न सुटणाऱ्या सवयी?

Submitted by कटप्पा on 10 July, 2018 - 22:39

काही सवयी अशा असतात, तुम्ही कितीही चेंज व्हा, प्रगती करा, देश बदला, कल्चर बदला सुटत नाहीत.
लहानपणापासून अजाणतेपणी त्या सवयी पाळल्या गेल्या असतात.

एखादी चप्पल उलटी असेल, मला ती सरळ करावी वाटते. मला आठवत देखील नाही ही सवय मला कधीपासून आहे.

अजुन एक - पाण्याचा पेला तोंड न लावून वरून घटघट पिणे. अमेरिकेत देखील कोणाच्या घरी गेलो आणि पाणी ऑफर झाले, वरून प्यायला सुरू करतो.

तुमच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या अजून टिकून आहेत???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यात चुकीचं काय आहे? असंच असतं (असायला हवं ) ना? >>> चुकिचे आहे नाही माहीत नाही. पण ईथे फक्त एक सवय म्हणुन लिहीले आहे
पण सगळेच ईतका जास्त वेळा हात धुत नाहीत हे मात्र नक्की

मोबाईलवर बोलताना हातवारे करणे. एखाद्याला पत्ता समजावताना पण हाताने उजवीकडे-डावीकडे वळ असे सांगतो. बऱ्याच जणांना असावी ही न सुटणारी सवय.

तसेच मला कॉल मध्ये स्क्रिन शेअर न करता त्या स्क्रिन वरच्या गोष्टी इतरांना दिसतात असं मानून बडबड चालू करण्याची सवय आहे Happy

थोडेसे जरी काही केले की लगेच हात धुवा, एक वेळचे जेवण करेस्तोर किमान दोन नॅपकिन पूर्ण ओले होतात हात पुसून. किचनमधे कणिक मळले... हात धु, भाजी शिजायला टाकली .. हात धु! >>>>>>> अगदी अगदी.पूर्वी पोळ्या करतानाही भाजी ढवळायची असेल तर लाटणे ठेऊन हात धुवून भाजीच्या डावाला हात लावत असे.

बूट घालून जास्त वेळ राहता येत नाही, शक्यतो एका जागी तास दोन तास बसायचे असेल तर असेल ते पादत्राण काढून ठेवतो. त्यामुळे प्रवासात नेहमी चपला शोधाव्या लागतात आणि ट्रेन असेल तर पाय भयंकर घाण होतात. मग ते लवकरात लवकर धुवायची घाई!
सकाळी उठल्यावर शौचास बसून दात घासणे. भारतीय पद्धतीत थोडा त्रास होतो, पण सवय जात नाही. सुट्टीच्या वेळी किमान १५ ते २० मिनिटे घरभर किंवा कुठेही फिरत दात घासणे, प्रत्येक वेळी ब्रश जास्तीत जास्त ४५ दिवस टिकतो.

कुणाचे दात पिवळे दिसले/ तोंडाचा वास आला की तसं सांगणे. ही सवय सोडायची आहे.

पैश्याचा हिशेब न ठेवणे.
आवाजात असलेली जन्मजात जरब. माझं साधं बोलणं समोरच्याला दरडावल्यासारखं वाटतं बऱ्याचदा.
चालण्यातली मुजोरी, हे जग माझं आहे आणि मी इथला राजा अश्या पद्धतीने चालणे.
गाडीवर असताना लहान सहान गोष्टींवरून चिडून शिव्या घालणे, खुन्नस देणे.
गाडी चालवतानाच मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलणे, मनातल्या खास गोष्टी मी नेहमी गाडीवरच बोलतो.
नको तिथे भावनिक गुंतवणूक करून ठेवणे.
काम करताना मायबोली वाचणे.

गाडीवर असताना लहान सहान गोष्टींवरून चिडून शिव्या घालणे, खुन्नस देणे. + १

इतर वेळीही चटकन राग येतो आणि बोलण्यात शिव्या येतात. मुलं लहान असताना ठीक होतं. त्यांच्यासमोर मी कितीही शिव्या दिल्या तरी त्यांची काय बिशाद की ते शिव्या देतील? तितका धाकच होता त्यांना.. आता नातवांसमोर भीती वाटते, एकतर ते बिनदिक्कत मला फॉलो करुन ब / भ ची बाराखडी उजळतात आणि वर मलाच जाब विचारतात. कसला धाक नाही साल्यांना... त्यामुळे त्यांच्यासमोर बोलताना तरी ह्या सवयीला लगाम घालायचा प्रयत्न करतोय पण अजून यश येत नाहीये.

