न सुटणाऱ्या सवयी?

Submitted by कटप्पा on 10 July, 2018 - 22:39

काही सवयी अशा असतात, तुम्ही कितीही चेंज व्हा, प्रगती करा, देश बदला, कल्चर बदला सुटत नाहीत.
लहानपणापासून अजाणतेपणी त्या सवयी पाळल्या गेल्या असतात.

एखादी चप्पल उलटी असेल, मला ती सरळ करावी वाटते. मला आठवत देखील नाही ही सवय मला कधीपासून आहे.

अजुन एक - पाण्याचा पेला तोंड न लावून वरून घटघट पिणे. अमेरिकेत देखील कोणाच्या घरी गेलो आणि पाणी ऑफर झाले, वरून प्यायला सुरू करतो.

तुमच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या अजून टिकून आहेत???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कपड्यांच्या / चादरींच्या घड्यांबाबत मी योकु भौ व दक्षे सोबत Wink कदाचित अत्यंत शिस्तीचे पालक ह्या बाबतीत कारणीभूत असावेत... हे मी आई ला बरेचदा बोलुन हि दाखवले आहे Lol

इथे ओसीडी च्या सवयींबद्दल ही लिहायचं आहे काय? मग चिक्कार लिहिता येईल मला Happy
कपडे वाळत घालण्याबद्दल, कपडे, चादरी घडी घालण्याबद्दल, पायाच्या तळव्यांना जराही ओलं लागायला नको. अशा अनेक न सुटणार्या सवयी आहेत.

वाचन! विषय बंधन नाही, सणक आली की वाचत सुटतो, मनात काय आले ते हाती पुस्तक असले तर पुस्तक नसले तर विकिपीडियावर काढून वाचत बसतो, सिंधू संस्कृती पासून ते स्कायलॅब कशी पाडली, अन ब्रिटिश पार्लमेंट मधील थोरल्या विल्यम पिटचं भाषण ते डेझर्ट वारफेयरची बेसिक्स, काहीतरी विचार करताना, वर्तमानपत्र वाचताना आलेले रेफरन्स सरळ सर्च करून वाचत बसतो, त्याने बहुश्रुत व्हायला मदत होतेच पण प्रसंगी आपण "कर्ट अन मॅनरलेस" म्हणून पण प्रोजेक्ट होतो. पण ही सवय आहे खरी, झपाटल्यागत वाचत बसतो.

जेवताना पान स्वच्छ केलं की लिंबाची फोड शेवटी चोखुन खाणे, त्याची उरलेली रिंड मिठात बुचकळून नंतर ती हातावर रगडणे सुद्धा एक जुनी सवय.

स्वतः स्वयंपाक करायला आवडतो, पण किचन मध्ये लोकांची लुडबुड खपत नाही, हॉस्टेल काळात १२-१५ पोरांचे नॉनव्हेज, पार तांबडा पांढरा वजडी सुक्के वगैरे सहित बनवत असे पण पूर्ण एकाकी, पाककला मला मेडिटेशन सारखी वाटते, डिस्टर्ब झालेलं आवडत नाही. दारू पार्टी असली तरी बाहेर पोरे पीत बसणार मी किचन मध्ये एकटा, हाती उलथने, झारा दुसऱ्या हाती ९० ओन्ली सोडा रमचा पेग, संपला की एखाद्याला आवाज देऊन रिफिल मागवायचे पण ते तितकेच, किचन मध्ये एन्ट्री नाही कोणालाच, तू कांदे चिर तू भांडी विसळ अशी पूर्व कंडिशन पण नाही.

पाठ्यपुस्तक असो वा कादंबरी कोणी कणा मोडून पूर्ण फोल्ड करून वाचत असलेलं दिसलं तरी डोस्कं आऊट होतं,

बियर थेट बाटली तोंडाला लावून पिणे (पाइंट फक्त अपवाद) स्ट्रिक्ट नो नो,

स्वयम्पाक करताना किचन ओट्यावर अजिबात पसारा आवडत नाही. जो डबा काढला तो परत जागेवर ठेवायचा. खरकटे पडले असेल ते लगेच उचलायचे. कान्दा, टोमॅटो चिरलेल्या प्लेट्स लगेच विसळुन पालथ्या मारुन ठेवायच्या. मिक्सरमधे काही काढले असेल तर लगेच ते भान्डे धुवुन पालथे मारुन ठेवायचे. या सर्व गोष्टीमुळे स्वयम्पाकास वेळ लागतो, पण नाईलाज को क्या इलाज! Proud
सैपाक झाला की हव्या त्या भान्ड्यात भाज्या- आमट्या काढुन ओटा,पुसुन... भान्डेवाल्या मावशीन्साठी भान्डी बाहेर काढुन मगच जेवायाला बसायचे.. उशीर झाला तरी चालेल. कारण जेवल्यानन्तर कामे होत नाही. Proud

