औद्योगिकरणाच्या विमानाचे कोसळणे टाळा! लेखक - अ‍ॅड. गिरीष राऊत

Submitted by नानबा on 29 May, 2018 - 08:40

औद्योगिकरणाच्या विमानाचे कोसळणे टाळा. औद्योगिकरणाचे विमान मानवजातीला व जीवसृष्टीला विनाशाकडे वेगाने नेत आहे. ते कोसळणार हे तर निश्चित आहे. ते कोसळण्याआधी सुरक्षितपणे उतरवावे. थोडक्यात क्रॅशलॅडिंग टाळावे. ते, त्यातील प्रवासी म्हणजे मानवजात वाचवण्यासाठी आवश्यक आहे.

औद्योगिकरण थांबण्याबाबतची भीती अनाठायी आहे. आजही औद्योगिकरण कुणालाही जगवत नाही. इतर प्राणिमात्रांप्रमाणेच मानवही हवा पाणी व अन्नामुळे जगतो. औद्योगिक उत्पादनांमुळे नाही. औद्योगिकरणामुळे जीवन संपुष्टात येणार हे नक्की झाल्यावरही ते चालू ठेवणे यामागे औद्योगिकरण जगवते असा निर्माण झालेला गैरसमज कारण आहे. आपण करोडो वर्ष पृथ्वीवर आहोत. औद्योगिकरण बुडबुड्यासारख्या अत्यल्प कालावधीत आले.
दारिद्र्य ही संकल्पना नीट समजून घेतली पाहीजे. ज्या पृथ्वीवर करोडो वर्षे हत्ती, गेंडा, व्हेल सारखे महाकाय जीव व्यवस्थित जगले ती पृथ्वी माणुस नावाच्या तुलनेने टीचभर पोट असलेल्या प्राण्याला जगवू शकत नाही काय ? जीवन व जीवनशैली यात गल्लत करू नये. पृथ्वी जीवनासाठी आहे. जीवनशैलीसाठी नाही. बाकी सर्व प्राणिमात्र उदरनिर्वाह करतात. आधुनिक माणुस नाही. तो कार, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, फ्लॅट, बंगला, वीज इ. निर्वाह करतो. त्यासाठी पैसा लागतो. करोडो वर्षे व कृषियुगात हजारो वर्षे पैसा लागला नाही. तेव्हा माणुस जगत नव्हता काय?

हे माणसाचे भरकटणे झाले औद्योगिकरणामुळे. त्याच्या कृत्रिम जगण्यासाठी लागणारी वस्तुनिर्मिती व वापर पृथ्वीच्या पध्दतीच्या विरोधात आहे. ते केले गेले हीच मुळात चूक झाली.
पैशांचा अभाव म्हणजे दारिद्र्य काय ? मग ती गोष्ट मानवी व्यवस्थेशी संबंधित आहे. मानवी शोषण किंवा चूक त्याला कारण आहे. त्याचा पृथ्वी किंवा निसर्गाशी संबंध नाही.

१५० ते २५० वर्षात औद्योगिकरणाने दारिद्र्य दूर झाले नाही. उलट पृथ्वीची जीवांचे पोषण करण्याची क्षमता औद्योगिकरण शहरीकरण व अर्थव्यवस्थेमुळे नष्ट होत गेली. पृथ्वी बकाल होत गेली.
लढाया व युध्द ही मानवी मनातून घडतात. औद्योगिकरणामुळे कच्चा माल बाजारपेठांवरील ताबा इ. कारणांमुळे महायुद्धे झाली. तणाव वाढले. उदा. बंदुकनिर्मिती उद्योगाच्या हितसंबंधांमुळे अमेरिकेत दर वर्षी शाळा महाविद्यालयांतील हजारो तरूण गोळीबारात मरतात. अमेरिकेचे सुमारे ७५ ते ९० % उत्पन्न शस्त्रास्त्रांच्या निर्यातीतून येते. त्यामुळे जगात तणाव असण्यात त्या देशाचे व पर्यायाने औद्योगिकरणाचे हितसंबंध आहेत. हे फक्त एक उदाहरण आहे. यंत्र व तंत्रज्ञान जगात धुमाकूळ घालत आहे. धरणे, खाणी, वीजनिर्मिती, मोटार - वाहन निर्माण, सीमेंट, स्टील, रासायनिक खते, कीटकनाशके इ. यांच्यामुळे आपण जगतो काय ?
ही उत्पादने बनवणाऱ्या उद्योगांत नोकर्‍या करून चलन म्हणजे पगार मिळवणे व अशा व्यवस्थेसाठी मंत्रालये, महापालिका, काॅर्पोरेटस् चालवणे याचा खऱ्या जीवनाशी संबंध नाही. उलट हे कोट्यावधी वर्षे चाललेल्या जीवनाविरूध्द आहे. औद्योगिकरण सुरू होण्यापूर्वी कुणी बेकार नव्हता.

