बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी विकेंड डाव बघेन, बोअर नाही झाला तर.

रोज बघावं असं वाटत नाही एकंदरीत. केबीसीच बरं वाटतंय.

ह्यावेळी कॅप्टन कोण आहे.

मेघा नाहीच कोणी ह्यात.

मागच्यावर्षी शिल्पा सॉलिड होती ऐकलेलं, मी नव्हतं बघितलं. तिलाच मेघाने follow केलं असंही म्हणत होते.

मी विकेंड डाव बघेन, बोअर नाही झाला तर.>>> त्यालाच जास्त बोअर व्हायला होतं. कारण हे सगळे मंदांचे शिरोमणी बोलायला काही इंटरेस्टिंग ठेवतच नाहीत. सलमानसुद्धा कंटाळतो.

मी कधीच BB पाहिलं नव्हतं . मराठी BB पहिलं आणि एन्जॉय हि केलं . त्यामुळे BB १२ बघत आहे. दिपांजली खूप छान कंमेंट्स !!
सुरभी जरा वेडीच दिसत आहे. आल्या आल्या तिने राडे सुरु केले आहेत .
रिंग टास्क मराठी BB मध्ये किती मस्त झाला होता . मेघा , सई ची आठवण आली बघताना आणि थत्ते आणि रेशम ची पण !

बारकाईने घराचा प्लॅन २ आठवडे बघत आहे आणि केलेले बदल आता चांगले कळले आहेत मला Happy
क्षेत्रफळ वाढवलं आहे बरंच .
डिझाईन इतकं चेंग केलय कि मराठी BB घराची ओळख खूप थोड्या ठिकाणी पटते .
घराची ऊंचीही ( ceiling height ) वाढवली आहे असं वाटतंय

विकेन्डचा वार फालतु आहे हिन्दीमधला, एक तर सलमानखान कडून इतकी अपेक्षा होती, इतकं ऐकल होतं, इथे काहीच अ‍ॅग्रेश्॑न, एन्टरटेन्मेन्ट दिसत नाहीये !
अर्धा वेळ अपकमिंग फिल्म्स प्रमोशन्स मधे जातो, उरलेल्या काही मिनिटात काहीतरी गेम्स, सुलतानी आखाडा !
हाउसमेट्सच्या बिहेविअरबद्दल, टास्क बद्दल काहीच नाही बोलत सलमान, जे बोलला ते अगदीच गुळमुळीत बोलला श्रीसन्तला !
btw मला हाउस्स्मेट्सचे हिन्दी अ‍ॅक्सेन्ट्स ऐकायला मजा येतेय, श्रीसन्तचा साउथ इंडीयन अ‍ॅक्सेन्ट , दीपकचा बिहारी , सुरभिचा हिमाचली आणि रोमिलचा अस्सल हरियाणवी अ‍ॅक्सेन्ट !
सुरभि कशीका असेना, कितीही निगेटिव जंगली इ. वागली तरी इतर लोक श्रीसन्तची मर्जी सांभाळत असताना ती पंगे घेतेय हे ही नसे थोडके, कालकोठरीत् पाठवले गेल्याने श्रीसन्त भांडत होता तिच्याशी बहुदा, ती म्हणे " श्रीसन्त होगा अपने घरपे, तू बाहर निकल , तेरे थुक जा जवाब थुक से दूंगी xxxx" वा वा वा टाळ्या !
इतर घरवाले इतके दिवस स्ट्राँग मैत्री किंवा दुश्मनी काहीच ठेवत नव्हते, सेलिब्रिटीज फारच इमेज कॉन्शस, सॉरी म्हणून वाद संपवत होते, गान्धीवादी शान्तता प्रस्थापित करत होते गेले ३ आठवडे !
पण जोवर कोणी स्ट्राँग्ली निगेटिव जात नाही , खुन्नस कॅरी करत नाही तोवर कोणी हिरोही बनु शकत नाही अशा गेम मधे, त्यामुळे सुरभि आवडो न आवडो अशी भडकाऊ व्हिलन कॅरॅक्टर्स नक्कीच लागतात शो मधे.
नेहा आता दीपिकाच्या इन्फ्लुअन्स्मधून बाहेर पडतेय आणि चांगला खेळती आहे गेम, तिचे ड्रेसेस पण फार मस्त असतात.
तिची स्टायलिस्ट सुध्दा रिचा आहे, जी मराठी बिबॉ मधे स्मिता गोन्द्करची स्टायलिस्ट होती.
या सिझनमधे नेहा, सृष्टी, कधीतरी जस्लीन सोडून इतर घरातले लोक फार अजागळ बॅड्ली ड्रेस्ड फिरतात, हर्षित या रिव्ह्युअर् चा हा व्हिडीओ नक्की पहा भयानक फॅशन सेन्स बद्दल Biggrin
https://youtu.be/MOwjo8ojsbE

हर्षित या रिव्ह्युअर् चा हा व्हिडीओ नक्की पहा भयानक फॅशन सेन्स बद्दल >>> Lol

कोथळा टाईप कुर्ता हे तर सॉलिड, ह ह पु वा Lol

कोठळा म्हणाला का कोथळा. कोठीवरून कोठळा असेल, मे बी गुजराथी किंवा हिंदी शब्द.

गुज्जु आहे हर्शित, बिबॉ मराठीही मस्तं रिव्ह्यु करायचा, टिपिकल गुज्जु अ‍ॅक्सेन्ट मधे.
सगळ्या फिमेल कॉन्टेस्टन्ट्सना बेन म्हणतो, खूप फनी क्युट आहे तो.
एकदा सगळे हाउसमेट्स मेघाच्या अगेन्स्ट गेले होते , मांजरेकरही तिला ओरडले, त्यावेळी बिचार्यानी रडत रडत व्हिडिओ टाकला होता.

