बालुशाही _ सविस्तर

Submitted by किल्ली on 15 November, 2018 - 13:22
balushahi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. मैदा: १/४ किलो
२. साजुक तुप: १०० ग्रॅम किंवा १ वाटी
३. खाण्याचा सोडा: चिमुटभर
४. दही किंवा ताकः २०० मिली किंवा एक पेला
५. तेलः तळणीसाठी
६. साखरः ३५० ग्रॅम अन्दाजे
७. पिण्यायोग्य पाणी

क्रमवार पाककृती: 

पाकः
१. साखर भिजेल इतपत पिण्यायोग्य पाणी टाकुन घट्ट पाक करुन घ्यावा
२. पाकात वेलची पूड टाकु शकता, आवडत असेल तर

बालुशाही:
१. तुप थोडे कोमट करुन घ्यावे/पातळ असावे.
२. मैद्यामध्ये तुप व सोडा घालुन एकजीव करावे.
३. पोळीसाठी कणिक मळतो तसे , वरील मिश्रणात ताक/दही घालत घालत मळून घ्यावे
हि तिंबलेली कणिक मऊसूत आणि सैलसर असावी. बोटाने स्पर्श करुन पाहिला तर कणकेच्या आत बोट गेलं पाहिजे
(थोडंफार पुरणपोळी साठी भिजवतो तशी कन्सिस्टन्सी )
४. वरील मैद्याच्या मिश्रणाचे लिंबाएवढे एक एक गोळे तळहातावर घेऊन चपटे करावे, मधोमध छिद्र पाडावे. थोडक्यात, त्या पामर मैद्याच्या गोळ्यांना बालुशाहीचा आकार द्यावा
५. जाड बुडाच्या कढईत तेल तापत ठेवावे, तेल अगदी गरम करावयाचे नाही. फक्त कोमट होऊ द्यायचे आहे
६. तेल कोमट झाले की आच बंद करावी.
७. ह्या कोमट तेलात एक एक करुन वर तयार केलेली बालुशाही सोडावी
असे केल्यानंतर कडेकडेने पिटुकले बुडबुडे येऊ लागतील, एक एक बालुशाही तेलातल्या तेलात हळूच ऊडी मारुन वर तरंगु लागेल
८. असे झाल्यानंतर आच सुरु करावी.
९. बालुशाही थोड्या लालसर झाल्या की उलट करुन/ परतून/ दोन्ही बाजुंनी तळून घ्याव्यात
१०. लालसर दोन्ही बाजुंनी तळून झालं की आच बंद करावी
११. तळलेल्या बालुशाही एका स्टीलच्या चाळणीत किंवा ताटात झार्‍याने काढुन घ्याव्यात

१२. पाकात ह्या तळलेल्या बालुशाही बुडवुन थोडा वेळ (पाक मुरेपर्यन्त ठेवाव्यात)
पाकातुन काढुन डिशमध्ये आणि डिशमधुन उचलून थेट खाऊन टाकाव्यात.

प्रकाशचित्रे:
मैद्याचा तिंबलेला गोळा:
b1.jpg

कोमट तेलात बालुशाही:
b2.jpg

तळत असताना:
b3.jpg

तयार बालुशाही:
b4_0.jpg

झाल्या सगळ्या करूनः, या खायला
b5.jpg

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

१. तळणीच्या तेलाचे तापमान योग्य साधले पाहिजे.
एकदा वरील कृतीप्रमाणे करुन पाहिलं की अंदाज येईल.
तेल जास्त गरम झाले तर बालुशाही खुसखुशीत होत नाहीत.

२. बालुशाही खाल्ल्या नाही तर बरेच दिवस टिकतात, पण असं कधी घडलं नसल्यामुळे नेमके किती दिवस टिकतात ते काही सांगता यायचं नाही

३. माझी मैत्रीण ह्यात वरून चोकोलेट सॉस घालून fusion बनवते, तसंही try करून पाहू शकता

४. आधीचे बालुशाही चे धागे
बालुशाही: https://www.maayboli.com/node/42163 : प्राजक्त्ता , 30 March, 2013
बालुशाही (फोटोसह): https://www.maayboli.com/node/39694 : madevi , 17 December, 2012

माहितीचा स्रोत: 
सासुबाई, सौ. दीपा कुलकर्णी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मला वाटले बालुशाही तेलातुन बाहेर उडी मारुन परत तेलात जाणार.
तळून झाले की पाकात उडी मारणार. छान मुरले की ताटात उडी मारणार.
आणि खाणाऱ्याने तोंड उघडले की ताटातुन डायरेक्ट तोंडात उडी मारणार.

या पाकृचा व्हिडीओ पाठवला मला किल्लीताईने. त्यात ती तळताना म्हणत होती "मार उडी लवकर, मार" म्हणून लिहिले मी वरचे.
Lol Biggrin

७. पिण्यायोग्य पाणी
२. बालुशाही खाल्ल्या नाही तर बरेच दिवस टिकतात, पण असं कधी घडलं नसल्यामुळे नेमके किती दिवस टिकतात ते काही सांगता यायचं नाही >>>. Biggrin

मस्त पाक्रु. आम्हीपण याला खाजाच म्हणतो.

मस्त!
बहुधा जोगेश्वरी किंवा कसबा गणपती (पुण्यात ) जवळ एका ठिकाणी पारस खाजा म्हणून चिरोट्यासारखाच पण तेवढा नाजुक नसलेला पदार्थ खाल्लेला आठवतोय. पण तो आवडला नव्हता.