युनोच्या बाॅन येथे नोव्हेंबरमधे झालेल्या जागतिक वातावरण बदल परिषदेत हे जाहीर झाले की, यापृढे तापमान न थांबता वाढत राहणार आहे. मानवजात या शतकात नष्ट होत आहे. अशावेळी वातावरणातील साठलेला कार्बन पृथ्वीला निर्जीव करणार असल्याने नवे प्रकल्प तर सोडाच पण चालू औद्योगिकरण थांबवणे अनिवार्य बनले आहे. हा कार्बन शोषणारे हरितद्रव्य तात्काळ वाढू लागले पाहिजे. तरच जीवसृष्टी वाचण्याची शक्यता आहे.
अशावेळी नोकरी, उद्योग आपल्याला जगवतात या भ्रमामुळे ही समस्या कार्बनरहित तंत्रज्ञान वापरून सोडवता येईल असे वाटणे हे जीवनशैली व जीवन यात फरक न केल्याने घडत आहे. कोणतेही तंत्रज्ञान वाचवणार नाही.
मानवजातीला आता तातडीने अडीचशे वर्षे मागे जावे लागेल. मनात प्रगती व विकासाचे गंड बाळगले तर पृथ्वीवरून उच्चाटन अटळ आहे.
आजही सर्व औद्योगिक व इतर लोकसंख्या पृथ्वी जगवते. शहरे शेतीमुळे जगतात. पृथ्वी शेत पिकवते.
मात्र औद्योगिक जग क्षणोक्षणी पृथ्वीविरूध्द व तिच्या जीवन देण्याच्या क्षमतेच्या विरूद्ध वागते.
हे थांबवावे. शहरे विसर्जित करावी . प्रत्येकाने आपले अन्न स्वतः पिकवावे. तो पृथ्वीचा नियम आहे. त्याच्या विरोधात जाणारी आधुनिक मानवी व्यवस्था गुंडाळावी. ती भ्रामक व्यवस्था टिकवण्याच्या अट्टाहासाने पूर्ण विनाश ओढवेल.
धन्यवाद,

आपला
अॅड. गिरीश राऊत
निमंत्रक
भारतीय पर्यावरण चळवळ
९८६९०२३१२७ व्हाॅ. अॅप.
कृपया सर्वत्र पाठवा.

---------------------------
सदर लेख लेखकाच्या परवानगीने प्रसिद्ध केला आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असे लेख त्या वाईट औद्योगिकीकरणातून तयार झालेल्या दुष्ट तंत्रज्ञानाच्याच मदतीने वाचताना मला फार खिन्न वाटते. असो, तातडीने २५0 वर्षे मागे जाण्याची कल्पना मला लईच आवडली आहे, तसेही आपल्या देशातील अनेकजण मनाने अडीचशेच काय अडीचहजार वर्षे मागे आहेत त्यामुळे हे सोपे जावे.

लेखक जो बदल नमूद करतायतय तो सोसायटी लेवल ला होणे गरजेचे आहे. त्याकरता विचार समाजाच्या सर्व स्तरांवर पोहोचणे गरजेचे आहे.
त्याकरता माध्यम म्हणून हे वापरणे गरजेचे आहे. जिथे बदल शक्य आहे तिथे सुरुवात स्वतःपासूनच करावी. प्रत्येक प्रामाणिक माणूस हे करतोच. पण उद्दिष्टाच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचण्याकरता उपलब्ध चॅनल्स वापरले नाहीत तर अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचता येत नाही हे लक्शात घ्यावं.

दिलीप कुलकर्णी १९८० च्या दशकात प र्यावरणावर अभ्यास करत होते- आधुनिक जीवनशैली विनाशाकडे घेऊन जाते हे लक्शात आल्यावर टेल्को मधली उत्तम पगाराची नोकरी सोडून कोकणात जाऊन राहिले. पर्यावरण क्षेत्रात लिखाण करत राहिले.
२०१५ साली त्यांची भेट झाली तेव्हा त्यांना विचारलेलं की हे सगळे बदल (मातीचे घर, घरात फक्त बल्ब, पूर्ण रहाणीमान जास्तीत जास्त सस्टेनेबल, अगदी आईस्क्रीम खूप एनर्जी खातं म्हणून आईसक्रीम ही खात नाहीत. ) हे अगदी पटले तरी लगेच कसे जमणार आम्हाला?

त्यांचे उत्तर छान होते. माझ्या शब्दात त्यांच उत्तर मांडतेयः
डायरेक्ट सगळे बदलता आले नाही तरी एक गोष्ट पकडून महिनाभर करून बघावी. जमतीये वा टलं तर पुढे जावं. ते म्हण तात आम्ही ही इत का प्रयत्न करतो तरी काही गोष्टी वापरतोच आम्ही (उ दा. पावसाळ्यात प्रवास करताना कागदपत्रांसाठी पिशवी. ) आपल्या तुलनेत ह्या फॅमिलीचा कार्बनफूटप्रिंट इतका कमी आहे तरी ते अ से म्हणाले! ( ते एसटीनेच प्रवास करतात. जवळ पाण्याची बाटली (प्लॅ स्टिक नव्हे). चहा पिण्यासाठी स्टील चे ग्लास घेऊन फिरतात वगैरे).

मला ते पटले, आवडले. हे आणि असे अ नेक बदल स्वतःत करण्याचा प्रयत्न करून मग च लोकांना सांगण्याचा प्रयत्न असतो. वाटचाल चालू आहे.
"बनत बनत बन जायेगा" हे अनुभवायला यावं म्हणून प्रयत्नशील आहे.

पर्यावतरणाच्या क्षेत्रात काम करताना
१. अभ्यास २. स्वतःत बदल ३. जनजागृती ४. घटनात्मक बदल ५. अ‍ॅक्च्युअल फिल्ड वर्क - हे आणि असे अनेक टप्पे असतात.

