Submitted by कटप्पा on 10 July, 2018 - 22:39
काही सवयी अशा असतात, तुम्ही कितीही चेंज व्हा, प्रगती करा, देश बदला, कल्चर बदला सुटत नाहीत.
लहानपणापासून अजाणतेपणी त्या सवयी पाळल्या गेल्या असतात.
एखादी चप्पल उलटी असेल, मला ती सरळ करावी वाटते. मला आठवत देखील नाही ही सवय मला कधीपासून आहे.
अजुन एक - पाण्याचा पेला तोंड न लावून वरून घटघट पिणे. अमेरिकेत देखील कोणाच्या घरी गेलो आणि पाणी ऑफर झाले, वरून प्यायला सुरू करतो.
तुमच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या अजून टिकून आहेत???
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
recent सवय :
recent सवय :
१. सतत माबो उघडणे , बंद करणे
१. सकाळी जाग आलेली असली तरी घड्याळ बघून परत झोपणे , आणि मग उशिरा उठणे
२. उद्या सकाळी लवकर उठू असं रोज ठरवणे
३. एरवी स्वयंपाक मोजून करणे , अचानक जास्त लोक आली तर अंदाजे खूप प्रमाणात करणे , मग उरलेलं अन्न शिळासप्तमी करून संपवणे '
४. चहा सोडण्याचा प्रयत्न वारंवार करणे
५. रँडम कुठल्याही विषयवार सर्फ करून वाचत राहणे , उदा : हडप्पा संस्कृती , शेंगदाणे , प्राणी , काहीही
६. बस मध्ये झोपणे
७. ऑफिस मध्ये खुर्चीवर मांडी घालून बसने , चप्पल खाली सोडलेली असते
८. मॉनिटर चा brightness ० शून्य ठेवणे
खूप आहेत सवयी अजून
काय काय लिहू असं झालाय
सोमवार पासून रोज व्यायाम करूया असं ठरवणे ,
खर्च कमी करू असं ठरवणे
पुण्यात विकांताला गावभर फिरणे , मित्रमैत्रिणीना भेटणे
आणि सगळ्यात महत्वाची कधीही न सुटणारी सवय :----------
"अखंड बडबड करणे "
किल्लीच्या १,१, (दोनदा आलेत
किल्लीच्या १,१, (दोनदा आलेत म्हणून ) २,५,७,८ सवयीना +१
सोमवार पासून रोज व्यायाम
सोमवार पासून रोज व्यायाम करूया असं ठरवणे >>> हे पटलं
@अग्निपंख@: indexing चा
@अग्निपंख@: indexing चा कंटाळा आला .. पाहिलंच नाही काय आलेत अंक ते ..
ही अजून एक सवय ..
उत्साहाच्या भरात चुका करणे
उत्साहाच्या भरात चुका करणे >>
उत्साहाच्या भरात चुका करणे >> सेम हिअर ... जिवंत माणसाचं लक्षण आहे हे
जिवंत माणसाचं लक्षण>>>>>मग तर
जिवंत माणसाचं लक्षण>>>>>मग तर मला जिवंतपणाचं award मिळालं पाहिजे
नुकतेच माझ्याकडून टास्क चे estimates चुकीचे गेले ..
मी म्हटलं सोपंय एका दिवसात करेन
तो टास्क २ दिवस चालला
आता जपूनच estimates देते बॉसला
<<<अंघोळ पण सर्व काम झाल्यावर
<<<अंघोळ पण सर्व काम झाल्यावर करते, सुट्टी दिवशी पण<< माझी बहिणच तू!
मी पण सकाळी डबा वै बनवून मग अंघोळ आणि मग फ्रेश फ्रेश ऑफीसला.
किल्ली
किल्ली
माबो उघडणे आणि हापिसात खुर्चिवर मांडी घालून बसणे ला अगदी अगदी.
मी गेली १५ वर्ष याच कंपनीत आहे आणि रोज आऊट लूक सोबत माबो उघडते. एकावेळे अनेक खिडक्या उघडून ठेवलेल्या असतात.
खुर्चित तर मांडी घातल्याशिवाय मला हापिसात इतका वेळ बसताच यायचं नाही.
जेव्हा मला शांतता हवी असते तेव्हा नाकात बोटे घालायची सवय आहे. ब्रह्मानंदी टाळीच
एकावेळे अनेक खिडक्या उघडून
एकावेळे अनेक खिडक्या उघडून ठेवलेल्या असतात.>>> +१११११
दक्षुजी विपू ला उत्तर द्या ना
किल्ली बघ गं विपु
किल्ली बघ गं विपु
जेव्हा मला शांतता हवी असते
जेव्हा मला शांतता हवी असते तेव्हा नाकात बोटे घालायची सवय आहे. ब्रह्मानंदी टाळीच >>> शी , दक्षे काय हे
७. ऑफिस मध्ये खुर्चीवर मांडी
७. ऑफिस मध्ये खुर्चीवर मांडी घालून बसने , चप्पल खाली सोडलेली असते
>>>
हि सवय मलाही आहे. म्हणजे होती. आता ऑफिसमध्ये अशी मौज करू शकत नाही. पण कॉलेजमध्ये असताना लेक्चरला वा परीक्षेला मांडी घालून बसायचो.
आणखी एक म्हणजे थिअरी लिहिताना फास्ट लिहिणे गरजेचे असल्याने उभा राहायचो. तसे केल्याने लिहायचा स्पीड वाढतो असे मला सायकोलॉजिकली वाटायचे.
अगदी आजही मी ऑफिसमध्ये फास्ट काम करायचे असले की उभा राहून करतो.
