फुकटात विनासायास वेटलॉस

Submitted by शाम भागवत on 3 July, 2018 - 03:17

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>
व्हिडिओ मध्ये क्लिअरली असे सांगितले आहे की प्रथिने वाढवा, गोड टाळा, अंड्यातले पिवळे टाकू नका. कार्ब्स देखिल कमी खा असे सांगितले आहे.
त्याचे "काहीही खा" मध्ये रुपांतर कसे होते?
<<<
तसे रूपांतर होते कारण इतके दिवस अंड्यातील पिवळे टाकून द्या, कार्ब्ज चालतील पण फॅट्स आणि बीपी असेल तर मीठ खाऊ नका असं डॉक्टर्स आणि डायेटिशिअन्स सांगत होते. आहाराचे 'सकाळी फॅट फ्री दुधाबरोबर दोन मारी बिस्किटं, दोन तासांनी अर्धा फुलका किंवा एक ब्रेड स्लाइस आणि एग व्हाइट'टाइप तक्ते देत होते. मला स्वतःला दिले गेले आहेत.

सामान्य माणसाला (शिरूरच्याच नव्हे, मुंबईतल्याही) ताटात पोळीकडे पोळी म्हणून न पाहता उदा. १०%फॅट, ५%फायबर आणि ८५%कार्ब्ज असा चार्ट पाहणं जमत नाही, आवडत नाही.
सायन्सला रोज नवीन शोध लागतात, सामान्य माणसाला जेवायला बसण्यापूर्वी आजचे लेटेस्ट रीसर्च पेपर्स वाचणं शक्य नसतं.
म्हणून 'दोन वेळाच जेवा, ते पोटभर जेवा, अधेमधे काही खाऊ नका आणि रोज निदान पाऊण तास चाला' ही चतु:सूत्री लक्षात ठेवणं आणि पाळणं हे त्यापेक्षा कितीतरी सोपं म्हणून शक्य आहे.

शिरूरचा माणूस 'ही जाहिरात आहे' अशी तळटीप वाचल्यावर वरची अशास्त्रीय माहिती इग्नोअर करतो का? मुंबईचातरी करतो का? अशास्त्रीय विधानं खोडणं समजू शकतं , नव्हे ते योग्यच आहे. 'ही जाहिरात आहे हे मान्य करा (आणि मग वाट्टेल ते बोला)' हा आग्रह मला अजून समजलेला नाही.

त्याचे "काहीही खा" मध्ये रुपांतर कसे होते? >>> स्वातीजी, ते दीक्षितांच्या एका भाषणात आलेले आहे. पण तेव्हढाच तुकडा पाहिला तर मग असाच समज होतो. दीक्षितांनी पुस्तक लिहीताना या चुका केलेल्या नाहीत. लिखाण डोळ्यासमोर असते आणि त्यातल्या चुका प्रूफे तपासताना लक्षात येतात. भाषणाचे तसे नाही. एखाद्या मुद्याच्या प्रेमात गर्मजोशीत एखादे वाक्य , शब्द जोशात निघून जातात. ते नंतर तपासून पाहण्याची सोय नाही. भाषण पुढेच सरकत राहते.

त्याच भाषणात दीक्षितांनी अनेक उपचारपद्धतींचा उल्लेख केल आहे ज्यात हे खाऊ नका ते खाऊ नका किंवा तासातासाने अमूक तमूक खा असे सांगितले जाते. तुम्ही म्हणता तसे हे लक्षात ठेवायला, आचरणात आणायला अवघड आहे. दीक्षित दोन्हीच्या तुलनेत काहीही खा असे सांगतात. पुढे प्रोटीन्स वाढवा. साखर जास्त नको असे सांगतात. तसेच मी सांगितले म्हणून विश्वास ठेवू नका. पटल्यानंतरच आचरणात आणा असेही म्हणालेत.

पुस्तकात त्यांनी व्यवस्थित शास्त्रशुद्ध माहिती दिलेली आहे. ती वाचली तर शंका च काय वाद सुद्धा राहणार नाहीत.