गाडीवर असताना लहान सहान गोष्टींवरून चिडून शिव्या घालणे, खुन्नस देणे.>>>>
यावरून एक आठवले. एकदा असाच कोठेतरी जात होतो. गाडी मीच चालवत होतो. वाटेत एका रिक्षावाल्याने कोणत्याही प्रकारे सिग्नल न देता अत्यंत भयानक पद्धतीने कट मारला. शेवटी मी त्या रिक्षावाल्याला पुढच्या सिग्नलवर गाठले आणि त्याच्याशी एक शब्दही न बोलता त्या रिक्षात बसलेल्या प्रवाशांशी बोलायला सुरुवात केली. "भाभी, एक बात बतानी थी| आप जिस रिक्षा मे बैठे हो, उसके ब्रेक लाईट्स बंद है| और अभी आपने देखा होगा, इसने (रिक्षावाल्याने) कैसे कट मारा| अगर मुझे ब्रेक दबाने सिर्फ १-२ सेकंड देरी हो जाती तो अभी आप अस्पताल होते!" इतके बोलून मी माझ्या गाडीची काच बंद केली. नंतर पहिले तर ती बाई पैसे चुकते करून उतरली होती आणि तो रिक्षावाला मला खुन्नस देत होता!!!

अवांतर समाप्त!!!

गाडी चालवतानाच मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलणे, मनातल्या खास गोष्टी मी नेहमी गाडीवरच बोलतो. हा एक प्रकारे कम्फर्ट झोन चा प्रकार असावा . दुचाकीवर बसून मागे बसलेल्या माणसाशी मनमोकळ्या गप्प्पा मारता येतात हा अनुभव मलाही आहे .

गाडी चालवतानाच मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलणे, मनातल्या खास गोष्टी मी नेहमी गाडीवरच बोलतो. हा एक प्रकारे कम्फर्ट झोन चा प्रकार असावा . दुचाकीवर बसून मागे बसलेल्या माणसाशी मनमोकळ्या गप्प्पा मारता येतात हा अनुभव मलाही आहे .+१११११
आमचे बहुतेक निर्णय बाईकवरच झालेत ..
मी मागे बसलेली असताना तो(नवरा) खूप बोलतो एरवी पेक्षा Proud Lol

हा एक प्रकारे कम्फर्ट झोन चा प्रकार असावा . >>>>>
हा सायकॉलॉजीकल कंडिशनिंग चा प्रकार असावा,
ज्याच्याशी बोलायचंय त्याला समोरासमोर बोलायला विचित्र वाटते,
एक उत्सुकता म्हणून विचारतोय, तुम्ही चॅट वर किंवा फोनवर बोलताना जास्त कम्फर्टेबल असता का?

बाईक वर बोलणे हा धोकादायक प्रकार.मागच्याचे बोलणे वारा असल्याने पोहचत नाही पुढे.न ऐकता भलत्या गोष्टीला हो म्हटले तर पुढे 'हे सत्यवचनी हरिश्चंद्रा, निभाव तुझे वचन' होते Happy

चॅटवर किंवा फोनवर जास्त बोलता येत नाही, त्यापरिस समोरासमोर बोलणे पसंत करतो. ज्या गोष्टी एक घाव दोन तुकडे टाइप असतात त्यांच्यासाठी मात्र मी मेसेजचा पर्याय निवडतो. मुख्यतः तेव्हा आपलं अमुक एक म्हणणं आपण एकाच मॅसेज मध्ये एकाच वेळी बोलू शकतो म्हणून!

कुठल्याही आनंदावर उत्तम विरजण घालून देऊ ही आमची जन्मजात सातारी खाज आवरायचा आटोकाट प्रयत्न करतो, पण बेटं जमतच नाही.

