औद्योगिकरणाच्या विमानाचे कोसळणे टाळा! लेखक - अ‍ॅड. गिरीष राऊत

Submitted by नानबा on 29 May, 2018 - 08:40

औद्योगिकरणाच्या विमानाचे कोसळणे टाळा. औद्योगिकरणाचे विमान मानवजातीला व जीवसृष्टीला विनाशाकडे वेगाने नेत आहे. ते कोसळणार हे तर निश्चित आहे. ते कोसळण्याआधी सुरक्षितपणे उतरवावे. थोडक्यात क्रॅशलॅडिंग टाळावे. ते, त्यातील प्रवासी म्हणजे मानवजात वाचवण्यासाठी आवश्यक आहे.

औद्योगिकरण थांबण्याबाबतची भीती अनाठायी आहे. आजही औद्योगिकरण कुणालाही जगवत नाही. इतर प्राणिमात्रांप्रमाणेच मानवही हवा पाणी व अन्नामुळे जगतो. औद्योगिक उत्पादनांमुळे नाही. औद्योगिकरणामुळे जीवन संपुष्टात येणार हे नक्की झाल्यावरही ते चालू ठेवणे यामागे औद्योगिकरण जगवते असा निर्माण झालेला गैरसमज कारण आहे. आपण करोडो वर्ष पृथ्वीवर आहोत. औद्योगिकरण बुडबुड्यासारख्या अत्यल्प कालावधीत आले.
दारिद्र्य ही संकल्पना नीट समजून घेतली पाहीजे. ज्या पृथ्वीवर करोडो वर्षे हत्ती, गेंडा, व्हेल सारखे महाकाय जीव व्यवस्थित जगले ती पृथ्वी माणुस नावाच्या तुलनेने टीचभर पोट असलेल्या प्राण्याला जगवू शकत नाही काय ? जीवन व जीवनशैली यात गल्लत करू नये. पृथ्वी जीवनासाठी आहे. जीवनशैलीसाठी नाही. बाकी सर्व प्राणिमात्र उदरनिर्वाह करतात. आधुनिक माणुस नाही. तो कार, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, फ्लॅट, बंगला, वीज इ. निर्वाह करतो. त्यासाठी पैसा लागतो. करोडो वर्षे व कृषियुगात हजारो वर्षे पैसा लागला नाही. तेव्हा माणुस जगत नव्हता काय?

हे माणसाचे भरकटणे झाले औद्योगिकरणामुळे. त्याच्या कृत्रिम जगण्यासाठी लागणारी वस्तुनिर्मिती व वापर पृथ्वीच्या पध्दतीच्या विरोधात आहे. ते केले गेले हीच मुळात चूक झाली.
पैशांचा अभाव म्हणजे दारिद्र्य काय ? मग ती गोष्ट मानवी व्यवस्थेशी संबंधित आहे. मानवी शोषण किंवा चूक त्याला कारण आहे. त्याचा पृथ्वी किंवा निसर्गाशी संबंध नाही.

१५० ते २५० वर्षात औद्योगिकरणाने दारिद्र्य दूर झाले नाही. उलट पृथ्वीची जीवांचे पोषण करण्याची क्षमता औद्योगिकरण शहरीकरण व अर्थव्यवस्थेमुळे नष्ट होत गेली. पृथ्वी बकाल होत गेली.
लढाया व युध्द ही मानवी मनातून घडतात. औद्योगिकरणामुळे कच्चा माल बाजारपेठांवरील ताबा इ. कारणांमुळे महायुद्धे झाली. तणाव वाढले. उदा. बंदुकनिर्मिती उद्योगाच्या हितसंबंधांमुळे अमेरिकेत दर वर्षी शाळा महाविद्यालयांतील हजारो तरूण गोळीबारात मरतात. अमेरिकेचे सुमारे ७५ ते ९० % उत्पन्न शस्त्रास्त्रांच्या निर्यातीतून येते. त्यामुळे जगात तणाव असण्यात त्या देशाचे व पर्यायाने औद्योगिकरणाचे हितसंबंध आहेत. हे फक्त एक उदाहरण आहे. यंत्र व तंत्रज्ञान जगात धुमाकूळ घालत आहे. धरणे, खाणी, वीजनिर्मिती, मोटार - वाहन निर्माण, सीमेंट, स्टील, रासायनिक खते, कीटकनाशके इ. यांच्यामुळे आपण जगतो काय ?
ही उत्पादने बनवणाऱ्या उद्योगांत नोकर्‍या करून चलन म्हणजे पगार मिळवणे व अशा व्यवस्थेसाठी मंत्रालये, महापालिका, काॅर्पोरेटस् चालवणे याचा खऱ्या जीवनाशी संबंध नाही. उलट हे कोट्यावधी वर्षे चाललेल्या जीवनाविरूध्द आहे. औद्योगिकरण सुरू होण्यापूर्वी कुणी बेकार नव्हता.