>>>>तसे रूपांतर होते कारण इतके दिवस अंड्यातील पिवळे टाकून द्या, कार्ब्ज चालतील पण फॅट्स आणि बीपी असेल तर मीठ खाऊ नका असं डॉक्टर्स आणि डायेटिशिअन्स सांगत होते. आहाराचे 'सकाळी फॅट फ्री दुधाबरोबर दोन मारी बिस्किटं, दोन तासांनी अर्धा फुलका किंवा एक ब्रेड स्लाइस आणि एग व्हाइट'टाइप तक्ते देत होते. मला स्वतःला दिले गेले आहेत.

हा निव्वळ वादाला घातलेला वाद आहे.
जर इतके दिवस पिवळे टाकून द्या सांगत होते तर आवर्जून इथे पिवळे खा असे लिहिले पाहिजे का काहीही खा असे लिहिले पाहिजे? आणि एस्पेशियली पुढे ते स्पष्टीकरण देतायत का खायचे पिवळे. जर तुमच्यावर आधी अन्याय केलेल्या डॉक्टरांना नीट चूक ठरवायचे असेल आणि लोकांचे कन्फ्युजन दूर करायचे असेल तर दीक्षित काय म्हणतायत ते जसेच्या तसे आले पाहिजे. आणि ते काहीही खा म्हणत नाहीत. ६ मिनिटाच्या व्हिडियोत तर ते स्पष्टपणे १ पोळी खात असाल तर हळू हळू अर्धी खा असेही म्हणताहेत! मग इथे कुणीतरी (जे दीक्षितही नाहीत आणि जिचकरही नाहीत) काहीही खा म्हणून लिहिलंय त्यासाठी हे टेक्निकल लोकांना कळत नाही वगैरे डिफेन्स कशासाठी?
जाहिरातच करायची असेल तर मथळा व्यवस्थित लिहून करावी.
ते जास्तीचं पण महत्वाचं एक्सप्लेनेशन दिल्याने लोक हे डाएट फॉलो करणार नाहीत असे आहे का?
आणि जर समोरच्या माणसाला काही गोष्टी डोक्यावरून जातायत तर त्याला उपाय त्याला काहीही खा म्हणून सांगणे कसा काय होतो?

आणि आधीच्या कॉमेंटमध्ये खुद्द या पद्धतीचा फायदा झालेल्यांनी सुद्धा लिहिले आहे की ते साखर खात नाहीत. प्रथिने जास्त खातात. सॅलड खातात!

मी अनु
बुकगंगावर आहे. तिथूनच मागवले. एक दिवसात आले.

मला समजायला आणि अवलंबायला सोपी म्हणून ---------------> माझ्यासाठी चांगली
हे जे शेंडा बुडखा नसललेलं कॉजल रिलेशन लोकांच्या माथी मारलं जात आहे, गळी ऊतरवलं जात आहे ते अतिशय अतिशय घातक आहे.
त्या दोन सेमी लांबीच्या डॉटेड लाईनमध्ये कसे होत्याचे नव्हते होऊ शकते हे समजून घेणे कीचकट असले तरी आपल्या भल्यासाठी ते समजून घेणे किंवा तसा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे हे अ‍ॅक्नॉलेज का होत नाहीये तेच कळत नाहीये.

>>>मान्य. Happy
आणि सहमत. Happy

श्या! मी दीक्षित पद्धतींनी ५५ मिनिट संपवून तलवार उपसून आले होते.

बाबौ!! किती प्रतिसाद
इथं लिहू लिहू क्यालर्‍या जळूनच इथल्या निम्म्यांचं डाएट झालं असेल Proud

मला एकदा "वजन कसे कमी करावे" या व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. पाच सहा लाखांचा जमाव जमला होता. भाषण केबल टीव्हीवर लाईव्ह होते. मी पैसे घेत नाही हे आयोजकांना माहीत होते. भाषण संपल्यावर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. आयोजकांनी आवाहन केलेले असतानाही नागरिकांच्या वतीने मला एक चेक देण्यात आला. मी नम्रपणे नाही म्हटले. पण त्यांनी कसानुसा चेहरा केला आणि हातात तर घ्या म्हणाले. मी चेक हाती घेतला आणि पाहिले तर पाच कोटीची रक्कम.
पाच कोटी आजही किरकोळ रक्कम नाही. हो कि नाही ? एव्हढे पैसे देण्यामागे नागरिकांचे असलेले प्रेम पाहून माझ्या डोळ्यांत पाणी आले.
पण मला पैसे घेता येणार नाहीत कारण माझी तत्त्वं आहेत हे मी आयोजकांनाही ठणकावून सांगितलेले होते. माझ्यावर प्रेम करणा-या जनतेला नाही कसे म्हणायचे हा प्रश्नच पडला होता. पण शेवटी तत्त्वं जिंकली आणि मी नकार दिला.
हे ऐकल्याबरोबर अनेक लोक रडू लागले. काही बेशुद्ध पडले. काही जमिनीवर फतकल मारून विलाप करू लागले.
मला आयोजकांनी गर्दीतून बाहेर काढले आणि गाडीत बसवले. पण माझ्या डोळ्यासमोरून ते दृश्य जात नाही.
आजही मला तो पाच कोटीचा चेक आठवतो आणि तो न घेतल्याबद्दल माझीच मला लाज वाटते.

