१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
milindaa, Toshavee, dineshvs
milindaa, Toshavee, dineshvs सर्वांचे आभार, आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करून बघतो.
एकदम मस्तच आयडिया ग मनु. आता
एकदम मस्तच आयडिया ग मनु. आता करतेच, मग बघते कोण खात नाही तो पायनॅपल जॅम.
काल सुपर्मार्केट्मध्ये गेले
काल सुपर्मार्केट्मध्ये गेले असताना ऑलिव्ह ऑईलची बाटली हातातून निसटून फुटली आणि सगळ्या कपड्यांवर ऑईल सांडल. आणि अगदी भरपूर सांडलं. घरी आल्यावर इंटरनेटवर पाहून कपडे डिशवॉशर डिटरजंटने चोळून गरम पाण्यात वॉशरमध्ये (लाँड्री) धुतले. तेलाचा मागमूसही राहिला नाही.
आधी हे माहित नसताना मी तेलाचे डाग पडलेले दोन शर्ट फेकून दिले होते.
हाय, बर्याच इडल्या उरल्यात.
हाय,
बर्याच इडल्या उरल्यात. फोडणीची इडली आणि इडलीचा उपमा या व्यतिरीक्त काय करता येइल?
फ्राईड इडली. स्ट्रीप्स करून
फ्राईड इडली. स्ट्रीप्स करून शॅलो फ्राय करायच्या आणि केचअप बरोबर किंवा चटणीबरोबर खायच्या. नाहीतर फ्रीज कर. २आठवड्याने परत गरम करून खायच्या.
इडली मंचुरियन.
इडली मंचुरियन.
धन्स आर्च, माझ्या मिनी इडल्या
धन्स आर्च, माझ्या मिनी इडल्या आहेत त्यामुळे तशाच फ्राय करता येतिल....
आणि धन्स मृ, पन ते मंचुरियन कसे करायचे???
तुपावर शॅलो फ्राय केल्या तर
तुपावर शॅलो फ्राय केल्या तर अजून मस्त लागतं ईडली फ्राय
बाप रे, मग तर मी खायलाच
बाप रे, मग तर मी खायलाच नको...
लाजो, मला पाठवून दे त्या
लाजो, मला पाठवून दे त्या इडल्या.. उद्या चिली इडली करायची आहे मला
भज्यांच्या पिठात बुडवून
भज्यांच्या पिठात बुडवून तळायच्या व नुस्त्या खायच्या किंवा चटणी / सॉसबरोबर खायच्या. झकास लागतात.
१४ दिवसानी इडल्या खायच्या?
१४ दिवसानी इडल्या खायच्या? मोड येतील की त्याना........
अश्विनी _के धन्यवाद गं... आणि
अश्विनी _के धन्यवाद गं... आणि मंजुडी ती चिली इडली ची रेसिपी सांग... नाहीतर खरच पोष्ट करेन हां इडल्या...
जामोप्या... इडली फ्रिझ करायचीये.. मोड नाही यायचे पण त्याना एक एक काडी टोचली तर मस्त 'इडली कँडी' होइल...
वरतुन साखर पेरायची किंवा बासुंदीत बुडवुन खायची..... घ्या लिहीता लिहीता आयडिया सुचली... 
इडली कुस्करून अमीरी खमण
इडली कुस्करून अमीरी खमण बनवायचे मस्त पैकी. चांगले लागते(मला आवडत नाही ते खमण, पण उरलेल्या इडल्या अश्या संपवल्या माझ्या तेव्हा मैत्रीणीने सांगितले)
माझ्या बॉसिणीच्या मुलीनं तिचा
माझ्या बॉसिणीच्या मुलीनं तिचा फ्रॉक व तोंड काजळाच्या डबीचा पुरेपूर वापर करत माखून ठेवले. तोंड साफ झाले पण तिचा नवा जाळीवाला फ्रॉक माखलाय. जाळीत पण काज्ळ अडकलंय. फ्रॉक स्वच्छ होत नाहिये. तिने विचारायला सांगितलंय काही उपाय आहे का ते.
त्याच्यावर पीठ टाकून जरा चोळ,
त्याच्यावर पीठ टाकून जरा चोळ, मग भांडी घासायच्या साबणाने हलकेच धू. शक्यता आहे जातील डाग. नाही तर मग म्हण, का जळ्ळा मेला फ्रॉक
धन्स आरती सांगते तिला तस्सं
धन्स आरती
सांगते तिला तस्सं करायला आणि तस्सं म्हणायला 
पीठ म्हणजे कणिकच ना? आणि खरंच भांडी घासायच्या साबणाने म्हंजे विम बार किंवा पितांबरी बार ने घासायला सांगू?
ashwini_k काहिच होत नसेल तर
ashwini_k काहिच होत नसेल तर काळ्या रंगाचा डाय करायला सांगा त्या फ्रॉकला.
काजळाच्या डागांवर टाल्कम
काजळाच्या डागांवर टाल्कम पावडर टाकून मग पाण्यात थोडंसं रिन आला टाकून मग थोडावेळ भिजवून ठेउन नेहमीसारखं धुतलं की निघतिल फ्रॉकवरचे काळे डाग.
