वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज ही रिक्षा वाकड ला पाहिली
रिक्षेच्या मागचं वाक्य :
"चाल कासवाची , पण आहे भरवशाची "

वाकड आणि हिंजवडी मध्ये सशाची चाल कशी वापरता असेल ह्याचा विचार करून हसतेय Lol

HINDU अशी व्हॅनिटी प्लेट उसगावात अलिकडेच पाहिली. काय अभिमान! काय अभिमान!
नशीब 96KULI, PUNERI अशा प्लेट्स अजून दिसल्या नाहीत.

>>नशीब 96KULI, PUNERI अशा प्लेट्स अजून दिसल्या नाहीत.<<

नेकि और पुछपुछ???

IMG_0870.JPG

दुसऱ्यांचे खुप वाचले.
माझ्या कारवर लिहले आहे ‘इदं न मम’
( हे वाचून एकाने विचारले होते “तुम्ही मुस्लीम आहात का?” आता त्याला असं का वाटले कोणास ठाऊक. Happy )

शाली, ते 'ईदम्' म्हणून वाचले असले तरी पुढे 'न मम' लिहिले आहे की! Happy Happy म्हणजे खरं तर 'तुम्ही ईद साजरी करत नाही का' असे विचारायला हवे!

कदाचित त्यांनी ते इद एन मम्मं (म्हणजे इदचा उपवास आणि मग मम्मं = जेवण) असे वाचले असेल Wink
रच्याकने, गाडी तुमचीच आहे ना ? इदं न मम लिहिले आहे म्हणुन विचारले Wink

आज सकाळीच एका बाईकमागे वाचलं:

फरगॉट सुपरमॅन
ट्राय मी! Happy

आणि हे वाचून त्या असामीला मी मागूनच नीट न्याहाळलं Lol
काह्हीच विशेष वाटलं नाही हे विशेष Biggrin

परवा एका बाईक च्या मागे वाचलं -
"कौन केहेता है मौत आयेगी तो डर जाऊंगा ... रायडर हू कट मारके निकल जाऊंगा"
नवीन Submitted by वेडा कल्पेश on 7 September, 2018 - 20:16
>>>>
काही महाभाग नंबर न टाकता असले उद्योग करतात.

हो गं आर्या Lol
काहीही लिहीतात....स्व्तःला तरी बघावं ना आधी !

Pages