युनोच्या बाॅन येथे नोव्हेंबरमधे झालेल्या जागतिक वातावरण बदल परिषदेत हे जाहीर झाले की, यापृढे तापमान न थांबता वाढत राहणार आहे. मानवजात या शतकात नष्ट होत आहे. अशावेळी वातावरणातील साठलेला कार्बन पृथ्वीला निर्जीव करणार असल्याने नवे प्रकल्प तर सोडाच पण चालू औद्योगिकरण थांबवणे अनिवार्य बनले आहे. हा कार्बन शोषणारे हरितद्रव्य तात्काळ वाढू लागले पाहिजे. तरच जीवसृष्टी वाचण्याची शक्यता आहे.
अशावेळी नोकरी, उद्योग आपल्याला जगवतात या भ्रमामुळे ही समस्या कार्बनरहित तंत्रज्ञान वापरून सोडवता येईल असे वाटणे हे जीवनशैली व जीवन यात फरक न केल्याने घडत आहे. कोणतेही तंत्रज्ञान वाचवणार नाही.
मानवजातीला आता तातडीने अडीचशे वर्षे मागे जावे लागेल. मनात प्रगती व विकासाचे गंड बाळगले तर पृथ्वीवरून उच्चाटन अटळ आहे.
आजही सर्व औद्योगिक व इतर लोकसंख्या पृथ्वी जगवते. शहरे शेतीमुळे जगतात. पृथ्वी शेत पिकवते.
मात्र औद्योगिक जग क्षणोक्षणी पृथ्वीविरूध्द व तिच्या जीवन देण्याच्या क्षमतेच्या विरूद्ध वागते.
हे थांबवावे. शहरे विसर्जित करावी . प्रत्येकाने आपले अन्न स्वतः पिकवावे. तो पृथ्वीचा नियम आहे. त्याच्या विरोधात जाणारी आधुनिक मानवी व्यवस्था गुंडाळावी. ती भ्रामक व्यवस्था टिकवण्याच्या अट्टाहासाने पूर्ण विनाश ओढवेल.
धन्यवाद,

आपला
अॅड. गिरीश राऊत
निमंत्रक
भारतीय पर्यावरण चळवळ
९८६९०२३१२७ व्हाॅ. अॅप.
कृपया सर्वत्र पाठवा.

---------------------------
सदर लेख लेखकाच्या परवानगीने प्रसिद्ध केला आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागे जाण्याऐवजी जे आत्ता हातात आहे ते घेऊन पुढे सकारात्मक पावले उचलता येतील. औद्योगिकरण अपरिहार्य आहे हे लक्षात घेऊन त्यातूनच पर्यावरणाची हानी कशी कमीत कमी होईल, पर्यावरणास आणि मानवी समुहास घातक गोष्टींच्या उत्पादनावर कसा आळा घालता येईल या दृष्टीनं विचार आणि प्रयत्न केले तर ते वाया जाणार नाहीत. आहे तो गाडा पुन्हा मागे वळवणे शक्य नाही, योग्य नाही आणि त्याची गरजही नाही.

सध्या जगाची लोकसंख्या साधारण ७६२ कोटी ६० लाख आहे. आणि पृथ्वीची क्षमता फक्त ६० लाख लोकसंख्या पोसण्याची आहे (शिकारी आणि वरकड अन्न गोळा करून खाणे). आता मग उरलेल्या ७६२ कोटींचे काय करायचं? २५० वर्षे मागे गेले तरी लोकसंख्या १७७० मध्ये होती साधारण ७०/८० कोटी. १९६० च्या दशकातील बेबी ब्लूमर्स च्या काळातला २. १% चा ग्रोथ रेट आता ०.१% वर आलाय. हरित क्रांती झाली म्हणून लोकांना खायला तरी मिळत आहे. ७२ च्या दुष्काळात मिलो आणि मका खायची वेळ आली होती. तर लोकसंख्या काही मारून टाकणे शक्य नाही. फार तर त्याचा रेट कमी करू शकतो. मुलं न होऊ देणाऱ्या लोकांना काही विशेष इन्सेन्टिव्ह देऊन.

दुसरा एक विचार असा करावा कि प्रदूषण होण्यात जास्तीत जास्त सहभाग कशाचा आहे आणि त्यावर कसा नियंत्रण आणता येईल. तर एक उदाहरण घेता येईन, कमी प्रदूषण करणाऱ्या गाड्या, जसे कि २ स्ट्रोक जाऊन ४ स्ट्रोक किंवा बी एस ४ एंजिने. सक्षम सार्वजनिक वाहतूकी. आणखी एक उदाहरण घ्यायचे तर नद्यांमध्ये सोडले जाणारे प्रदूषित पाणी. काही कारखाने किंवा शहरे अथवा गावे प्रोसेसिंग चा खर्च टाळायला प्रदूषित पाणी नदीत किंवा जमिनीत सोडतात. त्याचे काटेकोर पालन.

आता हे होण्या साठी लोकशाही मध्ये म्हणजे लोकांमध्ये जागृती पाहिजेआणि ती जागृती येण्यासाठी पर्यावरण रक्षणाची जाणीव असलेले लोक जास्त आणि नसलेले कमी अशी विभागणी हवी. त्यासाठी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमधून जागृत करू शकता. पुण्यासारख्या शहराने सुरु केलेलं टाकीतील गणेश विसर्जन हे त्या पैकीच एक. आणि ज्याला शक्य आहे त्याने त्या मार्गाने यात सहभागी झाले पाहिजे. तुम्ही गाडीने रोज प्रवास करून कामाला जाता काही हरकत नाही, तुम्ही झाडं लावू शकता. तेही शक्य नाही तर जे लोक लावत आहे त्यांना पाठिंबा/मदत द्या.

उद्देश एकच आहे कि पर्यावरण रक्षणासाठी सरकार वर समाजाने दबाव निर्माण केला पाहिजे. शेवटी समाजाचे काम असा दबाव निर्माण करणे आहे. पॉलीसी मेकरना योग्य निर्णय घेणे भाग पडेल.

