न सुटणाऱ्या सवयी?

Submitted by कटप्पा on 10 July, 2018 - 22:39

काही सवयी अशा असतात, तुम्ही कितीही चेंज व्हा, प्रगती करा, देश बदला, कल्चर बदला सुटत नाहीत.
लहानपणापासून अजाणतेपणी त्या सवयी पाळल्या गेल्या असतात.

एखादी चप्पल उलटी असेल, मला ती सरळ करावी वाटते. मला आठवत देखील नाही ही सवय मला कधीपासून आहे.

अजुन एक - पाण्याचा पेला तोंड न लावून वरून घटघट पिणे. अमेरिकेत देखील कोणाच्या घरी गेलो आणि पाणी ऑफर झाले, वरून प्यायला सुरू करतो.

तुमच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या अजून टिकून आहेत???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमी करकरीत नोटा पर्समधे हव्या असतात.अगदी नव्या नसतील तर त्यातल्या त्यात नवीन हव्या.जुन्या नोटा एकतर बदलते किंवा खर्च करून टाकते.

देवकी+1
मी विसरलो होतो ही सवय टाकायला.

स्वतःसाठी मस्त पैकी आलं-वेलची-गवती चहा टाकुन चहा बनवुन झाला की त्यात चिमुटभर कॉफी पावडर टाकणे,
रस्त्याने चालताना बर्‍यापैकी गोल दगड दिसला की एकदा त्याला हुकवुन चॅक्क चॅक्क करुन मग आजुबाजुला एखादा खड्डा दिसतो का ते पाहुन त्याला त्यात टोलवणे,
अभ्यास करताना बाजुला सुगन्धी अगदबत्ती पेटवुन ठेवणे,
कोर्‍या आणी विशिष्ट नंबरच्या नोटा बाजुला काढुन ठेवणे (जसं की कोणाचा फोन नं, दहावी, बारावीचा बैठक क्रमांक इ.इ.)
बायकोला फोन करुन वेगळच नाव घेवुन आधी सुरुवात करुन, कशी आहेस बरेच दिवस झाले भेट नाही की फोन नाही आहेस कुठे, बायको काही म्हणाली की ओह अरे तुला लागला होय फोज, अरे देवा आता कस होणार माझं????...........(प्रकार स्वतःच्या जबाबदारीवर करावा.......मी काय बोल्लो नाय !!!!)
बाकी आठवतील तसे...

आज सकाळी शेवटचं केल होत नन्तर कधी तरी अचानक. रोज रोज मधे चार्म नाय रहात.
बायकोला समजत, ती पण मग आवाज बदलुन बोलायला सुरुवात करते, किंवा मी कट करते, जिकडे लावत होतास तिकडे कर पाहु परत अस म्हणते. :))

चालताना पायाखाली चौकोन( लादी किंवा नुसतंच डिझाइन) असतील तर एकदम symmerty मधे चालायची सवय आहे. चौकोन लहान असतील तर एका चौकोनात एकच पाऊल, आणि मोठे असतील तर दोन-तीन अशी पण दोन चौकोनांच्या मधल्या रेषेवर पाय द्यायचा नाही.
खाताना पण एक घास उजव्या बाजूने तर दुसरा डाव्या बाजूनेच चावायचा. समान हक्काचं भूत बसलेलं आहे मानेवर. Lol

चिन्मयी मी पण तुझ्याच बोटीत...... << मी पण
माझ्या किचन मधे २ पायपुसणे आहेत वेगवेगळ्या मटेरीयलचे त्यामुळे त्यांचा स्पर्श ही वेगळा आहे. किचन मधे चालतांना एकावर पाउल पडल की त्याच रग वर दुसरंही पडायलाच पाहीजे नाहीतर मला २ मिनीट कसतरी होत राहातं...

रस्त्याने जाताना अगदी छोटेसे जरी देऊळ दीसले की हात कपाळाला आणि मग छातीला लाउन नमस्कार करणे.. अगदी गाडी चालवत असेन तरी सुध्दा.. देऊळ अगदी छोटस पट्कन न दीसणारं असलं तरी मला दीसतं आणि हात आपोआप कपाळाकडे जातो.
रात्री झोपताना अगदी झोपण्यापूर्वी कीती वाजले हे न बघता झोपूच शकत नाही..घड्याळ बघून झोपालो नाही तर सारखं काहीतरी राहीलय असं वाटत राहतं...
लीहीलेला ई-मेल बरेचदा न वाचता सेण्ड करणे. ही सवय माझी जाता जात नाही..

माझी एक विचित्र पण प्रयत्न करुनही न सुटणारी सवय म्हणजे बोलताना किंवा विचार करताना एखादा शब्द किंवा वाक्य तर्जनीने जागीच हवेत लिहीणे. मनाला प्रश्न पडला असेल तर ब-याचदा शेवटी प्रश्नचिन्ह सुद्धा असते.

चालताना पायाखाली चौकोन( लादी किंवा नुसतंच डिझाइन) असतील तर >>>> ही सवय मलाही आहे. तसेच फूटपाथवरून चालताना दर वीस पावलांवर ते गटारांची झाकणे, मॅनहोल कवर की काय येतात त्यांच्याही मी मध्येच पाय ठेवतो, कडेवर नाही. भले त्यासाठी एखादे पाऊल आखूड वा लांब टाकतो Happy

आॅफिसला जाता-येता समोर चाललेल्या वाहनक्रमांकातील अंकांची बेरीज करणे. बर्‍याचदा त्यातल्या दोन अथवा तीन अंकांची बेरीज = चौथ्या अंक असते. याची इतकी सवय झालीय की अशी बेरीज जुळणार्‍या चारपाच गाड्या मिळाल्या की मनात कुठेतरी बरे वाटते किंवा आॅफिसात पोहचेपर्यंत एकही असे वाहन मिळाले नाही तर काहीतरी राहिल्यासारखे वाटते. ट्रेन सोडून रस्त्यावरून दैनंदिन प्रवास करायची वेळ आल्यावर बस, रिक्शा, दुचाकी, चारचाकी, टॅक्सीने प्रवास करताना ट्रॅफिकमध्ये काहीतरी चाळा म्हणून ही सवय लागली ती अजून आहे.

