वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल एका रिक्षाच्या मागे वाचल....

"म्हाराज तुमच्यासाठी काय प.."

"पन" मधला न ह टायपो नाहीये, त्या रिक्षावर अस्सच लिहिल होत. मनात विचार आला राजे जर परत आले आणि चुकुन त्यांनी हे वाचल तर ते लिहीणार्‍याला आणि पुण्यासारख्या शहरात आपल्या रिक्षावर अशुद्धलेखन अभिमानाने मिरवणार्‍याला दोघांनाही शिक्षा ठोठावतील

कशाला असले उद्योग करायचे? माणसाचे दात किडलेत तर कवळी करुन घ्यायची . वाघाचे दात मोजून काय करणार?

Proud

१. रो मत पगली फिर आउंगा (ह्या बाबाला त्या 'पगली'ने हिन्दी सिनेमा इस्टाईलने सांगावं 'ये खुशी के आंसू है'!)

२. हस मत पगली प्यार हो जायेगा (आता त्या बिचार्‍या पगलीने करावं तरी काय?)

३. जगह मिलने पर पास दिया जायेगा (भारतीय रस्त्यांवर हे कदापि शक्य नाही!)

४. शेरका बच्चा 1ही अच्छा (ह्याचा फोटो घ्यायचा माझा प्रयत्न रेन्टल कारच्या ड्रायव्हरने गाडी पुढे काढून हाणून पाडला! रच्याकने, ह्या वाक्यात भारताच्या लोकसंख्यावाढीचं कारण सापडतं असं मज पामराचं मत आहे)

५. जो करे सो हरी करे (उर्फ भगवान भरोसे.....क्लासिक इन्डियन मेन्टॅलिटी)

एका ट्रकवर लिहिलं होतं 'मि मराठी'. म्हटलं बाबा रे, आधी नीट मराठी लिहायला तरी शिक>>>झोयो-ट्रक असावा

एका टेंपोच्या मागे असे लिहिले होते:-

मारवा डचीम शहूरमें दीमिलेल

नीट फोड करताच समजले की हे "मारवाडची मशहूर मेंदी मिळेल" असे आहे. पण तरी टेंपोमधे मेंदी विकतात?

अहो आशिका, टेम्पोतल्या मेंदीचं सोडा, मी रस्त्याच्या बाजूला स्वच्छतागृहाची भांडी विक्रीला ठेवलेली बघितलीयेत. तीही भर मुंबईत पवईत!
आ.न.,
-गा.पै.

मी रस्त्याच्या बाजूला स्वच्छतागृहाची भांडी विक्रीला ठेवलेली बघितलीयेत. तीही भर मुंबईत पवईत!>>> अरे बापरे, काय सांगता?

Pages