अभिजीत देशपांडे लिखीत आणि दिग्दर्शीत "आणि डाॅक्टर काशिनाथ घाणेकर" सिनेमा काल पाहीला. अभिजित हा आमच्या वर्गमित्राचा भाचा म्हणून अजून कौतुकानं व प्रेमानं पाहीला.
काशिनाथ घाणेकरांची नाटकं आणि त्यांचा सुवर्णकाळ आमच्या पिढीला पहाता किंवा अनुभवता नाही आला, मात्र हा सिनेमा बघताना त्या काळात शिरून, भालजी पेंढारकर, सुलोचनादिदी, डाॅक्टर ह्या अप्राप्य व्यक्तींसमवेत काही क्षण जगल्यासारखं निश्चितपणे वाटलं.
जुनी मुंबई, जुनं शिवाजी मंदीर, जयप्रभा स्टुडीओ, जुने रस्ते आणि जुनी नाटकं पहाताना नाॅस्टॅल्जिक (गतकालविव्हल ) व्हायला झालं. एखाद्या जुन्या वाड्यात अनेक वर्षांनी, सहजपणे आत शिरावं आणि तेथील प्रत्येक वस्तुनं, कोप-यानं, भिंतीनं ठाईठाई आपल्या मनाचा वेध घ्यावा, त्यावर कब्जा करावा, आपल्याला जुन्या दिवसांकडे, जुन्या माणसांकडे, जुन्या आयुष्यांकडे खेचून घ्यावं, त्यांची जीवघेणी आठवण व्हावी, त्यांच्या सुखानं आपणही शहारावं व त्यांच्या दुःखानं आपलेही डोळे भरून यावेत पण तिथून परत निघताना मात्र पाऊल निघू नये असा काहीसा अनुभव आला चित्रपट पहाताना.
अनेक पुस्तकांमधून, चित्रपटांतून आपल्याला माहीत असणारे आपले मराठी चमचमते कलाकार, आपली माणसं, आपल्याला त्यांच्याबद्दल वाटणारं कुतुहल, आदर, प्रेम, अभिमान,अपेक्षा ह्या सर्वांवर बोलतो हा चित्रपट. दिदी, भालजी पेंढारकर, डाॅक्टर ह्यांच्यासारखी वलयांकीत माणसं व त्यांचं सर्वसामान्य जगणं खूप काही सुचवून जातं. Entertainment industry is the most cruel industry हे पुन्हा एकदा ठळकपणे जाणवतं.
सर्व कलाकारांनी झपाटल्यासारखं काम केलंय. सुबोध, लेका तुझं काय करायचं रे? तू ना, वेडा माणूस आहेस. ठार वेडा. मुळात त्याच्या व डाॅक्टरांच्या दिसण्यात, आवाजात, जगण्यात, शरीरयष्टीत भरपूर अंतर आहे, पण त्यानं, (मेकअप आणि काॅस्चुम्सनं पण) ते असं बेमालूम मिटवलंय की खुद्द डाॅक्टरही फसले असते. डाॅक्टरांचं निरागस खळाळतं हास्य, देहबोली, लकबी, संवादफेक, प्रेम, संताप, मिश्कीलपणा, बेभान जगणं, बेतालपणा, रांगडेपणा, धसमुसळेपणा, कलाकार म्हणून होणारी तगमग अशी पकडलिये की तो डाॅक्टर नसून सुबोध आहे हे विसरायलाच्च होतं. सुरुवातीच्या काळातल्या तिशीतल्या व नंतर पन्नाशीतल्या डाॅक्टरांमधला पेहेरावातला सूक्ष्म बदलही जाणवतो. त्याचे ते निळे डोळे ह्रदयाचा ठाव घेतात. सुबोध हा सुबोध म्हणून दिसतो त्याहून छान डाॅक्टर म्हणून दिसतो. थोड्या वेळानं समजेनासं होतं की सुबोध आवडतोय की डाॅक्टर की हे सर्व आधी मनात बघून आता आपल्याला दाखवणारा दिग्दर्शक?
सुमितनं साकारलेले डाॅ लागू पण असेच. सुमीत, साराभाईपासूनच लाडका होता पण इथं मात्र मानलं बाॅस. नक्कल न करताही केवळ देहबोली व संवादफेकीवर कॅरॅक्टर उभं केलंय. मोहन जोशी, आनंद, सोनाली, सुहास पळशीकर व प्रसाद ओक पण अमेझींग. नंदिता, वैदेही पण सरस.
