२०१९च्या लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी - राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम

Submitted by टवणे सर on 10 December, 2018 - 17:21

२०१९च्या लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी म्हणून बघितल्या जाणार्‍या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम या राज्यांतील निवडणुकांचे निकाल आज ११ डिसें (भाप्रवे) रोजी जाहीर होतील. त्याबद्दल चर्चा (लाथाळी) करण्यासाठी उघडलेला हा धागा.

माझा होरा:
राजस्थान, मप्र, छत्तीसगढ -काँग्रेस (मध्यप्रदेशात लहान पक्षांबरोबर युती करून, इतर दोन ठिकाणी बहुमताने)
तेलंगणा - टीआरएस
मिझोरामः माहिती नाही. सध्या तिकडे भाजपाचे वारे असल्याने कुठल्यातरी आघाडीत भाजपा असेलच

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चला,
गेल्या साडे चार वर्षांत congresi भटांना खुश व्हायला एक तरी निमित्त शेवटी मिळाले. मात्र इतके करूनही papu शेवटी नापासच झाला.

आता ह्या तिन्ही राज्यातील जनतेला papu made बटाटाच्या फॅक्टरीत लवकरच रोजगार मिळेल. व त्यातून प्रचंड प्रमाणात सोने निघून ही तीनही राज्य सुखी समाधानी होतील. Lol

मी congresi भट (?) नक्कीच नाही पण आज खुश तो बहोत है हम....
हे...... धत्तड तत्तड धत्तड तत्तड.....

क्या दिन दिखाये मोदीने, काँग्रेस जितने पे जेन्युईनली खुशी हो रही है -- कुणाल कामरा, ट्वीटर वरुन साभार.

मात्र इतके करूनही papu शेवटी नापासच झाला.

--------- Rofl

उद्या राहूल गांधी पंतप्रधान जरी झाला तरी हेच पालूपद असणार आहे भक्तांचं. काय करणार नावडतीचे मीठ अळणी. त्यामुळे तुमच्या मताला शून्य किंमत आहे. तुम्हि फक्त जळजळ बाहेर काढा आज... Rofl

मागची सर्व चर्चा वाचली... पराभव खुप जिव्हारी लागला असेल तर मी दु:ख समजतो. पराभव पचवण्या साठी लागणारे बळ मिळो, आत्मपरिक्षणासाठी शुभेच्छा.

काँग्रेस जिंकली म्हणुन हुरळण्यातही अर्थ नाही. दिल्ली मजल अजुन खुप पुढे आहे...

<<
>>>>>दुसर्‍याची लायकी काढण्याचा मक्ता आणि अधिकार तुम्हाला कोणी दिला?

ती त्यांनी आज फक्त स्पष्टपणे काढली इतकेच, अस्पष्टपणे हे कैक वर्षे सुरू आहे Proud

असो! >>
--------- लायकी संबंधातली पोस्ट पान २ वर गेली. मुळ पोस्ट येथे दिसत नाही... पार्श्वभूमी च्या अभावी किंवा मूळ पोस्ट वाचली नाही तर गैरसमज होण्याची संभावना असते. "त्यांनी असे म्हटले...." पण का म्हटले ? कुठल्या प्रतिसादाला त्यांनी असे म्हटले आहे हे पण बघणे उचित ठरेल म्हणजे दूध का दूध.. पानी का पानी...
वाचकांचा गैरसमज नको म्हणुन पान २ ची (डिसे. ११, १०:१०) पोस्टचा वाद निर्माण करणारा भाग { } असा आहे.

{कॅथलिक ख्रिश्चन आई आणि पारशी बाप (आजोबाचे नाव Feroze Jehangir Ghandy) यांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा हा जानवेधारी ब्राह्मण कधी आणि कसा झाला?}
यातच गुंतून रहा. तेच बरं आहे आणि तीच लायकी आहे.

