बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो...चांगला केला...एकदम ग्रेसफुल वगैरे नव्हता पण कमी वेळात थोडीशी प्रॅक्टिस करून बरा केला...अॅथेलेटिक आहे ती.

हो, अजिबात व्हल्गर नव्हता तिचा पोलडान्स, खूप ग्रेसफुल !
इथे नेहा खरच खूप स्लिम दिसतेय, मला आठवते ती मराठीत पाहिलेली नेहा बर्यापैकी गुटगुटीत बालिका होती.
जस्लीन मात्र काही घाला, चीप दिसते !
भारतीने फार मजा आणली काल, सगळ्यांवरच भारी जोक मारले पण सगळ्यात दीपकला मस्तं शालजोडीतले टोमणे सुनावले Proud
सलमानला इंटरेस्ट नसेल तर घरी पाठवा आणि भारतीला टेक ओव्हर करु द्या शो !
बाकी एलिमिनेशन बद्दल आणि सिक्रेटरुमबद्दल नो कॉमेंट्स.
एक तर जबरदस्तीने जुळवलेली जोडी आणि त्यांचं खोटं खोटं प्रेम, मग लुटुपुटुची भांडणं, रुस्स्वे फुगवे , ब्रेकप आणि आता अनुपजलोटाचे सिक्र्र्टरुम मधे जाऊन जस्लीनची जासुसी करणे, शिवाशीष बरोबर अफेअर, रॉमिलला कायद्याचे सल्ले विचारणे ( लिव्हिन मधे प्रॉपरटीचा हक्क मिळतो का वगैरे )हे सगळं खोटं आहे, ऑडीयन्सला मूर्ख समजतात बिबॉ !
खरंखुर प्रेम असेल तर गोष्टं वेगळी , पण इथे तिचे वडिलच कबुल करतायेत कि आम्हाला कल्पना नवह्ती याची, शॉकिंग आहे वगैरे !
त्यामुळे ६५ वर्षांच्या अनुप जलोटाला २७ वर्षाच्या जस्लीन बरोबर खोटं खोटं प्रेम पहाताना पिडोफिलिआ आहे असं वाटतं Uhoh
जाउद्या झालं , जलोटा गझल गायकही आहेत तेंव्हा बसु देत त्यांना हार्मोनियमवर खोटं अ‍ॅक्टींग करत गात “ ना उम्र कि सीमा हो, ना जन्मोंका हो बंधन “

नाही, भारती नवीन शो ‘इंडीया हॅज गॉट टॅलेंट’ प्रमोट करायला आली होती, ती त्या शो ची होस्ट आहे म्हणून तिनी घरात शिरून बिबॉ गॉट टॅलेंट शो केला.

हे जसलिन-अनुप प्रकरण पूर्ण खोटेपणा आहे. अनुप जलोटांकडे सध्या काम नसेल, तेव्हा त्यांना थोडे जास्त पैसे आणि लाइमलाईट आणि जसलिनला एक एक्पोजर देण्यासाठी हे सगळं चालू आहे. आता तिकडे सिक्रेट रूममधे अनुप देवदास मोडमधे जसलिनच्या प्रत्येक हालचालीवर टिप्पणी करत बसणार. Uhoh so childish.
सलमानने खरंच सोडून द्यावा शो आता. एवढ्या अरसिकतेने शो करायची अजिबात गरज नाही.

सगळे सलमानचं कौतुक करायचे मराठीच्या वेळी, म्हणून मी वीकेंड तरी बघुया ठरवलं तर पुचाट एकदम. मराठी वीकेंड चांगलं होतं यापेक्षा.

होना, मी इतकी स्तुति ऐकली होती वीकेन्डच्या वारची, आता वाटतय आपण बघायला सुरवात केली म्हणूनच खराब होस्टींग करतोय सलमान Proud
शनिवारी वीकेन्डचा वार यावेळी तर ७०% गोविंदाच्या प्रमोशनने खल्ला !
भारती होती म्हणून मजा आली १५-२० मिनिटं रविवारी.
इथून पुढे मांजरेकरांना कोणी नावं ठेवणार नाही नक्की !

