न सुटणाऱ्या सवयी?

Submitted by कटप्पा on 10 July, 2018 - 22:39

काही सवयी अशा असतात, तुम्ही कितीही चेंज व्हा, प्रगती करा, देश बदला, कल्चर बदला सुटत नाहीत.
लहानपणापासून अजाणतेपणी त्या सवयी पाळल्या गेल्या असतात.

एखादी चप्पल उलटी असेल, मला ती सरळ करावी वाटते. मला आठवत देखील नाही ही सवय मला कधीपासून आहे.

अजुन एक - पाण्याचा पेला तोंड न लावून वरून घटघट पिणे. अमेरिकेत देखील कोणाच्या घरी गेलो आणि पाणी ऑफर झाले, वरून प्यायला सुरू करतो.

तुमच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या अजून टिकून आहेत???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी अजिबात न सुटणारी सवय-
वर्षाचे बाराही महिने अंगावर ब्लॅंकेट घेऊन झोपणे, तेही डोक्यावरुन! मग कोणताही ऋतू असो! त्याशिवाय झोपच लागत नाही. गेल्या वर्षी उन्हाळ्यात मरणाचं उकडत होतं, आणि भरीस भर लाईट जाऊन त्याच दिवशी नेमका इन्व्हर्टर पण बंद पडलेला होता. तरीही मी अंगावर अगदी डोक्यापासून पायांपर्यंत अंगावर ब्लॅंकेट घेऊन गाढ झोपले होते. उठल्यावर मस्त घामाने आंघोळ झालेली होती! Happy

बाकीच्या काही सवयी-
१) माबो
२) अभ्यास करताना सतत बोलत राहणे, ज्याचा अभ्यास करतेय, ते सतत मोठ्याने वाचत राहणे. मग तो कोणताही विषय असो! या सवयीमुळे आई-दीदी भोंगा म्हणून चिडवतात! Lol
३) वडापाव खाताना नेहमी अर्धा वडा पावात भरुन खाणे आणि अर्धा नुसता चटणीसोबत खाणे! अप्रतिम चव लागते नि दोन वडापाव खाल्ल्याचं फिलींगही येतं! तेवढंच बाहेरचं खाणं घटवल्याचा आनंद! Happy
४) गार पाणी पिणे! सर्दी झालेली असली तरी गार पाण्यावाचून राहवत नाही. साधं पाणी प्यायल्यावर ते प्यायल्यासारखंच वाटत नाही हल्ली! Happy

वडापाव खाताना नेहमी अर्धा वडा पावात भरुन खाणे आणि अर्धा नुसता चटणीसोबत खाणे! अप्रतिम चव लागते नि दोन वडापाव खाल्ल्याचं फिलींगही येतं! तेवढंच बाहेरचं खाणं घटवल्याचा आनंद! Happy>>>> =+११११

मीही असेच करते, पण फक्त बेस्तीज
वा कुटुंबासोबत असताना, चार-,चौघात अगदी शिस्तीत वागते मी, अगदी शहाण्यासारखी

वरचे तुझे घोंगडी सवय वाचून एक किस्सा आठविला, अन खूप हसले,

माझी बेड टी ची सवय आधी लिहिलंय, बाकीच्या पण सांगीन म्हणतेय

खरेतर मी महाआळशी, घरी काहीच करत नाही, अन माझ्या पप्पांना पण आवडत नाही मी काही काम केलेले सो आळसाचे छान निमित्त मिळते. पण समजा चुकून काही करायला गेले की मलाही तो अति स्वच्छतेचा किडा चावतो, काही चिरले की लगेच कचरा डब्यात टाका, काही सांडले तर लगेच साफ करा, अन मुख्य म्हणजे थोडेसे जरी काही केले की लगेच हात धुवा, एक वेळचे जेवण करेस्तोर किमान दोन नॅपकिन पूर्ण ओले होतात हात पुसून.