{ } मधे दिलेले हे १०:१० च्या प्रतिसादात आहे, ते धादांत खोटे आहे. अप-प्रचाराचा भाग आहे. विचारांना विरोध करण्यात कमी पडल्यावर नैराश्यापोटी तयार केलेल्या कहाण्या आहेत, त्यात सत्यांश शुन्य आहे. कृपया खोटा प्रचार करु नका.

माय - बाप कोण आहे, त्यांचा जात धर्म काय आहे याने काय फरक पडतो आहे?

<< जानवे घातले की निवडणूक जिंकता येते हा अत्यन्त चुकीचा प्रघात मात्र पडला >>
------- हा असा प्रघात पडला आहे हे केवळ तुमच्या मनातच आहे. जानवे, गोत्र या अगदीच निरर्थक गोष्टी आहेत.

वरील एक l आय्डीसुद्धा बटाटा आणि सोन्याची कधीच खोटी सिद्ध झालेली तीच तीच गोष्ट उगाळत आहेत. तटस्थ वाचकालासुद्धा ह्याचा उबग येतो. फेसबुक/ वॉट्स ॲप वर अनेक फेक,फोटोशॉप्ड, मॉर्फ्ड पोस्ट्स येत होत्या त्याही प्रचंड केविलवाण्या आणि उबगवाण्या वाटत होत्या. माध्यमधुरीण प्रचारकांचे एक सोडा पण मराठी संस्थळावरचे लोक इतके अडाणी नसतात. ते यातला खोटेपणा ओळखू शकतात. मग या लिखाणाचा काय उपयोग/ प्रयोजन?

हिरा, त्यांना धन्यवाद म्हणा,
कुंपणावरचे मतदार भाजप पासून दुरावण्यात वाह्यात भक्त आणि पेड ट्रोल्स यांचा मोठा हात आहे

प्रयोजन?

खोटं बोला रेटून बोला बाळकडू घेतलेले साधक आहेत हे. दुसरं काहीच नाही मुद्दा म्हणून मग असलंच रेटणार ना. अजून सहा महिन्यांत तर पळता भुई थोडी होणार अशांना. कल तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी हय. Wink

वरील एक l आय्डीसुद्धा बटाटा आणि सोन्याची कधीच खोटी सिद्ध झालेली तीच तीच गोष्ट उगाळत आहेत.
<<

खोटी सिद्ध झालेली तीच तीच गोष्ट ??

गोष्ट कधी खोटी ठरली ? ती बातमी खोटी असल्याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे ? की पप्पू गांधी व त्याच्या प्रवक्त्यांनी ती बातमी खोटी ठरवल्याने बातमी खोटी होते ?

पण मराठी संस्थळावरचे लोक इतके अडाणी नसतात. ते यातला खोटेपणा ओळखू शकतात. >>> तुम्ही अजूनही या भ्रमात कसे आहात? समर्थकांनी स्वखुशीने बुद्धी गहाण टाकणे हे फॅसिझमचे वैशिष्ट्य आहे. तरीही मी म्हणेन की असे उघड लोक परवडले पण संतुलीतपणाचे आणि ज्ञानाचे ढोंग करणारे सर्वात घातक.

my old post, reposting for public interest,

https://www.youtube.com/watch?v=CUERIXVK27I

वरिल चित्र फीत मधे १:४४ ते २:०५ दरम्यान आलू उल्लेख आहे. ये मेरे शब्द नही मोदीजी के शब्द है असे राहुल गांधी या भाषणात म्हणतात.

आता तुम्ही काट छाट करुन सोईचे जे आहे तेच दाखवणार असाल तर तो चक्क खोटेपणा आहे. टंकायच्या आधी खरे आहे का खोटे हे तर आधी तपासा.

