न सुटणाऱ्या सवयी?

Submitted by कटप्पा on 10 July, 2018 - 22:39

काही सवयी अशा असतात, तुम्ही कितीही चेंज व्हा, प्रगती करा, देश बदला, कल्चर बदला सुटत नाहीत.
लहानपणापासून अजाणतेपणी त्या सवयी पाळल्या गेल्या असतात.

एखादी चप्पल उलटी असेल, मला ती सरळ करावी वाटते. मला आठवत देखील नाही ही सवय मला कधीपासून आहे.

अजुन एक - पाण्याचा पेला तोंड न लावून वरून घटघट पिणे. अमेरिकेत देखील कोणाच्या घरी गेलो आणि पाणी ऑफर झाले, वरून प्यायला सुरू करतो.

तुमच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या अजून टिकून आहेत???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

recent सवय :
१. सतत माबो उघडणे , बंद करणे

१. सकाळी जाग आलेली असली तरी घड्याळ बघून परत झोपणे , आणि मग उशिरा उठणे
२. उद्या सकाळी लवकर उठू असं रोज ठरवणे
३. एरवी स्वयंपाक मोजून करणे , अचानक जास्त लोक आली तर अंदाजे खूप प्रमाणात करणे , मग उरलेलं अन्न शिळासप्तमी करून संपवणे '
४. चहा सोडण्याचा प्रयत्न वारंवार करणे
५. रँडम कुठल्याही विषयवार सर्फ करून वाचत राहणे , उदा : हडप्पा संस्कृती , शेंगदाणे , प्राणी , काहीही
६. बस मध्ये झोपणे
७. ऑफिस मध्ये खुर्चीवर मांडी घालून बसने , चप्पल खाली सोडलेली असते
८. मॉनिटर चा brightness ० शून्य ठेवणे

खूप आहेत सवयी अजून
काय काय लिहू असं झालाय

सोमवार पासून रोज व्यायाम करूया असं ठरवणे ,
खर्च कमी करू असं ठरवणे
पुण्यात विकांताला गावभर फिरणे , मित्रमैत्रिणीना भेटणे

आणि सगळ्यात महत्वाची कधीही न सुटणारी सवय :----------
"अखंड बडबड करणे "

@अग्निपंख@: indexing चा कंटाळा आला .. पाहिलंच नाही काय आलेत अंक ते ..

ही अजून एक सवय ..
उत्साहाच्या भरात चुका करणे

जिवंत माणसाचं लक्षण>>>>>मग तर मला जिवंतपणाचं award मिळालं पाहिजे Lol

नुकतेच माझ्याकडून टास्क चे estimates चुकीचे गेले ..
मी म्हटलं सोपंय एका दिवसात करेन
तो टास्क २ दिवस चालला Lol Lol
आता जपूनच estimates देते बॉसला

<<<अंघोळ पण सर्व काम झाल्यावर करते, सुट्टी दिवशी पण<< माझी बहिणच तू!
मी पण सकाळी डबा वै बनवून मग अंघोळ आणि मग फ्रेश फ्रेश ऑफीसला.

किल्ली
माबो उघडणे आणि हापिसात खुर्चिवर मांडी घालून बसणे ला अगदी अगदी.
मी गेली १५ वर्ष याच कंपनीत आहे आणि रोज आऊट लूक सोबत माबो उघडते. एकावेळे अनेक खिडक्या उघडून ठेवलेल्या असतात.
खुर्चित तर मांडी घातल्याशिवाय मला हापिसात इतका वेळ बसताच यायचं नाही.

जेव्हा मला शांतता हवी असते तेव्हा नाकात बोटे घालायची सवय आहे. ब्रह्मानंदी टाळीच Lol Proud

७. ऑफिस मध्ये खुर्चीवर मांडी घालून बसने , चप्पल खाली सोडलेली असते
>>>

हि सवय मलाही आहे. म्हणजे होती. आता ऑफिसमध्ये अशी मौज करू शकत नाही. पण कॉलेजमध्ये असताना लेक्चरला वा परीक्षेला मांडी घालून बसायचो.

आणखी एक म्हणजे थिअरी लिहिताना फास्ट लिहिणे गरजेचे असल्याने उभा राहायचो. तसे केल्याने लिहायचा स्पीड वाढतो असे मला सायकोलॉजिकली वाटायचे.

अगदी आजही मी ऑफिसमध्ये फास्ट काम करायचे असले की उभा राहून करतो.
तसेच फास्ट विचार करायचा असला तरी उभा राहून कंबरेवर हात ठेवतो.