स्वतः अभ्यास केल्यावर (आकडे वारी, फिल्ड ट्रि प्स, विषयातले ज्ञान वगैरे) डोळे उघडतात. त्यानंतर अस्वस्थतेचा काळ असतो. मग तुम्ही आतून आणि मग बाहेरून (वाईटपणा पत्करूनही ह्या विषयावर बोलणे, वागणे) बदलता. त्यानंतर प्रत्येकजण आ पापल्या आवडी प्रमाणे आणि वकुबाप्रमाणे काम निवडतो. काही सपोर्ट , काही लीड करतात. मग जनजागृती करायची, घटना त्मक बदलासाठी प्रय त्न करायचा, ह्या फंदात न पडता आपलं आपण एकटं काम करायचं ( उदा नदी स्वच्छता, ईकॉलॉजिकल रिस्टोरेशन वगैरे) वगैरे वगैरे अनेक मार्ग असतात.

अ‍ॅड गिरिष राऊत जनजागृती आणि घटनात्मक बदल ह्यात काम करताहेत, अ‍ॅक्च्युअल फिल्डवर्कही करताहेत.
माहिती ज्यांच्यापर्यंत पोचवायची त्यांना जे मार्ग ठावूक आहेत तेच वापरावे लागतात. अंतिम उद्दिष्टापर्यंत पोचण्यासाठी ही गरजेची गोष्ट आहे.

मी एकदम तयार आहे जंगलात राहायला. प्रगतीवरच माझा विश्वास नाही. प्लास्टिक चीजेंबनवणारे कारखाने अन नेसेसरी पॅकिंग मटेरिअल, मेटलच्या खाणी, अनावश्यक टूरि झम ़ कार व अ‍ॅनिमल रेसिंग व इतर बर्‍याच सिस्टिम्स बंद पडल्या तरी काही फरक प ड णार नाही. छान लेख.
सिक्स्थ मेजर एक्स्टि क्शन इज ऑल रेडी इन प्रोग्रेस् . भारतात तर अगदी कमी अवेअरनेस आहे.

अन्न पिकवणे हा सुद्धा पृथ्वीचा नियम नाहीये. चला आपण सगळे दगडाची हत्यारे बनवून शिकारीला बाहेर पडूयात

बाकी, आगाऊ +१

फारच naive आणि बाळबोध विचार.
दिलीप कुलकर्णी यांनी जी प्रयोगशीलता दाखवली आहे त्यामागे त्यांचे स्वतःचे कष्ट आहेत. आधी केले मग सांगितले असे वागणे आहे.
या लेखात असे काही दिसले नाही. 250 वर्षे का? 249 किंवा 251 का नाही?
Time (though fictional) is an irreversible entity. मागे जाणे शक्य नाही.

आगाऊ +१..

अ‍ॅड गिरिष राऊत जनजागृती आणि घटनात्मक बदल ह्यात काम करताहेत, अ‍ॅक्च्युअल फिल्डवर्कही करताहेत<<<<<
तरीही मानवजातीला तातडीने अडीचशे वर्षं मागे जावे लागेल, अशी विधाने करतात? मजाच आहे सगळी!

चला आपण सगळे दगडाची हत्यारे बनवून शिकारीला बाहेर पडूयात<<<<
यो! शिकार करणाऱ्यांची लाईफस्टाईल म्हणजे कपडेही तसेच ना? वा वा! हरणामागे धावून धावून मसल टोनिंग झालेले, अल्पवल्कलांकित hot guys पाहायला माझी अडीचशेच काय, अडीच लाख वर्षंसुद्धा मागे जायची तयारी आहे. Lol

ते कोसळण्याआधी सुरक्षितपणे उतरवावे. थोडक्यात क्रॅशलॅडिंग टाळावे. ते, त्यातील प्रवासी म्हणजे मानवजात वाचवण्यासाठी आवश्यक आहे. >>

शहरे विसर्जित करावी . प्रत्येकाने आपले अन्न स्वतः पिकवावे. तो पृथ्वीचा नियम आहे. >> पृथ्वीचा नियम कसा काय ? मनुष्य प्राणी सोडल्यास क्लोरोफिल नसलेले कुठले ऑर्गॅनिझम फार्मिंग करते ? सगळेच हंटर गॅदरर्स नव्हेत काय ? मग जी काय अधोगती झाली ती फक्त औद्योगिक क्रांती मुळेच ? त्याआधीच हंटर गॅदरर्स पासून फार्मिंग कडे झालेली काही हजारो वर्षांची वाटचाल जरी स्लो असली तरी अधोगती नेणारी नव्हती काय ? विमानाचा स्पीड नसला तरी किमान एस्टीचा तरी असेलच ना ?

अगदी व्हॉट्सॅपीय लेख !

काय बकवास लेख आहे , लिहिणार्याने बुद्धी गहाण ठेवली वाटते , एकांगी विचार फक्त

कार्बनडाय ऑक्साईडचं दगडात रुपांतर करणारे प्रकल्प जगात चालू होतायत, मस्क मार्सवर कॉलनी बनवतोय आणि हे राउत चालले २५० वर्षे मागे. बरं जाणार कसं मागे? आणि कोण कोण जाणारे?
पुण्यातले असल्या व्याख्यानांना येणारे पेंशनर का हे असले लेख फॉरवर्ड करणारे निर्बुद्ध? त्यांना मागच्या खोलीत जायला वॉकर लागतो. निघाले अडीचशे वर्षे मागे! त्याकाळी ५० ५५ वर्षे झाली की माणसे मरत... तुम्ही .... किमान वानप्रस्थाश्रमात तरी जा!
सगळं चागलं चुंगलं खायला प्यायला मिळतय तर लागलेत भिकेचे डोहाळे. उजिलाटा.
हा लेख दिसत न्हवता ते किती बरं होतं! काही तरी बेकार आहे, अजिबात वाचू नका अशी हाळी ऐकली आणि पर्यावरण नामक ग्रुपचे सदस्यत्व घ्यावे लागले. आता भोआकफ.