सुलोचनाबाईंचं, डाॅक्टरांचं घर, जुनं फर्निचर, जुने फोन, जुन्या गाड्या....मस्त उभं केलंय. सुलोचनाबाईंचं घर अगदी असंच असेल असं वाटतं. त्यांचे पुरस्कार, सन्मानपत्रेही दिसतात भिंतीवर. ह्या सिनेमात त्या कलाकार म्हणून कमी आणि कणखर आई किंवा कुटुंबप्रमुख म्हणून जास्त जाणवतात.
आता डाऊनसाईड ऑफ द मुव्ही....
चित्रपट हाॅन्टींग आहे..... मनावर गारुड करतो. दुस-या दिवशीही सुखानं जगू देत नाही.... दुसरं तिसरं काही सुचत नाही. सतत आठवत रहातो.
काय करणार? नाईलाज आहे. डाॅक्टरांवरचा चित्रपट आहे. आपल्या अस्तित्वानं समोरच्याला वेड नाही लावलं तर ते डाॅक्टर कसले?
मात्र घाणेकर एव्हढे मोठे
मात्र घाणेकर एव्हढे मोठे सुपरस्टार नव्हते या मताशी बहुतांश जनता सहमत आहे म्हणून त्याबद्दल चर्चा होतेय>>>>
40 वर्षांपूर्वी कोण स्टार होते हे आजच्या जनतेला कसे कळणार? त्यांना ते कुणी सांगितले तरी सुपरस्टारपदाच्या आजच्या कसोट्या लावून आजची जनता त्यांना जोखणार.
राजेश खन्ना आजच्या सुपरस्टार्सपेक्षा जास्त लोकप्रिय होता हे आजच्या जनतेला पटवून घेणे कठीण जाते, तिथे मराठी रंगभूमीवरील सुपरस्टारला कुठे भाव मिळणार.
मी अजून सिनेमा पाहिला नाही,
मी अजून सिनेमा पाहिला नाही, पण युट्युबवर गोमू गाणं नवीन आणि जुनं पाहिलं. एकाच स्क्रीनवर दोन्ही गाणी हाफ हाफ स्क्रीनवर पाहिल्याने पटकन तुलना झालीच. सुबोध भावेने डॉ घाणेकरांच्या रोलसाठी निळ्या लेन्सेस आणि खोटी ugly जुल्फे या व्यतिरिक्त काहीच प्रयत्न केले नाहीत. किती गुबगुबीत आहे. कित्येक ऍक्टर्स भूमिकेची गरज म्हणून वजन वाढवतात / कमी करतात. भावेंनी ते कष्ट घ्यायला हवे होते किंवा मग दुसरा कोणी ऍक्टर चालला असता का?
बाकी गोमू नाच नवीन आणि जुना दोन्ही equally विनोदी आहेत. आशा काळेंना नाचताना पहायचं होतं, मला ती अतर्क्य गोष्ट वाटत होती, पण त्या चांगल्या नाचल्या आहेत.
गोमू व पिंजरा दोन्ही गाणी 10
गोमू व पिंजरा दोन्ही गाणी 10 10 सेकंद पडद्यावर आहेत. यु ट्यूबवर पूर्ण एकेक कडवे दिलेय.
आशा काळेंना नाचताना पहायचं
आशा काळेंना नाचताना पहायचं होतं, मला ती अतर्क्य गोष्ट वाटत होती, पण त्या चांगल्या नाचल्या आहेत.>>>>
https://www.youtube.com/watch?v=0pABNu9_15U
गुगल करुन काघा चा फोटो पाहिला
गुगल करुन काघा चा फोटो पाहिला.
एक हॉलीवूड चा नट असाच काहीसा दिसायचा.
जुना.
mi_anu - क्लार्क गेबल?
mi_anu - क्लार्क गेबल?
डब्बल चव्वल मोजून पुण्यातल्या
डब्बल चव्वल मोजून पुण्यातल्या नाटकात पाॅपकाॅर्न खाऊन दाखवा बघू.
ते असो. नाटकांत एक निराळाच उपद्रव असतो. जितेंद्र जोशीच्या (हे आपलं उगाच हा) एका नाटकात शेजारी बसलेलेले एक आजोबा त्यांच्या शेजारच्या शीटाला दर पाच मिनिटांनी सांगत होते- ‘हे छाने हा. लिहून ठेवायला पाहिजे.’
‘लिहून ठेवायला पाहिजे’ हे श्याम मनोहरांचं यांनी काॅपी केलं असल्याची अजिबात शक्यता नाही. हे लक्षात आल्यावर त्सारा मूड गेला. गिरिजा ओक छान दिसत असल्याचंही लक्षात आलं नाही. हे भलतंच. त्यामुळे नाटकं नकोच. भंपक का होईना, बायोपिक चालतील.
