग दल सारख्या संघटना घरवापसीसाठी आग्रही आहेत तर दुसरीकडे अशा वापस आलेल्या लोकांना सन्मान आणि मोठी पदे मिळू नयेत म्हणून टोकाचा विखारी प्रचार करताहेत यातला विरोध समर्थकांना कळत नसेल काय? वापस आलेल्यांना मुख्य धारेमध्ये सामावून घेतले जाणार नसेल; सदैव गौण आणि हीन समजले जाणार असेल तर घरवापसी ही केवळ हिंदू संख्या वाढवण्याच्या स्वार्थी राजकीय हेतूनेच केली जात आहे ना? त्यामागे प्रेम किंवा कळवळा किंवा कोणतीच उदात्त भावना नाहीच ना?
हे अर्थात उघड आहे पण मीडियातून हा मुद्दा फारसा येत नाही म्हणून लिहिले.

राहुल गांधी आणि त्यांचे कुळ हिंदू नसल्याचा मुद्दा >> चायला, ह्याना वरुण चाल्तो मग राहुलचा काय प्रॉब्लेम ??

आपल्याला राजकारणातले फार काही कळत नाही, त्यामुळे राजकीय धुमाळीच्या धाग्यांवर जायचे नाही, लिहायचे नाही असा स्वतःपुरता नियम केला होता. पण या निकालानंतर लिहावेसे वाटू लागलेच. कारण बीजेपीला ताळ्यावर आणायला हवे आहे.

मी लहानपणापासून संघ, अभाविप, भाजप यांच्याच बाजूने राहिलो आहे. ईतके की मी आज पर्यंत भाजप सोडून कोणत्याही पक्षाला मतदान केले नाही. लहानपणापासून देशातल्या सगळ्या प्रॉब्लेम्सला गांधी परिवार, काँग्रेस आणि त्यांचे ईतर धर्मियांचे लांगुचलांचन जबाबदार आहे हे माझ्या मनात पुर्णपणे कोरलेले होते. पण अमितव सारखेच देशाबाहेर पडल्यावर दुसरी बाजू दिसायला लागली.

मोदी यांनी विकासाचे राजकारण करायला लागल्यावर थोडी आशा राहीली होती पण गेल्या काही वर्षात ती पण मावळली.

गोमांसवरुन झालेल्या हत्या, भाजपा नेत्यांची हेट स्पीचेस, कश्मिरमधील बलात्कार प्रकरण, बीफबंदी, पॉर्नबंदी, वेमुला प्रकरण, जीएनयू प्रकरण, पुतळे/बुलेट ट्रेनचे अवाढव्य खर्च, नोटाबंदी/जीएसटी मधली मिसमॅनेजमेंट, महागाई, सोशल मिडीया वर फिरवले जाणरे मास्टरस्ट्रोक्सचे व बाकी फालतू मेसेज, जरा काही बोललं की "जावा पकिस्तानात, तुम्ही देशद्रोही, सीमापे हमारे जवान येह कर रहे है वोह कर रहे है.... यामुळे फारच भ्रमनिरस झाला आहे.

तरी नशीब तो जमीन अधिग्रहण कायदा करायचा प्रयत्न हाणून पाडला गेला.

आयुष्यभर बीजेपीने कोंग्रेसला ज्या ज्या कारणासाठी नावे ठेवली, जनतेने बहुमत देउन त्यांना सत्ता दिल्यावर स्वत: त्यावर अक्षरशः कडी केली आहे.

यासाठी तर निवडून नव्हते दिले ना मोदीसरकार !

आता पुढच्या निवडणूकी मधे कोणाला मत द्यावे हा पुरता संभ्रम आहे.

काँग्रेसवर अजुनही विश्वास नाही. रागा अजून देश हाकू शकतील याची शाश्वती वाटत नाही. सत्ता मिळाल्यास ते दुसर्‍या एखाद्या लायक माणसाला पंप्र पदी बसवतील असे वाटत नाही. जुनी भ्रष्टाचाराची यादी आम्ही अजुन विसरलो नाही.

बीजेपीने पाच वर्षात काय दिवे लावले आहेत ते दिसत आहेच. परत सत्त मिळाल्यावर किती उन्मत्त होतील आणि काय काय पहावे लागेल देव जाणे !

अतरंगी, अमितव अगदी माझ्या मनातले लिहीले आहे. पुर्ण पोस्ट आवडली.

बिफवरुन हत्यासत्र, जाती-धर्मात द्वेष, भ्रष्टाचाराबात कमालिचे मवाळ, पोलिसांना जिवे मारणे, सर्व शांत असताना राम मंदिराच्या प्रश्नाला पुन्हा जिवंत करणे आणि महत्वाचे विज्ञानाच्या विरोधी. सर्वत्र खोटी आकडेवारी तर डोक्यात जाते आहे (खरा विकास किती आणि कागदी विकास किती हा संशोधनाचा विषय ठरावा) असो.

