बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त झाला कालचा टास्क... असं खेळायचं नाहितर आपले लोक.. किती तो कलकलाट होता फुकाचा.. नेहा, करण मस्त टिकुन राहिले.

सुशांत राजेश रेशमने नाटकं केली अति. जुई स्मिता लढत होत्या, पण ह्या लोकांचे ऐकत बसायच्या ही मोठी चूक त्यांची.

त्यात जुई बाई जाम किरकिऱ्या होत्या त्या गेल्यावर, सईबाई जाम किरकिऱ्या झाल्या. टास्क नाही एकंदरीत.

नेहासाठी हिंदी बघावं की काय अधूनमधून हा विचार करतेय.

नेहासाठी बघण्याइतकी ती दिसत नाही अन्जु, पण आता या टास्क नंतर ती बर्यापैकी पॉप्युलर झाली आहे, पुढेपुढे नाही करत पण सेन्सिबल बोलते !
या आठवड्याचे अ‍ॅग्रेसिव टास्क चे २ दिवस नक्की पहा !
आत्ता तरी चॅनल आणि ऑडीयन्सची फेव दीपिका आहे, ती सर्वात स्ट्राँग , थोडी बॉसी आणि सर्वात जास्त दिसते , बघुया पुढे काय होते पण आहेत्या स्पर्धकात ती एकटी विनर मटेरिअल दिसते.

दिपिका मेघासारखी आहे का?
नेहा मलासुद्धा स्मिताची स्ट्रॅटेजी घेऊन खेळत असल्यासारखी वाटली.

दिपिका पण मला आवडते. पण हा टास्क तिने गिव्ह अप केला जो करणवीर आणि नेहाने छान खेळला असं मी बघितलं युट्युबवर.

केबिसी सोडवत नाहीये मला. त्याचवेळी हे असतं नेमकं.

अन्जु,
देशातही एपिसोड्स रेकॉर्ड करायची फॅसिलिटी आहे ना ?
आईकडे टाटा स्काय वर आहे डीव्हीआर .

हो असते पण माझ्या केबलवर नाहीये. वुटवर बघेन मधेच, विशेषत: नेहा, करणवीर टॉर्चर टास्क बघायचाय. रात्री साडेअकराला रिपिट असतं टीव्हीवर, पण तेव्हाही नाही जमत. आता बघेन वुटवर.

बघितला मंगळवारचा एपिसोड.

नेहा, करणवीर ग्रेट. दीपिका थोडीशी उठलेली दिसली म्हणून तिला बाद ठरवलं ते बरोबर होतं का, हेच समजत नाहीये मला. मला वाटतं संचालक पार्शल होते.

सृष्टीची वाट लावली, संचालक काही बोलले नाहीत तेव्हा. तिच्या नाकातोंडात साबणाचं पाणी सतत उडवत होते ते जरा अति वाटलं.

श्रीशांत सतत अशांत होत होता, दीपिका त्याला शांत करत होती. फार फनी वाटायला लागलं नंतर नंतर हे.

पुढचा एपिसोड टाकला नाहीये अजून voot वर.

आमच्याइथे यु.एस ला छोटा एपिसोड दाखवतात का शंका आहे, सृष्टीचा टॉर्चर दाखवलच नाही, पुन्हा पुन्हा रिवाइंड करून शोधल मी पण नव्हतं.
ट्रेलर मधे पाहिल होतं पण अ‍ॅक्चुअल एपिसोड मधे नाहीच !
मराठी बिबॉ ९० मि असायचं, हे १ च तास, त्यात अ‍ॅड्स !

बिग बॉस हिंदी एक तासचं असते. voot वर तर ४५ मिनिटं असतं.

नेहानंतर श्रीष्टी का सृष्टी ती बसली होती task साठी. साबणाचे पाणी होतं ते बहुतेक, तिच्या नाका तोंडात गेलं म्हणून ती उठली.