>>>हरणामागे धावून धावून मसल टोनिंग झालेले, अल्पवल्कलांकित hot guys पाहायला >> Lol अगो हरणीमागे कर ते!
अर्थात अडीचशे वर्षे मागे गेलीस तर 'मज आणून द्या तो हरिण (अल्प)वल्कलाकांता' गाण्याचं कास्टिंग ही ओपन असेल!

जिज्ञासा, दिलीप काका.चेही मत असेच आहे की वनाधारित जीवनशैली हवी.
वैयक्तिक रित्या तुझे आणि माझे मत सेम आहे. लेखक म्हणतो ते करणे हितावह आहे , पण ते प्रॅक्टिकली होणार नाही. एकतर लोकाना माहितच नाहिये की ग्लोबल वॉर्मिन्ग, त्याचे already दिसू लागलेले इम्पॅक्ट्स, अमानी म्हटल्याप्रमाणे ६ वे मास एक्स्टि न्क्शन, प्रत्येक मास एक्स्टिन्क्शन मधे अपेक्स प्रेडिटर वर सगळ्यात मोठा परिणाम, ज्यान्ना कळ तय त्यानाही हे सामाजिक चक्र भेद ण तितकस सोप्प नाहिये.

ग्लोबल वॉर्मिंग, परिणाम इ. वर उपाय म्हणून' २५० वर्षे मागे जा' हे उत्तर असेल तर रोगापेक्षा इलाज भयंकर आणि म्हणूनच हास्यास्पद असं नाही का वाटत ?
मास एक्स्टिन्क्शन रिव्हर्स करायचं म्हणजे निसर्गाच्या चक्रात मानवाचा हस्तक्षेपच की! मग तुम्ही जो हस्तक्षेप म्हणता तो चांगला आणि रिन्युएब्ल एनर्जी, वस्तूंचा वापर कमी करणे, सस्टेनेबल बनवणे इ. इ. वाईट... सगळं ठार बंद करुन अश्मयुगात वाटचाल हाच एक अघोरी उपाय!? हे तुम्हाला तरी कोणी आयुष्यात मानेल असं मनोमन वाटतं का? तुम्ही २५० वर्षे जुनी लाईफ स्टाईल फॉलो करु शकाल का?

जग भरल्यापोटी ढेकर देऊन आता भारतात किती प्रदुषण आहे इ. इ. बोल लावते आणि त्याला भारतातील इंटलेक्ट जेव्हा ते फॉलो करतात तेव्हा त्यांना अजुनही इंधन/ वीज हवी तेव्हा हवी तितकी न मिळणारी आणि त्यामुळे हालअपेष्टात जीवन जगणारी भारतीय जनता दिसतच नाही का?
त्यांना विकासाची फळे भोगून मग सस्टेनेबल वे ने घेऊन जा! 'नव्या' २५० वर्षे जुन्या पद्धतीत अपयश आलं, आजचे CO2 दुष्परिणाम रिवर्स करणारं आणखी काही यंत्र सापडलं तर उगा सग्ळ्यांना अष्मयुगात न्यायचं खापर नका फोडून घेउ आपल्याच डोक्यावर.

काही नाही सापडलं आणि झाला माणूस एक्स्टींग्ट तर होउन जाउ द्या! कमित कमी टॉप वर असताना विनाश होईल.

पैसा जसा वाचवायला आधी खूप मिळवायला लागतो, तशीच उर्जा वाचवायला आधी खूप मिळवावी लागते. ती वापरली, तन, मग तृप्त झालं की मग ती वाचवायची, अधिकाधिक पुरेल अशी जीवनशैली अंगिकारणे हे जमतं.
रिकाम्यापोटी एका - दोघांना जमेल हे .. भारताची आजची लोकसंख्या आणि त्यांना लागणार्‍या गरजा याचा थोडा अभ्यास करा आणि मग २५० वर्ष्यां पुर्वीचे गोडवे गा!

लेखक म्हणतो ते करणे हितावह आहे , पण ते प्रॅक्टिकली होणार नाही. >> लेखक म्हणतो ते करणे हितावह आहे का हे ही तपासायला हवे. आज डोके दुखले तर पटकन एक गोळी घेऊन मोकळे होणारे आपण खरच 250 वर्षे मागे जाऊन अधिक सुखी होऊ का? मुळात मागे जाणे हा कोणत्याही समस्येवरचा उपाय असू शकत नाही.

अमितव, तुमच्या पहिल्या पोस्ट संदर्भाने:
१. निगेटिव कार्बन एमिशन खरेच पायलट व्यतिरिक्त यशस्वी झाले की तुम्हाला माझ्याकडून (पुण्यात) पार्टी. (विनाश हो ऊ नये म्हणूनच पर्यावरण क्षेत्रात काम करणारे लोक प्रयत्न करत असतात)
२. हे होईतो खूप उशीर होऊन अन्न साखळी damage झाली नसेल अशी आशा.

दुसर्‍या पोस्ट संदर्भाने:
तुम्ही भारतातली घाणेरडी शहरे पाहिली आहेत का? तिथल्या कधीही कुठेही कचरा फेकणार्‍या नागरिकांबद्दल तुमचे काय मत आहे?

