हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरी जेकेबाई म्हणजे जॉर्ज आर आर नाही ही खैरियत आहे, नाहीतर हरिभाऊ एकटाच राह्यला असता शेवटी, आणि तो पण वैफल्यातून आत्महत्या करतो असलं काही आलं असतं.
त्यामानानं बरीच लोकं शिल्लक राह्यली म्हणायची. ☺

काल १ सप्टेंबर २०१७...
१९ वर्षांनी कालच्याच दिवशी हॅरी -जिनी आणि हर्मायनी-रॉनची पोरं हॉगवर्ट्समध्ये गेली शिकायला...
रोलिंगबाईंनी ट्विट केलंय...

त्यापैकीच एक विचार तिथे असा मांडलाय की, हॅरीने जंगलात resurrection stone टाकून दिला, पण तो त्याने जपून ठेवला असता आणि युद्धानंतर सर्व गेलेल्यांना एकदा भेटायला बोलावून त्यांच्या कुटुंबियांशी, आप्तांशी भेट करून दिली असती तर... त्यांना शेवटचा निरोप घेता आला असता ना..>>>>>
...........असे का केले नाही, याचे उत्तर तुम्हाला The Tales of Beedle the Bard मधे मिळेल Goodluck Happy

Harry Potter and the cursed child वाचतोय. मला आवडलंय हेही पुस्तक.

काल डेथली हॉलोजचा शेवटचा भाग बघत होते. ( पिक्चरमध्ये सगळीच वाट लावल्ये..!) मला जस्ट एक प्रश्न पडलाय, की हॅरीला शेवटी जंगलात तो Resurrection Stone मिळतो, पण तो नक्की कशासाठी ? म्हणजे मृत्यूदेवतेच्या तीनही भेटी मिळून तो अजिंक्य बनावा यासाठी की अजून काही उद्देश? कारण व्हॉल्डेमॉर्टला सामोरं जाण्यापूर्वी त्याला त्याचे पालक, सीरियस आणि ल्युपिन भेटतात खरं, पण नंतर मग हॅरी तो स्टोन जपून न ठेवता जंगलातच टाकून देतो आणि नंतर शोधायलाही जात नाही..
नक्की कारण कोणी सांगेल का?
आणखी एक प्रश्न म्हणजे, व्हॉल्डेमॉर्टकडून हॅरी मारला गेल्यानंतर, म्हणजे हॅरीमधला हॉरक्रक्स नष्ट झाल्यानंतर हॅरी आणि डम्बल्डोरमध्ये जो संवाद होतो, तो नेमका कुठे ? म्हणजे कसा नक्की आणि तो खराखुरा होता की फक्त हॅरीच्या डोक्यातील विचार होते?

आणि आता...
..........असे का केले नाही, याचे उत्तर तुम्हाला The Tales of Beedle the Bard मधे मिळेल Goodluck या Mr Pratik यांच्या प्रतिसादाबद्दल माझं म्हणणं....
मला Beedle ची गोष्ट माहीत आहेच. पण माझा मुद्दा वा हेतू, त्या स्टोनने हॅरी कोणाला जिवंत करून कायमचे बोलवावे असा नव्हता तर प्रत्येकाला आपल्या दिवंगत आप्तेष्टांचा निरोप घेता आला असता का, ते योग्य ठरलं असतं का? असा मुद्दा वाचनात आल्यानंतर मला प्रश्न पडला, म्हणून मी विचारलं

हॅरी ला resurrection स्टोन हा मरताना मिळतो (just आधी ) .. so मला वाटतं त्या वेळी हॅरी ला त्याची जवळची माणसे (जी तेव्हा दिसतात) त्याच्या सोबत असावीत असे वाटू शकते ...असा विचार करून आणि दुसरे म्हणजे स्टोन चुकीच्या हातात पडू नये म्हणून dumbledore ने हॅरी ला दिला असावा.

म्हणजे मृत्यूदेवतेच्या तीनही भेटी मिळून तो अजिंक्य बनावा यासाठी की अजून काही उद्देश? >>>

असं नसावं ..कारण cloack आणि stone जरी त्याला मिळाले असले तरी elder wand हि luckily मिळते ...means तो luckily मास्टर ऑफ death झाला.

हॅरी ला स्टोन नको असतो कारण मेलेल्या माणसांना पुन्हा त्या स्टोन ने बोलावणे हे त्यांच्यासाठी नक्कीच कष्ट दायक असू शकते...ते पुर्ण पणे जिवंत होत नाहीत ...नाही मोक्ष मिळतो ...नाही भूत Happy (according to book )
so he dropped the stone आणि ते निघून जातात.