अरे हो, कोमट तेलात बोट घातल्याने नक्की कसे वाटते ते कळवा कुणीतरी ईकडे. माझ्याने तर असले दिव्यकाम होने नाही.

किल्ली व्हिडीओ ची लिंक द्याच आता.

धन्यवाद रावी, VB , विनिता.झक्कास Happy
व्हिडीओ ची लिंक द्याच आता >>> व्हीडीओ सोमीवर/ पब्लिकली अप्लोड करण्यासारखा नाहीये, बरंच काय काय आहे त्यात अवांतर Proud
त्यामुळे तो सध्या तरी नाही करणार Happy
झब्बु देईनच>> नक्कीच, ऊडीचा व्हीडीओ बनवता आल तर उत्तम :फेस्पामः, तुम्ही बाशा तळत अस्ताना कुणालातरी मदतील घेऊन Happy Proud

नेटवरचे व्हिडियो पाहिले. तेल/तूप फार तापायच्या आधीच बालुशाही सोडायच्या हे कॉमन दिसलं.
विस्तव बंद केलेला दिसला नाही.
तळून झालेल्या बालुशाही अगदी उडी मारून नाही, पण हळू हळू वर येतात.
एका रेसिपीत पीठ आंबून दुप्पट झाल्यावर त्याला पंच करून वापरल़ंय.
कोमट तेल आणि मंद आचेमुळेच बालुशाही फुलतात आणि स्पॉंजी होतात.
तुम्ही खरंच सविस्तर रेसिपी टाकलीत.

@ योकु आणि ज्यांना प्रश्न पड्लाय ते समस्त माबोकर :
उडी मारून वर येणे ही संकल्पना खरे तर माझ्या साबांची! त्यांनी मला शिकवताना अगदी असेच ह्याच शब्दात सांगितले आणि हा शब्द्प्रयोग मला जाम आवडला. म्हणून तो मी रेसीपीमध्ये वापरला.
तर होते असं की तेल थोडेसेच गरम असल्यामुळे बालुशाही आधी तळाशी जातात आणि फुलून तेलाच्या वरती येउन तरंगु लागतात. ही प्रक्रिया जर थोडी वेगात झाली तर, ते ऊडी मारल्यासारखे दिसते. हे ऊडी मारणं मक्याच्या लाह्यांप्रमाणे पटापट नसून सन्थपणे फुलत हळूच तेलाच्या पृष्ठ्भागावर तरंगणं आहे. एरवी काहीही तळताना तो पदार्थ आपला आकर बदलतआणाणि कढईत जास्तीची जागा व्यापतो. इथे हे तर होतंच , शिवाय तो पदार्थ (बाशा) उन्ची (!) गाठतो

तुम्हा सर्वांचं शन्कासमाधान झालं का?

@ भरतः तुम्ही बराच अभ्यास केलात की!
खुप धन्यवाद

७०+ प्रतिसाद इतक्या गुण्यागोविंदात पडलेले बघून मला अगदी गहिवरून आलेलं आहे. Proud Happy

पीठ तिंबून घ्यायचे का? नीट तिंबून घेतले तर बाशा पेढ्यासारखी दिसेल.

आमच्या हाफीसतली बाशा ओबडधोबड दिसते, पीठ नीट न मळता केल्यासारखी. तशीही चांगली लागत असणार, संपतात लौकर यावरून.

प्रचंड तुपाबद्दल>> तुप जास्त असावे लागते ह्या रेसीपीला, फार फार तर घरचं लोण्कढं तूप वापरता येइल Happy
धन्यवाद सायो Happy
डाएट वाल्यांनी खाऊ नये असाच आहे हा पदार्थ Proud Light 1

बाशा फार आवडते. पण मैदा साखर या कॉम्बोमुळे वर्षातून 2 किंवा 3 खाते फक्त!

मोद, तुम्हांला ते हे म्हणजे चिकन म्हणायचे आहे का? Wink

बापरे ७७ प्रतिसाद पाहून इथे आले .... मस्त धमाल प्रतिसाद आहेत एकेक. मी पूर्वी ( मापात असताना) करायचे घरी ..... आता विकत आणायचा विचारही करत नाही. बाशाची तहान चिरोट्यांवर भागवते....
बाकी पाक्रु छान लिहलीये. हीच ट्रीक वापरली ( थंड तेल)तर टपरी टाईप समोसे, कचोरी होतात खुसखुशीत

जबरदस्त बालुशाही, चिकाटीबद्दल कौतुक किल्ली. फोटोही मस्त.

कठीण काम, मिठाईवाल्याना शरण जाणं सोपं ☺. मी फार गोड खात नाही त्यामुळे थोड्या प्रमाणात असले पदार्थ आणले तरी चालतात, नवऱ्यासाठी.

कमेंट्स एकेक Lol

पाकृ प्रेझेंटेशन भारीय.
मला आवडत नाही हा प्रकार विशेष.
उडदाच्या पिठाचे करून दह्यात भिजवलेले आवडतात, Wink

याला बालुशाही नाव कसे पडले असावे?

हीच ट्रीक वापरली ( थंड तेल)तर टपरी टाईप समोसे, कचोरी होतात खुसखुशीत>>>> टपरी टाईप समोसे हवे असतील तर समोसे करून तासभर फ्रीज मध्ये ठेवायचे अन मग तळायचे, भारी होतात

आता मायबोलीवर सोनपापडी ची आणि संदेश ची रेसिपी आली की मी नुसती वाचून सुखाने मरायला मोकळी Happy
तो बदामी हलवा नावाचा लाल लाइफबॉय साबण कसा बनवतात ते मला माहिती आहे.

Pages