अतिरेकी कुठलंच काही पचत नाही, मग ते कोणी देशी एतद्देशीय असो वा परदेशी , कोणी "यु नो ना देसीज" म्हणलं का आम्ही राष्ट्रभक्त होतो, कोणी जर "काय बेटी ती अमेरिका तिथं का संस्कार आहेत?" असं म्हणलं रे म्हणलं की "तुम्हाला टोटल ८ पोरे कुठल्या संस्कारांतर्गत झाली हो?" असे फटकन विचारून टाकतो, माणसे दुखावतात, ही सवय सोडायची आहे.

राव पाटिल तुमच्या सवयी मला अगदी माझ्या वाटतात.
स्वयंपाक करताना हात धुण्याची आणि नॅपकिन ओला करण्याची सवय मला पण आहे, पण त्याला इलाज नाही.
पोळ्या करताना पिठाच्या हाताने च डाव घेऊन भाजी ढवळली तर मला आवडत नाही.

राव पाटिल तुमच्या सवयी मला अगदी माझ्या वाटतात. फक्त ते दात मी घासत नाही तुमच्यासारखे घरभर फिरत (X)आणि करताना...
स्वयंपाक करताना हात धुण्याची आणि नॅपकिन ओला करण्याची सवय मला पण आहे, पण त्याला इलाज नाही.
पोळ्या करताना पिठाच्या हाताने च डाव घेऊन भाजी ढवळली तर मला आवडत नाही.

आणि करताना... <<< Lol
अहो तो वेळेच्या व्यवस्थापनात मोडुन घेतो. घाई असेल तर दात घासायला पुरेसा वेळ देता यावा म्हणून.. आणि सुटीच्या दिवशी दंतमार्जनाखेरीज इतरही कामे होतात फिरत फिरत!

स्वयंपाक करताना हात धुण्याची आणि नॅपकिन ओला करण्याची सवय>>>>>ह्यासारखीच आणखी एक सवय ::
कोड लिहिताना सतत कोड बिनकामाचा समजून trial code clear करण्याची सवय , काही वेळानंतर पुन्हा काम पडलं तर आपण काय काय try केलं ते विसरणे , command prompt वापरत असेल तर सारखा cls करणे
Lol
मला माझी स्क्रिप्ट क्लीन आवडते , कंमेंट्स फक्त documentation साठी वापराव्या , म्हणून ट्रायल कोड कंमेंट न करता delete केला जातो
Lol

हा या चहा पिण्यावरून आठवलं... माझी एक आजी आहे ती ओट्यापाशी उभी राहूनच उकळता चहा पिते. बाकीच्यांचे कप्स जेमतेम भरून होताहेत तोवर हिचा कप रिकामासुद्धा होतो! आनि हो ती बशी वगैरे न वापरता सरळ कपानीच चहा पिते... कसाकाय एवढा गर्र्म पिऊ शकते कोण जाणे!

मीही कपानेच पितो Happy

कसाकाय एवढा गर्र्म पिऊ शकते कोण जाणे! >>>> कॉलेजला असताना आमच्या ग्रुपमध्ये जणू शर्यत लागायची कोण चहा अगोदर संपवतो ते. त्यामुळे लागली बहुधा ही सवय

यावरून मलाही आठवलं , आमच्या चुलतभावाकडे शेतावर
एक गडी होता कामाला -वाघमोडे. लागणीच्या किंवा इतर काही वेळा संध्याकाळी शेतात चहा यायचा घरून. थर्मास वै प्रकार गावाकडे नसल्याने तांब्यात चहा अन १-२ फुलपात्री असायची चहा प्यायला. सगळा फैल एकाच झाल कि एकजण फुलपात्र धूऊन चहा प्यायचे. हे वाघमोडे पाणी पितो तसे वरून तांब्याने चहा प्यायचे Uhoh

आमच्या किरणुला माझ्या प्रतिसादांनंतर खाली गालीप्रदान करण्याची सवय आहे. ती कधीच सुटणे शक्य नाही Lol

सकालि लवकर न उठणे, रात्री जागरण होवो नाहीतर लवकर झोपू दे सकाळी लवकर उठण्याच्या नावाने माझी बोंबच !

हापिसात काम करताना मला laptop वर गाणी ऐकत काम करायची सवय आहे. त्याने माझा कामाचा वेग वाढतो आणि कामात लक्ष लागते.

Pages