आणि डाॅक्टर काशिनाथ घाणेकर

Submitted by मेधावि on 9 November, 2018 - 23:29

अभिजीत देशपांडे लिखीत आणि दिग्दर्शीत "आणि डाॅक्टर काशिनाथ घाणेकर" सिनेमा काल पाहीला. अभिजित हा आमच्या वर्गमित्राचा भाचा म्हणून अजून कौतुकानं व प्रेमानं पाहीला.

काशिनाथ घाणेकरांची नाटकं आणि त्यांचा सुवर्णकाळ आमच्या पिढीला पहाता किंवा अनुभवता नाही आला, मात्र हा सिनेमा बघताना त्या काळात शिरून, भालजी पेंढारकर, सुलोचनादिदी, डाॅक्टर ह्या अप्राप्य व्यक्तींसमवेत काही क्षण जगल्यासारखं निश्चितपणे वाटलं.

जुनी मुंबई, जुनं शिवाजी मंदीर, जयप्रभा स्टुडीओ, जुने रस्ते आणि जुनी नाटकं पहाताना नाॅस्टॅल्जिक (गतकालविव्हल ) व्हायला झालं. एखाद्या जुन्या वाड्यात अनेक वर्षांनी, सहजपणे आत शिरावं आणि तेथील प्रत्येक वस्तुनं, कोप-यानं, भिंतीनं ठाईठाई आपल्या मनाचा वेध घ्यावा, त्यावर कब्जा करावा, आपल्याला जुन्या दिवसांकडे, जुन्या माणसांकडे, जुन्या आयुष्यांकडे खेचून घ्यावं, त्यांची जीवघेणी आठवण व्हावी, त्यांच्या सुखानं आपणही शहारावं व त्यांच्या दुःखानं आपलेही डोळे भरून यावेत पण तिथून परत निघताना मात्र पाऊल निघू नये असा काहीसा अनुभव आला चित्रपट पहाताना.

अनेक पुस्तकांमधून, चित्रपटांतून आपल्याला माहीत असणारे आपले मराठी चमचमते कलाकार, आपली माणसं, आपल्याला त्यांच्याबद्दल वाटणारं कुतुहल, आदर, प्रेम, अभिमान,अपेक्षा ह्या सर्वांवर बोलतो हा चित्रपट. दिदी, भालजी पेंढारकर, डाॅक्टर ह्यांच्यासारखी वलयांकीत माणसं व त्यांचं सर्वसामान्य जगणं खूप काही सुचवून जातं. Entertainment industry is the most cruel industry हे पुन्हा एकदा ठळकपणे जाणवतं.

सर्व कलाकारांनी झपाटल्यासारखं काम केलंय. सुबोध, लेका तुझं काय करायचं रे? तू ना, वेडा माणूस आहेस. ठार वेडा. मुळात त्याच्या व डाॅक्टरांच्या दिसण्यात, आवाजात, जगण्यात, शरीरयष्टीत भरपूर अंतर आहे, पण त्यानं, (मेकअप आणि काॅस्चुम्सनं पण) ते असं बेमालूम मिटवलंय की खुद्द डाॅक्टरही फसले असते. डाॅक्टरांचं निरागस खळाळतं हास्य, देहबोली, लकबी, संवादफेक, प्रेम, संताप, मिश्कीलपणा, बेभान जगणं, बेतालपणा, रांगडेपणा, धसमुसळेपणा, कलाकार म्हणून होणारी तगमग अशी पकडलिये की तो डाॅक्टर नसून सुबोध आहे हे विसरायलाच्च होतं. सुरुवातीच्या काळातल्या तिशीतल्या व नंतर पन्नाशीतल्या डाॅक्टरांमधला पेहेरावातला सूक्ष्म बदलही जाणवतो. त्याचे ते निळे डोळे ह्रदयाचा ठाव घेतात. सुबोध हा सुबोध म्हणून दिसतो त्याहून छान डाॅक्टर म्हणून दिसतो. थोड्या वेळानं समजेनासं होतं की सुबोध आवडतोय की डाॅक्टर की हे सर्व आधी मनात बघून आता आपल्याला दाखवणारा दिग्दर्शक?