अजुनही हरल्यावर 'विरोधात' मत दिलेल्या मतदारांना गद्दर, देशद्रोही, हिंदूंचे दुष्मन हिंदूच कसे आहेत (म्हणुन राणा प्रतप, पृथ्वीराज हरले... आणि म्हणुन मोदी हरले)... आत्मपरिक्षणच नाही करायचे.

भाजपाच्या द्वेषी दगडापेक्षा राहुल/ केजरीवाल/ अजुन कुणी यांची विट चांगली असे म्हणायची पाळी आणली आहे.

देश चालवायला टीम लागते जी राहुल गांधी कडे आहे. मोदी स्वत: कोणालाही काही विचारात नाही, हेकेखोरपणे मी म्हणेन तो कायदा असे करतात, त्यामुळे फार छान वाटत असले तरी ही लोकशाही आहे राजेशाही नाही त्यामुळे फार काळ मस्तवालपणा करता येत नाही.. भारत कोणालाच मस्तवालपणा करू देत नाही हा हजारो वर्षांचा इतिहास आहे. अच्छे अच्छे गाडले गेलेत जे स्वत:ला अपराजित आणि सर्वाशाक्तीशाली समजू लागले होते... ज्यांनी टीमने काम केले तेच आज जनमाणसांवर अजून राज्य करत आहेत. उदा छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या सहकार्‍यांची किति मोठी यादी सगळ्यांना तोंडपाठ आहे कारण त्यांनी आपल्या सहकार्‍यांवर पूर्ण विश्वास ठेवला आणि त्यांनाही नावारुपाला आणले. स्वतःच्या नावाचा गाजावाजा करण्यासाठी आटापिटा करणार्‍या मोदिला पदच्युत झाल्यावर गल्लीचं कुत्रंसुद्धा भीक घालणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे.

काँग्रेस आणी भाजपशिवाय पर्याय नाही म्हणून गळे काढणार्‍यांनी स्वतः जोर लावून एक संघटना घडवावी आणि कराव तिसरा पर्याय उभा. नेहमी नेहमी तीच ती कोल्हेकुई करुन आपला जोकर होतोय हे लक्षात घ्यावे. होणे-जाणे काही नाही फक्त दुगाण्या झाडणे इतकेच करणे म्हणजे तिसरा पर्याय असा काही समज झाला असावा. बहुजनांच्या वंचितांच्या मागण्या अपूर्ण आहेत, ठिक आहे मान्य. पण दुगाण्या झाडण्याशिवाय आपण जमीनीस्तरावर नक्की काय केले हे तरी सांगावे. आजचा जमाना पैशाचा आणि पावरचा आहे. खरेतर हे सार्वकालिक सत्य आहे. दलित पिडित मागास वर्गीय लोकांना पुढे आणण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. मागासवर्गियांचे उद्योग उभे राहायला हवेत. उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी आज जेवढे चांगले वातावरण आहे तितके पूर्वी कधीच भारतात नव्हते. परंतु तिथे दोन दोन हात करण्याऐवजी हे भामटे केवळ सवर्णांनी-जैनांनी-गुजरात्यांनी आमचे रस्ते अडवून ठेवलेत अशी कोल्हेकुई केली. जणू उद्योगधंदे म्हणजे बसल्याजागी सुखासुखी होणार्‍या गोष्टी असतात..

मागासवर्गीय बहुजनांना काँग्रेस असो वा भाजप कोणाच्या कार्यकाळात उचित न्याय मिळत नाही अशी बोंब ठोकणारे भारताचे तुकडे पाडू इच्छित आहेत असे मला वाटते. त्यांच्याकडे कोणताही कार्यक्रम, संघटना, इच्छाशक्ती, तयारी दिसत नाही केवळ बोंबाबोंब दिसते.

मतदारांचाच विश्वास नसतो हो असल्या तिसऱ्या पर्यायावर. आम आदमी पक्ष हे त्याचे उत्तम उदाहरण. तिसरा पर्याय उभा करावा म्हणजे नक्की काय करावं?

इथल्या एका (?) ड्युआयडीकडे दुर्लक्ष करावे तेवढे कमी आहे. उकीरड्यात लोळणार्यांना नमस्कार करून पुढे जावे. आपणही लोळण घेऊ नये.

याच हिशेबाने बहुतांश जनता राजकारणाच्या उकीरड्यात नसते. ती आपले मत मांडते आणि 5 वर्षं वाट पाहते. मत मांडले तर आमच्या प्रमाणे घाण का आवडत नाही, उकीरड्यात का लोळत नाही म्हणून भांडायला येणार्यांना मुद्दाम लायकी दाखवावी एव्हढी देखील त्यांची पात्रता नसते.

>> लहानपणापासून देशातल्या सगळ्या प्रॉब्लेम्सला गांधी परिवार, काँग्रेस आणि त्यांचे ईतर धर्मियांचे लांगुचलांचन जबाबदार आहे हे माझ्या मनात पुर्णपणे कोरलेले होते. पण अमितव सारखेच देशाबाहेर पडल्यावर दुसरी बाजू दिसायला लागली.