अजून बऱ्याच आहेत, वेळ मिळेल तश्या लिहीन

असच करय्चे मी पन! >> भारी! Happy असा अभ्यास केल्याने पटकन डोक्यात शिरतं माझ्याही! Happy

मीही असेच करते, पण फक्त बेस्तीज
वा कुटुंबासोबत असताना, चार-,चौघात अगदी शिस्तीत वागते मी, अगदी शहाण्यासारखी>> सेम पींच! बाहेर असं खाल्लं की भूत बघितल्यासारखं बघतात! Lol म्हणून घरातच असं आस्वाद घेत खायचा वडापाव! Happy

वरचे तुझे घोंगडी सवय वाचून एक किस्सा आठविला, अन खूप हसले,>> कोणता किस्सा? ऐकायला आवडेल! Happy

वडापाव खाण्याच्या सवयीवरून माझी एक सवय आठवली!

मी घरी असताना किंवा एकटा असतांना क्रीम बिस्कीट खात असेन तर क्रीम बिस्कीट उघडून आधी क्रीम नसलेले बिस्कीट खातो आणि मग क्रीम चाटून तिचा आस्वाद घेतो!!!

अगं थोडा फिल्मी प्रकार झाला होता
कॉलेजात असताना आमचा मोठा ग्रुप होता पण आम्ही चौघी खूप जवळच्या होतो, त्यातील एकीचे घरी दुपारी कोणी नसायचे म्हणून मोस्टली तिच्या कडेच थांबायचो. तिचा बॉफ्रे होतो जो नेमका तिच्या आईला आवडायचा नाही. एके दिवशी तिच्या घरी असताना तिला अचानक त्याची म्हणे खुप आठवण येऊ लागली अन आत्ताच भेटणार म्हणून गेली सुद्धा. एकतर हिच्या आईने त्यांच्या बाजूवल्या काकूंना तिच्यावर नजर ठेवायला सांगितले होते, म्हणून त्या काकू दर तासाला येऊन मुद्दाम सगळे ठीक ना विचारायला येत.

झाले, ही गेली नजर चोरून, अन त्या काकू आल्या, मग काय, तारांबळ नुसती, काहीच न सुचल्याने पटकन एकीला झोपवून घोंगड्याने झाकले, दुसरी तिचे डोकं चेपू लागली. नुसती धम्माल, काय काय केले होते त्या काकूंना त्या घोंगड्या खाली तीच मैत्रीण आहे अशी खात्री करून देण्यासाठी, तेही त्यांना घोंगड्यापासून लांब ठेऊन, हे सगळे आठविले.

माझी अजून एक सवय

सुटीच्या दिवशी, अगदी पहाटे उठून मस्त चहा पिते, नाश्ता खाते, कायप्पा वर काहीतरी स्टेटस टाकते, हल्ली माबो चेक करते अन मग पुन्हा झोपते ते थेट ११-१२ वाजेस्तोर

घरी असताना किंवा एकटा असतांना क्रीम बिस्कीट खात असेन तर क्रीम बिस्कीट उघडून आधी क्रीम नसलेले बिस्कीट खातो आणि मग क्रीम चाटून तिचा आस्वाद घेतो!!!>>>>>>>>>>>>>>>>>>
+11111111111111111111111111

जर दोन बिस्कीट असतील तर त्यातले अर्धे क्रीम नसलेले भाग आधी खाते... आणि क्रीम असलेले दोन भाग एकत्र जोडून खाते... फार मस्त वाटत... Happy

अभ्यास करताना सतत बोलत राहणे, ज्याचा अभ्यास करतेय, ते सतत मोठ्याने वाचत राहणे. मग तो कोणताही विषय असो>>>>>>>
त्याच फ्लोमधे कोणी मधेच टपकल आणि काही विचारल तर चूकून पटकन यातलच काहीतरी सांगते.. Happy

गार पाणी पिणे! सर्दी झालेली असली तरी गार पाण्यावाचून राहवत नाही. साधं पाणी प्यायल्यावर ते प्यायल्यासारखंच वाटत नाही हल्ली! Happy>>>>>+11111111111

वडापाव खाताना नेहमी अर्धा वडा पावात भरुन खाणे आणि अर्धा नुसता चटणीसोबत खाणे! अप्रतिम चव लागते नि दोन वडापाव खाल्ल्याचं फिलींगही येतं! तेवढंच बाहेरचं खाणं घटवल्याचा आनंद! Happy>>>>>>>+11112
मी कधीकधी एक वडा दोन पावात भरून खाते... Happy

----कुठलतरी काम करताना हळूहळू शून्यात बघत तिसराच विचार करणे... काम थांबलेल असत..