आमच्या काकु, भावजया... पटापट स्वयम्पाक करण्याच्या नादात किचन ओट्यावर सगळा पसारा मान्डुन ठेवतात. सान्डउन्ड झालेली असते. पाणी/दुध सान्डलेल, लसुन तिथेच सोलल्याने त्याचे टरफले., फोतरे, मिरचीचे देठे, ... सगळे पडलेले. त्यात पोळ्या करतानाचे पिठ सान्डलेले. आणि मग जेवणानन्तर हे सगळे आवरत बसाय्च.
मला अश्या पसार्यात तर तिथे स्वयम्पाक उमजतच नाही.

<<वाचन! विषय बंधन नाही, सणक आली की वाचत सुटतो, मनात काय आले ते हाती पुस्तक असले तर पुस्तक नसले तर विकिपीडियावर काढून वाचत बसतो, सिंधू संस्कृती पासून ते स्कायलॅब कशी पाडली, .<<<
अगदी अग्दी. जेवताना हमखास काहीतरी पाहिजे वाचायला. कॉलेज लाइफ मधे तर जवळ, कागदाचे चिरोटे, भेळीचा तेलकट कागद दिसला तरी वाचत बसायच. मी तर खुपदा काही नव्हते वाचायला, तर इन्ग्लिश डिक्शनरी, टेलिफोन डिरेक्टरीसुद्धा वाचल्यात. Proud

सैपाक झाला की हव्या त्या भान्ड्यात भाज्या- आमट्या काढुन ओटा,पुसुन... भान्डेवाल्या मावशीन्साठी भान्डी बाहेर काढुन मगच जेवायाला बसायचे.. उशीर झाला तरी चालेल. कारण जेवल्यानन्तर कामे होत नाही. Proud
आमच्या काकु, भावजया... पटापट स्वयम्पाक करण्याच्या नादात किचन ओट्यावर सगळा पसारा मान्डुन ठेवतात. सान्डउन्ड झालेली असते. पाणी/दुध सान्डलेल, लसुन तिथेच सोलल्याने त्याचे टरफले., फोतरे, मिरचीचे देठे, ... सगळे पडलेले. त्यात पोळ्या करतानाचे पिठ सान्डलेले. आणि मग जेवणानन्तर हे सगळे आवरत बसाय्च.
मला अश्या पसार्यात तर तिथे स्वयम्पाक उमजतच नाही.>>> +११११११११११११११११११११११११११११११११११११११११
अगदी अगदी !!

सैपाक झाला की हव्या त्या भान्ड्यात भाज्या- आमट्या काढुन ओटा,पुसुन... भान्डेवाल्या मावशीन्साठी भान्डी बाहेर काढुन मगच जेवायाला बसायचे.. उशीर झाला तरी चालेल. कारण जेवल्यानन्तर कामे होत नाही >>> अगदी अगदी .

नैने ओट्याच्या स्वच्छतेच्या बाबतीत मी पण सेम. मला स्वयंपाक करताना कांद्याची सालं, मिरचीचे देठ वगैरे टाकून दिल्याशिवाय मी पदार्थाकडे वळत नाही. माझी बाई चिरून बिरून घेउन पदार्थ करून मग ओटा साफ करते. ओट्यावर पाणी असेल तर ते निपटून काढल्याशिवाय मला स्वयंपाक जमत नाही.

* य वर्षांपासून दुपारच्या जेवणात मोठा ग्लास भरून ताक लागतेच. ती सवय मरेपर्यंत जाईल असे वाटत नाही.

<<माझी बाई चिरून बिरून घेउन पदार्थ करून मग ओटा साफ करते. ओट्यावर पाणी असेल तर ते निपटून काढल्याशिवाय मला स्वयंपाक जमत नाही.<<, एक्झॅक्टली... मी पाहिलय तुझ्याकडे हे! Happy

लहान पणापासून चहा पिण्यासाठी घरात असलेला एक छोट्या आकाराचा ग्लास वापरतो आहे , गेली २० वर्षे रोज तोच ग्लास हवा असतो त्याशिवाय चहा पिल्यासारखा वाटतच नाही ............. आता न सूटणारी सवयच झाली आहे ती

झोपेचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. घरच्यासारखी झोप नातेवाईकाकडे, मैत्रीणीकडे कुठेही लागत नाही. .. अगदी हॉटेलात गुबगुबीत गाद्या असल्या तरी.

घरातलीसुद्धा जागा बदलली, अगदी पुर्वेकडचे डोके पश्चिमेकडे केले तरी झोप लागत नाही.

