२०१९च्या लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी - राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम

Submitted by टवणे सर on 10 December, 2018 - 17:21

२०१९च्या लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी म्हणून बघितल्या जाणार्‍या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम या राज्यांतील निवडणुकांचे निकाल आज ११ डिसें (भाप्रवे) रोजी जाहीर होतील. त्याबद्दल चर्चा (लाथाळी) करण्यासाठी उघडलेला हा धागा.

माझा होरा:
राजस्थान, मप्र, छत्तीसगढ -काँग्रेस (मध्यप्रदेशात लहान पक्षांबरोबर युती करून, इतर दोन ठिकाणी बहुमताने)
तेलंगणा - टीआरएस
मिझोरामः माहिती नाही. सध्या तिकडे भाजपाचे वारे असल्याने कुठल्यातरी आघाडीत भाजपा असेलच

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कॉंग्रेसचा विजय हा फारसा दैदीप्यमान नसला तरी भाजपचा पराभव दैदीप्यमान आहे.
>>>

या मताशी सहमत नाही. राजस्थान आणि मप्र मध्ये काँग्रेसकडून अजून अधिक जागांची अपेक्षा होती. तिथे त्यांना चांगली टक्कर मिळाली. मप्रमध्ये टक्केवारी किती बदलली आहे त्याचे आकडे आले का?
लोकसभेच्या निवडणुकीत शहरांचे बल (वेटेज) विधानसभा निवडणुकीपेक्षा बरेच अधिक असते. तिथे भाजपाला धक्का लागल्याचे प्रथमदर्शनी दिसत नाहिये. सविस्तर विदा आला की याचे विश्लेषण येईलच.
२००४च्या अनपेक्षित पराभवात शहरी मतदाराने भाजपाकडे पाठ फिरवल्याचे नुकसान अधिक झाले होते. २००४च्या तुलनेत शहरी मतदार बल २०१९मध्ये बरेच जास्त असणार.

एक नक्की आहे की लाट ओसरली आहे. २०१९मध्ये हिंदी हार्टलँडमधून खोर्‍याने सिटा येणार नाहीत. तिथे नवीन पॉकेट्स जी विकसित केली आहेत भाजपाने त्याचा झालाच तर फायदा होईल.

२००४ प्रमाणेच, थोडे जास्तच, भाजपाने मित्रपक्ष गमावले आहेत.

२०१९ इज गोइंग टु बी इंटरेस्टिंग. राहुल गांधीच भाजपाचे अ‍ॅसेट ठरू शकतात, मोदी ठरण्याची आशा कमी आहे.

पर्सनल कॉमेंटस करणार्‍या ट्रोलभैरवांना उत्तर देत नाही.
एकतर माझ्यापाशी तेवढा पेशन्स नाही आणि त्यांच्यासारखा दिवसभर इथे 'दे दान सुटे गिराण' करत पडून राहण्याइतका वेळ त्याहून नाही.
तस्मात आपल्या डबक्यात सुखी रहा.<<<<

Proud

हिंदू एवढे हिंस्त्र असू शकतात हे गेल्या चार वर्षात पहिल्यांदा कळले. हिंदूनी आक्रमक व्हावे पण ते तिकडे सीमेवर. तिकडे मात्र हिम्मत नाही.

गोत्र गोत्र म्हणून केकटणाऱ्या मोदी भक्तानो , गांधी आडनावाचे गोत्र दत्तात्रेय कसे असू शकते हे प्रश्न मनेका आणि वरुण गांधीला विचारून का नाही बघत ? की त्यांची शुद्धी करून घेतली आहे ?

२०१९
48314894_2183878691636799_3782194758303088640_n.jpg

पाच राज्यांच्या निवडणुका - एक अन्वयार्थ

मी बाबांकडे पाहीले. आज त्यांच्या मेहनतीचे चीज झाले होते. प्रत्येक निवडणुकीनंतर निकाल लागल्यावर विजयी मिरवणूक निघे. बाबा खिडकीत उभे राहून खिन्नपणे मान हलवत...