तसेच फास्ट विचार करायचा असला तरी उभा राहून कंबरेवर हात ठेवतो.
जेव्हा मला शांतता हवी असते
जेव्हा मला शांतता हवी असते तेव्हा नाकात बोटे घालायची सवय आहे.
>>>>
कानात लिहायचे होते का?
कानामात्रा काही चुकलात का?
खरेच नाकात बोट घालायची सवय असेल तर ते ईथे कबूल करायच्या धाडसाचे कौतुक
मॉनिटर चा brightness ० शून्य
मॉनिटर चा brightness ० शून्य ठेवणे>>>> +१११११
मलाही आहे ही सवय!
इथे कितीजणी माझ्यासारख्याच.
इथे कितीजणी माझ्यासारख्याच.
माझ्या डोक्याला कायम बंधाना, नाही तर हेअर बँड, नाही तर गॉगल.
कुठच्याही विषयावरून, शब्दावरून काहिही वाचत सुटायचं.
माबो च्या य खिडक्या चालू/उघड्या
जेव्हा मला शांतता हवी असते
जेव्हा मला शांतता हवी असते तेव्हा नाकात बोटे घालायची सवय आहे>>>कोणाच्या?
Submitted by किल्ली on 13
Submitted by किल्ली on 13 July, 2018 - 09:36
<<<अंघोळ पण सर्व काम झाल्यावर करते, सुट्टी दिवशी पण>> +१
भान्डी घासायला टाकण्याआधी स्वछ विसळून ठेवते. इतकी स्वछ कि बघणारे कन्फ्युज होतात.
ओटा आवरल्याशिवाय जेवायला बसवत नाही.
कशालाही चुकून पाय लागला तर पाया पडते, इकडे लोक कन्फ्युज होतात
कितीही थंडी असली तरी एक पाय
कितीही थंडी असली तरी एक पाय पांघरूणातून जरासा 'किलकिला' बाहेर काढल्याशिवाय झोप येत नाही.
आणि थंडी नसेल म्हंजे उकडंत असेल तरी अंगावर पांघरूण (अगदी पातळसे का होईना) घेतल्याशिवाय झोप लागत नाही.
कितीही थंडी असली तरी एक पाय
कितीही थंडी असली तरी एक पाय पांघरूणातून जरासा 'किलकिला' बाहेर काढल्याशिवाय झोप येत नाही.>>>>> मला पण सवय आहे ही
श्री स्वतःच्या नाकात बोट
श्री स्वतःच्या नाकात बोट घालायला काय प्रोब्लेम आहे?
भन्नाट भास्कर धन्यवाद. धाडस कतूं?
तोंडात, कानात बोट घालू शकतो तर् नाकाला काय?
तोंडात, कानात बोट घालू शकतो
तोंडात, कानात बोट घालू शकतो तर् नाकाला काय? Uhoh
>>>
सगळेच घालतात. फक्त लोकं असे चारचौघांत बोलून दाखवत नाही ईतकेच.
पण चारचौघांसमोर घालू मात्र नये. आपल्याला आपले समजत नाही. पण दुसरा कोणी नाकात बोट घालताना दिसला की घाण दिसते. एकांतात मात्र हवे ते कम्फर्टेबल ज्यात असू ते सारे करावे ..
नाकात बोट टाकून गिरमीट
नाकात बोट टाकून गिरमीट चालवायची सवय मला पण आहे. काय तो आनंद वर्णावा...
स्क्रीन टैम लय आहे माझा... सतत कुठलीतरी स्क्रीन समोर लागतेच लागते. सवय जाता जात नाही...
नाकाचा शेंडा दाबून रंध्रातून
नाकाचा शेंडा दाबून रंध्रातून येणारी पांढरी केसासारखी तार काढायला फार आवडते.बसल्या बसल्या चाळा असतो.
नाकात बोट? आणि त्यामुळे चक्क
नाकात बोट? आणि त्यामुळे चक्क ब्रम्हानंदी टाळी? ह्या! नाही पटलं बुवा. काय काय सवयी असतात कुणाकुणाला!
शाली +1
शाली +1
लहान असताना झोपताना एका
.
मला झोपताना मोबाईल कुशीत
मला झोपताना मोबाईल कुशीत लागतो. नाहीतर आपले तान्हे बाळ दुरावले आहे असे सतत वाटत राहते.
जेवताना मी मांडी घालून बसलो
जेवताना मी मांडी घालून बसलो की मला डावा हात अमिताभ बच्व्हन हांय्य सारखा डाव्या मांडीच्या सपोर्टवर बाहेर कॅन्टीलीवर छज्ज्यासारखा काढायची सवय आहे.
बरेच लोकं गंमतीने त्यावर टाळी देणे वा अन्नाचा घास ठेवणे असे प्रकार करतात
जेवताना मी मांडी घालून बसलो
जेवताना मी मांडी घालून बसलो की मला डावा हात अमिताभ बच्व्हन हांय्य सारखा डाव्या मांडीच्या सपोर्टवर बाहेर कॅन्टीलीवर छज्ज्यासारखा काढायची सवय आहे.
बरेच लोकं गंमतीने त्यावर टाळी देणे वा अन्नाचा घास ठेवणे असे प्रकार करतात
मला झोपताना मोबाईल कुशीत
मला झोपताना मोबाईल कुशीत लागतो. नाहीतर आपले तान्हे बाळ दुरावले आहे असे सतत वाटत राहते.
Submitted by भन्नाट भास्कर on 14 July, 2018 - 10:31
हे पहा ऋन्मेऽऽष cum भन्नाट भास्कर चे बाळ! : https://www.maayboli.com/node/64672
Pages