हो दीपिका बर्यापैकी मेघा सारखी आहे, टॉप३ मधे नक्की.
बेसिकली हा जिंकायचा सेट फॉर्म्युला दिसतोय, अ‍ॅग्रेसिव्ह असणे -बॉसी असणे, घरामधे बरेच लोक अगेन्स्ट गेले तरी प्रसंगी वाइटपणा घेणे, सतत सगळ्यावर स्टँड घेणे, एखाद्या स्पर्धकाशी जिवाभावाची मैत्री करणे, कॅमेरासमोर सतत दिसणे, किचन मधे अ‍ॅक्टीव्ह वावर, ऑडीयन्सला सगळ्या प्रकारची इमोशन्स दाखवत रहाणे :).
तरीही दीपिका आणि मेघात मेन फरक असा कि मेघा फेमस अजिबातच नव्हती , पोटेन्शिअल विनर म्हणून कोणी दखलही घेतली नवह्ती पण दीपिकाकडे डे १ पासून फोकस आहे !
बरेच लोक अ‍ॅक्चुअली दीपिकाला हिना खानशी सुध्दा कंपेअर करतायेत, बहुदा खूप बॉसी आहे म्हणून पण मी पाहिला नाही मागचा हिन्दी सिझन त्यामुळे मला माहित नाही नक्की का ते !

आम्हाला आज यु.एस मधे पुन्हा शॉर्ट एपिसोड Uhoh
शिवला टॉर्चर केलेलं आज दाखवलच नाही, इतरही टॉर्चर्स उरकल्यासारखे दिसले , टिझर मधे टास्क आणि टॉर्चर्स खूप डिटेल्स दाखवले होते.
टॉर्चर टास्क मधे श्रीशन्तचं अ‍ॅग्रेशन पहायला आवडल असतं पण आज श्रीशान्त पुन्हा व्हॉयलेन्स सहन होत नाही म्हणून आतमधे जाऊन बसला, त्याला बिबॉने सुट दिली आहे मागच्या आठवड्यापासून टास्क्स करायला, मला वाटतय त्याला अँगर मॅनेजमेन्ट इश्युज असावेत !
नेहा खूप पॉलिटीकली करेक्ट खेळतेय, बॅड बुक्स मधे नाही आली ऑपॉनन्ट्सला छळूनही , सबा खानला जाऊन सांगून आली कि मी तुझ्याशी इथून पुढे कामापुरतच बोलेन , फार फ्रेंड्ली नाही राहु शकत “जो लोग मेरे अन्दरकी हैवानियत जगाते है, उनसे मै डिस्टन्स रखती हूं’
सबाला ते पटलं चक्क!
सृष्टीचं झोपेत चालणं मला प्लॅन्ड वाटलं, इंट्रो मधेच तिने या सवयीबद्दल/डिसॉर्डर बद्दल सांगितलं सांगितल तेंव्हा मला वाटल याचा बराच फ॑यदा घेता येईल तिला Proud

नेहा स्ट्रॉंग वाटली. दीपिका शेवटपर्यंत जाईलस वाटतंय! पहिल्यापासूनच आवडतेय ती!
खान बहिणी किरकीर्या आहेत. Kriti मध्ये फायटिंग मटेरियल आहे. मला बॉसी तर kriti वाटतेय.

तीनजण कसे गेले. आयदर जोडी किंवा सिंगल जायला हवे होते ना.

खान सिस्टर्स पहिल्या जायला हव्या, खूप भांडतात असं वाटतं.

ह्या वरच्या दोघी परवा पार्शल वाटल्या. रोमी दिसायला छान आहे, केस मस्त आहेत.

जोडी मधला एक कसा जावु शकतो.. गेले तर दोघे जाणार..
मलाहि ती कृति आवडते.. अन रोमिल बोलतो बरोब्बर..

पण क्रिती आणि रोमी पार्शल होत्या ना? त्या दिवशी दिपिका जरा उठली तर बाद केलं, नंतर तो टोकदार मिशीवाला उठला जोडी टास्क असताना तर बाद नाही केलं त्याला.

कॅप्टन नेहा झाली. >>> थँक यु कविता.

भावना ताई मी fb वर बघितल की romil and त्याच्या partner मधून एकाला सांगतात जायला.
दोघ आपसी सहमती(bb चा शब्द) मधून तो हवालदार जातो

हो मलापण हे पटलं नाहि..
नेहा कॅप्टन झाली.. खरं तर सॄष्टीला व्हायचं होतं.. ती सोमी बरोबर तेच बोलत होती. फायटर नाहि वाटत ती रडु वाटते.
कऊ पण मग जोडी अन सिंगल हि संकल्पनाच रद्द होते इथे.. अस नसणार.. आज असेल एविक्शन.. आजचं अगोदरच कस कळलं

Pages