आणखी एक प्रश्न म्हणजे, व्हॉल्डेमॉर्टकडून हॅरी मारला गेल्यानंतर, म्हणजे हॅरीमधला हॉरक्रक्स नष्ट झाल्यानंतर हॅरी आणि डम्बल्डोरमध्ये जो संवाद होतो, तो नेमका कुठे ? म्हणजे कसा नक्की आणि तो खराखुरा होता की फक्त हॅरीच्या डोक्यातील विचार होते? >>>>

of course हे हॅरी च्या डोक्यात चालू असतं ,, but that does not mean कि हे खरे नाहीये Lol Lol
I think it is both

फॅन्टास्टिक बीट्स चा दुसरा पार्ट क्राईम्स ऑफ ग्रिंडेलवार्ल्ड येतोय पुढच्या वर्षी १६ नोव्हेंबरला

सहज एक आठवले... जे विसरायला झाले आहे Proud

टॉम रिडलची डायरी चेंबर ऑफ सीक्रेट्स घडून गेल्यानंतर हॅरी डंबलडोर कडून मागून घेतो आणि त्यात सॉक्स घालून ल्युशिअस मॅलफॉय कडे देतो. ल्युशिअस ती डॉबी कडे देतो आणि डॉबी स्लेवरीतून फ्री होतो.
पुढे होरक्रक्सेस चे रहस्य डंबलडोरला कळाल्यानंतर तो ते हॅरीला सांगतांना ऊदाहरण म्हणून त्याच्यापुढे वॉल्डर्मॉट ची रिंग (जी घातल्याने डंबलडोर कर्स होतो) आणि टॉम रिडलची डायरी टेबलाच्या खणातून काढून दाखवतो.
टॉम रिडलची डायरी डॉबीकडून पुन्हा डंबलडोर कडे कशी येते?

जीनी विजली टॉम रिडलची डायरी मोनिंग मर्टेलच्या लॅवेटरी मधे फेकून पळून जाते जी पुढे हॅरीला मिळते.. हॅरीच्या रूममधून ती डायरी पुन्हा कोण पळवते (जीनी का?) जी पुन्हा चेंबर ऑफ सिक्रेट्समधे बेशुद्ध जीनीच्या बाजुला असते?

टॉम रिडलची डायरी डॉबीकडून पुन्हा डंबलडोर कडे कशी येते? >> हॅरी (आणि डॉबीलाही) सॉक्समध्ये इंटरेस्ट असतो. पण काहीतरी करून हॅरीच्या हातातून मायफॉयने ते घ्यावं यासाठी, थोडक्यात मायफॉयला गंडावण्यासाठी हॅरी ती डायरी वापरतो. एकदा सॉक्स डॉबीला मिळाल्यानंतर आणि त्याची सुटका झाल्यानंतर ती डायरी परत डंबलडोरकडे गेली असेल.

हॅरीच्या रूममधून ती डायरी पुन्हा कोण पळवते (जीनी का?)
>> हो. पुस्तकात तसं आहे. जीनीला ती डायरी किती भयंकर आहे ते कळलेले असते. त्यामुळे हॅरीला ती डायरी मिळाली आहे हे कळल्यानंतर ती त्याच्या रूममधून ती डायरी घेते. त्यानंतर मग यू नो हू तिच्यावर पूर्ण ताबा मिळवून तिला चेंबरमध्ये जायला भाग पाडतो.

जर का पुस्तकं वाचली नसतील तर वेळ मिळाल्यावर नक्की वाचा. आगाऊपणा करत नाहीये पण या प्रश्नांवरून तुम्हाला इंटरेस्ट आहे म्हणून म्हणतीये. खूप मस्तं आहेत पुस्तकं आणि मुवीत न दाखवलेल्या अनेक गोष्टी आणि त्यांची उत्तरे आहेत.

टॉम रिडलची डायरी डॉबीकडून पुन्हा डंबलडोर कडे कशी येते?>> डॉबी स्लेव्हरीतून मुक्त झाल्यावर हॉगवर्ट्स मधे काम करतो तेव्हा डम्बी मागुन घेत असावा..

डायरी पुन्हा कोण पळवते (जीनी का?)>> हो जीनीच..

धन्यवाद पीनी, टीना.
तुम्हाला टॉम रिडलच्या डायरीचा डॉबी कडून डंबलडोरकडे नेमका प्रवास आठवल्यास नक्की लिहा.
कारण वॉल्डी ती ल्युशिअस कडून मागून घेतो आणि तिची अवस्था बघूनच त्याला आपले होरक्रक्सेसचे गुपित फुटले आहे हे कळते असे पुसटसे आठवते आहे. पण हे बेलाट्रिक्सच्या वॉल्ट मधून हफलपफ कप गायब झाल्यानंतर घडते (तोवर डंबलडोर हॅड ऑलरेडी फॉलन) म्हणजे डायरी पुन्हा डंबलडोर कडून मॅलफॉयकडे आलेली असते. कशी काय?

