Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07
बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरली फक्त मेघा धाडे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुष्करचा वरचा एक बघितला,
पुष्करचा वरचा एक बघितला, family ने झापलेले दिसतंय चांगलंच. आऊ रेशम चांगल्या. रेशम खरी वगैरे म्हणतोय मग मेघा सईचं नाव घेतलं, मुलाखत घेणारी fan दिसतेय पुष्करची पूजा बोरकर बहुतेक, मी ओळखते तिला tv वर बघूनचं.
रेशम पण पुष्कर पुष्कर करत होती शेवटी. स्मिताला सोडून ह्याला मतं द्यायला सांगितलं असणार कारण मेघाला बोलला, तिच्याविरुद्ध गेला शेवटी काही दिवस.
स्मिताने पण चेक करावं सोशल मिडिया जरा आणि मेघाची कशी लोकप्रियता होती आहे बघावं, मुलाखत देण्याआधी. रे ताई बद्दल काय बोलतात हेही बघावं.
तिकडे सैड्या सैड्या करायचा तेवढं काही सई सई करत नाहीये.
डिजे मस्त पोस्ट.
डिजे मस्त पोस्ट.
थोडक्यात जे मेघाला फेक म्हणायचे ते बाहेर येऊन स्वतः वेगळेच वाटत आहेत, मेघा मात्र जशी आहे तशी आहे पाहिल्या दिवसा पासून ते अत्ताच्या इंटरव्ह्युज पर्यन्त !
>>> म्हणजे आता फेक कोण झाले? नेमके जे मेघाला फेक म्हणायचे तेच फेक ठरायला लागलेत. सगळ्यात फेक पुष्कर ठरलाय.
अस्तादनंही कबुल केलं की बाहेर मेघाबरोबर कधी इतका वेळ घालवला नव्हता. मग येड्या एखाद्या व्यक्तीबरोबर चार तास घालवणे आणि १०० दिवस घालवणे यात फरक नसतो का? मग कशाला ' मेघा बाहेर अशी नाहीच्चे' करून कोकलत होतास? तिलाही तुझ्याबद्दल हेच्च वाटत असेल असं एकदाही डोक्यात आलं नाही का? मूर्ख लेकाचे !
स्मिताच्या पीआर नं स्मिताच
स्मिताच्या पीआर नं स्मिताच जिंकली अशा थाटात घाईघाईनं पार्टी द्यावी हा औचित्यभंग वाटला. अजून मेघानं अशी काही मोठी पार्टी केली नाहीये आणि या तिसर्या नंबरवरच्या बाई लै जोशात.
कदाचित त्यांनी तयारी केली असेल आणि संधीचा जास्तीत जास्त फायदा उठवायचा असेल त्यांना.
मेघाचं करीयर देखिल जोरात सुरू होऊ दे. तिच्या पुढच्या वाटचालीबद्दल मी साशंक आहे. पण ती हुशार आहे आणि संधीचं सोनं करेल यात शंका नाही, शंका आहे ती तिला मुळात संधी मिळेल का?
ती पुष्करची मुलाखत घेणारी
ती पुष्करची मुलाखत घेणारी स्मिताच्या पार्टीत तुम्ही कोणी दिसला नाहीत, invite केलेलं का. तो म्हणाला हो तिने बोलावलेलं पण मला family बरोबर time स्पेंड करायचा होता म्हणून मी गेलो नाही. सई पण नव्हती म्हणाली ती
ज्या स्मिताचा सतत द्वेष केला, ती पुढे गेली त्याचं सेलिब्रेशन बघायला कशाला सई जाईल. तुझं काही बोलणे झालं का सईशी तर नाही म्हणाला. आता कशाला सईशी बोलतोय.
ह्या सर्वात सईचा पार पचका झाला हे तिला आता हळूहळू समजलं असेल, आई बाबांनी झापलं असणार नक्कीच. तिसरा नं पण हुकला शेवटी तिचा.
शंका आहे ती तिला मुळात संधी
शंका आहे ती तिला मुळात संधी मिळेल का? >>> नक्की मिळेल. ती आधीही हिंदी सिरियल्स वगैरे करायची. कलर्स मराठी, कलर्स हिंदी आणि tv 18 हे सर्व प्रोजेक्ट देतील तिला. वर्षभर तरी बांधिलकी असणार त्यांची.