जिज्ञासा, एका पिढीत अवघड आहे. टप्प्या टप्प्यात होऊ शकते. माझे वैयक्तिक मत मिडल ग्राऊंड हे आहे.
मी मध्यंत री एक प्रयोग केलेला. फिनेल घातलेले आणि कपड्यांचा साबण घातलेले असे दोन ग्लास ठेवले - लोकांना विचारले हे पाणी प्याल का? ते पाणी प्यायला अर्थातच कोणी तयार नव्हते. पण आपल्या घरात आपण रोज हे वापरल्यावर ते नदीत जाते. तेच पाणी आपल्या घरात (किंवा डाऊन स्ट्रीम गावात जाते) आणि माणसं ते पितात, त्यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. साबण न वापरता कपडे "क्लिनिकली" स्वच्छ करण्याचे मार्ग आहेत, पण ते साबणाची "झाग" देत नसल्याने लोक त्याला तयार होत नाहीत. साधे खडेमीठ टाकून फरशी पुसली तर ती स्वच्छ होते, आमच्या घरातला एक ही माणूस इतर घरातल्यांपे क्षा जास्त वेळा आजारी पडत नाही - असे असूनही, ते वापरायला लोक तयार होत नाहीत कारण मागे जा ता येणार नाही ही समजू त. म्हणजे न दिसणारे पोल्युटेड पाणी पिणे "झाग" वाले कपडे घालता न येण्यापेक्शा हितावह!
(ह्यावर वॉटर ट्रीटमेंट चा मुद्दा येईल - तर साबण आणि फिनेल एसटीपी ने ट्रीट होऊ शकते का हे त्या क्षेत्रातल्या जाणकारांना विचारा / इथे जाणकार असतील त्यांनी सांगा.)
पुढे आणि मागे म्हणजे नक्की काय? ह्यात माध्यमांनी, आपल्या वेळच्या शिक्षणाने केलेले कंडिशनिंग किती? हे ही मुद्दे तपासावे लागतील.

तुम्ही भारतातली घाणेरडी शहरे पाहिली आहेत का? >> हो.
तिथल्या कधीही कुठेही कचरा फेकणार्‍या नागरिकांबद्दल तुमचे काय मत आहे? >>> अशिक्षित/ अर्धशिक्षित लोकांना शिकवून समस्या सुटेल का त्यांना अंधकारमय जगात लोटून? आता मला खेदाने वाटायला लागलंय की, 'नको त्या लोकांच्या' हाती नको त्या गोष्टी पडतायत याचं वैषम्य तर नाहीये ना? Sad

भारतात शेती आधरईत जीवन्शनशैली प्रायोगिक तत्वावर चालु आहेत. गोपुरी वर्धा,अम्कोली मोहोलळ .पण हे प्रयोग प्रयोगच राहिले. ह्याचे साआर्वत्रिकरण होतान दिसले नाही.ह्याचाच अर्थ त्यात काहीतरी कमतरता असणार

शहरात राहुन फक्त २ गोस्टी केल्या तरी खुप फरक पडेल
.१. लहाबालामांना डायपर न वापरणे. आजकाल काही ठिकाणी जैव विघटीत होणारे मिळतात पन त्याची विश्वासार्हता माहीत नाही.
२.सनिटरी नप्किन ऐवजी कप्स वापरणे.

मला तर जुना काळच आवडतो. ऑस्ट्रलोपिथेकस चा. त्याकाळी कसं दगडाची हत्यारं वगैरे बनवायच्या पण भानगडीत कोणी पडायचं नाही. मुख्य म्हणजे कोणालाच बोलता यायचा नाही. काही लोकांनी बोलायला सुरुवात केली आणि मगच प्रॉब्लेम चालू झाला. चला परत मागे जाऊया त्या काळात.

सिंगापूर बेस्ट आहे ह्या बाबतीत. कच रा रीसायकलींग ट्रेनिन्ग पीपल टू रीसायकल, मी तिथे रिव्हर क्रूज घेतली होती तर ते रिव्हर वॉटर पण ट्रीटॅव पोटेबल आहे. तुम्ही ड्रिंकींग वाटर मधून फिरता आहात असे ती बाई सांगत हॉती. हॅट्स ऑफ. ती लेव्हल भारतात येणार नाही. कधीच.

अशिक्षित/ अर्धशिक्षित लोकांना शिकवून समस्या सुटेल का त्यांना अंधकारमय जगात लोटून? आता मला खेदाने वाटायला लागलंय की, 'नको त्या लोकांच्या' हाती नको त्या गोष्टी पडतायत याचं वैषम्य तर नाहीये ना? Sad >>
माझ्या प्रश्नाचा रोख तुमच्या लक्शात आला नाही बहुतेक.
कचरा का वाईट? फक्त नजरेला वाईट दिसतो म्हणून का त्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो म्हणून जास्त?

जर नजरेला दि स णार नाही अ शा रितीने कचरा केला तर चालेल का? (बाकी परिणाम तसेच असल्यास?)
जे हवेच्या बाबतीत जागतिक स्तरावर घ डतय ( उदा co2 emission) त्याला तुम्ही कुठेही टाकलेला कचरा म्हणणार का नाही? का दिसत नसल्याने / माझ्या चैनीसाठी/ सोयीसाठी आवश्यक गोष्ट असल्याने इट्स ओके?
भारतातल्या कचरा टाकणार्‍या माणसाची समजूत असते, मी कचरा क रणार, तो उचलायची जबाबदारी महानगर पालिकेची. तशीच प्रवृत्ती कार्बन हवेत टाकणार्‍या लोका न्ची (आपण सर्व) आहे का?