सुमितनं साकारलेले डाॅ लागू पण असेच. सुमीत, साराभाईपासूनच लाडका होता पण इथं मात्र मानलं बाॅस. नक्कल न करताही केवळ देहबोली व संवादफेकीवर कॅरॅक्टर उभं केलंय. मोहन जोशी, आनंद, सोनाली, सुहास पळशीकर व प्रसाद ओक पण अमेझींग. नंदिता, वैदेही पण सरस.

सुलोचनाबाईंचं, डाॅक्टरांचं घर, जुनं फर्निचर, जुने फोन, जुन्या गाड्या....मस्त उभं केलंय. सुलोचनाबाईंचं घर अगदी असंच असेल असं वाटतं. त्यांचे पुरस्कार, सन्मानपत्रेही दिसतात भिंतीवर. ह्या सिनेमात त्या कलाकार म्हणून कमी आणि कणखर आई किंवा कुटुंबप्रमुख म्हणून जास्त जाणवतात.

आता डाऊनसाईड ऑफ द मुव्ही....
चित्रपट हाॅन्टींग आहे..... मनावर गारुड करतो. दुस-या दिवशीही सुखानं जगू देत नाही.... दुसरं तिसरं काही सुचत नाही. सतत आठवत रहातो.
काय करणार? नाईलाज आहे. डाॅक्टरांवरचा चित्रपट आहे. आपल्या अस्तित्वानं समोरच्याला वेड नाही लावलं तर ते डाॅक्टर कसले?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

भाई व ठाकरे दोन्ही सिनेमांची ट्रेलर्स पाहिली. जानेवारीत रिलीज आहेत.>>>> हे रोल्सही सुबोध भावे करत आहे काय?

मला पण बघायचा आहे हा सिनेमा. मला फक्त एक छोटी आठवण आहे टीव्हीवर शूर आम्ही सरदार गाणं चालू होतं , माझे बाबा गाण्यातले औरंगजेब तर ते घोड्यावर बसलेले किडमिडीत डॉ. घाणेकर बघून हे गाणं ह्यांच्यावर अजोबात सूट होत नाही म्हणून इतके हसत सुटले होते.

> पण नाटकाच्या बाबतीत लिमिटेड वर्तुळात आवड होती.
नाटकं म्हणजे अत्यंत नाटकी असा समज झाला.

घाणेकरांचे सिनेमे मात्र टीव्हीवर आले. ते पाहताना सुपरस्टारपद वगैरे कधी जाणवले नाही. दादा कोंडकेच निर्विवाद मराठी सिनेमात सुपरस्टार होते.
मी त्या वर्तुळात नसल्याने मतभेद होण्याची शक्यता आहे. तसेच वयही नव्हते. मात्र त्याच वयात हिंदी मराठी कलाकारांचे स्टारडम जाणवत असे हे ध्यानात आहे. माझ्यापर्यंत घाणेकरांचे स्टारडम आले नाही कधी. ही माझ्या वर्तुळाची अपूर्णता असेल कदाचित. > +१. घाणेकर म्हणल्यावर तो गोमु संगतीनं मधला भयानक नाचच आठवतोय. ते नाटकात काम करायचे आणि सुपरस्टार(?) होते हे आताच समजलं. मास अपील होत का नक्की त्यांना? कि सुबोध भावे आणि स्वप्नील जोशीसारखेच लिमीटेड वर्तुळात डोक्यावर घेतलेले?
एनिवे लेख चांगला आहे. सिनेमा अर्थातच बघणार नाही Lol

> माझे बाबा गाण्यातले औरंगजेब तर ते घोड्यावर बसलेले किडमिडीत डॉ. घाणेकर बघून हे गाणं ह्यांच्यावर अजोबात सूट होत नाही म्हणून इतके हसत सुटले होते. > Lol Lol