होना, मी इतकी स्तुति ऐकली होती वीकेन्डच्या वारची, आता वाटतय आपण बघायला सुरवात केली म्हणूनच खराब होस्टींग करतोय सलमान Proud
शनिवारी वीकेन्डचा वार यावेळी तर ७०% गोविंदाच्या प्रमोशनने खल्ला !
भारती होती म्हणून मजा आली १५-२० मिनिटं रविवारी.
इथून पुढे मांजरेकरांना कोणी नावं ठेवणार नाही नक्की ! >+++१११११११११११

भारती होती म्हणून मजा आली १५-२० मिनिटं रविवारी. >>> बघायला हवं voot वर.

मला आत्ता youtubeवर समजलं नेहा nominated आहे, मी vote दिलं तिला.

इथून पुढे मांजरेकरांना कोणी नावं ठेवणार नाही नक्की >>> Lol

Mid-week elimination की काय ते चाल्लंय बहुतेक. श्रीसंत, केव्ही आणि नेहा नाॅमिनेटेड..."महानता" टास्क मुळे...:अओ:
श्री गेला तरी चालेल..नाहीतरी सारखा रडतच असतो...मला घरी जायचंय...घरी जायचंय...पण मग त्याच्याइतका राडा करणारं कुणी उरणार नाही. केव्ही पण जवळपास भांडकुदळच आणि डिप्लोमॅटिक. बिबाॅमधे राहण्यास परफेक्ट्ट.
बिचारी नेहाच जाते की काय आता.. Sad

हो ना.

सुरभी राणाने काहीतरी राडा केलाय ना, तिला काढायला हवं. यु ट्यूबवर बघितलं आणि हे तिघे राहूदेत.

नाहीतर कोणाला काढणार नाहीत, अनुप जलोटा बरोबर सिक्रेट रूममध्ये ठेवतील.

सध्या दिपकची पार्टनर ऊर्वशी invisible आहे. गेली तरी हरकत नाही. बाकी आग लावणारे, त्यात तेल घालणारे आणि शेवटी राखेवर पाणी ओतणारे राहूदेत. त्याशिवाय 3 महिने निघणार कसे ना..
सुरभी अजूनतरी जाणार नाही. Main content तीच देते ना दिसेल त्याच्याशी उच्चकोटीचा वाद घालून आणि मग रडून. कधीकधी वाटतं पोरीला अॅटॅकबिटॅक यायचा एवढा किंचाळून. Uhoh पण नाही. ती तीची स्ट्रेन्ग्थच आहे बहुतेक.

यावेळी मिडवीक एव्हिकशन असणारे म्हणे, मलाही नेहाचीच चिन्ता वाट्तेय , तिला फॅन फॉलॉइंग आहे पण करणवीर आणि श्री ला तिच्यापेक्षा जास्त !
अशीही चर्चा आहे कि जो कोण जाईल तो अनुप जलोटाबरोबर सिक्रेट रुम मधे जाणार म्हणून !
खरं तर सिक्रेटरुममधे जायला श्री परफेक्ट आहे, पण पब्लिकचा अतिप्रचंड सपोर्ट आहे त्याला, व्होट आउट नाही होणार तो.
परवा त्याच्या बायकोचा व्हिडिओ मेसेज दाखवला , सांगत होती ती कि सारख सारख क्विट करायची भाषा करत जाउ नको वगैरे , चांगल वाटत नाही, मग श्री इमोशनल झाला, वाटल आता सुधारला.. पण कसल काय, दुसर्या दिवशी पुन्हा पलथ्या घड्यावर पाणी, काय तर त्याने बनवलेला टिशुपेपरचा बॉल बिबॉने घराच्या आत खेळु नका सांगितलं, खेळायच सामान परत मागितल म्हणून कांगावा आणि घरी जायच्या धमक्या Biggrin
किती रड्या आहे, अजिबात स्पोर्ट्समन्शिप नाही.. म्ह्स्णे बीसीसीआयने माझ्याकडचा बॉल काढून बॅन केला आता बिबॉही बॅन लावतय म्हणत बाथरुममधे रडत गेला, दरवाजा बन्द करून भींतीवर लाथा वगैरे मारत बसला.. बिबॉ ने बॉल मागितला तर डिस्ट्रॉय करून दिला.. अवघड आहे !
सलाम त्या धोनीला , कसे असे अनेक प्लेयर मॅनेज करताना इतका कुल राहु शकतो Happy
बायकांना कमजोर समजून सो कॉल्ड रिस्प्केटच्या नावाखाली हा येडा गेम गिव्हप करतो, जर समोर एकच फिमेल प्लेयर राहिली तर.
अ‍ॅज इफ त्या जिंकुच शकत नाहीत याने गिव्हप केल्याशिवाय !
तरी अत्ता पर्यन्त २दा सलमानने यावरून सौम्य शब्दात सुनावलय त्याला, तरी आज म्हणे पुन्हा तेच केलं, शेवटी हा आणि सोमी उरले होते तर जिंकु दिलं तिला.
काही म्हणा बिबॉला एन्टरटेन्मेन्ट आणि कन्टेन्ट खूप देतोय श्री, नाही घालवणार त्याला !