ट्रेनमधे बसल्या बसल्या सहज डोक्यात सीक्वेन्स लावत होतो पण हा डायरीचा सीक्वेन्स काही केल्या जमेना.

तसा काही प्रवास दिलेला नाहीये.
पण नंतरच्या भागात दाखवलं आहे की डंबलडोरला हॉरक्रक्स किंवा त्यासारखं मृत्यूनंतर जगवणार काहीतरी करून ठेवलं असावं असा संशय असतो. ते कुठं असतील आणि त्यांचा नाश कसा करायचा याचा अंदाज घेण्यासाठी त्यांनी खूप माहिती, वस्तू, आठवणी गोळा करून ठेवलेल्या असतात.
दुसऱ्या भागात ती डायरी आणि तिच्याबद्दल सगळं कळल्यानंतर तो हॉरक्रक्सच आहे आणि त्याचा नाश कसा झाला ही महत्वाची गोष्ट होती. त्यामुळे डंबलडोरने ती डायरी नक्की जपून ठेवली असणार. किंबहुना ती डायरी हा हॉरक्रक्सचा संशय खात्रीत बदलणारा पहिला क्लू होता.

बेलाट्रिक्सच्या वॉल्ट मधून हफलपफ कप गायब झाल्यानंतर घडते (तोवर डंबलडोर हॅड ऑलरेडी फॉलन) म्हणजे डायरी पुन्हा डंबलडोर कडून मॅलफॉयकडे आलेली असते. कशी काय?>>
हे नीट आठवत नाहीये. पुस्तकं पुन्हा वाचायची वेळ आली आहे. ☺️

कारण वॉल्डी ती ल्युशिअस कडून मागून घेतो आणि तिची अवस्था बघूनच त्याला आपले होरक्रक्सेसचे गुपित फुटले आहे हे कळते असे पुसटसे आठवते आहे. पण हे बेलाट्रिक्सच्या वॉल्ट मधून हफलपफ कप गायब झाल्यानंतर घडते (तोवर डंबलडोर हॅड ऑलरेडी फॉलन) म्हणजे डायरी पुन्हा डंबलडोर कडून मॅलफॉयकडे आलेली असते. कशी काय?
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

डंबलडोर ने त्याबद्दल हॅरीला सांगतांना when he discovered असा उल्लेख केला आहे. पुस्तक आता हाताशी नाही त्यामुळे चु भु दे घे पण ते म्हणजे ल्युशिअस वर Legilimency वापरून असणार. ल्युशिअसच्या मेमरीमध्ये त्याला डायरीची अवस्था दिसली असेल.

डायरी डॉबीकडून डंबलडोर कडे येणे सहज शक्य आहे डॉबी हॉगवर्ट्स मध्ये कामाला असल्याने.

डायरी पुन्हा डंबलडोरकडून मॅलफॉयकडे आलेली नाही. ती शेवटपर्यंत डंबलडोरकडेच आहे.

>>>कारण वॉल्डी ती ल्युशिअस कडून मागून घेतो आणि तिची अवस्था बघूनच त्याला आपले होरक्रक्सेसचे गुपित फुटले आहे हे कळते असे पुसटसे आठवते आहे >>>. असे नाहीये. गुपित फुटले हे हफलपफ कप गायब झाल्यावर त्याला कळते. कारण वॉल्टमधून बाकीचे धन सोडून स्पेसिफिकली कप उचलला जातो.
तोपर्यंत हॉरक्रक्सच्या मागे कोणी आहे हे त्याला माहीत नाहीये. डायरी ल्युशिअसच्या मुर्खपणाने नष्ट झाली असे तो समजत असतो ( जे बरोबरही आहे एका अर्थाने)

मला जेवढे आठवते त्यानुसार पुस्तकात डंबलडोरकडे डायरी परत येत नाही. ते फक्त चित्रपटात दाखवले आहे. सहाव्या पुस्तकात जेव्हा हॅरी आणि डंबलडोरला होऽक्रक्सचे रहस्य कळते तेव्हा डंबलडोर त्या डायरीविषयक आपले निरीक्षण सांगतो - या डायरीपासून त्याला तीव्र स्वरुपाची जादू सेन्स झाली होती. त्यावरून ते गेस करतात की ही डायरी एक होऽक्रक्स असावी कारण त्या डायरी संबंधित एक खून (मर्टलचा) झाला होता.