नक्की मिळेल. ती आधीही हिंदी
नक्की मिळेल. ती आधीही हिंदी सिरियल्स वगैरे करायची. कलर्स मराठी, कलर्स हिंदी आणि tv 18 हे सर्व प्रोजेक्ट देतील तिला. वर्षभर तरी बांधिलकी असणार त्यांची. >> तुझ्या तोंडात साखर पडो, अन्जू.
एकंदरीत सगळ्यांनाच काम
एकंदरीत सगळ्यांनाच काम मिळण्यासाठी आधी ग्रुमिंगची गरज आहे. मेघाला मुख्य नायिकेची भूमिका कदाचित मिळणार नाही पण मिळालेल्या कुठल्याही भुमिकेचं सोनं ती नक्कीच करेल. सईला तर ट्रान्सफाॅरमेशनची गरज आहे. तिचं करिअर अजून खर्या अर्थाने सुरु व्हायचं आहे. बिबाॅच्या घरात आल्याने विस्मरणात गेलेले काही लोक पुन्हा लोकांना दिसले आहेत. पण रोज येणार्या नवीन टॅलेंटसमोर टिकून राहण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याचं आव्हान सगळ्यांसमोर आहे.
मेघाला मुख्य नायिकेची भूमिका
मेघाला मुख्य नायिकेची भूमिका कदाचित मिळणार नाही पण मिळालेल्या कुठल्याही भुमिकेचं सोनं ती नक्कीच करेल. >>>>> अगदी अगदी मेघाला एखाद्या सिरियलमध्ये एखाद्या व्हॅम्पची/ नायिकेच्या सासूची/ ग्रे/ निगेटिव्ह शेडची भूमिका मिळायला हवी. अश्या भूमिका लोकप्रिय होतात. एखाद्या पौराणिक/ ऐतिहासिक मालिकेतसुद्दा भुमिका मिळाली तिला तरी हरकत नसावी.
मग बायको बरोबर ऑस्ट्रेलियाला
मग बायको बरोबर ऑस्ट्रेलियाला >>>> बायकोचा राग घालवायला तिला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणारे वाटत.
Big Boss success party's
Big Boss success party's photos:
https://www.youtube.com/watch?v=C-7QqiGB2Hg&t=10s
पुष्करच जोगची मुलाखत:
https://www.youtube.com/watch?v=OOkRL0rtNCk&t=148s
https://www.youtube.com/watch?v=n5PnQt9zmzM
मेघाची अॅक्टिंग आणि डान्सिंग
मेघाची अॅक्टिंग आणि डान्सिंग इ. स्किल्स किती चांगली आहेत जरा शंकाच आहे, ( बिबॉ च्या स्पॉन्सर्ड टास्क्स मधे तिचा पर्फॉर्मन्स कधी उठून दिसला नाही) पण तिने प्रोड्यूसर, शो अँकर वगैरे ट्राय केले तर जास्त सक्सेस्फुल होईल. एखादा स्वतःचा टॉक शो होस्ट केला तरी छान जमेल तिला.
लाऊड vamp चांगलं करू शकेल
लाऊड vamp चांगलं करू शकेल मेघा, आवाजाचा उपयोग तिथे छान होईल आणि त्यात ती एक ग्रेस पण आणू शकेल.
तिचा आवाज एकीकडे लाऊड आणि एकीकडे गाण्यासाठी चांगला आहे असं मिश्रण आहे.
ती आणि आस्ताद मिळून singing reallity शो पण anchoring करू शकतील.
ती talk show चांगला करेल. त्याग करणारी भाभी किंवा वहीनी रोल वगैरे मात्र मिळाला तरी करू नये तिने. फार स्कोप नसतो, रडण्याशिवाय. एखादा dashing role च करावा.
खमकी सासू किंवा नंदितासारखी
खमकी सासू किंवा नंदितासारखी खमकी जाऊबाई मस्त शोभेल मेघा. किंवा सद्याच्या ट्रेंडनुसार ऐतिहासिक सिरियल्समधे पण छान शोभेल ती.
टाॅक शोमधे दुसर्या कुणाला बोलु देईलसं वाटत नाही.