वर अर्धवट माहितीच्या आधारावर ज्याने हे (आलू- सोना... मग दात विचकवणारी/ हसणारी बाहुली) लेबल राहुल गांधी यांना लावले त्यांनी आधी शहानिशा करायला हवी होती. तुम्हाला राहुल गांधी आवडत नसतील तर ठिक आहे पण म्हणुन खोट्याचा वापर करुन त्यांनी स्व तः कधी हे म्हटलेच नाही ते त्यांच्या तोंडी कोंबू नका.

खोटा प्रसार, प्रचार करु नका. तुमच्या नकळत तुमचा वापर होत आहे...

ट्वणे म्हणत आहेत ते बरोबर आहे.शहरी मतदात आजही भाजपच्या बाजुने आहे.त्यामुळे लोक्सभा २०१९ अजुनही भाजपच्यच कह्यात आहे.

तुमच्या नकळत तुमचा वापर होत आहे...>>> काहींच्या बाबतीत हे नकळत अजिबातच नाही, असा प्रचार जाणूनबुजून करणे हेच राष्ट्रकार्य अशी त्यांची ठाम समजूत आहे किंवा करुन देण्यात आली आहे.

बर्‍याच शहरी म्तदारांच्या मनात कोन्ग्रेस ची प्रतिमा भ्रश्टाचारी पार्ती अशी आहे.. ती इतक्या कमी वेळात पुसली जाने अवघड आहे.काल्च्या निकालाने आनंदी झालेल्या लोकांपेक्शा दुखी झालेले लोक मला तरी जास्त भेटले. त्यामूळे कालच्या निल्कालांवरुन काही निष्कर्ष आताच काधणे योग्य होणार नाही.

दुखी झालेले लोक मला तरी जास्त भेटले.

--- अहो मतदान करणारे मतदार कॉन्ग्रेसला जास्त प्रेफर करत आहेत. तुमच्या अवतीभवती भाजपप्रेमी हिंदुत्ववादी लोक जास्त आहेत म्हणून तोच भारतिय जनादेश समजायचा आणी प्रत्यक्ष मतदारांना देशद्रोही-मूर्ख-गद्दार समजायचे हे योग्य वाटते का?

हेला मी आधी म्हंटल आहे. पुन्हा सांगते कोन्ग्रेस जिंकु न देने हा प्रयत्न बर्‍याच प्रादेशिक पक्षाम्चा असतो. त्यांना भाजपाचे भय कमी आणि कोन्ग्रेसचे जात असते. असे पक्ष निवडणुकिच्या वेलेस कोन्रेग उमेदवर पाडण्याचे काम इमानैतबारे करतात. त्याचा सरळ फायदा भाज्पाला मिळतो. भाज्पची votebank fixed(जे लोक मला भेटत आहेत) आहे. त्यामुळे मतविभाजन त्यांच्याबबतीत घडत नाहे.
मला असे कित्येक लोक माहीत आहेत जे रजा काधुन स्वखर्चाने मध्यप्रदेश्मधे जाउन भाजपाला मत देउन आलेत. हे नशीब कोन्ग्रेसच्या कपळी नाही.
त्यामुळे ह्या निकालांवरुन कुठलेच निषकर्ष मी तरे नाही काढणार.