तर सारांश असा कि पर्यावरण रक्षण हे सर्व समावेशक कसा करता येईन हे पाहणं महत्वाचे. जास्तीत जास्त लोक कसे जोडले जातील हे पाहणं महत्वाचे. हे करताना अति तेथे माती हे लक्षात ठेवलेच पाहिजे. पर्यावरणाची अवस्था भयानक आहे. त्यामुळे लोकांसमोर ते प्रभावीपणे येणे जास्त महत्वाचे.

वरदा, मी माझे मत दोन तीन पोस्टस मधे टाकले आहे. कदाचित संपादन करून लेखातही टाकायला हवे का?

ज्या स्केल वर प्रोब्लेम आहे त्या लेवल करता फक्त काही ब दल कितपत पुरे पडतील हा मात्र फार मोठा प्रश्न आहे.
पर्यावरणा बाबत अनेक स्ट्रीम आहेत ज्यात खूप लोकं काम करत आहेत. जवळपास प्रत्येक गोष्टीची आपण वाट लावली आहोत, लावत आहोत.

मी ज्या केस स्टडीज, फिल्ड विजिट्स, एक वर्षाचा कोर्स केला, अनेक लेक्चर्स अटेंड केली, वाचन केले त्याच्या आधारे लिहितीये:
निसर्गाचे तत्त्व असे आहे की जर तुम्ही फक्त स्ट्रेस काढलात तरी सिस्टीम त्याच्या बेस्ट पॉसिबल स्टेज ला पोहोचते. हा आजचा एक्विलिब्रयम पॉईंटचा अनुभव. हा ईक्विलिब्रियम अनेक आवर्तनांनतर साधला गेलाय (म्हणजे वातावरण, बाकीच्या नैसर्गिकनैसर्गिक, ऑक्सिजन चे प्रमाण वगैरे) उदाहरण काय? तर एखादी पडकी जमीन आहे , खूप वाईट अवस्थेत आहे. तिला फक्त माणसे आणि गुरे ह्यांपासून संरक्षण दिले, काही अ‍ॅक्सलरेटर्स टाकले तर ती तिथल्या बेस्ट पॉसिबल कंडिशनला पोहो चते.
मग काळजी करायचे कारण कुठे?
मातीसारखे रिसोर्सेस तयार करायला शेकडो वर्षे लागतात (तू सांगू शकशील ह्यावर). पाणी जे सुरुवातीला तयार झाले तेच आजही वापरतोय.
हे सगळच आपण फार वेगाने संपवतोय, खराब करतोय.
ह्यावरही सोल्युशन काढता येऊ शकते कदाचित, पण पॅरिस करारानुसार २ डिग्रीज चे लिमिट क्रॉस हो ऊ नये, ह्यासाठी कुठलेही, दुसरे सोल्युशन मिळवण्यासाठी हा वेळ पुरेसा असणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा काळ किती दशकात येणार? आपण २१०० पहाणार का? (आपण म्हणजे आपण स्वतः नव्हे.) ही प्रोबॅबिलिटी वाढवण्यासाठी (probable solution ) we should buy as much of time as possible.
हे थेरॉटिकली शक्य आहे का? आहे. त्याचे उत्तर वरच्या लेखात आहे.

प्रॅक्टिकली, वर अमितव ने जे सांगितले (संपायची असेल तर संपूदेत) असाच दृष्टीकोन बहुतेकांचा असतो.
हा बदल सोसायटी लेवल ला घडला तरच हे शक्य आहे. as a first step समाजातल्या सर्व स्तरांवरच्या माणसांपर्यंत ही माहिती तरी पोहोचली पाहिजे. तर बदल होण्याची शक्यता आहे.

उद्देश एकच आहे कि पर्यावरण रक्षणासाठी सरकार वर समाजाने दबाव निर्माण केला पाहिजे. शेवटी समाजाचे काम असा दबाव निर्माण करणे आहे. पॉलीसी मेकरना योग्य निर्णय घेणे भाग पडेल.

तर सारांश असा कि पर्यावरण रक्षण हे सर्व समावेशक कसा करता येईन हे पाहणं महत्वाचे. जास्तीत जास्त लोक कसे जोडले जातील हे पाहणं महत्वाचे. हे करताना अति तेथे माती हे लक्षात ठेवलेच पाहिजे. पर्यावरणाची अवस्था भयानक आहे. त्यामुळे लोकांसमोर ते प्रभावीपणे येणे जास्त महत्वाचे. >> हे छान आहे. योग्य आहे.

त्यातही अनेक भन्नाट अनुभव आहेत. सगळी यंत्रणा (अनेकजण एकत्र येऊनही ) आपल्या डेटा पॉईंट्स, कायद्याला धरून असलेल्या मागण्यांचाही कसा धज्जा उडवू पहाते. असो, तो वेगळा विषय आहे.