सई, प्रतिसाद एकदम पटला.
स्पेशली हे वाक्य. "डायबेटिक लोकांनी काहीही खावे, आंबे खावे, फणस खावा कारण ते भारतीय आहेत वगैरे सुडोसायंटिफिक क्लेम्ससुद्धा चालू असतात."

पण तरीही इथे जे भागवत बॅशिंग चालू आहे ते पटत नाहीये.आणि भागवतही मुद्दा प्रॉडक्टिव्हली पुढे सरकेल अश्या काही अ‍ॅक्शन्स घेत नाहीयेत. (प्रश्नांना उत्तर देणे/मूळ लेखाचा कंटेंट बदलणे/'ही जाहीरात म्हणून इंटेंडेड नव्हती, माझ्या लिहीण्यातून तसे वाटले असेल तर हामालेदो' वगैरे वगैरे.)

एकंदर रिझल्ट मुद्दे पुढे न सरकणे, मूळ माहिती कंटेंट्/थोडक्यात शंका हा फॉर्मॅट बदलून 'ही जाहीरात आहे पुरावा१: ब्ला, ही जाहीरात आहे पुरावा २: ब्ला', 'मूळ व्हिडिओ बघा: ब्ला,मूळ व्हिडिओ बघा: ब्ला ब्ला' असा रिकर्सिव्ह व्हाईल लूप मध्ये गेलाय.>>>> @मी अनू, एग्झाक्टली मनातलं मांडलंत. +१

हा लेख भारावलेली जाहीरात आहे हे खरच
>>>
व्हिडिओ मध्ये क्लिअरली असे सांगितले आहे की प्रथिने वाढवा, गोड टाळा, अंड्यातले पिवळे टाकू नका. कार्ब्स देखिल कमी खा असे सांगितले आहे.
त्याचे "काहीही खा" मध्ये रुपांतर कसे होते?
>>>> हे फारच पटलं. इथलं वाचून दिक्षित पद्द्धत फॉलो करून दिवसातून २ वेळा ५५ मिनिटात 'काहीही' खाउन जर वजन किंवा साखर आटोक्यात आली नाही तर बदनामी लेखकाची न होता दिक्षित पद्धतीत काही अर्थ नाही अशीच होइल.
हा लेख आणि व्हॉत्सअ‍ॅप वर येणारे फॉर्वर्ड्स ह्यात फार फरक नाही वाटत मला.

इथे बरीच चर्चा झाली आहे. माझे मत बस्केशी सहमत आहे. हा लेख आणि इथे "काहीही खा" हे मी विथ पिंच ऑफ सॉल्टच घेतले. माझ्यासाठी या लेखाचा उद्देश्य दीक्षितांचे भाषणाची जाहिरात हा होता आणि त्याचा अनेकांना फायदा झाला आहे असे दिसत आहे. तुम्हाला पटले तरच करा. सोशल मिडीयात लेख जरा तारतम्याने घेतले नाही तर अवघडच आहे. जसे मी आधी लिहले की योगाचे फायदे लिहणारा लेख लिहला तर केवळ जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली करा एवढे डिसक्लेमर पुरेसे आहे. प्रत्येक आसन चुकीचे झाले तर काय होईल, तुम्हाला अमुक एक व्याधी असेल तर हे आसन करु नका इत्यादी शंभर तळटीपा टाकल्या नाही तरी मला ओके आहे.