(No subject)
तिथे कसौटी जिंदगी कि रिमेक
तिथे कसौटी जिंदगी कि रिमेक स्वतः केकताच करणार आणि कोमोलिका २ म्हणून हिना खानची चर्चा होती पण तिने अफवा असल्याचे म्हंटले, आता मेघाला घ्या म्हणाव केकताला , छान जमेल तिला कोमोलिका
जुना एपिसोड पाहिला त्यात
जुना एपिसोड पाहिला त्यात स्मिता मेघाला मेआअपवरुन उचकवत होती. चोरपोलिस टास्कमध्ये मेकअप लपवायचा की नाही यावरुन स्मिता आणि मेघाचे भांडण पाहिले. स्मिताची बेक्कार स्ट्रॅटेजी पाहिली. कुत्सित हसुन उचकवत होती मेघाला. आउलाही किती पिड्लंय तिने. मला स्मिता बिलकुलच आवडत नाहीए आता. जुई परवडली.
माझीच जुनी पोस्ट : यात सई
माझीच जुनी पोस्ट : यात सई ऐवजी स्मिता आणि स्मिता ऐवजी सई एक्स्चेन्ज कराव्याश्या वाटतायेत पण ही ती पोस्ट
बिग बॉस नंतर कलर्स मराठीसाठी एक आयडीया !
नवीन सिरियल ’बिग फॅमिली’ !
एक भलीमोठी महाजॉईंट फॅमिली !
पात्रपरिचय :
थत्ते आणि उना हे त्या फॅमिलीचे कंट्रोलिंग आई वडिल .
त्यांची नालायक निकम्मी मुलं : राजेश आणि सुशान्त , एकच गुडबॉय , लग्नाळु लाडका पुष्कर.
या खेरीज एक नालायक मुलगी जुई आणि तिचा नवरा इस्टेटिला हपापलेला घरजावई (घरचा भेदी) अस्ताद.
घरात २ पाताळयंत्री सूना, एकमेकींवर दररोज कुरघोडी करु पहाणार्या , रेशम आणि मेघा (अनुक्रमे राजेश व सुशानतच्या बायको)
राजेश बाहेरख्याली रंगेल, घरी बायकोला घाबरणार पण घराबाहेर एका बॉलिवुड आयटेम गर्लशी घरोबा, ती स्मिता !
रेशम दुष्ट असून नवर्याच्या प्रेमात बुडलेली आणि त्यामुळे मेघासमोर कायम हरणारी , ती मेघा समोर जिंकण्यासाठी घरजावई अस्ताद आणि नणंद जुईची मदत घेत रहाते पण घरजावई केसाने गळा कापणारा, रेशमसाठी चोरी करताना निम्म्याहून अधिक माल स्वतः गिळंकृत करणारा !
सुशान्त गुड फॉर नथिंग , ड्रग अॅडीक्ट , रागावर आणि भावनांवर ताबा नसणारा, मेघा मात्रं कोल्ड ब्लडेड, हुषार , कपटी आणि नवर्याच्या चूका कव्हरप करणारी आणि घरच्या बिझनेसमधे सर्वस्त पॉवरफुल, तसेच सासूच्या मर्जीत राहिल्याने कायम वरचढ.
अशा परिस्थतीत एक दिवस अचानक घरातला लहान मुलगा पुष्की लव्ह मॅरेज करून एक हिम्मतवाली सगळ्यांना पुरून उरणारी बायको आणणर सई !
इथे सगळ्यांच्या नकळत सासरा थत्तेचाही एक घराबाहेर घरोबा, हर्षदा खानविलकरशी , त्यांची नाजायज मुलगी ऋतुजा.
सईच्या येण्याने पेटलेल्या घरात अजून आग लावायला एक दिवस ऋतुजा येणार आपला हक्क सांगायला, ती आणि सई टिम अप करून अख्या घराला सळो कि पळो करून सोडणार.
याखेरीज घरात काही वफादार पण कनिंग नोकर !
रेशमचा नोकर भुषण , जो इकडच्या गोष्टी तिकडे करायला रेशम वहिनीला मदत करणार , रेशमची स्ट्रेंथ राजेशपेक्षा हा नोकरच !
उ.ना ची नौकरानी आरती सोलंकी जी अख्ख्या घराची महावस्ताद खबरी असेल.
सुशान्तचा वफादार नोकर विनित ज्याला सुशान्त साहेब आवडतात पण साहेबांची बायको मेघाबद्दल राग आहे !
.
.
.
एस टी वाय धागा काढावासा वाटतोय यावर Biggrin
Submitted by दीपांजली on 31 May, 2018 - 11:03
नालायक निकम्मी मुलं : राजेश
नालायक निकम्मी मुलं : राजेश आणि सुशान्त , एकच गुडबॉय , लग्नाळु लाडका पुष्कर.
