मायबोली गणेशोत्सव २०१८ - "आमच्या घरचा बाप्पा"

Submitted by संयोजक on 12 September, 2018 - 05:28

अनंत कोटी रूपे तुझी
अनंत कोटी नावे
कुठल्याही रूपांत
तू मनास भावे

अलौकिकतेने धन्य तुझी मूर्ती
पसरलेली विश्वात तुझीच किर्ती
नको काही आम्हास शिवाय कृपादृष्टि
असु दे छायेत तुझ्या ही सारी सृष्टी

IMG-20170824-WA0003.jpg

वाजत गाजत ,थाटामाटाने गणराजाचे आगमन झालेले आहे. घरच्यांनी मोठ्या हौसेने सजवलेल्या मखरात मूर्ती विराजमान आहेत. निरांजनाच्या , समईच्या प्रकाशात बाप्पांचा चेहरा आणखीन उजळून , झळाळून निघालाय. या देखण्या मूर्तीची , मखराची, तुम्ही केलेल्या सजावटीची, रोषणाईची प्रकाशचित्रे आणि माहिती इथे द्या.
त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१८' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.

Group content visibility: 
Use group defaults

सगळे बाप्पा पाहून प्रसन्न वाटलं.

हा घरचा. डेकोरेशन च्या झिरमिळया प्लास्टिक आहे गेली 5 वर्षे तेच वापरतो.फुलांची महिरप मागच्या वर्षी आणलीय.
IMG_20180913_161601_1.jpg

माझा बाप्पा.
4A657D37-3A7C-4511-AE1E-1E18850EC253.jpeg

दिसत नाहीएना बाप्पा? हा जरा जवळून.
FDF6F294-B4E9-4039-83C6-2591F2902934.jpeg

mi_anu छान ऐटदार वाटतोय बाप्पा फेटा घातल्यामूळे.

सोनू, बाप्पा गोडच आहेत सगळे. पण ईतके कशासाठी केले होते?

मस्तच आहे पंखे सजावट.
मला पुढच्या वर्षी करायचीय.यावर्षी कंटाळा केला पेपर आणायला चांगल्या स्टोअर ला जायचा.बाप्पा फेटा 3 वर्षे तोच वापरतो.
मला प्लेडो बाप्पा खाली उजव्या बाजूचे नारिंगी सर्वात आवडले.सुंदर सफाईदार काम.

जाई, अहो लहानपणी आपण पंखे करायचो तसे लहान मोठे पंखे करून भिंतीवर कंपोज केले आहेत फक्त. मुलांचा खेळही झाला आणि आरासही झाली. Happy

अनु, हे खुप सोपे आणि सुंदर दिसते.

गणपती बाप्पा मोरया! सगळे बाप्पा आणि आरास बघून खूप प्रसन्न वाटले. पंख्याची सजावट मस्त! प्ले डोचा बाप्पा गोड आहे.

गणपती बाप्पा मोरया! सगळे बाप्पा आणि आरास बघून खूप प्रसन्न वाटले. पंख्याची सजावट मस्त! प्ले डोचा बाप्पा गोड आहे>>>+1

Ganpati2018.jpg
थर्माकोल दिसला म्हणून लगेच हाणू नये. मी २-३ मखरं आलटून पालटून वर्षानुवर्षे वापरते.
ते पिंक रंगाचं कमानीसारखं आहे ते मात्र लाकडाचं आहे.
मोरया!

हे पंखे मागे चिकटवता कसे?
2 एंडेड सेलो टेप का टाचण्या?मागचे कापड लोड घेते का?

सर्वच बाप्पा गोंडस.

संपदा, निव्वळ अप्रतिम बाप्पा आहे. पद्मासन, हाताची बोटे, सोंड सगळं सुरेख! राजा रवीवर्मांची पेंटींग आठवली. अशी मुर्ती मला काही मिळत नाही. Sad मस्तच!

शुम्पी, शिम्पल! मस्त! मंदार सिंहासनारुढ बाप्पा मस्त.

अश्विनी तुमचा तर भारीच. माझीही अशीच आरास आहे.

Pages