वाचल्या पोस्ट्स परत, पण मी किंवा वरदाने विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर त्यात कुठेही दिसलं नाही. वरचा लेख शहर सोडून द्यायला सांगतो, पैशाची गरज काय वगैरे मुद्दे मांडतो, कुलकर्णींनी ऑलरेडी शहर सोडून पर्यावरणस्नेही जीवनशैली अंगिकारली आहे. पण त्या मेजर बदलांमधले तुम्ही काय काय स्वतः इम्प्लेमेंट केलेय? ते करताना काय अडचणी आल्या, त्यावर कसा तोडगा काढला वगैरे सविस्तर लिहा. केमिकल कमीत कमी वापरणे, ओला सुका कचरा वेगळा करणे, रियुज रिसायकल वगैरे गोष्टी आज भरपूर लोक करतात त्यामुळे ती उदाहरणे नकोत. बाकी तुमच्या पोस्ट्समध्ये केवळ आपल्याकडे वेळ कमी आहे, तातडीने काहीतरी करायची (वरच्या लेखानुसार 250 वर्षं मागे जायची) गरज आहे (कुणी? इतर लोकांनी?) हेच वारंवार येतंय.

वरदा, विपू करते.

श्रद्धा अ‍ॅटॅक केल्यासारख्या पोस्टस असल्याने उत्तर देत नाहिये. अनेक पर्सनल सॅक्रिफायसेस केले आहेत, जशी पक्वता येत जाईल तसे करत जाईनही. जर जेन्युईन कुतुहलाने विचारले असते तर उत्तर दिले असते.

What are some of the health issues for women who use disposable menstrual products?

detox-the-boxYour skin is the largest organ in your body and also the thinnest. Less than 1/10th of an inch separates your blood stream from potential toxins. Also, your skin is highly permeable, especially the skin around your vaginal area and inside your vagina itself. This means that anything your skin comes into contact with can enter your bloodstream in less than 30 seconds and be distributed throughout your body. Once these chemicals find their way into your body, they tend to accumulate over time. This is why attention needs to be paid to the ingredients used in tampons and sanitary pads. Most pads have a top layer that feels like cloth but is in fact a plastic woven sheet, plastic wings and adhesives and super-absorbent polymer gels—that soak up the flow—are comprised of plastics; most tampon brands come with plastic applicators and are made of non-organic cotton. Using synthetic menstrual products means a risk in exposure to:
•Residual pesticides – Most major brands of tampons and pads contain non-organic cotton or wood pulp grown using agrochemicals and pesticides.
•Synthetic fragrances, odor neutralizers and other potentially hazardous ingredients
•Dioxins and plastic chemicals – The hazardous nature of chemicals are cause for concern that calls for further research(1). The WHO classifies dioxins as a highly toxic environmental pollutant and health risk(2). Dioxins are produced in chlorine bleaching processes. A possible link to cancers, endometriosis, immune system depression and pelvic inflammatory disease has been established(3). BPA and BPS disrupt embryonic development and are linked to heart disease and cancer, Phthalates are known to disregulate gene expression and DEHP may lead to multiple organ damage(4). The call for further research to reduce on health risks to women from dioxin and other chemicals has been raised in the US Tampon Safety Act and Robin Danielson Act since 1999(5). The US Endometriosis Association indicated to use organic cotton sanitary products without plastics until research addresses the risks(6).
•Bacteria and fungus toxins – Synthetics and plastic also restrict the free flow of air, can trap heat and dampness, potentially promoting the growth of yeast and bacteria in your vaginal area, a possible cause for vaginitis(7).

https://ecofemme.org/convenience-cost-part-2/

We have gynecologist in our family. who recommends using SHE CUPs. 70% of women in my family and friends use CUP, remaining use cloth pads as they dont like CUPs.

फायनली अशा प्रकारचा प्रतिसाद येणार हे अपेक्षितच होतं. स्वतः अंगिकारलेल्या मोठ्या गोष्टींबद्दल सविस्तर लिहा, असं म्हटलं तर पर्सनल अटॅक कसा काय होतो, काय माहीत?

असो. धन्यवाद.

नानबा, अटॅक करण्यासाठी विचारलं नाहीये तर तू हा लेख इथे डकवला आहेस म्हणून विचारलं. आणि तुला वैयक्तिक विचारणा केलीये ते सोडून ही मी काही प्रश्न विचारले आहेत त्याचीही उत्तरं मिळत नाहीयेत
मी फोन वरून जास्त लिहू शकत नाहीये, वेळ मिळाला की लिहेन

Audyogikaran aani paryavaran hya vishayavar boltana ladies baykancha personal health-hygine issues aani sanitary napkin chya totyanbaddal bolaycha kay sambandh! Vishay kay aapan boltoy kay!

मूळ लेख आवडला. त्यात मांडलेली भूमिका एकदम टोकाची आहे. पण म्हणून मायबोलीवर निदान तो वाचला तरी गेला. नाहीतर या विषयावर मवाळ भाषेत बरेचदा बरेच लिहिले गेलेय.

मागे जाणे शक्य नाही असे प्रत्येकाला वाटते, मलाही वाटते कारण प्रत्येक सुखासीनतेच्या गोष्टीने मला तिचा गुलाम केलेय. एक्सकलेटर, लिफ्ट व जिना ह्या तीनही गोष्टी आज शहरात बहुतेक जागी असतात. मी मात्र त्यातली लिफ्ट वा एक्सकॅलेंटरच वापरते. मी जिना वापरला तर त्यामुळे होणारा फरक अगदीच नगण्य असल्याने मी त्या भानगडीत पडू नये हे माझे मीच ठरवून टाकले आहे. हे असे सर्वत्र बाबतीत आहे. त्यामुळे मी मागे जाऊ शकत नाही.