The days to be apologetic about Rahul Gandhi are over. आणि हा विश्वास फक्त आताच्या निकालामुळे आलाय असं नाही नाही, तर त्याने ज्या प्रकारे स्वतःला कंडक्ट केलंय त्यासाठी आहे. आपल्या चुका मान्य करण्याचा समंजसपणाही दाखवलाय. सत्ताधारी पक्षाच्या सर्वेसर्वांपासून त्यांच्या ट्रोल आर्मीपर्यंत त्याची खिल्ली उडवण्याचा चंग बांधला होता, त्याला पुरून उरलाय.
राहुलचा धर्म, जात, गोत्र यांबद्दल त्याच्या बाजूने बोललं जायची गरज पडली नसती, तर ते अधिक रुचलं असतं. पण ही वेळ आणली गेलीय. काँग्रेस हा हिंदूविरोधी आणि अल्पसंख्यधार्जिणा पक्ष आहे, हे उघडपणे बोललं गेलं. पण वैयक्तिक हल्ले खूप आधीपासून सुरू आहेत. मोतीलाल नेहरूंचे वडील मुसलमान होते , इंदिरा गांधींचं खरं नाव वेगळंच काही होतं हे इथे मायबोलीवरच वाचलेलं आहे. तशा आशयाची एक पोस्ट या धाग्यावरही आहे. गुजरात निवडणुकांच्या दरम्यान राहुलने एका देवळात गैरहिंदूंसाठी असलेल्या रजिस्टरमध्ये सही केली, आता कुठल्याशा पूजेदरम्यान पुरोहितांनी त्याला गोत्र विचारलं तर ते माहीत नाही, असं सांगितलं असं म्हणून आयटीसेलमार्फत प्रचार केला गेला. इथे मांडलेलं पारशी वडील आणि कॅथलिक आईचं लॉजिक वापरून राहुलच्या गोत्राची अ‍ॅनालिसिस केंद्रातले विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे कॅबिनेट मंत्री करत आहेत. (उद्या तुलसी गॅबार्ड अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरल्या तर याच लोकांचे उर भरून येतील)

दुसरीकडे मोदींनी अनेकवेळा स्वतःच्या जातीचा स्वतःच उल्लेख केलाय. . बिहार विधानसभा निवडणुकांदरम्यान
तसंच मणिशंकर अय्यर यांच्या ओछी किस्म का आदमी चा ओछी जाति का आदमी असा विपर्यास करून.
( सी पी जोशींना त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी लागली)

व्यक्तिगत टिप्पण्यांचा प्रवास जर्सी गाय आणि संकरित बछडा -५० करोड की गर्लफ्रेंड - नानानानींनी जलवाहिन्या टाकल्या का?- काँग्रेसची विधवा असा झोकात चालूच आहे.

विरोधकांना पाकसमर्थक म्हणण्याची खोड वरपासून खालपर्यंत पसरली आहे (गुजरात निवडणुकांआधीची मनमोहनसिंग यांच्याबद्दलची कमेंट, जम्मु काश्मीरमध्ये अलीकडे विधानसभा बरखास्तीच्या वेळची कमेंट ते इथल्या कमेंट्स)

राहुल गांधी हिंदू नाहीत, म्हणता म्हणता आपले वैचारिक विरोधक हिंदूच नाहीत असं म्हणेपर्यंंत मजल गेल्याचे या धाग्यावर दिसलेच आहे.

लोकांनाच विकास नको , जातीपाती धर्माचं राजकारण हवं म्हणणार्‍या विशेषतः अनिवासी मोदीसमर्थकांसाठी इथे टाकल्या गेलेल्या कट्टर हिंदुतववाद्यांच्या प्रतिक्रिया समर्पक उत्तर आहेत.

शेवटी टवणे सरांचे यशस्वी भाकिताबद्दल अभिनंदन. काँग्रेसला इतक्या प्रमाणात यश मिळेल, तेही विरोधकांची युती झालेली नसताना, असे मला वाटले नव्हते.
कुठे किती स्विंग झाला त्याची माहिती एनडीटीव्हीवर आली आहे.
छत्तीसगढमध्ये गेल्यावेळीच अतिशय जवळची लढत होती, तर अन्य दोन राज्यांत मोठा फरक होता, म्हणजे सगळीकडे स्विंगचं प्रमाण सारखंच असावं. छत्तीसगढमध्ये जोगी फुटले होते. बडं नाव असलेला नेता नव्हता. २०१३ च्या नक्षली हल्ल्यात काँग्रेसचे अनेक नेते मारले गेले होते. (तरीही काँग्रेसची नक्षलवाद्यांना सहानुभूती आहे, आता इथे ती चळवळ पुन्हा फोफावेल, असे म्हणणारे आहेतच)

उघड फाशिस्ट लोक परवडले हे ठीक. पण त्यांनी खोटेपणाने फाशिझ्म रेटावा हे ठीक नाही. अर्थात फाशिस्ट म्हटले की खोटा आणि भडक प्रचार येतोच. पण मग खरे कोणी बोलावे? फक्त ज्नानी लोकांनीच? इतरांना कसले नियम लागू नसावेत का?
धन्यवाद उदय.