गारंबीचा बापू आणि गुंतता हृदय हे ही गाजलेली इतर नाटकं आठवली.
यातलं गारंबीचा बापू चित्रपटरूपात पाहिल्याचं आठवतंय. नाटक वाचलंही होतं. पाहिलेलं नाही.
चंद्र होता साक्षीला आणि हा खेळ सावल्यांचा हे चित्रपट पाहिलेत. त्याबद्दल (बरं) लिहिण्यासारखं काही नाही. मराठा तितुका मेळवावा मध्ये हे डॉ.काशीनाथ घाणेकर हे लक्षातही आलं नव्हतं.
एक हिंदी चित्रपटही आहे नावावर. त्यातलं हे गाणं

गोमू जुन्या आणि नव्या दोन्ही गाण्यातला नाच हिलारीयस विनोदी आहे.
गॅदरिंग मध्ये मॉंटेसरी टीचर लहान मुलांना सांगतात ना, मोकळ्या आणि भरपूर हालचाली करा, मागच्या प्रेक्षकांना पण दिसल्या पाहिजेत तसं वाटलं ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️

बाकी सारे सोडा. घाणेकरांचा एकटी नावाचा सिनेमा बघा. त्यात सुलोचनाताईंनी त्यांच्या आईचे काम केलेय, आणी दोघांनी भूमिकेचे सोनं केलयं.

लिंब लोण उतरु कशी हे गाणे पण जबरी !! https://www.youtube.com/watch?v=fA5LYsHSyPI माझ्या नशीबाने मला हा टिव्हीवर पहायला मिळाला.

गगन भेदी नाटक मी बालगंधर्व मध्ये पाहिलेले आहे. एव्हरी वन्स इन अ व्हाइल एखादी कलाकृती येते जी समाजाचा बदलता मूड अगदी चपखल पकडते. हेच्च मला वाटत होते हेच मला म्हणायचे होते असे सामान्य माणसाला वाट्ते व तो ती कलाकृती डोक्यावर घेतो. उदा. दीवार, समाजातला बदल रोमँटिक चित्रपटामधून जनतेला कॅथार्सिस मिळत नव्हता असंतोष खदखदत होता. पैसे कमी व पिळवणू क करणा रे मालक लोक गोदीत फॅक्ट्रीत होते. ठर्रा पिउन गटारीत पडणारे होते. बहिणीच्या लग्नाची काळजी करणारे, नुकते कमावते तरूण वडिलांनी वाढवलेला पोरव डा विधवा आईच्या बरोबरीने संभाळणारे होते. तो क्षण दीवारने बरोब्बर पकडला.

दिल चाहता है हे असेच एक उदाहर ण. अर्बेन यंग मुलांच्यातली मैत्री कधी पकडलीच गेली नव्हती. तो फ्रेश टोन पक्का पकडला दिग्दर्शकाने.
बाकी बाजू सशक्त होत्या. हिट तो होनीही थी पिक्चर.

सैराट हे ही एक.

तसेच त्या लाल्याच्या पात्राचे आहे. तरूण पिढी ला ऐतिहासिक पौराणिक नाट्कांमध्ये काही आय्डेंटीफायेबल मिळत नव्हते ते लाल्या च्या भुमिकेतून मिळाले. प्रेक्षक जर पात्राच्या जागी स्वतः ला बघू लागला ना तर तो बघायला परत परत येणार. पण जे क्रेडिट व प्रेम त्या पात्राला भुमिकेला मिळ ते आहे त्यात आपला एका मर्यादे पलिकडे वाटा नाही आहे हे समजून पुढे निघायची मॅचुरीटी पाहिजे ती घाणे करां मध्ये दिसली नाही सिनेमात.

पण जे क्रेडिट व प्रेम त्या पात्राला भुमिकेला मिळ ते आहे त्यात आपला एका मर्यादे पलिकडे वाटा नाही आहे हे समजून पुढे निघायची मॅचुरीटी पाहिजे ती घाणे करां मध्ये दिसली नाही सिनेमात. >>> त्यांच्याबद्दल जे ऐकलंय आणि वाचलंय (अजून हा सिनेमा पाहिला नाहीये) त्यावरून वाटतं की ती मॅच्युरिटी नव्हतीच घाणेकरांमध्ये..
एकूणात घाणेकर = प्रचंड अहंगंड + व्यसनाधीनता
एवढंच कळतं..