नानबा, Yuval Noah Harari यांचे Sapiens a brief history of humankind हे पुस्तक लवकरात लवकर वाचावे असे सुचवेन.

बाकी डायनॉसोर्सनी कुठे शहरे वसवली होती तरी त्यांची वेळ आल्यावर झाले ते नामशेष. निसर्गाला आता माणसाला करायचं असेल नामशेष तर करू दे की! उगीच त्याच्या कामात ढवळाढवळ कशाला?>>>>>

मलाही कित्येकदा असेच वाटते. निसर्गचक्रामुळे हवेतला कार्बन तसाही वाढणार होताच. फरक इतकाच की औद्योगिकरण झाले नसते तर वाढते तपमान इतक्या जलद गतीने न वाढता गेल्या 1000 वर्षात ज्या गतीने वाढले त्याच गतीने वाढले असते. औद्योगिकरणाने गती व भीषणता वाढवली. पुढच्या मानवी पिढ्याना याचे परिणाम भोगावे लागणार.

स्वतःच्या वैयक्तिक आवडीनुसार आपण कुलकर्णी कुटुंबासारखा निर्णय घेऊ शकतो पण याने बाकी निसर्गाला काही फरक पडेल असे वाटत नाही. फरक पडण्यासाठी असे निर्णय मोठ्या प्रमाणात घेतले गेले पाहिजेत. पण त्यांनाही उपलब्ध औधोगिकरणावर अवलंबून राहावे लागेल.

इथे बऱ्याच वेळा वैयक्तिक सहभाग काय करता आणि वैयक्तिक सहभाग फारसा गरजेचा नाही असे दोन्ही सूर दिसले. व्रतस्थ राहणे तसे फार अवघड आहे पण त्यातून तुम्हाला प्रश्न विचारायचे नैतिक बळ येते. काहीसा हाय मॉरल ग्राउंड सारखा प्रकार. त्यामुळे तुम्ही काय करू शकता ह्या प्रश्नाचा जरा वेगळ्या प्रकारे विचार करावा लागेल. वैयक्तिक प्रयत्न कितपत फायद्याचे आहेत हे समजून घ्यायचं तर पहिले प्रदूषण कसे होते हे पाहावे लागेल.

मुळात प्रदूषण हे हवा आणि पाणी अश्या २ मुख्य प्रकारामध्ये आहे. त्यात हवेत जैव इंधनाचा वाटा हा जवळ जवळ ८७% आहे. त्यातही कोळसा जो मुख्यत्वे वीज निर्मीती साठी वापरला जातो त्याचा हिस्सा ४६% आहे. जगात बनणारी वीज हि ७५% थर्मल आहे. म्हणजे ७५% वीज ४६% वायू प्रदूषण करते. उरलेला हिस्सा हा वाहने, कारखाने आणि घरं गरम ठेवण्यासाठी लागणारी उष्णता यांचा आहे. तर हि वीज वापरली जाते माणसांकडून. दरडोई आपण किती वीज वापरतो ? मग यात प्रगत देश आणि प्रगतिशील देश दोन्ही. प्रगतिशील देशांची लोकसंख्या कमी पण वापर जास्त भारतासारख्या देशाची लोकसंख्या जास्त आणि वापर कमी आणि दिवसेंदिवस वाढत जाणारा. या विजेचा वापर सगळीकडे होतो. प्रत्यक्ष घरगुती वापर फारसा नसतो. मोठ्या प्रमाणावर वापर हा अप्रत्यक्ष आहेत. मग यावर काय करता येईन तर अणू ऊर्जा किंवा अपारंपरिक ऊर्जा श्रोत. त्यांचा वापर कसा वाढेल ते पाहणं आणि आपला समाज काय प्रयत्न करतोय हे पाहणे. यावर मतदार म्हणून लोकं दबाव आणू शकतात. आणि जी उत्पादने आपण विकत घेतो त्या बनवणाऱ्या कंपन्या किती प्रदूषण करतात यावर हि लक्ष ठेऊ शकतो.

तसाच मानवी सांडपाणी आणि कारखाने हा पाणी प्रदूषणाचा मोठा हिस्सा आहे. यातले पाणी प्रदूषण हे सरळ सरळ सरकार च्या हातात येते. वैयक्तिक काही फारसा करू शकत नाही. जे पाणी वापरले जाणार ते प्रदूषित होणारच. मात्र प्रक्रिया ना करता नदीत सोडणे हे महापाप. ते टाळता येणे सहज शक्य आहे. यासाठी प्रयत्न करणे आपल्या हातात आहे.

असा विचार करता असा दिसून येतं कि वैयक्तिक प्रयत्नातून फारसा काही हाती लागणार नाही पण ह्या छोट्या गोष्टींमधून खारीचा वाटा मात्र उचलू शकतो. हे करताना मूळ उपाय काय आहे हे लक्षात असले पाहिजे. शेवटी कंझुमरीअम चालतो ग्राहकाच्या जीवावर त्यामुळे ग्राहकाने प्रदूषण मुक्त उत्पादनाची मागणी केली तर बदल होईलच.

माझ्या मते काही सोपे उपाय
१. पर्यावरण रक्षणासाठी असलेल्या दबाव गटांना सक्रिय पाठिंबा
२. उत्पादने विकत घेतांना कमीत कमी प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना प्राधान्य
३. जमेल तसं वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणे

यात अजून काही उपाय सुचत असल्यास भर घालावी.