माझ्यासाठी या लेखाचा उद्देश्य दीक्षितांचे भाषणाची जाहिरात हा होता>>
Lol पारू, इथे लोक एकमेकाची डोकी ह्याला 'जाहिरात' म्हणा ह्या मुद्द्यावरून तर फोडत आहेत. तुम्ही एकदम सगळेच निकालात काढले की. Rofl

सोशल मिडीयात लेख जरा तारतम्याने घेतले नाही तर >>> ज्यांना तारतम्य आहे ते थोडी तरी माहिती घेतील, मग ते खेड्यातले असोत नाहीतर अँटीलियातले.. ज्यांच्याकडे तारतम्य आहे ते भाषण ऐकून, डॉक्टरांना भेटूनच पुढच्या स्टेप्स घेतील. ज्यांच्याकडे नाही त्यांना व्हॉट्सअ‍ॅप वर व्हिडीओ ची लिंक पाठवली काय आणि दीक्षितांचे भाषण ऐकायला हॉल मधे नेले काय, सोपे तेव्हढेच ते पाहतील.
डॉक्टरला काय कळतंय असे म्हणणारे अनेक जण पाहीले आहेत.

मग आता तू इथे लिहायचं थांबवशील का? Proud>> ही तर सुरुवात आहे, तू आणि तुझ्या सारख्या अनेकांना हा लेख आता जाहिरात वाटतो आहे तसेच भागवताना सुद्धा वाटले आणि त्यांनी तसे लिहिले की झाले तीच दिवाळी आणि तोच दसरा. Proud तो पर्यंत वाचत रहा.

तीच दिवाळी आणि तोच दसरा.>>
इथे लोक डाएट कसं करावं / असावं याचा आटापिटा करताहेत आणि तुम्हाला दिवाळी दसरा सुचतोय होय!
लोकांच्या तोंडाला पाणी सुटून ते मेलं इन्शुलीन झिरपणार नाही का?

मित्राने दीक्षितांचा प्लॅन सुरू केला आहे. फास्टिंग शुगर पहिल्या दिवशी १५३ आली. दुस-या दिवशी १३५. तिस-या दिवशी १२०.
दीक्षितांना पाठवण्यासाठी फास्टिंग इन्घुलिन द्यायला आंम्ही दोघे गेलो तेव्हां त्या टेक्निशियनने विचारले डॉ. जगन्नाथ दीक्षित का ? रोजचे पाच सहा पेशंट्स असतात. त्यांच्याकडे येणा-या एका पेशंटची गोळी बंद झाली आहे.

डॉ. दीक्षितांच्या पुस्तकात इन्सुलिनच्या स्त्रावाबद्दल असे म्हटलेय:

"गंमत म्हणजे आपण किती आहार घेतला याच्यावर इन्सुलिनची निर्मिती अवलंबून नसते. प्रत्येक खाण्याबरोबर एका विशिष्ट प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती होते.

इन्सुलिन स्रवण्यासाठी ग्लुकोज हे सर्वात प्रभावी उद्दीपक आहे. त्यामुळे आहारात कर्बोदके असतील तर इन्सुलिनची जास्त प्रमाणात निर्मिती होते. प्रथिनांतील अमिनो आम्लांमुळे इन्सुलिनची काही प्रमाणात निर्मिती होते. मात्र हे उद्दीपन कर्बोदकांच्या तुलनेत खूप कमी असते. मेदपदार्थ व त्यातील मेदाम्लांचा मात्र इन्सुलिन निर्मितीवर अत्यल्प प्रभाव असतो. यावरून एक गोष्ट लक्षात येईल की आपल्या आहारात कर्बोदके असतील तर इन्सुलिन जास्त प्रमाणात निर्माण होईल. जर मेदपदार्थ वा प्रथिने असतील तर इन्सुलिन अत्यल्प प्रमाणात निर्माण होइल."

पहिल्या दोन वाक्यांचा मला नीट अर्थबोध झाला नाही.
पण कसल्या सेवनाने इन्सुलिन निर्मिती जास्त होते, व कसल्या सेवनाने कमी हे पुस्तकात स्पष्टपणे नमूद केले आहे.

तसेच कर्बोदके, प्रथिने आणि मेद व्यतिरीक्त विविध जीवनसत्वे आणि क्षार यांची शरीरास आवश्यकता, त्यांचे प्रमाण, कुठल्या पदार्थात ते असतात याचा पुस्तकात आढावा घेतला आहे.