वरची अश्विनी ची पोस्ट वाचून
वरची अश्विनी ची पोस्ट वाचून आठवले.मागच्या आठवड्यात मुलाने(वय वर्षे २) डोक्याला केसांना व्हिक्स फासून ठेवले होते.ते त्याच्या हाती कसे लागले हा वेगळा विषय आहे..पण सुमारे ५-६ वेळा त्याच्या आणि १-२ वेळा आपल्या शँपू ने केस धुवून पण निघायचे नाव नाही हताश होऊन मी सन्ध्याकाळी केस कापून आणावेत असा विचार करून अपॉईंटमेण्ट पण घेतली पन तेवढ्यात अजून १ ट्राय म्हणून आपले पॅराशूट चे खोबरेल तेल चांगले डोक्यावर थापून ठेवले. २-३ तासानी केस धुतले तर सगळा चिकट पणा गेला होता.
शाईचा डाग कशाने निघेल?
शाईचा डाग कशाने निघेल? नवर्याच्या शर्टावर पडलाय मोठ्ठा डाग, खिशातुन पेनाची शाई गळून .. सरळ धुवायला गेले अन डाग पक्का झाला तर म्हणून ३-४ दिवसांपासून तसाच ठेवलाय. काय करता येईल?
ह्या बायका ना! अश्या आळशी
ह्या बायका ना! अश्या आळशी आहेत!!!!
कुठे बरं उघडता येईल नवा धागा? 'कोणाशी तरी बोलायचंय' मध्ये?

मुलींनो, या अशा समस्यांसाठी नवा धागा उघडा की.. ह्या स्वयंपाकघरातल्या युक्त्यांमध्ये कपडे आणू नका बरं
http://www.maayboli.com/node/4458 हा धागा बघा ठीक वाटत आहे का

नाहीतर मदत-समिती- मदत करा
का इथेच लिहूया?
अरे हो की ! हा बाफ फक्त
अरे हो की ! हा बाफ फक्त स्वयंपाकाबद्दल आहे. माझ्या डोक्यात खिचडी झालीय ते भांड्यात भांडं अडकणे, कसले कसले डाग पडणे हे वाचता वाचता
बादवे, 'कोणाशी तरी बोलायचंय' मध्ये टाकलं तर----
१) काजळाची डबी तिच्या हाताशी येईल अशी ठेवावीच का?
२) नवर्यानेपण तेवढेच प्रयास करायला हवेत डाग काढायला !
३) मुलांना काजळ लावणे हे वैद्यकीय दृष्ट्या वाईट आहे, एवढं पण कळत नाही?
४) बरबटवू दे हो मुलांना. देवा घरची फुलंच ती.
५) काजळ लावल्याने दृष्ट पडणार नाही असं वाटत असेल तर ही सपशेल अंधश्रद्धा आहे.
असे काहिसे प्रतिसाद येतील
चला फार विषयांतर झाले
पूनम, ह्या बाफचं नाव
पूनम, ह्या बाफचं नाव कुठल्याही छोट्या छोट्या अडचणी निस्तरण्यासाठी युक्ती हवी असेल तरी चपखल आहे. पण त्याखालचा मॅटर फक्त स्वयंपाकघराकडे बोट दाखवतोय.
अश्विनी!
केश्विनी तुझ्या बोलण्यात
केश्विनी
तुझ्या बोलण्यात तथ्य आहे. 'आहारशास्त्र आणि पाककृती' हा मुख्य ग्रूप आहे म्हणून म्हटले. बर, राहूदे मग इथेच.
किंवा याच ग्रूपमध्ये अजून एक धागा उघडायचा का- 'स्वयंपाकघराच्याबाहेरचा युक्त्या' म्हणून?
बर, ते होईपर्यंत अल्पनाला मदत करा
लिंबू लावून ब्लीच करून पहा अल्पना.
अल्पना, मी चौथीत असताना नवीन
अल्पना, मी चौथीत असताना नवीन मोज्यांवर शाई सांडली म्हणून आईला कळू न देता खटाटोप करुन युक्ती शोधली.. कालनिर्णय च्या मागील बाजूच्या पानांवर.. तिथे लिहील्याप्रमाणे कोलगेट पेस्ट लावून १० मि. उन्हात ठेवले होते व मग धुतले. गेला होता डाग. पण आता तू एकदा धुतला आहेस म्हणते..तर जाईल का नाही शंका आहे. प्रयत्न करुन पहा.
पूनम, आशु धन्यवाद. अजून धुतला
पूनम, आशु धन्यवाद.
अजून धुतला नाहीये. आत्ताच करुन बघते.
...
...
हो मुख्य ग्रुप दिशाभूल करेल
हो मुख्य ग्रुप दिशाभूल करेल
पण आता डागावर पीठ टाकायचं तर स्वयंपाकघराशी संबंध आलाच किनै?
लिंबू लावायचं तरी स्वयंपाकघर हवंच किनै?
Pages