दर वेळी हे वाचताना भयंकर हसू येतं.
या खेरीज एक नालायक मुलगी जुई आणि तिचा नवरा इस्टेटिला हपापलेला घरजावई (घरचा भेदी) अस्ताद. >>>
सई आणि स्मिता चे रोल्स आहेत तेच बरोब्बर आहेत
डिजे तिकडे सोमिवर टाकायला हव
डिजे तिकडे सोमिवर टाकायला हव होत हे , मजा आलि असती.
यात शराला अॅड केलं नवह्तं
यात शराला अॅड केलं नवह्तं त्यावेळी , तिची एंट्री झाली नव्हती.
तिला मेघाची बहिण सोडून कुठल्याच रोल मधे टाकता येत नाहीये
मेघा मॅडमची बहिण जी डिव्होर्स झाल्यामुळे मेघाच्याच सासरी रहातेय, घरचा भेदी घरजावई अस्ताद तिचा जुना मित्रं असणार जो प्रयत्नं करणार तिच्याशी काही कनेक्शन जोडायचे !
वाइल्ड कार्ड वाल्यांना अॅड
उषा नाडकर्णीने या घरात आणलेली तिच्या माहेरची कोणीतरी अनाथ मुलगी शर्मिष्ठा - घरकाम स्वयंपाक लाँड्री वगैरे सगळ्यांची पडेल ती कामे करणारी. सुशांत चा हलकट राजकारणी मित्र नंदकिशोर आणि मेघाचा लाडावलेला फ्लॉप गायक असलेला भाऊ त्या खा या दोघांची त्या गरीब शर्मिष्ठावर नजर .
उषा नाडकर्णीने या घरात आणलेली
उषा नाडकर्णीने या घरात आणलेली तिच्या माहेरची कोणीतरी अनाथ मुलगी शर्मिष्ठा - घरकाम स्वयंपाक लाँड्री वगैरे सगळ्यांची पडेल ती कामे करणारी. सुशांत चा हलकट राजकारणी मित्र नंदकिशोर आणि मेघाचा लाडावलेला फ्लॉप गायक असलेला भाऊ त्या खा या दोघांची त्या गरीब शर्मिष्ठावर नजर .
<<<
Omg hilarious
डीजे, मै
डीजे, मै
इथे सगळ्यांच्या नकळत सासरा
इथे सगळ्यांच्या नकळत सासरा थत्तेचाही एक घराबाहेर घरोबा, हर्षदा खानविलकरशी , त्यांची नाजायज मुलगी ऋतुजा.
>>> लोल
धमाल आहे....
धमाल आहे....
बिग बॉस मराठीच्या फेसबुकच्या
बिग बॉस मराठीच्या फेसबुकच्या कव्हरपेजवर अजूनही फिनालेच्या घोषणेचा फोटो आहे. मेघा धाडे विजयी झालीये तर तिचा ट्रॉफी घेतलेला फोटो हवा ना? मी लिहून आले तिथे. कद्रू लेकाचे!
स्मितुडीला पारच आयटेम girl,
स्मितुडीला पारच आयटेम girl, बिचारी.
तिच्यातल्या गुणांवर पण दोन शब्द लिहायचे होते ना. हेल्पफुल कायम, राब राब राबणारी, काही हातात नसताना मार्ग काढणारी जसं कुशन task मध्ये केलं तसं. मेहेनत करून कॅप्टनशीप दावेदारशीप नेहेमी दुसऱ्याला दान करणारी. काही लोकांची गुलाम असली तरी विरुद्ध पार्टीला पण हेल्प करणारी जसं स्वतःचं beauty पार्लर उघडल्यासारखी. दुसऱ्यासाठी काय स्वत:साठीही stand न घेणारी. तरीही मी मी, माझं माझं न करता पुढे आलेली डार्क हॉर्स. सर्वात ह्या मुलीने गाजवलं शांतपणे तमाशा न करता.
हा ते सई स्मिता रोल उलटसुलट
हा ते सई स्मिता रोल उलटसुलट ते पटेल मला डीजे, तू म्हणालीस ते.
मेघाची भेट होतच राहिल असे
मेघाची भेट होतच राहिल असे आस्ताद का म्हणाला?
मेघाची भेट होतच राहिल असे
मेघाची भेट होतच राहिल असे आस्ताद का म्हणाला?>> त्याची गर्लफ्रेंड स्वप्नाली मेघाची चांगली मैत्रीण आहे म्हणुन..
Pages