कौन कंबख्त कहता है के मै स्फुट पाडणे के लिये पिता हूं? मै तो पिता हूं क्यों की ये जलन बरदास्त कर सकू

ज्याला पप्पू म्हणून जाणीव पूर्वक प्रपोगेट केले गेले आणि लोकांनी ही त्यावर विश्वास ठेवला त्या माणसाचे विजयानंतरचे भाषण वाचा....
https://www.loksatta.com/desh-videsh-news/we-dont-want-to-erase-anyone-f...

कामदेवजी, तुमची सकाळची लावणीची रिक्वेस्ट आज नक्की पुर्ण होते बघा.... कविराज फॉर्मात यायला लागलेत हळू हळू

अरे अरे अरे!
इथल्या समस्त कॉंग्रेस पाठीराख्यांप्रमाणेच या निवडणूकीतल्या भाजपाच्या पराभवाचा अन्वयार्थ राहुल गांधींनीही "जनतेने मोदींना नाकारले" असा लावलाय का काय?
खुद्द राजस्थानमधल्या एक्झिट पोल मध्ये अनेक मतदारांनी सांगितले की we love modi but here in this election we will vote congress for local reasons
बाकी इतकी वर्ष देश चालवलेल्या कॉंग्रेसने शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी हे देशासमोरचे मुख्य प्रश्न आहेत असे म्हणणे म्हणजे स्वताच्याच इतक्या वर्षांच्या अपयशाची कबुली देणे आहे कारण हे प्रश्न काही पाच दहा वर्षात उगवलेले नाहीत
असो!
मुख्य दौऱ्याआधी सराव सामन्यात पराजय हा जसा भारताच्या संघाला आवश्यक असतो तसाच तो भाजपालाही होता
यातुन योग्य ते आत्मपरीक्षण करुन ते लोकसभा निवडणुकीला सामोरे जातील ही अपेक्षा

अजूनही भाजप योगीना पंप्र म्हणून प्रोज्रेक्ट करणार असेल आणि राम मंदीर आणि त्या प्रीत्यर्थ कायदा, गावाची नावे बदलणे याचेच तुणतुणे वाजवणर असतील आणि बुलंद शहर आणखी होणार असतील तर भाजपचे भविष्य अटळ आहे. थोडी बहुत चांगली कामे भाजपने केली आहेत तीही ह्या मूर्खपणामुळे झाकून जाणार आहेत . विकासाचे कातडे पांघरून आलेल्या लांडग्याला लोक खरोखर फसले आहेत. आता कातडे भिरकावून देऊन लांडगा मूळ रूपात ठाकला आहे. सुदैवाने फडणवीसांसारखे सेन्सिबल मुख्यमंत्री असल्याने हा लांडगा महाराष्ट्रात मोकाट सुटलेला नाही. त्यामुळे उत्तरेत भाजपचा जो हिंस्त्र नंगानाच चालू आहे तो मराठी माणसाच्या लक्षात येत नाही. अगदी सगळ मराठी ब्राम्हण समाज देखील भाजपच्या मागे नाही कारण मनाला पटत नाही. अर्थात महाराष्ट्रात हे चाळे चालणार नाहीत हे कारण . संत परम्परेमुळे मूर्तीपूजेचा आणि मंदीर बांधणीचा उन्माद महाराष्ट्रात नाही त्यामुळे हा मुद्दा अपील होणार नाही हे फडणवीस ओळखून आहेत आणि सेना त्याचे भांडवल करील याची भीती फडणवीसाना आहे. आता सेनेनेच हा मुद्दा हाय्ज्याक केला आहे. त्याचा त्याना काडेचाही फायदा होणार नाही पण भाजपच्या भात्यातला कुजका का होइना एक बाण त्यानी काढून घेतला आहे.
आणीबाणीत झालेल्या उत्तरेतील अतिरेकापासून शंकरराव चव्हाणांनी महाराष्ट्राला शील्ड केले होते. त्या उद्दाम पणाला त्यांनीही महाराष्त्रात थारा दिला नाही. त्यामुळे आणिबाणीतील अत्याचारबद्दल मराठी लोकाना फार कळलेच नाही. त्यामुळे जनता लाटेतही महाराष्ट्रातल्या काँग्रेसने बर्‍यापैकी तग धरला होता....