'अश्रूंची झाली फुले' मधला लाल्या हीच त्यांची खरी ओळख आहे. सगळा युवावर्ग फिदा होता त्यांच्या या भूमिकेवर. त्यांच्याभोवती एक वलय होतं आणि कुठलंही नाटक त्यांच्यामुळे लोक बघायचे, सहन करायचे. नंतर नंतर फार घसरण झाली. चित्रपटातले घाणेकर मला आवडले नव्हते. एक तर रंगमंचावर दिसणारं त्यांचं रूप पडद्यावर खुललं नाही. अभिनय, संवादफेक काहीच चित्रपटमाध्यमाला साजेसं नव्हतं. तेव्हाचा मराठी सिनेमासुद्धा अप्रगत, बालिश होता म्हणा. हे माध्यम ताकदीने हाताळणारे दिग्दर्शक, अभिनेते तुरळकच होते. बजेटही तोकडं असायचं. मराठी मध्यम वर्गाचा दबदबा, दरारा निर्माण झाला नव्हता. तेव्हा ममवला आकर्षित करतील असे चांगले चित्रपट निघत नसत. आणि घाणेकर कोणतीही भूमिका सहजतेने करतील असे अभिनेते नव्हते. प्रत्येक भूमिकेतून त्यांचा 'काशीनाथघाणेकरपणा' डोकावायचा. असो. मी हा चित्रपट पाहिलेला नाही, तेव्हा त्याबद्दल मत व्यक्त करीत नाही.

नाथ हा माझा हे पुस्तक मला काही आवडलं नाही. पिक्चर बघावासा वगैरे वाटत नाही त्यामुळे. त्यावरून तरी घाणेकर मनाला वगैरे भिडले नाहीत, उलट नाही आवडले फारसे.

पिक्चर भाऊ बघून आला, त्याला आवडला. त्याला सुबोध भावे बरोबरचं प्रसाद ओक, सुमित राघवन यांची कामं पण आवडली.

'अश्रूंची झाली फुले' मधला लाल्या हीच त्यांची खरी ओळख आहे. सगळा युवावर्ग फिदा होता त्यांच्या या भूमिकेवर. त्यांच्याभोवती एक वलय होतं आणि कुठलंही नाटक त्यांच्यामुळे लोक बघायचे, सहन @@@ हिरा, अगदि बरोबर लिहिले आहे तुम्ही

घाणेकरांची नाटकातून एक इमेज तयार झाली होती. मात्र चित्रपटात ते एकदम निष्प्रभ वातत. ते माध्यम त्यांना सूट झाले नाही. मला हा आठवते की हा खेळ सावल्यांच्या परीक्षणात लिहिले होते नायकासाठी एवढा सुमार अभिनेता घ्यावा याबद्दल आश्चर्य वातते, कदाचित चित्रपाटाच्या रिटेक्स मध्ये अभिनयातले उत्स्फूर्तता हरवूनही जात असेल. मात्र अतिअहंकार , नावीन काही आत्म्सात करण्याचे नाकारणे, त्याच त्याच सुरक्षित वर्तुळात राहणे यामुळे त्याना उतरर्ती कळा लागली. शेवटी शेवटी त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. कोणत्याही नाटकात कोणत्याही नाटकातले डायलॉग सुरू करून द्यायचे.

अहो घाणेकर कितीही वाईट नि भंपक असू देत की.