ज्यांना या पद्धतीचा अवलंब करायचा आहे, तसेच जे करत आहेत त्यांनी आपल्या आहाराचा समतोल साधण्यास त्यांचे पुस्तक वाचावे असे मी सुचवेन. आणि आपला आहार आपल्या डॉक्टर / आहारतज्ञांकडून तपासून घेणे उचित.

आज डॉ. भागवत एबीपी माझा च्या कट्ट्यावर आले होते. मी अधून मधून पाहिली मुलाखत.
- त्यात त्यांनी वेट लॉस कार्यक्रम मायग्रेन वाल्यांसाठी नाही असे म्हटले (जर त्रास होणार असेल तर)
- डायबेटिक पेशंट्सनी त्यांच्या डॉक्टरच्या सल्ल्याने हा कार्यक्रम अंमलात आणायचा आहे ( चक्कर येऊ शकते. असे काही झाले तर आम्ही जबाबदारी घेत नाही )
- डाएट प्लान तुमच्यासाठी आहे, तुम्ही डाएट प्लान साठी नाही.
- लग्न किंवा अशी काही परिस्थिती असेल की तुम्हाला तीन वेळा जेवण टाळता येणार नाही त्या वेळी तुम्ही स्वतः निर्णय घ्या. कारण शरीर तुमचे आहे. फायदे तुम्हाला हवे आहेत. पण नंतर वजन वाढले तर प्लान फॉलो केला पाहीजे.

हे मुद्दे लक्षात राहीले. रिपीट असेल तेव्हां पाहीनच. सर्वांनीच पहावा. इथल्या ब-याच शंकांचे निरसन होईल.

>>>>>गंमत म्हणजे आपण किती आहार घेतला याच्यावर इन्सुलिनची निर्मिती अवलंबून नसते. प्रत्येक खाण्याबरोबर एका विशिष्ट प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती होते.

>>>इन्सुलिन स्रवण्यासाठी ग्लुकोज हे सर्वात प्रभावी उद्दीपक आहे. त्यामुळे आहारात कर्बोदके असतील तर इन्सुलिनची जास्त प्रमाणात निर्मिती होते. प्रथिनांतील अमिनो आम्लांमुळे इन्सुलिनची काही प्रमाणात निर्मिती होते. मात्र हे उद्दीपन कर्बोदकांच्या तुलनेत खूप कमी असते. मेदपदार्थ व त्यातील मेदाम्लांचा मात्र इन्सुलिन निर्मितीवर अत्यल्प प्रभाव असतो. यावरून एक गोष्ट लक्षात येईल की आपल्या आहारात कर्बोदके असतील तर इन्सुलिन जास्त प्रमाणात निर्माण होईल.

हे पहिले आणि दुसरे वाक्य परस्पर विरोधी नाहीये का?

मला पहिल्या वाक्याचा अर्थ असा कळतो.
की तुम्ही १ पोळी खा किंवा ४ खा (हे वाक्य माझा कट्टाच्या सुरुवातीलाच ते म्हणताहेत) इन्सुलिनचे "माप" तेवढेच पडते. म्हणजे ५५ मिनिटात ४ पोळ्या खाल्ल्या तरी आणि १ खाल्ली तरी इन्सुलिन तेवढेच तयार होणार.

दुसऱ्या पॅराचा अर्थ असं होतो की पोळ्या जास्त खाल्ल्या तर जास्त इन्सुलिन तयार होणार. फॅट खाल्लं तर अत्यल्प होणार (हे बायोकेमिस्ट्रीच्या नियमांशी मिळते जुळते आहे). पुढे माझा कट्टामध्ये ते म्हणताहेत की जेवणांच्यामध्ये तुम्ही टोमॅटो खा, पातळ ताक घ्या, कारण त्याने इन्सुलिन स्रवत नाही. मग याला जर त्यांचेच पहिले वाक्य लावले तर मध्ये मध्ये जे खाल त्याने सुद्धा इन्सुलिन तयार झाले पहिजे.

परस्पर विरोधी...... सहमत
टोमॅटो आणि ताक खाल्ल्याने इन्सुलिन तयार होत नाही हहे चाचण्या करून ते सांगत आहेत.

Pages