39 साल पुरानी पार्टी है भाजपा, केंद्र की सत्ता में है, प्रचार में इतना पैसा फूँकते है कि कुबेर का खजाना भी शरमा जाए

फिर भी हालत ये है कि

तेलंगाना में 6 सीट से 1 पर आ गए ( 83% जनाधार खोया )

मिज़ोरम में 2 सीट से 1 पर आ गए ( 50% जनाधार खोया )

राजस्थान में 163 से 73 पर आ गए ( 55% जनाधार खोकर सत्ता गंवाई )

मध्यप्रदेश में 165 से 109 पर आ गए ( 34% जनाधार खोकर डेढ़ दशक पुरानी सत्ता गंवाई )

छत्तीसगढ़ में 49 सीट से 15 पर आ गए ( 69% जनाधार खोकर डेढ़ दशक पुरानी सत्ता गंवाई )

2015 के अंत तक जिस कांग्रेस के पास 6 राज्य थे, तीन साल में 11 हो गए

मला वाटल राहूल भाषणात रवी शास्त्रीचे मॅच जिंकल्यानंतरचे वाक्य म्हणणार. :).

भाजपला झटका बसला हे बर झाल. गुजराथ निवडणुकी पासूनच वातावरण बदलल्याचे संकेत मिळत होते. पण अजूनही वातवरण इतकेही बदललेले नाही की लोकसभेला काँग्रेस (किंवा इतर कुणिही) १०० च्या पुढे जाईल व भाजप १७५ च्या खाली येईल.
आघाडीच्या राजकारणाच्या गणितांची मांडणी भाजपला नव्याने करावी लागेल आणि एका दृष्टीने हे बरेच आहे. शिवसेनेवर दिवे ओवाळून टाकावे अशी परिस्थिती नसली तरी राज्य सरकार स्थापन करण्या आधी या पक्षाला भाजपने दिलेली हीन वागणूक महाराष्ट्रात सर्वांनी पाहिलेली आहे.
या सर्वातून धडा घेउन स्थिर सरकार देण्यासाठी आवश्यक असणारा समंजसपणा राष्ट्रीय नेतृत्व दाखवेल अशी आशा करायला हरकत नाही.

भाजपने ऊच्च स्तरावरची भ्रष्टाचार प्रकरणे वेगाने धसास लावयला पाहीजे होती असे वाटते. यापुढे ६ महिन्यात काहिही केल्यास आता त्याचा उलटा परिणाम होउ शकतो. पण माझ्या मते तेही एक अस्त्र अजून भाजपच्या भात्यात असावे. पाच वर्षे काहिही सिद्ध न झाल्यास ब्रस्।टाचार झालाच नव्हता असाही युक्तिवाद होऊ शकतो.