‘बायोपिक’ असा शिक्का लावला, की पुढचं सारं सोपं होत असेल बहुतेक. करणार्यांच्या आणि बघणार्यांच्या- दोघांच्या दृष्टीने.
मनस्वी आणि चक्रम माणसांवर फिल्म्स आल्याच पाहिजेत. कारण नाटकं, पुस्तकं यांकडे तर तुम्ही ढुंकून बघत नाही. सिनेमा आला की गर्दी आणि चरचा. सिनेम्यात पाॅपकाॅर्न खायला मिळतं. जनरेशन गॅप आडवी येत नाही. केव्हाही उठून जाता येतं. आणि तरीही या सार्याला पुरून उरून सिनेमे धंदा करतात. सिनेमे वर्रमानपत्रात येतात. बुकमायशोमध्ये दिसतात. हे छानच आहे की.

अश्रुंची झाली फुले, रायगडाला जेंव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू यातल्या भूमिका (अँग्री यंग मॅन) जर घाणेकरांची ओळख म्हणत असाल तर गुंतता हृदय हे, गारंबीचा बापू यातल्या भूमिकांना कय म्हणाल? त्या भूमिकां मधला अभिनय हि तेव्हढाच तोला-मोलाचा, इंटेंस होता. गंमतीचा भाग म्हणजे, अश्रुंची... मधे लाल्याची भूमिका मध्यवर्ती नाहि, प्रोफेसरांची (पंत) आहे. घाणेकरांनी त्या भूमिकेतुन पंतांना काहिसं ओवरशॅडो करुन लाल्याला अजरामर केलं. बच्चन साहेबांनी जसं आनंद आणि नमक हराम मधे काकाला केलं...

शेवटी-शेवटी घाणेकरांच्या करियरला उतरती कळा लागण्यात त्यांच्या अहंकारापेक्षा व्यसनाचा वाटा मोठा आहे. यातुन मोतीलाल पासुन लक्षा पर्यंत कोणिहि सुटलेलं नाहि...

घाणेकराच नाटकातल काम जराही बघितलेल नाही , एकटी हा समस्त आई वर्गाला रडवणारा पिक्चर पाहिलेला थोडाफार लक्षात आहे त्यातही सुलोचनाबाइच जास्त लक्षात राह्तात, घाणेकर चित्रपटाचा ट्रेलर मात्र खुप कॅची आणि आकर्षित करणारा वाटतोय, सुबोध प्रोमोत तरी छान वाटतोय नव्या उमेदिचे कलाकार समरसुन या भुमिका करतायत हे मात्र नक्कि ( सुबोधने यासाठी वजन मात्र कमी करायला हव होत , घाणेकरापेक्षा तो खुपच बाळसेदार गुबगुबित दिसतोय, हेअर स्टाइल वर पण फार काही मेहनत घेतलेली जाणवत नाही)

बच्चन साहेबांनी जसं आनंद आणि नमक हराम मधे काकाला केलं...
>> जोकिंग right? आनंद पूर्णपणे काका ने खाल्लेला मूवी आहे.

तो मुद्दाम झालाय बहुधा घाणेकर बनायला गुबगुबीत.>>> आ??? घाणेकर किरकोळ होते अगदिच, गोमु सन्गतिन ओरिजनल बघितल तर लगेच कळेल...

हा चित्रपट कसा आहे? चान्गला की वाईट? हया धाग्यावर मिक्स्ड प्रतिक्रिया येतायेत. माझा गोन्धळ होतोय.

डॉ. काशीनाथ घाणेकरांचा 'मधुचंद्र' सिनेमा कोणालाच आठवत नाहीए का? कोणीच कसं बोलत नाहीए त्याविषयी. मी लहान असताना दूरदर्शनवर पाहिला होता. 'मधु इथे आणि चंद्र तिथे' हे गाणे आठवतेय.

'मधु इथे आणि चंद्र तिथे' हे गाणे आठवतेय. >>> ह्यापेक्षाही अजून एक गाणे जास्त फेमस होते / आहे , माझ्या मते. ते म्हणजे --- हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी, दिसशी तू नव तरुणी काश्मीरी.