साजिरा
साजिरा

नाही आवडला का सिनेमा, असू दे की. वैतागतोस कशाला!
अहो तसं नाही. उद्या बघणारे की
अहो तसं नाही. उद्या बघणारे की. आवडेल नक्की.
३७० मिलिलिटर जेम्स डीन आणि
३७० मिलिलिटर जेम्स डीन आणि आणि ६३० मिलि क्लार्क गेबल बाट्लीत टाकुन गदागदा हलवुन केस किन्चीत थिन केल्यास काघा बनूशकती,ल.
बाय द वे इथे सुभा ने काघा गुब्बू नसतानाही गाल गोबरे केल्याची चर्चा चालू आहे.
सुभा ने काघा चा हा एकच फोटो बघून मेक ओव्हर केला असेल. यात काघा रारो सारखेही दिसतात. (आज मी इतक्या असंबद्ध पणे लोकांना दुसर्या सारखं म्हणते आहे की त्या लोकांनी वाचलं तर ते खास जिवंत होऊन मग परत आत्महत्या करतील.)
http://www.zeetalkies.com/gossip/uma-prakash-bhende-remember-drkashinath...
अरे हो ! मी- अनू, खरच की . डॉ
अरे हो ! मी- अनू, खरच की . डॉ घाणेकर बरेचसे क्लार्क गेबल सारखे दिसायचे. धन्यवाद फारेंड !!
तरी त्याने १० किलो वजन कमी
तरी त्याने १० किलो वजन कमी केले .. असे एका interview madhye tyane sangitale..... he dont want to loose more weight... tyache karan tyane ase sangitale ki... tyane cheharya varach tej kami hot.....but his acting in the movie.... is really treat ...at par excellent.... really hats off to him....
हे चिंचेचे झाड, मधु इथे
हे चिंचेचे झाड, मधु इथे चंद्र तिथे गाणी आवडतात. इव्हन चंद्र आहे साक्षीला मधलं पान जागे फुल जागे पण आठवतं, शूर आम्ही सरदार पण आठवतं. घाणेकरांचे हे सर्व पिक्चर tv वर बघितले तेव्हा फार समजायचं वय नव्हतं पण अभिनेते म्हणून लक्षात राहिले ते गारंबीचा बापू मधले. तो पण शाळेत असतानाचं बघितलाय. नाटक एकही बघितलं नाही. नाटकाची फार आवड नव्हती घरात आणि डोंबिवलीत एकमेव थेटर होतं वेस्टला. तिथे एक मोरूची मावशी बघितलं होतं. घाणेकर यांची नाटकं गाजत होती तेव्हा मी खूप लहान होते. फार काही समजायचं पण नाही त्यामुळे tv वर पिक्चर बघितले पण पुस्तकातून ते जास्त समजले, ते पुस्तक आणि त्यातले ते फार काही भावले नाहीत.
प्रत्येकाचे मत ! मला आवडले ते
प्रत्येकाचे मत ! मला आवडले ते तुम्हाला आवडेलच असे नाही Happy
मला आवडला. हॅट्स ऑफ टू सुबोध भावे !! >>>>> धन्स, अश्विनी. आता बघीन म्हणते.
सुबोध भावे आणि स्वप्नील जोशीसारखेच लिमीटेड वर्तुळात डोक्यावर घेतलेले >>>>>> अॅमी, सुबोध भावे ला स्वजो च्या कॅटेगरीमध्ये का बसवतायत तुम्ही?
दोघांचीही वर्तुळं लिमिटेड
दोघांचीही वर्तुळं लिमिटेड असल्यामुळे असेल

स्वजोच्या वर्तुळात आपले ते हे सोडले तर आणखी कोणी आहे का?
> अॅमी, सुबोध भावे ला स्वजो
> अॅमी, सुबोध भावे ला स्वजो च्या कॅटेगरीमध्ये का बसवतायत तुम्ही? > नाहीयत का एकाच कॅटेगरीत? मी मराठी आंतरजालावरच कुठेतरी वाचलेले कि ते मराठी मध्यमवर्गात (ie पुणेमुंबइतले लिमिटेड वर्तुळ)लोकप्रिय आहेत. मला हे दोघे+ प्रशांत दामले ही नावे वाचली की फक्त ढेरी आठवते
बादवे कुठे ते क्लार्क गेबलचे नाक आणि ओठ आणि कुठे हे मराठीतले सुपरस्टार
काही फोटोत एक्सप्रेशन तसे दिले असतील म्हणून किंचीत झाक जाणवत असेल. गेबलसारखे दिसणारे म्हणजे गुरुदत्त आणि प्राण!