बेड टी, एक मोठा मगभरुन दुधाचा दाट चहा प्यायल्या शिवाय डोळेच ऊघडत नाहीत माझे.
कधी वेळ आली की घरी कोणी नाही तरी उठल्यावर सगळ्यात आधी चहा पिते त्याशिवाय माझा दिवस सुरु होवुच शकत नाही. चहा सुद्धा बिन् साखरेचा किंवा एखादी सुगर फ्रीची गोळी घालुन हवा , अन दुधाचा म्हणजे दुध अन चहापत्ती घालुन, चहात पाणी घातलेले बिल्कुल नाही आवडत..

चहावरून आमची खोड आठवली. शेवटचा दुधाचा चहा जवळपास सतरा वर्ष अगोदर प्यायलो, त्यानंतर काळा चहा (का लाल चहा) विना साखर फक्त लिंबू पिळून प्यायला सुरुवात केली, जबरी किक मिळू लागली. मग तोच कायम पिणे सुरू केले, पाणी बुडबुडे फुटेपर्यंत उकळून गॅस बंद करायचा, मग त्यात चमचाभर पत्ती टाकून एकच मिनिट काँकॉट होऊ द्यायचा मग ते गाळून घ्यायचं, गाळणीतच लिंबू पिळायचं म्हणजे बिया तोंडात यायची शक्यता संपते. असा चहा खूप आवडतो रोज लागतो, हल्ली तीन मग असा चहा होतो दिवसात. पण असाच लागतो, मग पै पाहुण्यात कुचंबणा होते, नशिबाने बायको जोरदार आहे. सकाळी उठली की फक्त गरम पाणी अन लिंबाची सोय करून आणते, आपण त्यात आपलीच टी बॅग (सतत सोबत बाळगतो) डीप करून चहा बनवून पिऊन टाकतो.

व्हिबी माझी बहिण आहेस थोड्या फार फरकाने.
मला सकाळी उठल्यावर आधी पोट रिकामं केलं की माझ्या पसंतीचाच चहा लागतो.
पाऊण कप दुध, वर पाव कप पाणी, साखर मात्र व्यवस्थित लागते. उकळवून बासुंदी चहा... आहाहा
सध्या पथ्यपाणी खूप सुरू असल्याने चहा बंद आहे ऐन पावसाळ्यात Sad

मला कुठल्याही शब्दातील अक्षरे उलट सुलट करून काय शब्द तयार होतील (anagrams) ते बघायची सवय आहे. बहुत करून ही सवय देवनागरी पुरती मर्यादीत आहे, पण अधून मधून इंग्लिश शब्दांसोबतही खेळतो.

पाठ्यपुस्तक असो वा कादंबरी कोणी कणा मोडून पूर्ण फोल्ड करून वाचत असलेलं दिसलं तरी डोस्कं आऊट होतं... >>>

हे माझ्याबाबतीतही. पुस्तक, वर्तमानपत्रं इ. चीजा वेड्यावाकड्या घड्या करून वाचलेलं न मुख्य म्हणजे वाचून झाल्यावर तसंच टाकलेलं अजिबात खपत नाही. सोपं लॉजिक आहे माझ्यापुरतं याचं - या गोष्टींतून ज्ञान मिळतं (खरं-खोटं, मिर्चमसाला लावून इ चा विचार इथे नाही) तर त्याचा आदर करावा ही शिकवण लहानपणापासून आहे...

कुठलाही ईमेल,कुठलीही फाईल ( वर्ड,एक्सेल,पावरपॉईंट ई ) काहीही सेव्ह करताना किंवा सेंड करताना मला कर्सर कायम ctrl + home करून सेव्ह किंवा सेंड करायची सवय आहे.
का माहीत काय ? पण उगीचच !! Proud

मला प्रवास सुरू झाला कि अर्ध्या पाऊण तासाने झोप येते.

पुस्तक वाचताना पाच सहा पानांनंतर झोप लागते. मग दहा मिनिटांनी आपोआप जाग येते. नंतर मात्र अगदी फ्रेश राहून वाचून होतं पुस्तक.

टीव्ही पाहताना दुसरे काही तरी काम करत रहावेसे वाटते. बरेचदा कानावर पडत राहते. काही चाळा नसेल तर मग पुस्तक किंवा सरळ मोबाईल

गाडीत महिना महिना हवा भरत नाही. थेट पंक्चर झाल्यावरच.. ही सवय सुटत नाही.

कामं राहून गेली असतील तर ती डोक्यात राहतात. नंतर ती झाली नाहीत कि प्रेशर येतं. मग आत्ता करू, थोड्या वेळाने करू अशा पद्धतीने लास्ट डेट आल्यावर मग प्रचंड प्रेशरखाली होतात कामे. उदा. इन्कम टॅक्स रिटर्न्स, सोसायटी मेन्टेनन्स, गाडीचा इन्शुरन्स य्रिन्युअल, क्रेडीट कार्डांचे हप्ते. कधी कधी हे लक्षात ठेवण्याचंच प्रेशर खूप होतं मग काहीही करावेसे वाटत नाही.