शेवटी बिघडली सिस्टिम सुधारावयाची प्रोसेस हि डिलेड ग्रॅटिफिकेशन आहे. कोणीच काही न करता तर सुधारणार नाही.

What are the environmental costs?
•Sanitary waste is HUGE – The products we use add up. If only a quarter of India’s menstruating adolescent girls alone used disposable pads, 90 million would be disposed or burned every month alone.
•There is nUntitled2o ‘away’ – The plastics and components as well as the wrappers of disposable products are largely non-biodegradable, presenting huge waste management challenges around the world. Research has shown that each conventional sanitary pad contains the equivalent of about four plastic bags! A single pad is estimated to take 500-800 years to decompose in landfill. When pads are flushed down the toilet, sanitation workers have to descend into manholes to remove and handle used menstrual products from sewer blockages, public toilets, household trash, or even the roadside. These tasks are often done without protective clothing, gloves or masks. which puts the workers at risk of contracting infections with potentially deadly viruses or diseases. You can read more on these issues here. https://www.earthandus.org/disposable-pads-disposable-lives
•Burning releases environmental toxins – In many parts of the world, disposable menstrual products are burned by individuals or in incinerators along with other waste; this causes dioxins and other chemicals to be released which creates toxic ash and fumes. Read more about incineration here.

2000 Sali pan tya Arunachalam na bayko ni yogya personal hygiene product vaprave mhanun dhadpad karavi lagli aahe. Aani achanak 20 varshat direct cup!?
Is it affordable? If consumers buy from aliexpress, they may get for 100 or 200 rs, in india its cost is 2k/3k.
There is a learning curve for that product
It may not be suitable for all anatomy ( you can't advise it for teen girl)
Ajun barech mudde Aahet.
Purushani ugich kalat nahi, aapla prant nahi tithe laksh ghalu naye.
Daru, cigarette chya audyogik utpandanatun honari paryavaran hani baddal bola hav tar. Kon kon tadi-madi pyayla lagla batlya sodun, ganja odhayla lagla tyavar jara relevent discussion kara. Shobhel tari.

thank you for asking such questions miss toxic,I will try to answer as much as possible.
https://ecofemme.org/men-in-menstruation/
for teenagers:
cloth pads will last for approx 75 washes. So Eco Femme washable cloth pads can last 3 to 5 years, depending on how frequently you use them and if you care for them properly. For example: Do not use a brush to wash the pads, so the quality of the fabric is well maintained, and stick to the rinse-in-cold-water-first-rule to keep them clean
pictures: http://hygenie.in/cotton_cloth_pad.php
for remaining questions please visit:
https://ecofemme.org/faq/
By the way similar project is going on in Anandwan led by Pallavi amate. Strisshu.
This is for rural girls and women as well handicapped girls and women

<<लेखक म्हणतो ते करणे हितावह आहे , पण ते प्रॅक्टिकली होणार नाही. एकतर लोकाना माहितच नाहिये की ग्लोबल वॉर्मिन्ग, त्याचे already दिसू लागलेले इम्पॅक्ट्स,>>
<<पुढे आणि मागे म्हणजे नक्की काय? ह्यात माध्यमांनी, आपल्या वेळच्या शिक्षणाने केलेले कंडिशनिंग किती? हे ही मुद्दे तपासावे लागतील.>>

<<लेखकाच्या ताब डतो ब २५० वर्षे मागे जावे ह्या मागे, unless we take some immediate, non-lame steps - stopping increase of temp 2 degrees is impossible ही कळकळ आहे.>>

<<ह्यावरही सोल्युशन काढता येऊ शकते कदाचित, पण पॅरिस करारानुसार २ डिग्रीज चे लिमिट क्रॉस हो ऊ नये, ह्यासाठी कुठलेही, दुसरे सोल्युशन मिळवण्यासाठी हा वेळ पुरेसा असणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा काळ किती दशकात येणार? आपण २१०० पहाणार का? (आपण म्हणजे आपण स्वतः नव्हे.) ही प्रोबॅबिलिटी वाढवण्यासाठी (probable solution ) we should buy as much of time as possible.
हे थेरॉटिकली शक्य आहे का? आहे. त्याचे उत्तर वरच्या लेखात आहे.>>

<<हा बदल सोसायटी लेवल ला घडला तरच हे शक्य आहे. as a first step समाजातल्या सर्व स्तरांवरच्या माणसांपर्यंत ही माहिती तरी पोहोचली पाहिजे. तर बदल होण्याची शक्यता आहे.>>

@नानबा,
मी मुद्दाम तुझ्या पोस्ट्समधली काही वाक्ये इथे कॉपीपेस्ट केली आहेत. मुद्दे चर्चिले जाताना सोपं जावं म्हणून.... त्यातून मी काढलेले निष्कर्ष असे की तुझ्या/लेखकाच्या मते
१. लोकांना ग्लोबल वॉर्मिंग वगैरे माहित नाहीये अजिबातच.
(खरंच? निदान सुशिक्षित वर्गाच्या कानावरून हे मराठी वर्तमानपत्रांतून नक्की गेलेलं आहे. बाकी ज्या लोकांना रोजच्या जगण्याचे वांधे आहेत ते या गोष्टींना कधीच महत्व देणार नाहीयेत, मी त्यांना दोष देऊ शकणार नाही)

२.पुढे आणि मागे नक्की काय? हाच प्रश्न मी तुला माझ्या पोस्टमध्ये विचारला होता. की मागे जायचं म्हणजे नक्की किती आणि कसं?
तुला वैयक्तिक उत्तरे द्यायला अवघड वाटत असेल तर ती देऊ नकोस पण मी वैयक्तिक बाबी सोडूनही काही प्रश्न अगदी आकडे घालून विचारले आहेत. तुझ्या कुठल्याही पोस्टमध्ये त्यातल्या एकाही मुद्याचं स्पष्टीकरण मला दिसलेलं नाही. माबुदो म्हणून मला परत सांगशील का?

