बालुशाही _ सविस्तर

Submitted by किल्ली on 15 November, 2018 - 13:22
balushahi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. मैदा: १/४ किलो
२. साजुक तुप: १०० ग्रॅम किंवा १ वाटी
३. खाण्याचा सोडा: चिमुटभर
४. दही किंवा ताकः २०० मिली किंवा एक पेला
५. तेलः तळणीसाठी
६. साखरः ३५० ग्रॅम अन्दाजे
७. पिण्यायोग्य पाणी

क्रमवार पाककृती: 

पाकः
१. साखर भिजेल इतपत पिण्यायोग्य पाणी टाकुन घट्ट पाक करुन घ्यावा
२. पाकात वेलची पूड टाकु शकता, आवडत असेल तर

बालुशाही:
१. तुप थोडे कोमट करुन घ्यावे/पातळ असावे.
२. मैद्यामध्ये तुप व सोडा घालुन एकजीव करावे.
३. पोळीसाठी कणिक मळतो तसे , वरील मिश्रणात ताक/दही घालत घालत मळून घ्यावे
हि तिंबलेली कणिक मऊसूत आणि सैलसर असावी. बोटाने स्पर्श करुन पाहिला तर कणकेच्या आत बोट गेलं पाहिजे
(थोडंफार पुरणपोळी साठी भिजवतो तशी कन्सिस्टन्सी )
४. वरील मैद्याच्या मिश्रणाचे लिंबाएवढे एक एक गोळे तळहातावर घेऊन चपटे करावे, मधोमध छिद्र पाडावे. थोडक्यात, त्या पामर मैद्याच्या गोळ्यांना बालुशाहीचा आकार द्यावा
५. जाड बुडाच्या कढईत तेल तापत ठेवावे, तेल अगदी गरम करावयाचे नाही. फक्त कोमट होऊ द्यायचे आहे
६. तेल कोमट झाले की आच बंद करावी.
७. ह्या कोमट तेलात एक एक करुन वर तयार केलेली बालुशाही सोडावी
असे केल्यानंतर कडेकडेने पिटुकले बुडबुडे येऊ लागतील, एक एक बालुशाही तेलातल्या तेलात हळूच ऊडी मारुन वर तरंगु लागेल
८. असे झाल्यानंतर आच सुरु करावी.
९. बालुशाही थोड्या लालसर झाल्या की उलट करुन/ परतून/ दोन्ही बाजुंनी तळून घ्याव्यात
१०. लालसर दोन्ही बाजुंनी तळून झालं की आच बंद करावी
११. तळलेल्या बालुशाही एका स्टीलच्या चाळणीत किंवा ताटात झार्‍याने काढुन घ्याव्यात

१२. पाकात ह्या तळलेल्या बालुशाही बुडवुन थोडा वेळ (पाक मुरेपर्यन्त ठेवाव्यात)
पाकातुन काढुन डिशमध्ये आणि डिशमधुन उचलून थेट खाऊन टाकाव्यात.

प्रकाशचित्रे:
मैद्याचा तिंबलेला गोळा:
b1.jpg

कोमट तेलात बालुशाही:
b2.jpg

तळत असताना:
b3.jpg

तयार बालुशाही:
b4_0.jpg

झाल्या सगळ्या करूनः, या खायला
b5.jpg

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

१. तळणीच्या तेलाचे तापमान योग्य साधले पाहिजे.
एकदा वरील कृतीप्रमाणे करुन पाहिलं की अंदाज येईल.
तेल जास्त गरम झाले तर बालुशाही खुसखुशीत होत नाहीत.

२. बालुशाही खाल्ल्या नाही तर बरेच दिवस टिकतात, पण असं कधी घडलं नसल्यामुळे नेमके किती दिवस टिकतात ते काही सांगता यायचं नाही

३. माझी मैत्रीण ह्यात वरून चोकोलेट सॉस घालून fusion बनवते, तसंही try करून पाहू शकता

४. आधीचे बालुशाही चे धागे
बालुशाही: https://www.maayboli.com/node/42163 : प्राजक्त्ता , 30 March, 2013
बालुशाही (फोटोसह): https://www.maayboli.com/node/39694 : madevi , 17 December, 2012

माहितीचा स्रोत: 
सासुबाई, सौ. दीपा कुलकर्णी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

इन्टरेस्टिंग.
स्टेप बाय स्टेप कृती प्रकाशचित्रांसह दिल्याबद्दल धन्यवाद. Happy
(आणि आधीच्या पाककृती शोधून त्यांचे दुवे नोंदवल्याबद्दल शाब्बास! Happy )

छान आहे पाकृ. फोटो मस्तच.

बालुशाही खाल्ल्या नाही तर बरेच दिवस टिकतात Lol
इतर लिंक्स साठी धन्यवाद!

डिटेल्ड आहे पाककृती.
कमी तापलेल्या तेलात सोडलेले पदार्थ तेल पितात ना?
आमच्याइथे हलवायाकडे मिळणार्‍या बालुशाही वरून किंचित कडक , आतून खुसखुशीत असतात आणि त्यांवर साखरेच्या पाकाचा जाड पांढरा थर दिसतो.