बाकी कुठल्या लोकांच्या हातात काय आल्यानं मला वाईट वा टत असावं ते मला कळत नाहिये. मी, परदेशात रहाणारे तुम्ही, तिथले मूळ स्थानिक, इथले सर्व सामाजिक स्तरातले स्थानिक - सगळे सारखेच आहोत ही माझी धारणा आहे.

आगाऊ Lol
250 वर्षे मागे जाऊन आपण श्वासोच्छ्वास तर थांबवणार नाहीच. आजच्या लोकसंख्येला जेवण द्यायला शेती करता येणार नाही कारण हत्यारे, खाणी, बी बियाणी काहीही नाही. दगडाची हत्यारे करा आणि शिकार करा. थोडक्यात डोकं हा जो माणसाचा यूएसपी आहे तो वापरूच नका. कारण डोकं वापरलं तर माणूस कधी आजच्या घडीला परत येईल सांगता येणार नाही.
रानटी जगा! नुसती ताकद वापरायची तर वन्य प्राणी आपल्याला कच्च्या खातील. निसर्ग समतोल राखेल या ग्रेटर गुड मध्ये काय तो आनंद माना.
अहो, माणूस हा पण निसर्गाचाच भाग आहे, त्याची चांगली/वाईट बुद्धी ही पण निसर्गाचीच देन नाही का? चाकं उलटी फिरवून काय हशील?

'मिडल ग्राउंड' ही किती भोंगळ संज्ञा आहे. तुम्ही जे काही घर/भांडी/कपडे साफ करायला स्ट्रॉंग केमिकल्स न वापरणे, वगैरे लिहिलंय ते ऑलरेडी बरेच लोक फॉलो करत असतात. ओला सुका कचरा वेगळा करणे, ओला कचरा खतात रुपांतरित करून वापरणे, शक्य तिथे रियुजेबल पिशव्या इत्यादी वापरणे हेसुद्धा. पण वरच्या लेखात म्हटलेल्या आणि दिलीप कुलकर्णी यांनी फॉलो केलेल्या कुठल्या मेजर, जीवनशैली आमूलाग्र बदलणाऱ्या गोष्टी तुम्ही स्वतः अंगिकारल्या आहेत? त्याने तुमची जीवनशैली नक्की कशी बदलली? मला जाणून घ्यायला आवडेल. उदा.

1. शहर सोडलंय?
2. औद्योगिकीकरणाने निर्माण झालेली नोकरी सोडलीये?
3. शहरात एक किंवा अनेक घरं घेतली असतील ती सोडलीयेत?
4. विजेचा वापर सोडलाय?
5. आधुनिक उपकरणं वापरणं सोडलंय?
6. अनावश्यक प्रवास नको म्हणून सहली वा ऑनसाईट ट्रिप्स नाकारल्यात?
7. आधुनिक सोसायट्यांमध्ये घरकाम करायला येणाऱ्या मावशी जवळच असलेल्या झोपडपट्टी वा अगदी बेसिक सुविधाही नसलेल्या वस्तीत राहतात. जसे कुलकर्णी यांनी आईस्क्रीम भरपूर रिसोर्स खाते, म्हणून नाकारले तसे तुम्ही या वस्त्या बऱ्याच प्रमाणात कचरा, इतर आरोग्याचे प्रश्न निर्माण करतात म्हणून कामवाली न ठेवणे अंगिकारले आहे का?

की आम्ही आलो, शहरात नोकरी करत सेटल झालो, आता बाकीचे इकडे येऊ नका, गावातच राहा. (ते आगगाडीच्या डब्यांतले 'आतले नि बाहेरचे' प्रकार आठवला)

थोडक्यात हे तथाकथित मिडल ग्राउंड म्हणजे आपल्या लाईफस्टाईलला जास्त धक्का न लागू देता बारक्या बारक्या गोष्टी करून मोठ्ठं काहीतरी केल्याचा आव आणणे आणि इतरांना ते कसे पर्यावरणाला हानी पोचवतायत ते सांगत फिरणे का? ('मी माझ्या घरात अज्जिबात केमिकल्स वापरत नाही पण परवडत नाही म्हणून कामाच्या जागेपासून लांब घर घेतलेल्या आणि स्वतःच्या वाहनाने कामावर येणाऱ्या लोकांनी प्रदूषण केल्याने मला नामशेष व्हावे लागेल गं बाई! हे लोक खेड्यातच का नाही राहिले? श्या!') म्हणजे कचरा निर्माण होतो, प्रदूषण होते तर लोकांचे प्रबोधन करण्याऐवजी त्यांना थेट मागच्या काळात नेऊनच प्रश्न सोडवता येतील, असे सांगत फिरायचे? यो!

बाकी डायनॉसोर्सनी कुठे शहरे वसवली होती तरी त्यांची वेळ आल्यावर झाले ते नामशेष. निसर्गाला आता माणसाला करायचं असेल नामशेष तर करू दे की! उगीच त्याच्या कामात ढवळाढवळ कशाला?

मी, परदेशात रहाणारे तुम्ही, तिथले मूळ स्थानिक, इथले सर्व सामाजिक स्तरातले स्थानिक - सगळे सारखेच आहोत ही माझी धारणा आहे.>> ही चुकीची धारणा आहे. तसे प्रत्यक्षात नाही आहे.