मला हे दोघे+ प्रशांत दामले ही
मला हे दोघे+ प्रशांत दामले ही नावे वाचली की फक्त ढेरी आठवते >>>> I swear
ॲमी यांच्याशी अगदी सहमत.
ॲमी यांच्याशी अगदी सहमत. विशेषत: क्लार्क गेबलशी साधर्म्याविषयी. काघा क्लर्क गेबल सारखे अजिबातच दिसत नसत. गुरुदत्त?येस. प्राण किंचित.
नाहीयत का एकाच कॅटेगरीत? मी
नाहीयत का एकाच कॅटेगरीत? मी मराठी आंतरजालावरच कुठेतरी वाचलेले कि ते मराठी मध्यमवर्गात (ie पुणेमुंबइतले लिमिटेड वर्तुळ)लोकप्रिय आहेत. >>>>>>> सुबोध भावे क्लास पेक्षा मासचा अभिनेता आहे. स्वजोबाबत असे म्हणता येत नाही. बालगन्धर्व, लोकमान्य, कटयार सारखे चित्रपट त्याच्या खात्यात आहेत. हा, त्याने फुगे, अगडबम सारखे चित्रपट करणे टाळावे.
सुबोध भावे क्लास पेक्षा मासचा
सुबोध भावे क्लास पेक्षा मासचा अभिनेता आहे. स्वजोबाबत असे म्हणता येत नाही. बालगन्धर्व, लोकमान्य, कटयार सारखे चित्रपट त्याच्या खात्यात आहेत. हा, त्याने फुगे, अगडबम सारखे चित्रपट करणे टाळावे.>>> सूलू जी तुमची नावांची अदलाबदल झालीय. बाकी भावना पोचल्या आणि सहमत.
अखेर पाहिला. अभिनयाची बाजू
अखेर पाहिला. अभिनयाची बाजू खटाखट आहे. कमाल केली आहे ती सुमीत राघवन. हा गुणी अभिनेता फाफे नंतर मागे पडत गेला याचं वाईट वाटतं. सुबोध भावेचा काशिनाथ घाणेकर झकास. निर्मिती मूल्यंही चांगली आहेत. कॅमेरा वर्क उत्तम आहे. मात्र सिनेमा खूप आउट स्टँडींग वगैरे नाही. त्यामुळे खूप अपेक्षा न ठेवता गेलेलं चांगलं. ही दिग्दर्शकाला भावलेल्या घाणेकरांची गोष्ट आहे, आपण ती तशीच पाहिली तर आनंद घेता येईल.
नाॅस्टॅल्जिक (गतकालविव्हल )
नाॅस्टॅल्जिक (गतकालविव्हल ) हे भाषांतर भावले ...
कमाल केली आहे ती सुमीत राघवन.
कमाल केली आहे ती सुमीत राघवन. हा गुणी अभिनेता फाफे नंतर मागे पडत गेला याचं वाईट वाटतं. >>>
सहमत...
गतकालविव्हल हा माझा शब्द नाही
गतकालविव्हल हा माझा शब्द नाही. कुठे तरी वाचलाय.
सुमित राघवन हिंदी
सुमित राघवन हिंदी सिरियल्समध्ये गाजला, चांगल्या खुसखुशीत विनोदी सिरियल्स केल्या त्याने, हिंदीत डिमांड आहे त्याला. साराभाई व्हर्सेस साराभाई , सजन रे झूठ मत बोलो. तो मस्त आहे, सु भा पेक्षा जास्त आवडतो मला. सु भा आवडतो पण सुमित जास्त.
"सु भा पेक्षा जास्त आवडतो " -
"सु भा पेक्षा जास्त आवडतो " - यह सु भा, सु भा क्या है? कौन है भई यह सु भा?
सुबोध भावे
सुबोध भावे
ओह ओके. लिंकच नाही लागली पटकन
ओह ओके. लिंकच नाही लागली पटकन. धन्यवाद!
फेरफटका , आप सु भा नही जानते
फेरफटका , आप सु भा नही जानते
जरा वो तु पा रे भी पढीये, तुला पाहते रे.
फेफ, आज तुमच्या चाहत्यांची
फेफ, आज तुमच्या चाहत्यांची संख्या, फेबु फ्रेन्डलिस्ट अचानक घटली तर त्याची मुळे इथे असतील
Pages