मायबोली गणेशोत्सव २०१८ - "आमच्या घरचा बाप्पा"

Submitted by संयोजक on 12 September, 2018 - 05:28

अनंत कोटी रूपे तुझी
अनंत कोटी नावे
कुठल्याही रूपांत
तू मनास भावे

अलौकिकतेने धन्य तुझी मूर्ती
पसरलेली विश्वात तुझीच किर्ती
नको काही आम्हास शिवाय कृपादृष्टि
असु दे छायेत तुझ्या ही सारी सृष्टी

IMG-20170824-WA0003.jpg

वाजत गाजत ,थाटामाटाने गणराजाचे आगमन झालेले आहे. घरच्यांनी मोठ्या हौसेने सजवलेल्या मखरात मूर्ती विराजमान आहेत. निरांजनाच्या , समईच्या प्रकाशात बाप्पांचा चेहरा आणखीन उजळून , झळाळून निघालाय. या देखण्या मूर्तीची , मखराची, तुम्ही केलेल्या सजावटीची, रोषणाईची प्रकाशचित्रे आणि माहिती इथे द्या.
त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१८' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.

Group content visibility: 
Use group defaults

मागची कमान बांबूची रेडिमेड आणली, त्यावर लेस गुंडाळली,
मागे निळा सिल्क पेपर, त्यावर रेडिमेड फुले
IMG-20180914-WA0003.jpg

हा क्लोजप
IMG-20180914-WA0004.jpg

सुंदर रंगसंगती निळी आणि सोनेरी.
सिल्क पेपर कसा दिसतो? इथे लायटिंग मुळे नीट कळत नाहीये.

मीनलचा पान गणपती पण सुंदर.काय वापरले? रंग कोणते वापरले? ईंडिया वाँटस टू नो.

कागदावर सिल्क चे कापड लावावे तास वाटतो,
वरतून हात लावला तर कापडाच वाटतो,

रमण बाग शाळेच्या चौकात एक 2 मजली कागदाचे दुकान आहे, तीकडे प्रचंड व्हरायटी मिळते

गणेशस्तोत्र आणि गणपती चे श्लोक वापरुन आरास करायची असं यावेळी ठरवलेलं.
माउंट बोर्ड वर हँड्मेड पेपर चिकटवुन कॅलिग्राफि च्या पेन ने लिहायचा प्रयत्न केला आहे..
IMG_20180913_125654.jpgIMG_20180913_125718.jpg

Sorry दिवसभरात मायबोलीवर यायला वेळच नाही मिळाला. आमचा बाप्पा क्राफ्टच्या मातीचा केलाय. या video पासून प्रेरणा घेऊन!
https://www.youtube.com/watch?v=URSSs6Q7UYM

मी कागदाची पाने न करता खरीच पाने वापरली आहेत
फक्त सोंडेच्या पानाला थोडा आकार दिलाय. वरतून spray paint.
घरी फक्त Gold रंगच होता म्हणून तोच वापरला!!

IMG_2290.jpg

सगळे बाप्पा सुंदर! सजावटी सुद्धा सुरेख जमल्यात. Happy
मीनल, तुमचा बाप्पा किती सुरेख घडवलाय! एकदम कलात्मक!

सर्वच गणपती मस्त __/\__

आरास कशी करावी ह्याचे वेगवेगळे प्रकार पहायला व शिकायला मिळतात एथे Happy

bappa_0.jpg

आमचा बाप्पा! घरी मूर्ती करायचं हे विसावं वर्ष! तोच करवून घेतो, मी निमित्तमात्र.
P_20180912_031405_DF_2.jpgP_20180912_031405_DF_2_1_1.jpg

Pages