जिज्ञासा, thats where i m at personally.
लेखकाच्या ताब डतो ब २५० वर्षे मागे जावे ह्या मागे, unless we take some immediate, non-lame steps - stopping increase of temp 2 degrees is impossible ही कळकळ आहे.
collapse of civilizations मधे जेरेड डायमंड म्हणतो, की हे डेकेडस मधे घडते. सामान्य जनतेला वाटते वरचे कुणीतरी विचार करत असेलच की. आणि असे कसे कोणी काहीच अ‍ॅक्शन घेणार नाही?
राजकारणी शॉर्ट सायटेडनेस दाखवतात. (आताचा स्वार्थ जास्त महत्त्वाचा हे धोरण)
सिविलायजेशन लेवेलला हे छोट्या प्रमाणात होतं म्हणू शकतं (पूर्ण पृथ्वीच्या तुलनेत) आणि इथे आपल्याबरोबर इतरही इम्पॅक्ट होतायत.

हे असं घडलं नाही तर मला किती आनंद होईल misinformed असण्याचा!

जाताजाता वेळ असेल तर हे चेक करा:
https://www.theguardian.com/environment/2018/apr/26/were-doomed-mayer-hi...

असे अनेक डाटा पॉईंट सकटचे देखील लेख सापडतील.
अमितवच्या लिंक सारखे प्रयोग कर णारेही आहेत (उदा. सल्फ्युरिक अ‍ॅसिड चा पाऊस पाडणे, अमित ची लिंक ज्यात मर्यादा मेंशन केल्या आहेत) - पण ज्या स्केलला सध्याचे बदल घडताहेत, ते किती उपयोगी पडतील, ते कधी पूर्णपणे इम्प्लिमेंट हो तील हे ही प्रश्न आहेत.
उदा, अनेक micro organisms अन्नसाखळीत काम करत असतात, जर मधल्या लिंक मिस झाल्या (एक्स्टिंक्शन मुळे) तर पीक लावाल, पण उगवेल का? किती आऊटपुट मिळेल हे देखील प्रश्न निर्माण होतात.
आपण एका क्लोज लूप सिस्टीम मधे रहातो .( सर्क्युलर फीडबॅक सिस्टिम). हवा, पाणी जमीन ह्यात होणार्‍या क्रिया इन्टर्लिंकड आहेत.
पृथ्वीचा अक्ष, वजन, रोटेशनचा स्पीड - ह्याचाही आपल्या जगण्यावर परिणाम होतो.

एक उदाहरण द्यायचे तर :
ओशन प्लॅन्क्ट्न्स असतात ते पाऊस पडण्यासाठी अतिशय महत्त्वाचा रोल बजावतात. हे महासागरात असतात. महासागरांचे अ‍ॅसिडिफिकेशन, सॅलिनिटी चेंज झाली तर ह्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. हा प रिणाम झाला तर पाऊस पडेल काय? पाऊस नसेल तर आप ल्या वर काय परिणाम होईल?

250 वर्षे मागे जाऊन आपण श्वासोच्छ्वास तर थांबवणार नाहीच. आजच्या लोकसंख्येला जेवण द्यायला शेती करता येणार नाही कारण हत्यारे, खाणी, बी बियाणी काहीही नाही. दगडाची हत्यारे करा आणि शिकार करा. >> २५० वर्षे मागे शेती होती हो! असे काय करताय!
शेती जवळपास १०००० वर्षे आहे. पण वरदाने म्हटल्याप्रमाणे ती ही नैसर्गिक नाही.

आगाऊ, तुझ्या चित्रावरही लिहिते वेळ झाला की.

Arc, tumhi baai manus nasal tar aaplyala mahit nahi ani kalat nahi ashya goshtit nak khupsu naka. Aani baai asal tar lagech kapdache tukde(pan mag tyala pan kiman hatmag lagto! Nakoch te) Absorbant patrval / jhadachi pane, balala pananche langot ase vaprayla laga. Dhanyavad

इथे जेव्हा दुसर्‍या व्यक्तीचे लेखन बाकी काहीही टिप्पणी न करता फॉरवर्ड केलं जातं तेव्हा त्या लेखनाशी तो सदस्य शंभर टक्के सहमत असतो/ते असं माझं मत आहे. नसल्यास त्या सदस्याने मतभेद, इंटरप्रीटेशन अशावर थोडी टिप्पणी करणे अपेक्षित आहे. ते नसल्याने राऊतांचे मत हेच नानबाचे मत आहे असे धरूनच मी लिहित आहे