श्रीशांत जाईल...
कारण सुरभीच्या बोलण्यावरून तरी तसाच अंदाज येतोय..

https://www.youtube.com/watch?v=Gx208yqrdzA

मला वाटलेलं तेच होणार बहुतेक, बाहेर जाणार नाही कोणी, सिक्रेट रुममधे ठेवणार. श्रीशांतला ठेवणार, जलोटांबरोबर.

अगदी खरोखरचा घराबाहेर गेला तरी चालेल श्रीशांत. एवढा स्पोर्टपर्सन असूनपण जराही स्पोर्टींग स्पिरीट नाहीये त्याच्यात. एकही टास्क नीट केलेला नाही. नुसता संतापून आदळाआपट करतो. आणि काय तर म्हणे ही माझी स्ट्रॅटेजी आहे. Uhoh
बाकी अर्ध्यांना घाबरवून आणि अर्ध्यांना त्याच्याच बिपीचं टेन्शन देऊन ठेवलंय.

अरे हा,
सिक्रेट रूम मध्ये दोन बेड आहेत..
ते का याच कारण आता समजलं..
Lol

https://www.youtube.com/watch?v=EpiI_acwFNI

नेहाची तब्येत बिघडली, ती बाहेर जाणार म्हणतायेत इथे. कशाला जायचं तिने, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायचे आणि परत यायचं.

अफवा पसरवणार्या भरपूर लिंक्स आहेत, नेहाला चक्कर आली होती पण तिने त्यानंतर अ‍ॅक्टिव्हली टास्क केल॑, सो लुक्स लाइक शिइज फाइन.
रिअल अपडेट बॉलिवुड स्पाय, एकल्॑व्य स्टुडीओ किंवा ट्विटर वर ‘द खबरी’ ही अकाउंट्स देतात.
सो.... खरी बातमी हीच कि श्रीसन्त इन सिक्रेट रुम, मोअर ड्रामा, मोअर श्रीसन्त इमोशन्स, अब आयेगा मजा.. बिबॉ ने त्याला डायरेक्ट डीक्टेटरशिप टास्क मधून डिक्टेटरची ग्रँड रिएंट्री द्यावी, मज्जा येईल ! Biggrin
बिबॉने पुन्हा फिरकी घेतली, इन हाउस वोटींग घेतलं आणि सांगितलं कि तुमच्या मताप्रमाणे एव्हिक्शन ठरवा , मेजॉरीटी लोकांनी वोट्स देऊन नेहाला वोटाउट करायच ठरवलं, पण बिबॉ इज बिबॉ !
सगळी मतं ऐकून म्हणे आम्ही पब्लिकच्याच वोट्स्ने डिसिजन घेणार, ज्यात नेहाला हाय्येस्ट वोट्स मिळाली .
थोडक्यात काय, कमी अ‍ॅग्रेशनने खेळत असली तरी नेहा इज ऑन राइट ट्रॅक, श्री आणि करणवीर असताना पब्लिककडून हाय्येस्ट वोट्स आणि हाउसमेट्सना मात्र ती नको असणे, गुड साइन !
फक्त आता तिने तिच्या स्टाइलने पंगे घ्यायला हवेत ज्यांनी तिला वोटाउट करायच ठरवलय त्यांच्याशी, बिबॉ पुन्हापुन्हा हिंट्स देतायेत तिला.. मागेही कॉलर ऑफ द वीकच्या निमित्ताने श्री-दीपिका तिच्या मागे काय बोलले ऐकवल तिला.