३९६९४ पान हरवलंय

तेल व्यवस्थित तापल्यावर मग आच मंद करायची.>> नाही, तेलाच तापमान कमीच असलं पाहिजे, नाहीतर उडी मारत नाही बालुशाही. तेल हलके गरम्/कोमट हवे, वर दिल्याप्रमाणे

आमच्याइथे हलवायाकडे मिळणार्‍या बालुशाही वरून किंचित कडक , आतून खुसखुशीत असतात आणि त्यांवर साखरेच्या पाकाचा जाड पांढरा थर दिसतो. >>>> तळत असताना आच मध्यम ठेवायची, लालसर तळून घ्यायचं. मग क्रिस्पी होतात छान.
साखरेचा थर पाकातुन बाहेर काढुन ३-४ तास ठेवलं की दिसायला लागतो, पाक घट्ट असेल तर हा थर जमून येतो.
भरपूर वेळ देऊन करण्याचं काम आहे हे Happy
इथे एवढा धीर आहे कुणाला Proud
फोटो काढण्याची नुसती घाई Lol

४ थे प्रचि सुधारुन दिल्याबद्दल धन्स शाली Happy

हे तर भारतीय डोनट्स झाले :), फक्त ते सॉफ्ट असतात आणि हे खुसखुशीत.
बाकी पहिलाच ingredient मैदा असल्यामुळे पाककृतीला पास.

मस्त पाककृती! मला खूप आवडते.
बालुशाही खाल्ल्या नाही तर बरेच दिवस टिकतात>> माझ्याकडे अजीबात टिकत नाही. म्हणून मी करायचे टाळते Happy

मस्त पाककृती!
बालुशाही खाल्ल्या नाही तर बरेच दिवस टिकतात>>>>>> Lol

@ भरतः
'बालुशाही' असा गुगल सर्च केल्यानंतर माबोवरची वर उल्लेख केलेली २ पाने सापडली होती, तिथुन (गुगलवरुन) पानावर गेल्यास उघडत आहे. पण तेच पान दुव्यावरुन उघडत नाहीये . काय माहिती असं का होतंय.
@ मीरा..:
मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ वापरु शकता. थोडी चव वेगळी येते आणि खुसखुशीतपणा कमी असेल.
तशी कणकेची चव मला तरी आवडते Happy

धन्यवाद वावे, आसा., सस्मित, sonalisl, देवकी, मीरा.. Happy

कोमट म्हणजे हाताला झेपेल ईतपत, >>> बरोबर आहे, तसंच हवं. त्याच अर्थाने लिहिलंय हो Proud
बालुशाही ने ऊडी मारल्यानंतर आच सुरु करायची.

कोमट तेलात बालूशाहीला पिटुकले बुडबुडे कसे येतील किल्लीताई?
करुन पहातो. जर फसली तर फोटोसहीत येथे लेख लिहिल त्यावर. Lol

कोमट तेलात बालूशाहीला पिटुकले बुडबुडे कसे येतील किल्लीताई?>> येतात, वीडीओ पाठवते तुम्हाला Proud
वीडीओतल्या तेलाला स्पर्श करुन पाहा, तापमान समजेल Light 1 Proud Light 1 Light 1 Proud

जर फसली तर फोटोसहीत येथे लेख लिहिल त्यावर >> नक्की लिहा Lol

भयंकर रेसिपी आहे ☺️☺️☺️टिकतात वाल्या वाक्याचे लेखनमूल्य जाम आवडले.
मुळात असे किचकट पदार्थ घरी का करायचे, हा प्रश्न पडतो ☺️☺️ हलवायाकडून का नाही आणायचे.(हलवायाची बायको मायबोलीवर असल्यास आपला या पदार्थांचा सप्लाय बंद होईल कारण तिला पण असले किचकट पदार्थ घरी का करायचे असं वाटेल.)
भारी दिसतेय पण रेसिपी.खायला घरी येईन.

कोमट तेलात तळल्याचा पुरावा पाहिजे हां किल्ली.
तेल तापवून त्यात थर्मामीटर बुडवून व्हिडीओ अपलोड कर.
इथे सगळ्यांनाच कोमट तेलात वडे बुडबुडे येऊन लालसर तळले कसे जातील हा भक्ष्यप्रश्न (यक्षप्रश्न चा खादाड भाऊ) पडला आहे.

धन्यवाद mi_anu, अनामिका - Happy
.खायला घरी येईन.>> नक्की या, वाट पाहते Happy

मुळात असे किचकट पदार्थ घरी का करायचे, हा प्रश्न पडतो ☺️☺️ हलवायाकडून का नाही आणायचे.(हलवायाची बायको मायबोलीवर असल्यास आपला या पदार्थांचा सप्लाय बंद होईल कारण तिला पण असले किचकट पदार्थ घरी का करायचे असं वाटेल.)>>> Lol Rofl

नवरा 'घरी' करत नसून त्याच्या ऑफिस मध्ये करत असेल त्यामुळे नैतिकदृष्टया आपण हलवायाकडून विकत घेऊन खाऊ शकतो.☺️☺️

कोमट तेलात वडे बुडबुडे येऊन लालसर तळले कसे जातील
>>>>

बालुशाही ने ऊडी मारल्यानंतर आच सुरु करायची. मग ते लालसर होइपर्यंत तळायचे

@ मी अनु :
व्हिडीओ अपलोड कर.>> कुठे करु अप्लोड? ,
बिना तापमापीचा व्हीडीओ आहे,
तेलाला स्पर्श करुन पाहाव लागतं, एव्हढे कष्ट घेणार ना बालु साठी! प्ली झ प्ली झ प्ली झ

नैतिकदृष्टया आपण हलवायाकडून विकत घेऊन खाऊ शकतो.>> Lol

बालुशाही ने ऊडी मारल्यानंतर आच सुरु करायची. मग ते लालसर होइपर्यंत तळायचे>>
नेमकं हेच म्हणायचं आहे मला, धन्स आसा

मी घरी(आणि ऑफिस मध्ये) बाळूशाही करणार नाहीये त्यामुळे माझे व्हिडिओत हात घालून तेलाचे तापमान बघायचे श्रम वाचले आहेत.गरजु व्यक्तींनी व्हिडिओतील तेलात हात किंवा तापमापी घालून खात्री करून घ्यावी.

Pages