पायस , चैत्रगंधा जी ,
डायरी मालफॉय कडे येणाची शक्यता नाही कारण हॅरी जेव्हा ती त्याच्या हातात देतो तेव्हा सहज सवयी ने ती तो dobby कडे फेकतो. यानंतर डॉबी स्वतंत्र होतो . आता स्वतंत्र झालेल्या डॉबी कडून मालफॉय डायरी परत घेणे शक्य नाही . तसेच डॉबी ती कदाचित हॅरी ला परत देण्याची शक्यता नाकारता येणार नाही . अर्थात हे ना पिक्चर मध्ये दाखवलाय ना पुस्तकात .
डम्बलडोर म्हणतात तस .. thickets of wildest guesswork !

डायरी मालफॉय कडे येणाची शक्यता नाही >>

चेंबर ऑफ सीक्रेट्स पुस्तक

मि. मॅलफॉय रिप्ड द सॉक ऑफ द डायरी, थ्र्यू इट असाईड, देन लूक्ड फ्युरिअसली फ्रॉम द रुईन्ड बुक टू हॅरी.

पुस्तकात मॅलफॉय डायरी डॉबीकडे देत नाही. तो त्या स्मेली सॉकच्या वासामुळे डायरी उघडून, त्यातून सॉक काढून फेकतो. डॉबी हा फेकलेला मोजा झेलतो आणि त्यामुळे गुलामीतून मुक्त होतो. त्यानंतर त्या डायरीचा पुस्तकांमध्ये उल्लेख नाही. मॅलफॉयने तिचे पुढे काय केले हे सांगितलेले नाही पण चेंबर ऑफ सीक्रेट्स पुस्तकाच्या अखेरीस डायरी मॅलफॉयकडे राहते.

पुस्तकात मॅलफॉय डायरी डॉबीकडे देत नाही. >> ओके.

डंबलडोर डायरी टेबलाच्या खणातून काढून दाखवतो हे पुस्तकात आहे का? मला नक्की आठवत नाहीये आणि माझ्यजवळ आत्ता पुस्तक नाहीये. जर हा प्रसंग पुस्तकात नसेल तर मग अर्थात डायरी मॅलफॉयकडेच राहिली असेल. मुव्हीत असेल तर जाऊ दे. मग ते canon नाही.

चला परत एकदा पुस्तक वाचायची वेळ आली असं वाटतय.. मग आणखी एकदा लॉर्ड ऑफ द रिंग्स वाचायचं आणि हॅपॉ आणि लॉर्ड वरचे पझल गेम्स खेळायचे Wink

विंटर आणि हॅपॉ, काहितरी रिलेशन असावं, इतर वेळि थंड पडलेला धागा हिवाळ्यात सुरु होतो, आणि पुन्हा पुस्तकं वाचायची इच्छा होते. मी दोन वेळेस वाचलिये हि सिरिज, आणि दोन्ही वेळेस हिवाळ्यातच.

@ चैत्रगंधा
पुस्तकात असा उल्लेख नाही ! पिक्चर मध्ये दाखवलं फक्त !

@ पायस
बरोबर , तुमचा मुद्दा पटला !

धन्यवाद सगळ्यांनाच.
हॅरी, नेविल लंडन मधे आणि मी भारतात एकेका दिवसाच्या अंतराने जन्मल्याने त्यांच्याशी एक बाँड आहे. Proud
मला एकदा मिनिस्ट्री मधे जाऊन माझ्या नावाची प्रॉफसी शोधायची आहे (फुटली नसल्यास) Wink

आजच हॅरी पॉटर सिरिजचे सातवे व शेवटचे पुस्तक वाचुन झाले..खर म्हणजे ऐकुन झाले.. मी सातही पुस्तके जिम डेलच्या आवाजात ऑडियो बुक्सच्या द्वारे ऐकली.

या अप्रतिम सिरिजविषयी व जे के रॉलिन्ग्सच्या शैली विषयी शब्दच नाहीत! काय तो गोष्टविस्तार..काय ते कॅरेक्टर डेव्हलपमे.न्ट.. लाजबाब... आणी जिम डेलच्या आवाजात ते सगळे ऐकायचे म्हणजे एक पर्वणीच होती.. त्याने सोने केले आहे त्या पुस्तका.न्चे!

मी ही पुस्तके वाचायला इतकी वर्षे का वाट बघीतली याचे उत्तर मीच शोधत आहे!

मला एकाच प्रश्नाचे उत्तर अजुन मिळाले नाही.. गॉडरिक ग्रिफे.न्डॉरची तलवार तर ग्रि.न्गॉटच्या बॅ.न्केत गडबडीत राहुन गेली असते... मग नगीनीला मारताना सॉर्टी.न्ग हॅटमधे नेव्हिल लॉ.न्गबॉटमला ती तलवार कशी सापडते?

( अनुस्वार का देता येत नाहीत :( )

Pages