.----.आपल नाव कानात पोचल्याशिवाय हाकेला ओ न देणे... मग सगळ्या सुचना परत रिपीट कराव्या लागतात..

१००

<<<थोडेसे जरी काही केले की लगेच हात धुवा, एक वेळचे जेवण करेस्तोर किमान दोन नॅपकिन पूर्ण ओले होतात हात पुसून. <<< +११११११११ किचनमधे कणिक मळले... हात धु, भाजीत मीठ टाकल.. हात धु, भाजी शिजायला टाकली .. हात धु! थन्डीत प्रॉब्लेम होतो या सवयीने.

थोडेसे जरी काही केले की लगेच हात धुवा, एक वेळचे जेवण करेस्तोर किमान दोन नॅपकिन पूर्ण ओले होतात हात पुसून.>>>>+११११११११
मी पण सेम टू सेम अगदी

<थोडेसे जरी काही केले की लगेच हात धुवा, एक वेळचे जेवण करेस्तोर किमान दोन नॅपकिन पूर्ण ओले होतात हात पुसून. <<< +११११११११ किचनमधे कणिक मळले... हात धु, भाजीत मीठ टाकल.. हात धु, भाजी शिजायला टाकली .. हात धु! थन्डीत प्रॉब्लेम होतो या सवयीने. >>> सेम पिंच.

गार पाण्याचेही सेम. अगदी सर्दी खोकला असेल तरी, मग खाते नवर्याचा ओरडा Proud

माबोची सवय नव्हे तर व्यसन लागलय.

स्वयंपाक करुन संपता क्षणी मला जेवायला आवडत. त्यामुळे मी स्वयंपाक करता करताच बर्यापैकी आवरुन घेते. पण बाकी जेवण झाल्यावर..

वडापाववरून आठवले. मी वडापाव समोसापाव बर्गर वा तत्सम प्रकार खाताना सर्व कडेकडेने खात मध्यापर्यंत पोहोचतो. शेवटाचा घास पावाच्या सेंटरचा असतो. जिथे पावही सॉफ्ट आणि वडा जास्त असतो.

Submitted by VB on 14 July, 2018 - 12:59 >> Rofl इमॅजिन करुनच हसू आलं! Lol

जुई, अगं खरेच आम्ही अजूनही हसतो जुने प्रसंग आठवून. गेले काही दिवस हा विस्मरणात गेला होता ज्याची आठवण तुझ्या घोंगड्याने करून दिली

दुसरे काही उद्योग करत असताना पाणी प्यालो, तर एक मोठा घोट घेऊन तोंडाचा चंबू करून, नकळत ते पाणी तिथेच घोळवत ठेवायची सवय लागलीय.
कितीकदा ठसकाही लागलाय. शिवय हवं तितकं पाणी प्यालं जात नाही, ते वेगळंच.

अजुन एक वाईट सवय , पटकन एखाद्यावर विश्वास ठेवणे. मला न बरेचदा आधीपासुन अंदाज येतो की ईथे मी फसली जाणार आहे किंवा अमुक अमुक व्यक्ती माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेणारे. तरी मी मुर्खासारखी अंधळा विश्वास ठेवते अन मग नंतर बसते रडत.
अन त्यात म्हणजे खोटेपणा न जमतो न आवडतो, त्यात अशी वागणारी व्यक्ती खुप जवळची असेल तर खुप वाईट वाटते अन तरी पुन्हा स्वतः च परत बोलायला जाते Angry

नको तिथे नको ते पचकण्याची सवय... काही केल्या यावर उपाय सापडत नाही.
मला समजलेलं असतं की इथे हे न बोलून शहाणं राहाता येईल पण न जाणे जिभेला स्वतः ला वाचा फुटल्यासारखं होतं आणि... आणि काय? बोलल्या जातं Uhoh

>>सैपाक झाला की हव्या त्या भान्ड्यात भाज्या- आमट्या काढुन ओटा,पुसुन... भान्डेवाल्या मावशीन्साठी भान्डी बाहेर काढुन मगच जेवायाला बसायचे.. उशीर झाला तरी चालेल. कारण जेवल्यानन्तर कामे होत नाही. Proud
आमच्या काकु, भावजया... पटापट स्वयम्पाक करण्याच्या नादात किचन ओट्यावर सगळा पसारा मान्डुन ठेवतात. सान्डउन्ड झालेली असते. पाणी/दुध सान्डलेल, लसुन तिथेच सोलल्याने त्याचे टरफले., फोतरे, मिरचीचे देठे, ... सगळे पडलेले. त्यात पोळ्या करतानाचे पिठ सान्डलेले. आणि मग जेवणानन्तर हे सगळे आवरत बसाय्च.
मला अश्या पसार्यात तर तिथे स्वयम्पाक उमजतच नाही.<<<<
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११

