डाळ - तांदूळ खिचडी

Submitted by योकु on 20 August, 2015 - 10:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- एक मध्यम वाटी तांदूळ
- एक मध्यम वाटी सालाची मुगाची डाळ
- मीठ
- हळद
- एक/ दोन तमालपत्रं
- भरपूर जिरं
- तिखट आवडत असेल तर काही मिरीदाणे (शक्यतो यात घालत नाहीत, पण खातांना मध्ये मध्ये आलेले मस्त लागतात; नाही घातले तरी चालेलच)
- तेल किंवा आवडीप्रमाणे साजुक तूप (शक्यतो गाईचं)

क्रमवार पाककृती: 

- डाळ + तांदूळ एकत्र करून स्वच्छ धूवून, १५/२० मिनिटं पाण्यात भिजवावे.
- कुकरला नेहेमीप्रमाणे खिचडी शिजवून घ्यावी. शिजतांना, मीठ + हळद घालावं.
- कुकरचं प्रेशर गेलं की गरम असतांनाच, त्यात खिचडी पातळसर/ पळीवाढी होईल इतकं पाणी घालावं. पुन्हा गरम करत ठेवावी ही खिचडी.
- आता आवडीप्रमाणे जरा सढळ हातानी तेल किंवा तुपाची फोडणी करावी. त्यात भरपूर जिरं अन तमालपत्र घालून खमंग फोडणी खिचडीवर ओतावी. मिरीदाणे घेतले असतील तर ते फोडणीत घालावे.
- नीट ढवळून रटरटू लागली की गरमागरमच खावी. हवं असेल तर अजून साजुक तूप वरून घेता येईल.

वाढणी/प्रमाण: 
एवढ्या प्रमाणात २ माणसांना पुरावी संध्याकाळचं जेवण म्हणून
अधिक टिपा: 

- तांदूळ जुना, फुलणारा घ्यावा. बासमती शक्यतो नकोच
- सालाची मुगाची डाळ नसेल तर साधी मूगडाळ वापरता येईल
- नवीन काहीच नाही या प्रकारात, फोडणीच काय ती जरा वेगळी; दोनच जिन्नस वापरून केलेली आहे. त्याचा वेगळा स्वाद जाणवतो. साजुक तूप + जिर्‍याचा स्वाद अन तमालपत्राचा सुवास मस्त येतो.
सर्दी, घसादुखी आणि तत्सम आजारात जराही मिरची/ तिखट खाल्लं की घसादुखी अ‍ॅग्रेव्हेट होते असा मलातरी अनुभव आहे. त्यावर हा गरम्मागरम आहार पोटभरीचा तर होतोच पण पचायला हलकाही आहेच.
- आता नेहेमी शक्यतो अशीच खिचडी केली जाते. इतरवेळी मात्र लाल मिरची तळून घालतो तिखटपणासाठी.

- ही खिचडी एकदा योगशिबीरामध्ये खाल्ली आहे. शेवटच्या दिवशी शंखप्रक्षालन योग प्रकारानंतर गुरुजिंनी ही खिचडी २ डाव + एक डाव गाईचं साजुक तूप असं खायला लावलं होतं.
- शंखप्रक्षालन योगाच्या कृतीकरता लापी वाजवा अन नक्की काय होतं त्यानी + बाकी टेक-डिटेल्स करता डॉक/ आयुर्वेद/ योगशिक्षकाला विचारा Happy

माहितीचा स्रोत: 
योगशिबीर
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज केली होती ही खिचडी. पोंगलच्या खूप जवळ जाणारी चव व पोत. यात जरा काजू तळून घातले, खोबऱ्याचे काप वगैरे तेलावर भाजून घातले की पोंगलच! Happy

नेहमिच्या घोटिव खिचडि वर म्रुण च्या तु लिहलेल्या दाल तडक्याचा तडका दिला, फ्युजन वर्क्स ऑसम.कसुरी मेथी आणि बडिशेपची भन्नाट चव येते.image_31.jpg

मी कालच केली. खारेखाची रेस्पी.. फार यम्मी झाली होती! मी चांगल्या मोठ्या ३ मिरच्या उभ्या चिरून घातल्या डाळ तांदूळ शिजवताना, अन नंतर २ चमचे तिखट. सगळी खिचडी तुपात केली. सात्विक व झणझणीतचे भारी काँबिनेशन झाले. Happy

khichadi2.jpgkhichadi1.jpg

अशी वरतून फोडणी टाकलेली दालखिचडी माझ्या जुन्या जॉबच्या कँटीनमध्ये सही मिळायची..
साधी दाल खिचडी (डीके) किंवा दालखिचडी तडका (डिके तडका) अशी आपल्या आवडीनुसार ऑर्डर द्यायची.
साधी दालखिचडीही मस्त असायची, पण एकदा त्या तडक्याची सवय झाल्यावर साधी दालखिचडी आजारी लोकांचे खाणे वाटू लागले.

ऑफिसच्या बाजूच्या एका हॉटेलमध्ये " कर्ड राईस (दहीभात) तडका " मिळायचा. आंबट चवीच्या दहीभातावर तिखट फोडणी सोडलेली.. सर्रस लागायची.. पण नाकातून पाणीही यायचे.. म्हणून आम्ही पाचसहा जणांत एक मागवून थोडे थोडे शेअर करायचो

बस्के, खारेखाच्या त्या रेसिपीत पुढच्या वेळी एक अ‍ॅडिशन कर. सांडगी मिरची तळून घेच आणि त्याच तेलात ठेचून चिरलेली लसूण आणि लाल तिखट परतून वरून घाल. अहाहा!!!

कमलाबाई ओगलेंच्या पुस्तकात नेह्मी खाण्याची खिचडी ( शंख प्रक्षालन केलेले नसताना ) छान मसाला सांगीतला आहे. या मसाल्याने खुप चविष्ट लागते खिचडी.

नाशीकला योग विद्या धाम च्या निवासी वर्गात एकदा योगगुरु - विश्वासराव मंडलीक यांनी स्वतः तयार केलेली खिचडी अजुन स्मरणात आहे.

चिंचवडच्या इस्कॉन कृष्ण मंदीरात कुणी खिचडी ( प्रसाद ) खाल्ली आहे का ? इतकी अल्टीमेट चवीची खिचडी पहाण्यात नाही आली.

हा कालचा मेनू . योकुची आणि खा रे खा ची पद्धत वापरली . मस्त यम्मी झालेली खिचड़ी . स्वत केल्याने आणि नीट जमल्याने अजुनच चव आली होती Proud

Dal khichadi.jpg

काल या पद्धतीने केली होती. फक्त तमालपत्र नव्हतं. मला पथ्यामुळॅ डाळ-तांदळाच्या वेगवेगळ्या पाकृ शोधतच होते, नेमकी त्यावेळीच ही रेस्पि आल्याने गुड जॉब योकु.
ती पाणी घालायची आयडिया चांगली आहे आणि वरून फोडणी. मी ब्राउन राइस वापरला होता म्हणून जास्त वेळ भिजवली. मुलांनी पण वरून आणखी तूप घालून खाल्ली. आज डब्बे मी वोईच.

सर्वच खिचड्या मस्त दिसताहेत. पोंगल करताना बिन सालाची मूग डाळ कोरडीच हलकी भाजून घेतात. त्यामुळे डाळीची छान सौंधी सौंधी खुशबू येते. यम्म!

ही खिचडी खूप छान होते. नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची. रेसिपी करता धन्यवाद. मी यात फोडणीत दह्यातली सुकवलेली मिरची पण घालते.

Pages