हा चित्रपट कसा आहे? चान्गला की वाईट? हया धाग्यावर मिक्स्ड प्रतिक्रिया येतायेत. माझा गोन्धळ होतोय. >>> प्रत्येकाचे मत ! मला आवडले ते तुम्हाला आवडेलच असे नाही Happy
मला आवडला. हॅट्स ऑफ टू सुबोध भावे !!

बायोपिक म्हटल्यावर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया अटळ आहेत.
एक ज्याच्यावर सिनेमा आहे त्याबद्दलच्या आणि दुस-या सिनेमा कसा आहे याबद्दलच्या. इथे मिश्रण या दोन प्रतिक्रियांचे दिसते. सिनेमाला नावे ठेवताना कुणी दिसलेले नाही. ज्याच्यावर सिनेमा आहे त्याला थोडे ग्लोरिफाय करणे हे सिनेमा बनवणा-यांसाठी गरजेचे असते. मात्र घाणेकर एव्हढे मोठे सुपरस्टार नव्हते या मताशी बहुतांश जनता सहमत आहे म्हणून त्याबद्दल चर्चा होतेय. त्या काळात नाटकाचा वर्ग गृहीत धरला जात असे. कदाचित त्या पलिकडचा प्रेक्षक खिजगणतीत नसावा. त्यामुळे सुपरस्टार पदाबाबत चर्चा होत आहे.

दिग्दर्शक आणि लेखक यांना जी गोष्ट सांगायची होती ती कशी उतरलीय हे महत्वाचे आहे. बाकीच्या गोष्टी चित्रपटगृहाबाहेर सोडून यायच्या असतात. जसे संजूच्या वेळी झाले होते. ( वास्तवा पासून खूप फारकत घेतली हे काहींना रूचत नाही हे ही मान्यच आहे).

चित्रपट अतिशय सुरेख आहे, सगळ्यांची कामे उत्तम झाली आहेत. सुबोध बद्दल प्रश्नच नाही. पण प्रसाद ओक, आनंद इंगळे, सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी, वैदेही सगळ्यांची कामे उत्तम झालीत. नाटकात कामाची सुरुवात ते आयुष्याची अखेर म्हणजे जवळपास 25 वर्षांचा कालखंड चित्रपटात येतो पण कुठेही दोन प्रसंगांचा ताळमेळ चुकतोय किंवा काळ उड्या मारून पुढे सर्कवल्यासारखा वाटत नाही.

अभिनयाची उत्तम जाण असलेला अभिनेता पुढे प्रेक्षकानूनयी होत जातो. जुळवून घेणे स्वभावात नसल्यामुळे परत परत शून्यावर येऊन सुरवात करावी लागली तरीही ती करून प्रत्येक वेळी यशाचे शिखर गाठणारा व त्या नशेत वाहावत जाऊन स्वत:तल्या नटाला व स्वतःला संपवणारा काशीनाथ आजच्या पिढीपर्यंत पोचवण्यात चित्रपट यशस्वी झालाय.

इरावती घाणेकरांचे पात्र तसेच होते की चित्रपटात असे रंगवलेय कल्पना नाही. नवऱ्याला पुरती ओळखून असणारी बायको त्याच्या कामात अजिबातच रस घेत नाही, त्याची लफडी तिच्या बेडरूमपर्यंत पोचतात किंवा नवरा दुसरे लग्न करतोय म्हणतो तरी तिला काही वाटत नाही हे जरा विचित्र वाटले.

सुबोध जरा बारीक झाला असता तर बरे झाले असते. त्याचे जाडेपण खुपते.

सिनेम्यात पाॅपकाॅर्न खायला मिळतं
>>
म्हनजे काय ? फुक्कट मिळतात की काय? चांगले चव्वल मोजून घ्यायला लागतात. (बादवे आता मल्टि प्लेक्सात घरी तळलेले वडे, पोहे, लाह्या नेउ देतात की नाही. मध्ये काहीतरी कोडताने आदेश दिल्ते म्हने. आपन काय जात नाय मल्टि.त पर्वडत नाय हो.... आपलं टीव्ही ला येइ पर्यन्त वाट पाहतो..)

Pages