अगदी अगदी !!
किचन सिंक च्या आत वाकडी तिकडी खरकटी भांडी टाकलेली पाहून चीडच होते. त्यात ती आणखी बरबटतात..
मला स्वच्छतेची आणि टापटीपतेची ओसीडी आहे. जराही पसारा खपत नाही. घड्या जोरदार झटकून, टोकं नीट जुळवून, कपाटात ठेवताना सुधा फोल्ड दिसणार नाही इतपत. हॉटॅलमध्येही पसारा घालत नाही. आईच्या/आजीच्या अतिशय कडक शिस्तित वाढल्याने असेल..
दुसरे म्हणजे, हळूवार चालणारी, कुठलही कामं हळू करणारी माणसं डोक्यात जातात इतकी चीड येते.
आश्चर्य म्हणजे, मी जेवण मात्र अतिशय हळू जेवते.

दुसरे म्हणजे, हळूवार चालणारी, कुठलही कामं हळू करणारी माणसं डोक्यात जातात इतकी चीड येते
>>
+१ Proud

मला या बाबत स्वतःचा पण राग येतो कधी कधी.सतत काय कुत्रं मागं लागल्यासारखं काम करत असतो आपण? जरा म्हणून जीवाला आराम नाही. झालं ते काम सावकाश त्याच्या स्पिड ने तर काय बिघडलं, पण नाहीच! जित्याची खोड.... असो!

दुसरे म्हणजे, हळूवार चालणारी, कुठलही कामं हळू करणारी माणसं डोक्यात जातात इतकी चीड येते>>>> माझ्या मम्मालाही, अन गम्मत म्हणजे मी अशीच आहे, म्हणजे एकदम संथ अशी नाही, पण रमतगमत असते सारे, आपल्याच तंद्रीत. जास्त कधी काही करत नाही मी, कधीतरी क्वचित करायला जाते पण त्यातही कोणाची लुडबुड आवडत नाही,.

अजून एक सवय, कुठलेही काम अगदी शेवटच्या क्षणी करायला घेते, मग खूप धावपळ वगैरे होते, पण तरी शक्यतो करते डेडलाईन च्या आधी पूर्ण
मग स्वतःलाच टोमणे मारते, कर आराम कर अजून, आळशी कुठली. किमान पुढच्या वेळी सगळे वेळेत करायला घे, तरी परत येरे माझ्या मागल्या

<थोडेसे जरी काही केले की लगेच हात धुवा, एक वेळचे जेवण करेस्तोर किमान दोन नॅपकिन पूर्ण ओले होतात हात पुसून. किचनमधे कणिक मळले... हात धु, भाजीत मीठ टाकल.. हात धु, भाजी शिजायला टाकली .. हात धु! >> ह्यात चुकीचं काय आहे? असंच असतं (असायला हवं ) ना?

यात पाणी बरंच वापरतो आपण नकळत. हात स्वच्छ कमी वेळात धुवायला भरपूर मोठी धार फर्र्कन सोडली जाते.
(याला हात धुण्याचे पाणी सिंकमध्ये हाताखाली मोठं पातेलं ठेवून नंतर झाडाला घालता येईल/धार बारीक सोडता येईल.)
हेच भांड्यांबद्दल.पूर्वी भाकरीच्या तव्यात पिठलं वगैरे रियुज सर्रास होता.आता नळाला भरपूर पाणी, कामाला मेड यामुळे आपण कधीकधी अनावश्यक भांडी धुवायला टाकतो आपण.

भाजीत मीठ टाकल.. हात धु>>>>
भाजीत मीठ टाकल्यावर कशाला हात धुवायला पाहिजेत??? हाताने मीठ टाकता का? चमचा नाही वापरत?

हाताने मीठ टाकता का? चमचा नाही वापरत?>>> चिमटीत घेउन मीठ टाकायला मला फार आवडते. उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया.

Pages