देशाबाहेर न पडता दुसरी बाजू दिसायला लागावी यासाठी काय करावे लागेल?
एक खूप मोठ्ठा वर्ग आहे जो निव्वळ लहानपणापासुनच्या कंडिशनिंग मुळे गांधी परिवार आणि काँग्रेसला शिव्या घालतो.

देशाबाहेर न पडता दुसरी बाजू दिसायला लागावी यासाठी काय करावे लागेल?

>>

त्यांना 'ये मेरा इंडिया' किंवा 'मुंबई मेरी जान' चित्रपट दाखवावा.

देशाबाहेर न पडता दुसरी बाजू दिसायला लागावी यासाठी काय करावे लागेल?>>>>>

त्यांना माबोचे सभासदत्व काढुन द्या. Happy

एक खूप मोठ्ठा वर्ग आहे जो निव्वळ लहानपणापासुनच्या कंडिशनिंग मुळे गांधी परिवार आणि काँग्रेसला शिव्या घालतो.>>>>>>
याला केवळ कंडिशनिंग जबाबदार नाही, तारुण्यसुलभ जोश सो सावरकर आणि VHP किंवा तत्सम साहित्यात पुरेपूर आढळतो तो आकर्षक वाटतो.

15 ते 21 वर्षाच्या पोराला असरटीव्ह असणे म्हणजे काय हे माहीत नसते , त्याच्या लेखी सबमिशन किंवा डोमीनेशन या दोनच अवस्था असतात, VHP आणि तत्सम डोमीनेटिंग असल्याने गांधी /काँग्रेस फिलॉसॉफी आपोआप सबमिसिव्ह गणली जाते.

Looks like Indian Politics and perhaps Indian voters are 'quarter' away from coming to full circle.
मुखवटे गळून पडायला लागले की धक्के बसतातच आणि पड्झड देखिल होते. बिजेपी चे काही बुरूज निश्चीत ढासळले आहेत पण अजूनही (लाल) किल्ला राखू शकतील. मात्र त्या साठी योग्य बांधणी व निती आखावी लागेल. वेळ कमी आहे. २०१४ मध्ये जो भावनिक पाठींबा होता तो २०१९ मध्ये नसेल. किंबहुना ५६" छाती वि पप्पू यात पप्पू ला सहानुभूती अधिक मिळू शकते. महाराष्ट्र, ऊ.प्र. ईथे भाजपा ला काही फार मोठे यश मिळेल असेही वाटत नाही. त्यामुळे भाजपा व काँग्रेस यांच्यात मते विभागली गेली तर मग ऊर्वरीत छोट्या मोठ्या पक्षांच्या जुगाडावर कुठलेतरी खिचडी सरकार येण्याची शक्यता अधिक आहे. आणि मग जरा काही मनाविरुध्द घडले की या खिचडीतील डाळ, कढीपत्ते, सरकार ला मुठीत धरणार..
काहिही झाले तरी लोकशाहीच्या हिता साठी लोकांसमोर ठोस पर्याय हवा. नाहितर अवघड होईल सर्व.

जागो मोहन (जी) व मोदी (जी) प्यारे!

पूर्‍ण बहुमत नसलेल्या वाजपेयी आणि मनमोहन सिंग सरकारांनी या सरकारपेक्षा बरीच चांगली कामगिरी करून दाखवली होती.
बहुमतामुळे मिळालेल्या निरंकुश सत्तेचे भयावह परिणाम पाहता, सत्तेला चाप असणेच अधिक हितावह आहे.
रघुराम राजन यांच्या एका भाषणातून strong institutions—an independent judiciary, opposition parties, press freedom, and a vibrant civil society—prevent government excess,

strong institutions—an independent judiciary, opposition parties, press freedom, and a vibrant civil society—prevent government excess >> हेच तर आताच्या दुकलीला आणि त्यांच्या मार्गदर्शकांना नको आहे

भाजपचे कोअर मतदार कोण?
हिंदुत्ववादी की aspirational middle class ?
I guess both?
HINdu Nationalists, middle class, educated crowd, conservatives, capitalists, neutrals all support the party hence they got this huge success.
आता मात्र अनेक जण अनेक कारणामुळे नाराज वाटतात.

भाजपला जमीनीवर येऊन कोर्स करेक्शन करावं लागेल.
नाहीतर मग राजतिलक की करो तयारी जीतके आयेंगे जनेउधारी!!!

भाजपचे कोअर मतदार कोण?
हिंदुत्ववादी की aspirational middle class ? >>> भरत, तुमच्या प्रश्नाचे उत्तर "हो" म्हणून देता येइल Happy

या दोन्हीत मोठ्ठा ओव्हरलॅप आहे.

बाय द वे कोअर बेस काय किंवा कुंपणावरचे काय, नक्की कोणी खरेच नाराज बिराज आहे, की टिपीकल निवडणुकांच्या गेम मधे ५% मतदार इकडचे तिकडे गेल्याने हे झाले आहे, नक्की कळत नाही.

Core base( for any party ) will be limited. It will form less than 32% votes bjp polled during 2014.

Pages