मायबोली गणेशोत्सव २०१८ - "आमच्या घरचा बाप्पा"

Submitted by संयोजक on 12 September, 2018 - 05:28

अनंत कोटी रूपे तुझी
अनंत कोटी नावे
कुठल्याही रूपांत
तू मनास भावे

अलौकिकतेने धन्य तुझी मूर्ती
पसरलेली विश्वात तुझीच किर्ती
नको काही आम्हास शिवाय कृपादृष्टि
असु दे छायेत तुझ्या ही सारी सृष्टी

IMG-20170824-WA0003.jpg

वाजत गाजत ,थाटामाटाने गणराजाचे आगमन झालेले आहे. घरच्यांनी मोठ्या हौसेने सजवलेल्या मखरात मूर्ती विराजमान आहेत. निरांजनाच्या , समईच्या प्रकाशात बाप्पांचा चेहरा आणखीन उजळून , झळाळून निघालाय. या देखण्या मूर्तीची , मखराची, तुम्ही केलेल्या सजावटीची, रोषणाईची प्रकाशचित्रे आणि माहिती इथे द्या.
त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१८' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.

Group content visibility: 
Use group defaults

मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव खेतवाडी गिर्गाव भागाचे फोटो असलेला धागा सापडत नाहीये. लिंक देईल का कुणी प्लीज.

हो हाच. धन्यवाद.
मुलांना ब्लु डोळ्यांच्या बाप्पाचा फोटो दाखवायचा आहे Happy

सर्वांचे बाप्पा मस्तच, सजावट पण सुरेख. बाप्पा मोरया.

वारली पेंटिंग डिझाईन खूप सुरेख दिसतंय.

अश्विनी आता फोटो दिसला. मस्त बाप्पा मोरया.

प्राजक्ता अप्रतिम बाप्पा,गौरी सजावट.

Pages