मला वॉलेटमधे नोटा एकसारख्या लावून ठेवायची सवय आहे. शिवाय नोटाना पडलेल्या घड्या सरळ करणे ही दुसरी सवय. दोन्ही सवयी जाताजात नाहीत.

माझ्या नवर्याला पण नोटा सरळ लावण्याची सवय आहे. कधी खरेदीला वैगरे एकत्र गेलो का खुप वैताग येतो मला त्याच्या या सवयीचा. प्रत्येक ठिकाणी हा दुकानदाराने परत दिलेले पैसे आधी दुमडलेली नोट (कोपऱ्यात अगदी छोटी दुमड असेल तरी) सरळ करणार, मग त्या सरळ करणार म्हंजे एकावर एक ती पांढरी बाजू असते ती ठेवणार. नंतर स्वतःकडे असलेल्या नोटा काढुन, दुकानदारने दिलेल्या नोटा त्यात रकमेप्रमाणे लावुन ठेवणार म्हणजे १०० रा वर १०० ची नोट, ५०० वर ५०० ची असे. आणि हे सगळं अगदी आरामशीर अजिबात घाई गडबड नाही. बरं हे एकाच ठिकाणी नाही तर प्रत्येक ठिकाणी सेम. मार्केटला गेल्यावर भरपूर खरेदी असते तेव्हा खुप चिडचिड होते माझी. तशी हल्ली सवय झाल्यामुळे आता मला जास्त काही वाटत नाही उलट दुकानदारांचे 'हे काय चाललयं?' चेहरे बघून करमणूक होते.

मला किचन मध्ये वावरताना 4 फडके लागतात...एक काही चॉपिंग कटिंग , पीठ मळणे, चपात्या लाटणे वगैरे करताना कटिंग बोर्ड च्या खाली पसरायला.... दुसरा प्लॅटफॉर्म पुसायला.. जो दर पाच मिनिटांनी मला पुसायला च लागतो. आणि तिसरा प्लेट्स किंवा भांडी पुसायला. आणि एक सतत हात पुसायला.....
कदाचित ही विचित्र च सवय आहे. सगळे मला हसतात यावरून. पण मला हे हवं च असतं...

दुसरं म्हणजे लिपस्टिक. ही सवय गेल्या चार वर्षांपासून लागलीय. या आधी मी मुलगी जन्माला येई पर्यंत एकदा ही लिपस्टिक वापरली नव्हती. फक्त लग्नात काय ती ब्युटीशीयन ने लावलेली तीच. पण आज घरा बाहेर पडताना लिपस्टिक आणि काजळ लावल्याशिवाय निघालं तर मला खूप काहीतरी राहिलंय वगैरे असं वाटतं.

लिपस्टिक साठी अगदी अगदी अनिष्का, मलाही सवय कॉलेज पासून लागलीये, बिना लिपस्टिक मी राहूच शकत नाही.

पण काजळ बिग नो, मी काजळ लावले की काय होते माहीत नाही पण त्यादिवशी मी एकदातरी रडतेच. आधी आधी लक्षात यायचे नाही, मग नंतर थोडे थोडे लक्षात आले तरी मनाचे खेळ, योगायोग वाटून दुर्लक्ष केले पण नंतर बंदच केले. विचित्र असले तरी खरे आहे☺️

स्कुटर चालवून झाल्यावर हात धुण्याची 'स्निग्धा'ची सवय फार चांगली आहे. हात न धुण्यामुळे माझ्या दोन्ही हातांच्या अंगठा व त्याजवळील बोटाला नेहमी इन्फेक्शन व्हायचे,आणि डाँक्टरांनी सांगेपर्यंत त्याचे कारण माझ्या लक्षातच आले नव्हते.

monk सिरिज बघितली पाहिजे. << त्याला तर आजारच अस्तो. पण त्याच्या सगळ्याच सवई (पण कमी प्रमाणात) बघितल्या आहेत.
एक्सर्साईज च्या मशिन वर दोन ऑपशन्स असतात. किती मिनीटे झालीत आणि किती उरलीत. मला किती मिनीट उरलीत ह्यात जास्त ईटरेस्ट असतो. नेट वर मुव्ही बघतांना, पुस्तक वाचतांना कितीही ईन्टरेस्टिंग असल तरी किती उरलय हे सारख बघत असते.

पण आज घरा बाहेर पडताना लिपस्टिक आणि काजळ लावल्याशिवाय निघालं तर मला खूप काहीतरी राहिलंय वगैरे असं वाटतं >>>> +1000

मलाही सवय कॉलेज पासून लागलीये, बिना लिपस्टिक मी राहूच शकत नाही.>>>> हो मीही.घराबहेर जाताना टिकली,कानातले वगैरे नसले तरी चालेल,पण लिपस्टिक हवीच.

मला वॉलेटमधे नोटा एकसारख्या लावून ठेवायची सवय आहे. शिवाय नोटाना पडलेल्या घड्या सरळ करणे >>>>> नोटा क्रमवार लावायच्या.५००,२००,१००,वगैरे.

Pages