आजचा एपिसोड नाही पाहिला, नेहाच्या टिमने ट्विट केलं होतं, एका प्रोमोत दाखवलही आहे.
द खबरीने ट्विट केलय त्यानुसार आता परत बिबॉ ट्विस्ट पे ट्विस्ट, अजुन एक एव्हिक्शन म्हणे वीकेन्डला, खरंखुरं, आता पुन्हा नेहा वर्सेस करणवीर वोटींग Uhoh

अता फायनली नेहाला काढलं म्हणे, रविवारी दाखवतील.
प्लॅन्ड एव्हिक्शन, कारण सेलेब्रिटी असल्याने भरमसाट चार्जेस , पण त्या तुलनेने ती त्यांना हवे तसे कन्टेन्ट , ड्रामा नवह्ती देत.
तिला बर्याच हिंट्स दिल्या होत्या , श्री-दीपिका विरिध्द भडकवूनही दिले बिबॉ ने काही कन्टेन्ट देईल म्हणून, पण ती फ॑रच संतुलित सौम्य बोलते.
ती जर कॉमनर्स बरोबर नॉमिनेटेड असती तर गेली नसती म्हणून बुधवारनंतर वोटींग लाइन पुन्हा ओपन करून फक्त ती आणि करणवीर ठेवले नॉमिनेटेड.
बाकी आता जोड्या फुटणार आणि सगळे इंडीव्ह्युजिअली खेळणार म्हणे.
यावेळी श्रीसन्त किंवा कोणी कॉमनर जिंकेल बहुदा शो, मला तरी मेघा सारख कोणी विनर कॅटॅगरी म्हणून अजिबातच नाही आवडलय इथे .. एखाद्या एपिसोडमधे कोणीतरी बरं वाटतं, श्री करमणूक करतो इतकच !

अता फायनली नेहाला काढलं म्हणे, रविवारी दाखवतील. >>> मग आधीच काढायचं होतं की. माझ्यामते फार लवकर काढलं तिला. ती task चांगला करायची ना. श्रीशांत कुठे करतो, तो सारखा घरी जातो मी करत असतो. अनुप जलोटा तर मला बोअर वाटतात. एकंदरीत bb चं बोअर आहे. मी दोन दोन मिनिटांच्या क्लिप्स बघते youtubeवर.

परवा youtube वर सबा आणि सृष्टीमधला राडा बघितला दोन मिनिटं.

मोस्टली दीपिका, करणवीर जातील फायनलमध्ये.

मी एकच एपिसोड पाहिला. त्यात अर्धा तास एक माणुस डोकं भादरताना दाखवला. काही संवाद नाही, चर्चा नाही, भांडणे नाहीत. अगदीच बोअर झाले.

हो, फार लवकर काढलं नेहाला, टास्क बेस्ट करायची, अत्ता कुठे ओपन होत होती, पण ठाम मतं मांडायची नाही, राडे करायची नाही, एकदाही रडली नाही शो मधे , थोडक्यात त्यांच्या दृष्टीने झीरो कन्टेन्ट !
बुधवारीच काढल असत तर श्री सिक्रेटरुममधे कसा गेला असता ना ?
त्याला सिक्रेटरुममधे पाठवणे आणि त्यानी दीपिकाच्या विरुध्द जाणे हाच ट्विस्ट हवा होता बिबॉ ला, थोडक्यात एक स्ट्राँग हिरो श्री -एक स्ट्राँग व्हिलन दीपिका.
दीपिका आता पूर्णच निगेटीव जाणार, तिला सगळे सेल्फिश , मित्रांचा वापर करून घेणारी वगैरे टॅग देतायेत, तेच फुटेज मुद्दाम श्री ला दाखवतायेत.
तिने श्रीसन्त चे नाव घेतले तिथे खुद्द बिबॉ च निगेटीव दाखवायला लागले तिला.
खरं तर दीपिकाचं लॉजिक तिथे बरोबर होत कि जो माणुस सारखा जायचय म्हणतो त्याला निवडलं, तिघही मित्रं होते पण एकाच नाव घेणं भाग होतं.
पण श्री रड्या आहे, जायचं जायचं रडतो/धमकावतो पण कोणी नॉमिनेट केलं कि चिडतो.

Pages