असो. भारतीय लोकशाहीचा विजय असो. Happy

भरत. , सत्यच लिहिलंय. पाकिस्तानात जा हे अन्य संस्थळावर ऐकले आहे. संयमित वैचारिक विरोधही सहन होईनासा झाला की मग हैदोस हुल्ल्याला उधाण येते. असो.
या निवडणुकीवरून लोकसभेचे भाकित वर्तवण्यात अर्थ नाही हे अंशतः खरे आहे. कारण या धक्क्यामुळे बोध घेऊन भाजपा आपली रणनीती कदाचित बदलेल. कदाचित पोकळ भावनिक मुद्द्यांना मागे ढकलेल. पण जर कोअर अजेंडा बदलल्याचे जनतेला पटले नाही तर फसव्या दिखाव्याला जनता पुन्हा बळी पडणार नाही. शहरी ( विशेषत: आय्टीवाले) मतदारांचा भ्रमनिरास झाला आहे, अगदी स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराविषयीसुद्धा, हे जाणवते. वर्षभरापूर्वी मुंबईतले उत्तरी रिक्षावाले भाजपच्या बाजूने असत. आज त्यातले अनेक साशंक तर काही विरोधीसुद्धा दिसतात.
पण भाजपच्या हातात आणखी काही दिवस सत्ता आहे, शक्तिकांत दासांकडून पैसाही मोकळा होऊन बाजारात आणि सरकारकडे येईल. कुणी सांगावे, त्याचा सदुपयोग होईलही.

वरिल चित्र फीत मधे १:४४ ते २:०५ दरम्यान आलू उल्लेख आहे. ये मेरे शब्द नही मोदीजी के शब्द है असे राहुल गांधी या भाषणात म्हणतात.
<<

पप्पू गांधीचे भाट देखील पप्पूच असतात हे वरिल प्रतिसाद वाचून आता सिद्ध झालेय. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी वरिल चित्रफितीत जे पप्पू गांधी बरळतोय तसले विधान कधी ही केले नाही. जर केले असेल तर त्या विधानाची चित्रफित देखील येथे टाका. तसेही कॉंग्रेसी पप्पू त्याचे प्रवक्ते व त्याचे भाट अफवा पसरवण्यात सदैव आघाडीवर राहीले आहेत .

अफवा पसरवण्यात सदैव आघाडीवर राहीले आहेत .--- मोदीजी आणि त्यांचे भक्त खोट्या बातम्या आणि आरोप करण्यात इतके पटाइत आहेत की कितीवेळा तोंडावर पडले आणि माफी मागावी लागली ह्याची गणतीच नाही. चक्क लोकसभेत उभे राहून 'आम्हाला तसे काही बोलायचे नव्हते हो' अशी विनवणी करावी लागली.

मी निवडून आल्यास तुमच्या बालविवाहात पोलिस अडथळा आणणार नाहीत असे आश्वासन देणार्‍या भाजपच्या उमेदवार शोभा चौहान यांचा विजय झालाय. हीच ती भाजपच्या मतदारांची विकासाची संकल्पना? नै?

ये मेरे शब्द नही मोदीजी के शब्द है असे राहुल गांधी या भाषणात म्हणतात.
<<

पप्पू गांधींच्या बरळण्यावर विश्वास ठेवणार्‍या कॉंग्रेसी भाटांनी, पंतप्रधान मोदी त्यांच्या भाषणात "आलू" बाबत नक्की काय म्हणाले ते ही चित्रफिती पाहून ठरवावे. पप्पू गांधी व त्याचे समर्थक खोट्या अफवा पसरवण्यात कसे पटाईत आहेत ते चित्रफित पाहून कळेल.

भाजपचे थोबाड फुटले आहे यावरुन लक्ष वळबिण्यासाठी अनिरुद्ध.. बटाट्यांचा आधार घेत आहेत Lol
नवीन Submitted by विठ्ठल on 12 December, 2018 - 13:04
<<

भाटांचा हाच तर प्रॉब्लेम असतो, आधी खोट्या अफवा पसरवायच्या नंतर त्या अफवेचे पुरावे मागितले किंव्हा ती अफवा खोटी आहे हे दाखविणारे पुरावे दिले की लगेच विषयांतर करुन पळ काढायचा असो.
---
तीन राज्यातील निवडणुकीतील पराभवाने भाजपाचे थोबाड फुटले असेल तर गेल्या चार वर्षात कॉंग्रेसचे जे ३०-३५ निवडणुकात पराभव झाले, त्या पराभवानी कॉंग्रेस व पप्पू गांधीचे काय काय फुटले असेल ह्याचा विचारच न केलेला बरा ! Proud

Pages