जेव्हा मला शांतता हवी असते तेव्हा नाकात बोटे घालायची सवय आहे.
>>>>

कानात लिहायचे होते का?
कानामात्रा काही चुकलात का?

खरेच नाकात बोट घालायची सवय असेल तर ते ईथे कबूल करायच्या धाडसाचे कौतुक Happy

इथे कितीजणी माझ्यासारख्याच.

माझ्या डोक्याला कायम बंधाना, नाही तर हेअर बँड, नाही तर गॉगल.
कुठच्याही विषयावरून, शब्दावरून काहिही वाचत सुटायचं.
माबो च्या य खिडक्या चालू/उघड्या

Submitted by किल्ली on 13 July, 2018 - 09:36
<<<अंघोळ पण सर्व काम झाल्यावर करते, सुट्टी दिवशी पण>> +१

भान्डी घासायला टाकण्याआधी स्वछ विसळून ठेवते. इतकी स्वछ कि बघणारे कन्फ्युज होतात.
ओटा आवरल्याशिवाय जेवायला बसवत नाही.
कशालाही चुकून पाय लागला तर पाया पडते, इकडे लोक कन्फ्युज होतात Happy

कितीही थंडी असली तरी एक पाय पांघरूणातून जरासा 'किलकिला' बाहेर काढल्याशिवाय झोप येत नाही.
आणि थंडी नसेल म्हंजे उकडंत असेल तरी अंगावर पांघरूण (अगदी पातळसे का होईना) घेतल्याशिवाय झोप लागत नाही.

कितीही थंडी असली तरी एक पाय पांघरूणातून जरासा 'किलकिला' बाहेर काढल्याशिवाय झोप येत नाही.>>>>> मला पण सवय आहे ही

श्री स्वतःच्या नाकात बोट घालायला काय प्रोब्लेम आहे? Proud
भन्नाट भास्कर धन्यवाद. धाडस कतूं?
तोंडात, कानात बोट घालू शकतो तर् नाकाला काय? Uhoh

तोंडात, कानात बोट घालू शकतो तर् नाकाला काय? Uhoh
>>>

सगळेच घालतात. फक्त लोकं असे चारचौघांत बोलून दाखवत नाही ईतकेच.

पण चारचौघांसमोर घालू मात्र नये. आपल्याला आपले समजत नाही. पण दुसरा कोणी नाकात बोट घालताना दिसला की घाण दिसते. एकांतात मात्र हवे ते कम्फर्टेबल ज्यात असू ते सारे करावे ..

नाकात बोट टाकून गिरमीट चालवायची सवय मला पण आहे. काय तो आनंद वर्णावा... Biggrin
स्क्रीन टैम लय आहे माझा... सतत कुठलीतरी स्क्रीन समोर लागतेच लागते. सवय जाता जात नाही...

नाकाचा शेंडा दाबून रंध्रातून येणारी पांढरी केसासारखी तार काढायला फार आवडते.बसल्या बसल्या चाळा असतो.

मला झोपताना मोबाईल कुशीत लागतो. नाहीतर आपले तान्हे बाळ दुरावले आहे असे सतत वाटत राहते.

जेवताना मी मांडी घालून बसलो की मला डावा हात अमिताभ बच्व्हन हांय्य सारखा डाव्या मांडीच्या सपोर्टवर बाहेर कॅन्टीलीवर छज्ज्यासारखा काढायची सवय आहे.
बरेच लोकं गंमतीने त्यावर टाळी देणे वा अन्नाचा घास ठेवणे असे प्रकार करतात Happy

जेवताना मी मांडी घालून बसलो की मला डावा हात अमिताभ बच्व्हन हांय्य सारखा डाव्या मांडीच्या सपोर्टवर बाहेर कॅन्टीलीवर छज्ज्यासारखा काढायची सवय आहे.
बरेच लोकं गंमतीने त्यावर टाळी देणे वा अन्नाचा घास ठेवणे असे प्रकार करतात Happy

मला झोपताना मोबाईल कुशीत लागतो. नाहीतर आपले तान्हे बाळ दुरावले आहे असे सतत वाटत राहते.
Submitted by भन्नाट भास्कर on 14 July, 2018 - 10:31

हे पहा ऋन्मेऽऽष cum भन्नाट भास्कर चे बाळ! : https://www.maayboli.com/node/64672

Pages