शायनिंग इंदियाच्या वेळी त्या पलिकडे भारत आहे हे भाजप विसरला होता. आताही सोशल मिडियाच्या पलिकडे भारत आहे हे तो पुन्हा विसरला आहे त्याची कडू फळे निश्चितच चाखायला मिळतील...

थोडंसं अवांतर:

या वेळच्या भारत वारी मध्ये, मुंबईत उबर कॅब चालक भेटला होता एक. युपी चा होता. युपी च्या मुख्यमंत्र्यांचा बिग फॅन होता
गप्पा चालू असताना विषय तिथलं राजकारण आणि समाजकारण यावर आला.
सांगत होता की आज सुद्धा गावात अस्पृश्य लोकांना मंदिरात जाऊ देत नाही आम्ही. तो तिकडचा ठाकूर होता म्हणे
आणि इन जनरल बोलण्याचा टोन दलितांबद्दल पराकोटीचा राग या रेंज मधला होता.
कोणी काही बदलण्याचा प्रयत्न केला तर जीव जातो त्याचा असं सांगत होता
जे शिकतात ते तिथून बाहेर पडतात, गावात आले सणासुदीला तरी लो प्रोफाईल राहतात आणि बरच काही ज्याचा मतितार्थ त्यांना कस अजून ही त्यांच्या जागेवर ठेवलय इत्यादी ......

अर्थात यात तथ्य किती आणि तो खरं सांगत होता कि नाही मला माहित नाही, पण त्याच्याशी झालेलं संभाषण ही तिथे समाजकारण आणि राजकारण किती वाईट असेल अनेक लोकांसाठी रोजच्या जीवनात याची माझ्यासाठी एक छोटीशी झलक होती

बाकी निकाल जे लागले आले ते आहेत,

पण या वेळी योगी नि या 4 राज्यात तब्बल 74 सभा घेतल्या, मोदी आणि शहा यांच्या पेक्षा जास्त,
राहुल चे खानदान, बिर्याणी, शहरांचे नाव बदल, राम यापलीकडे कोणताही मुद्दा त्यांच्या प्रचारात नव्हता.
थोडक्यात भाजप चा मुख्य भर धर्म, लोकल अस्मिता गोंजारणे यावर होता, गुजरात निवडणुकांमध्ये विकास दाखवण्यासाठी जी रो रो फेरी वगैरे नाटके केली तशी नाटके या वेळी करावीशी सुद्धा त्यांना वाटले नाही.

https://scroll.in/article/905191/ram-biryani-rahul-gandhi-what-bjps-star...

पंतप्रधान पदाचा उत्तराधिकारी (लगेच 2019 ला नाही तरी पुढे कधीतरी) म्हणून जर योगी ना प्रोजेक्ट केले जात असेल तर कठीण आहे.

समाधानाची गोष्ट हीच की असले फायर ब्रँड , गरळ ओकणारे नेते, ठराविक पट्ट्यात अल्पावधीत लोकप्रिय झाले असले तरी PAN इंडिया अडगळीत गेले आहेत ,
ऋतुंभरा, उमभारती या यादीत लौकरच योगी चे नाव बघायला मिळो

सर्वांना वॉर्नींग: मुद्द्याचं लिहा, वैयक्तिक नको.
>>>>>
धन्यवाद अ‍ॅडमिन.
मी कधीही कोणावरही पर्सनल टीका करत नाही आणि यापुढेही करणार नाही याबद्दल खात्री देतो आहे.
आधीच म्हटल्याप्रमाणे ट्रोल्सकडे यापुढे संपूर्ण दुर्लक्ष करण्याचं धोरण सुरु ठेवेन.

Pages