३. लेखकाची कळकळ ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालणं आवश्यक आहे ही आहे आणि त्याचं थिअरेटिकल उत्तर या लेखात शोधण्याचा प्रयत्न आहे. ते व्यवहार्य नसलं तरी हितावह आहे.
मग जर सैद्धांतिक शोध असेल तर परत एकदा तेच, मी काही शंका उपस्थित केल्या आहेत त्याचं निरसन झालं तर मला आवडेल. आणि हितावह आणि व्यवहार्य हे नक्की कुणी आणि कसं आणि कुणासाठी ठरवायचं? हा माझा एक उपप्रश्न आहेच...

तुझ्या पोस्ट्सचा आणि त्या लेखातल्या मजकुराचा थेट संबंध किती आहे नक्की मला अंदाज येत नाहीये. किंवा तुला त्या लेखाव्यतिरिक्त आणखी काही म्हणायचे आहे का त्याचाही. तू यावर वाचन अभ्यास काम केलं आहेस म्हणतेस तर तुला काय वाटतं ते मुद्देसूद लिही की. अगदी स्पष्टच सांगायचं तर हा अत्यंत बिनडोक आणि भंपक लेख इथे डकवून नक्की काय साधलं? उलट पर्यावरणासारख्या गंभीर विषयावर विनोदनिर्मिती झाली. तुझं म्हणणं तेच असेल तर इथे मी सोडून इतरांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत त्याच्यावर चर्चा अपेक्षित आहे.

तुला वैयक्तिक अ‍ॅटॅक वगैरे वाटतो आहे, पण अगदी मला प्रामाणिकपणे सांग, की कसं वागावं याचा उपदेश/सल्ला तुम्ही दिला किंवा फॉरवर्ड केला की समोरून्/वाचकांकडून 'आधी केले मग सांगितले' आहे का हो हा प्रश्न येणे अगदीच स्वाभाविक नाही का?

वरदा, ह्यापेक्शा जास्त लिहायचे असेल तर मला नवीन लेख लिहावा लागेल.
मी जवळपास प्रत्येक गोष्टीच उत्तर यथाश क्ती दिल आहे (य्॑था वेळही).
ह्याहून अधिक टाईप करायचा ह्याक्षणी तरी खरच कन्टाळा आ लाय.
जो वि चा र तुला बिन्डोक वा टतोय तो ह्या क्षे त्रात ल्या अ नेक धुरि णाना आव श्य़ क वाटतो. (sarvaangin vichar karu shakat asalyas)

चर्चा क राय ची इ च्छा असेल त र विपू ब घ.

Mobile misbehaving. Need to spend efforts twice for each word.

अडीचशे वर्षे मागे जावे हा विचार कधीपासून पर्यावरण क्षेत्रात आवश्यक विचारांमध्ये आहे? कुठलाही तपशील वा त्याचे स्पष्टीकरण न देता? मला लिंक्स दे की... म्हणजे मी तज्ज्ञ वगैरे नसले तरी कामाच्या निमित्ताने का होईना, थोडेफार लक्ष ठेवून असते या विषयावर. निदान माझ्या ज्ञानात भर पडेल..

मी परत एकदा आणि शेवटचंच म्हणते आहे की मी तुला विचारलेले दोन ओळीतले वैयक्तिक प्रश्न सोडूनही काही प्रश्न विचारले आहेत, त्याचं दूरान्वयानेही उत्तर मला तुझ्या कुठल्या पोस्टमध्ये दिसलं नाहीये (म्हणूनच दाखव म्हणलं होतं, की मला कळलं नसेल म्हणून)...

ठीक आहे. तुला उत्तरं द्यायची नसतील तर किंवा ती दिली आहेत असे तुझे म्हणणे असेल तर असो. मीही माझ्यातर्फे लिखाण थांबवते.
धन्यवाद.

काही काही मायबोलीकरांच्या आवडत्या एक आहारत्ज्ज्ञ आंटी आहेत. त्या ' सॅलड बार मधले सगळे पदार्थ ( आधी पासून कापून ठेवलेले असल्यामुळे ) कचर्‍यात टाकण्याच्या लायकीचे असतात. रोजच्या रोज ताजी भाजी आणि ताजी फळे खरेदी करा तरच फायदा होईल' वगैरे टोकाचे आणि बहुतेक लोकांसाठी अव्यवहार्य सल्ले देत असतात.
मधुमेह, उच्च रक्तदाब, अतिरिक्त वजन हे सर्व काही एका दिवसात उद्भवणारे व्याधी नव्हेत. त्यावर उपाय सुद्धा दीर्घकाळ चालू राहतील असे हवेत.
ज्या लोकांना या आंटींची कंसल्टिंग फी परवडते अशातले किती लोक रोजच्या रोज ताजी भाजी / फळे मिळवू शकतात. ज्या शहरांमधे या आंटींचे बहुतांश गिर्‍हाइक राहतात तिथे कितीही ताजी म्हटली तरी शेतातून १-२ तरी दिवस आधी काढलेला भाजी पाला मिळत असणार. हे काय त्या आंटींना माहीत नसणार का ? पन काही तरी सनसनाटी लिहायचं म्हणजे आपल्या ब्लॉग कडे / वेबसाइट कडे लोकांचं लक्ष वेधून घेता येतं हा(च) उद्देश असला की लॉजिक वगैरे गोष्टी दुय्यम!