गुज्जु आहे हर्शित, बिबॉ मराठीही मस्तं रिव्ह्यु करायचा, टिपिकल गुज्जु अ‍ॅक्सेन्ट मधे. >>> हो गुज्जू आहे हे लक्षात येतं पण मराठीच्या वेळी करत होता हे नव्हतं माहिती. मज्जा आली असती बघायला.

मी आज लावलेलं पण कित्ती तो टाईमपास गोविंदा आणि त्याचा, bored.

नेहाचं चुकलं होतं का, सोमीबाबत. तिला बोलत होता सलमान. नंतर मी बंद केला tv. मध्ये काहीतरी कोणाला काही बाही विशेषणे देत होते.

नेहाने सोमीला डिस्क्वालिफाय कालं होतं एका चुकीनंतर..तेही क्लिअर वाॅर्निंग न देता...उलट सुरभीने सोमीपेक्षा जास्त चुका केल्या होत्या आणि खूप आरडाओरडा पण केला होता...तरी नेहाने सुरभीला डिस्क्वालिफाय न करता सोमीला केलं...म्हणून सगळेच तिच्या विरोधात गेले.

पण त्याआधी सोमीलाच जिंकवण्यासाठी नेहा प्रयत्न करत होती पण सोमीने तिला धुडकावून लावलं आणि उलटसुलट बरंच काही बोलली पण...नेहाने केलं ते रागाने पण केलं असेल पण चुकीचं नाही वाटत मला.

केली एकदाची पाहायला सुरुवात. कॉमनर्स जोड्या आणि सेलिब्रिटी हे कळालं. सेलिब्रिटी मध्ये एक जण आजिबात माहित नाही. कॉमनर्समध्ये कोणीच माहित नाही. जो एपिसोड पहिला त्यात नुसता कल्ला चालला होता. भांडकुदळ बहिणी कचाकचा भांडत होत्या जो दिसेल त्याच्याबरोबर .
त्या जेलमध्ये जायला आधी हसी-खुशी तयार झालेले तिघे अचानक नंतर का पाठवलं म्हणून भांडायला का लागले ते कळलं नाही.
ते प्रेमी जोडपं अगदीच विजोड आहे. अगदी काहीही चाललं होतं. बीबॉने त्यांना लगेच डेटवर पण पाठवलं.

त्या जेलमध्ये जायला आधी हसी-खुशी तयार झालेले तिघे अचानक नंतर का पाठवलं म्हणून भांडायला का लागले ते कळलं नाही.>>>> "महान" बनायला गेले होते. नंतर अंगाशी आलं सगळं म्हणून भांडत होते. थोडक्यात रडत होते.

पहिल्यांदाच पहातेय हा सिझन पण कसला बायस्ड वाटला सलमान खान/बिबॉ !
आजही दीपिका, खान सिस्टर्स ना फेवर केलं त्यानी.
खान सिस्टर्स तर नुसत्याच कांगावाखोर.. फक्त आरडाओरडा करतात!
ती सुरभि सुध्दा लाउड शिव्या देणारी अस्स्ली तरी ती मात्र अ‍ॅक्चअली अतिशय चलाख , सगळ्यांच्या स्ट्रॅटजीज ओळखून असणारी, उडती चिडीयाके पर गिननेवाली वाटते !
नेहा मला तिच्याजागी बरोबर वाटली, वेट ट्रेनिंगचा मुद्दा काढून तात्त्पुरत का होईना गप्प केलं तिने सलमानला पण मग शिवने रिंग पकडताना हात बदल्याचा मुद्दा आणला सलमाननी आणि नेहाला गप्प बसाव लागलं !
इतक ऐकून होते कि मागच्या सिझन्स बद्दल कि कोण ते झुबेर खान , प्रियांका जग्गा इ लोकांना बिहेवियर वरून डायरेक्ट घरातून हाकलून दिलं होतं सलमाननी , आता काय झालं या सिझनला ? Uhoh
वीकेन्डचा वार फॉरवर्ड करतच पाहिला, फार काही दम नाहीये निदान या सिझनच्या सलमान खान मधे, यापेक्षा मांजरेकर बरे म्हणायची वेळ आली.

अनुप सीक्रेट रूम मध्ये
आणि Jasleen shivashish च्या close
हे marathi bigg boss सारख वाटलं
^o^

Jasleen ने रोमिल ला live in relationship मध्ये राहून property वर हिस्सा मिळवता येतो का असच विचारलं होतं ना??

कोण गेलं ह्यावेळी.

नवीन Submitted by अन्जू on 8 October, 2018 - 01:20>>
कोणीच नाही...
Jasleen आणि अनुप जाणार अस सांगितल सलमान ने,
आणि त्यांच्या पैकी कोणीतरी एक bb house मध्ये राहू शकतो हे पण सांगितल
मग अनुप जी गेले घराबाहेर... (अस बाकी सर्वांना वाटतय पण ते सीक्रेट रूम मध्ये आहेत)
जोडीत फुट पडू शकते या....

हो ऑनलाइन सगळिकडे पब्लिक नेहाला भरपूर सपोर्ट करत आहे आणि या आठवड्यात तिचे कट्टर फॅन्स अजुनच जास्त वाढलेत, मला माहित नव्हत्/वाटलच नव्हतं तिला इन्स्टाग्रॅमवर इतके फॅन फॉलॉइंग असेल, आधी पासूनच 650k च्या आसपास होते, आता 700k क्रॉस केलेत.

एवढे आहेत बापरे.

मी इन्स्टावर नाहीये, मी फॅन वगैरे नाही तिची पण कुतूहल मात्र आहे, काय करतेय, कशी जातेय पुढे.

Pages