फेसबुकवर ऑनलाईन शॉपिंगच्या जाहिराती आल्या कि तिकडे आपोआप जाऊन काही न काही खरेदी करायची वाईट सवय आहे. असं वाटतं की आता नाही घेतलं तर कधीच नाही मिळणार हा आयटम.

चालताना मी डावीकडून मान वेळावून पाठीमागे पाहीले तर उजवीकडून पुन्हा पहायची एक सवय आहे. ती जात नाही. खूप जणं टोकतात त्यावरून.

अजून काही चित्रविचित्र सवयी आहेत. पण इथे सर्वांनी छान छान लिहील्याने नको आत्ता.

-वाचनाची खूप सवय, कोणताही शब्द गूगल वर सर्च करतोच. दिवसातून 10 शब्द तरी सर्च करून माहिती मिळवतो. क्रोम वर नेहमी दहा बारा पेज ओपन असतातच.
- सर्वात मोठी सवय सकाळी दहा बारा अलार्म वाजल्याशिवाय उठत नाही. पहाटे पहाटे किती वर्षा आधी उठलो असेल आठवत नाही.

छोट्या मोठ्या ओसीडी सवयी आहेत. चपलांबद्दल वरती लिहीलेले मी ही करतो. तसेच कोणत्याही पेपर ला, शालेय किंवा कामाच्या गोष्टींना पाय लागला तर ती "एक हात त्या गोष्टीकडे करून मग छातीकडे नेउन" नमस्कारासारखी अ‍ॅक्शन कम्पल्सिव्हली करतो Happy

बाकी इथे पाहा. माझा स्कोअर दहाच्या पुढे नसेल.

आगाऊपणा करून अंगावर काम ओढून घ्यायची अत्यंत वाईट सवय आहे. नंतर काम करु पर्यंत दमायला होतं. पेलत नाही. पण हौस काही जात नाही. (उदा. मैत्रिणीचे बेबी शॉवर होस्ट करणे, वाढदिवस साजरे करणे . त्यासाठी पैसे , श्रम घालविणे)
सहज स्व्तःच निरिक्षण करता लक्षात आल कि नकळत मोठेपणा मिरविण्यासाठी, स्वतःला बरं वाटण्यासाठी हे उद्योग केले जात असावेत. असो. अजुनही सवय जात नाही हे खरं.

घरात कुणी नसताना आपल्याला कुणी पाहत नाही म्हणून कधी कधी आनंदाने ओरडण्याची सवय आहे. विचित्रच आहे जरा.. Lol

दुनियादारी आल्यापासून गेले कित्येक वर्षे माझी एकच रिंगटोन आहे.. आणि तीच माझी अलार्म टोन देखील आहे.. टिकटिक वाजते डोक्यात.. धडधड वाढते ठोक्यात.. ती एवढी डोक्यात बसली आहे की एक न सुटणारी सवयच झाली आहे.
एकदा कधीतरी म्हटले आता बस्स.. बदलूया.. आणि बदलली
त्यादिवशी ना कुठला कॉल आलेला कळला ना सकाळी अलार्म वाजल्यावर जाग आली..
बस्स मग ठरवले. आता पुन्हा कधी रिंगटोनशी छेडछाड नाही _/\_

न सुटणार्‍या सवयी ?

पंखा !!

सकाळी किमान अर्धा तास स्नूझ अलार्म

डोळ्यांवर मोठा रुमाल टाकून झोपणे. (कारण डोळ्यांपुढे मिट्ट काळोख असल्याशिवाय झोपच लागत नाही.)

केस सतत घट्ट बांधून ठेवणे. (आता त्याचा कधी कधी त्रास होतो, डोकं दुखतं, तरीही ही सवय सुटत नाही. केस बांधलेले नसतील तर ५ मिनिटंही काम सुचत नाही.)

इथे लिहावी की नाही या संभ्रमात होते पण लिहितेच Proud
मी दात कायम ब्रेकफास्ट झाल्यावर आणि अंघोळी अगोदर घासते. चुकूनच कधी आधी घासले तर बाई लगेच सुर्याची दिशा पहायला जाते. Proud
अंघोळ पण सर्व काम झाल्यावर करते, सुट्टी दिवशी पण बेसिक कामं झाल्याशिवाय नाही करत.
एकेक लोक सकाळी उठून फ्रेश वगैरे झाले की पहिली अंघोळ करतात मग स्वयंपाक वगैरे... Uhoh
या केस मध्ये मी स्वयंपाक वगैरे झाल्यावर पुन्हा अंघोळ करीन कदाचित.

Pages