१. औद्योगिकीकरण म्हणजे नक्की काय? का औद्योगिक क्रांती म्हणायचे आहे (ज्याला दोनेकशे वर्षे झाली आहेत)? औद्योगिकीकरणाची संथ प्रक्रिया त्या आधी कित्येक शतके चालूच होती.
२. शेतीची सुरुवात तर सोडूनच द्या, पण अगदी भारतातही कमाल साडेपाच आणि किमान अडीच हजार वर्षांपासून शहरे, विविध स्पेशलाईज्ड उद्योगधंदे व त्यांचे उत्पादन उदयाला येऊन अखंडपणे सांस्कृतिक प्रक्रियांचा एक भाग आहे. खाणी वगैरे सुद्धा पाचेक हजार वर्षे अस्तित्वात आहेत. युद्धे अगदी आदिमानवापासून कायमच अस्तित्वात आहेत. नक्की काय सोडता येणार आहे यातलं? आणि कसं? जाणून घ्यायला अतिउत्सुक आहे.
३. अडीचशे वर्षे मागे जायचे म्हणजे नक्की कसे व कुठल्या गोष्टीत? अडीचशेच का? त्यात पहिली बाद जाणार ती वीज. आयुष्य वाचवणारी औषधे, वैद्यकीय तंत्रज्ञान, इत्यादि. ते का बाद करायचं? वीज नाही, सगळं स्वतःचं स्वतः करायचं, म्हणजे कोण करणार? बायका? मिक्सर सोडून रोज जात्यावर दळण दळणे, कपडे धुणे, भांडी घासणे, धान्य निवडणे, आणि अशी रोजची हजारो कामे कोण करणार? एलपीजी, पेट्रोल चालणार नाही. चुलीवर स्वैपाक करा (परत त्यात लाकडं जळून पर्यावरणाची हानी होणारच, कारण आजची लोकसंख्या, तेवढ्या गोवर्‍या मिळणारेत का? त्या धुराने सुद्धा प्रदूषण होतंच), चालत किंवा घोडागाडी बैलगाडीने जावा.
नानबा, तू करणारेस का? यातल्या किती गोष्टींना लागणारी उपकरणे तू वापरतेस? किती वापरत नाहीस? गाडी वापरतेस्/नाही/पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरतेस? (हा वैयक्तिक टीकेचा उद्देश नाही, तू हे सगळं इथे लेख टाकला आहे म्हणून विचारते आहे...) कामवालीकडून ही कामे करून घेणे म्हणजे शोषण आहे. सामाजिक विषमता यातून वाढीला लागते.

<<यंत्र व तंत्रज्ञान जगात धुमाकूळ घालत आहे. धरणे, खाणी, वीजनिर्मिती, मोटार - वाहन निर्माण, सीमेंट, स्टील, रासायनिक खते, कीटकनाशके इ. यांच्यामुळे आपण जगतो काय ?
ही उत्पादने बनवणाऱ्या उद्योगांत नोकर्‍या करून चलन म्हणजे पगार मिळवणे व अशा व्यवस्थेसाठी मंत्रालये, महापालिका, काॅर्पोरेटस् चालवणे याचा खऱ्या जीवनाशी संबंध नाही. उलट हे कोट्यावधी वर्षे चाललेल्या जीवनाविरूध्द आहे. औद्योगिकरण सुरू होण्यापूर्वी कुणी बेकार नव्हता. >>
हे डोकं ठिकाणावर असल्याचं लक्षण आहे का? माओची सांस्कृतिक क्रांती, ख्मेर रूज वगैरेचे प्रयोग यांविषयी लेखक निरागसपणे अनभिज्ञ दिसतो आहे. त्या सगळ्या प्रयोगांचे अपयश का आणि कसे आले (राजकीय कारणे सोडून) यावर विचार केला तर बरं होईल.
बरं लेखक स्वतः वकील आहेत. त्यांनी मग त्यांचा पेशा बंद केला आहे का? कारण त्या पेशाचाही 'खर्‍या जीवनाशी' संबंध नाही. जे आयटीत काम करतात त्यांचा ही नाही. जे शिक्षणक्षेत्रात आहेत त्यांचाही नाही. हे सगळं जस्टिफाईड आहे असं तुला म्हणायचं आहे का?
किमान दिलीप कुलकर्णींनी जी जीवनशैली अंगिकारली आहे ती तरी लेखकांनी अंगिकारली आहे का? कुलकर्णी सुद्धा इतकं 'प्रीचिंग' करत नाहीत......

बाकी राहिला मुद्दा पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग, सर्व नियम कायदे धाब्यावर बसवून अनिर्बंध कारखानदारी, संसाधनांची बेजबाबदार उधळपट्टी, त्यातून होणारे पर्यावरणातले दूरगामी बदल, धोके इत्यादी. तर राऊत सोडून इतरही लोक जागे झाले आहेत याविषयी. अनेक जण डोळस जगायचा प्रयत्न करत आहेत. भारतात, बाहेर पर्यावरण चळवळी उभ्या आहेत, प्रबोधन करायचा प्रयत्न करत आहेत. जरी ही प्रक्रिया हळूहळू होत असली तरी एका निश्चित गतीने होत आहे.

या असल्या बिनबुडाची विधाने करणार्‍या, अर्ध्याकच्च्या व्हॉट्सॅपीय लेखांनी मात्र पर्यावरणविषयीच्या प्रबोधनाची हानीच होते असे माझे नम्र मत आहे.

राजसीच्या मुद्याला अनुमोदन. डायपर आणि सॅ नॅ न वापरणे म्हणजे शेवटी बहुतांशी बायकांचे हाल. कारण सॅ. कप्स करायला सुद्धा औद्योगिकीकरणाची गरज आहेच.
परदेशातही जिथे लंगोट वापरायचा प्रचार केला जातो तिथे लंगोट धुवून देणार्‍या लॉन्ड्री सर्विसेस पण आहेत. त्या औद्योगिकीकरणाशिवाय चालतात होय?

आणि हो, पहिला कागद बंद करा बरं. गार्बेज आर्किऑलॉजी नामक लँडफिल्सच्या उत्खननाच्या प्रकल्पातून हे सिद्ध झालंय की पन्नासपन्नास वर्षे कागद न कुजता राहतो.

Pages