तसेच हे अंकल ! अडिचशे वर्षे म्हणजे १७७० धरा जवळपास. त्याकाळी बहुतेक जगभरात लोहार, सुतार, चांभार, विणकर, गवंडी, वैद्य, गवळी असे स्पेशलायझेशन होते. सर्वच जण स्वतः पुरती शेती, स्वतःची औजारे स्वतः बनवणे , वगैरे करत नव्हते. मग अडिचशे वर्षे मागे जाऊन नक्की काय साध्य होणार आहे.
पर्यावरणाचा र्‍हास कमी व्हावा, संवर्धन व्हावं , त्याबाबत समाजात जागरुकता वाढावी हे सगळे स्तुत्य उद्देश आहेत. पण शास्त्रीय लेख लिहायचा आव आणून शेवटी व्हॉट्सॅप वर फॉर्वर्ड होणार्‍या हळदीचे किंवा एरंडेलाचे ९६३ फायदे टाइप लेख झाला आहे हा .

या राउत अंकलकडे व्यवहार्य उपाय असतील ,सूचना असतील तर त्याचं स्वागत आहे. अन्यथा २५० वर्षे मागे जाणे म्हणजे इकडची मुलं काही मार्व्हेल शोज बघतात त्यात टाइम ट्रॅव्हेल दाखवतात त्याच धर्तीची कविकल्पना. त्यावर काय चर्चा करणार आणि काय प्रबोधन होणार

१७६८ सालात गेल्यास मला पेशव्यांसाठी सिद्धटेकी एकवीस हजार प्रदक्षिणा वगैरे घालाव्या लागतील. पोळ्या, सांबारी, कढी, तूपसाखर वगैरे रोज भोजन असेल. भोजनप्रसंगी लावलेल्या उदबत्त्यांमुळे, यज्ञामुळे प्रदूषण होईल का?

एकवीस हजार प्रदक्षिणा आणि कढीभात-भाज्या-तूपसाखर यांचं जेवण यांमुळे मसल्स डेव्हलप होतील का, याचा विचार मातेने करावा.

लेखकाला पर्यावरणाचा र्‍हासाबद्दल काळजी वाटते ती काळजी पोहोचली मात्र एकंदरीत लेख बालीश वाटला. अडीचशे वर्षे मागे जाणे हे काय ते कळले नाही. पर्यावरणस्नेही जबाबदार वर्तन हे प्रत्येकाने ठेवायला हवे, असे जबाबदार वर्तन कसे असावे याचे सोप्या भाषेत शिक्षण सर्वांनाच मिळावे, तसे वर्तन ठेवता येइल अशा व्यवस्थेचा आग्रह धरावा, सरकारने पर्यावरणस्नेही पॉलीसीज कराव्यात, कायदे करावेत म्हणून आग्रह धरावा , पण हे नुसते मागे जाणे कशासाठी? पर्यावरण स्नेही जगणे, झालेल्या चुका सुधारणे आणि नव्या चुका टाळणे म्हणजे पुढे जाणे. अडीचशे वर्ष मागे जाणे म्हणजे लगेच पर्यावरण स्नेही? कायच्या काय!

नानबा,
तुझीही कळकळ समजते पण लेख खरेच बालीश आहे. मी काही तज्ञ नाही. पण
करोडो वर्षे व कृषियुगात हजारो वर्षे पैसा लागला नाही. तेव्हा माणुस जगत नव्हता काय?

हे वाचून हसूच आले. बार्टरिंग सिस्टिम ही होतीच ना. छापलेल्या नोटा नव्हत्या पण धनाच्या इतर संकल्पना होत्याच. उदा. जमीन, गोधन, इतर पशूधन आणि त्यापासूनची उत्पादने, धान्य, मौल्यवान धातू, रत्ने वगैरे. दारिद्र्य-अभाव असणे हे तेव्हाही होतेच. अगदी टोळ्यांनी रहाणारे लोकं देखील देवाण-घेवाण करतच होते. तुमच्याकडे देण्यासारखे काहीतरी असेल तर ते देवून तुम्ही गरजेचे दुसरे काही घेणार. नाहीतर अभाव - म्हणजे दारिद्र्य. महाभारतात सतत गोधनाचा उल्लेख येत रहातो. दान म्हणून गोधन, युद्धात गोधन पळवणे, दूधाची चव माहित नसलेला अश्वथामा आणि दृपदाकडे गाय मागणारे द्रोणाचार्य. तेव्हा धन हे या ना त्या स्वरुपात पूर्वीही होते आणि ते देवाणघेवाणीसाठी वापरलेही गेले.

अडीचशे वर्षांपूर्वी भारतात चुलीवर स्वयंपाक चाले. सतत धुराचे प्रदुषण . तसे आता हवे का?

मला इथे चिडकू आणि arc यांनी लिहिलेल्या पोस्ट आवडल्या. त्यात समस्या आणि त्यावरचे उपाय याबद्दल लिहिले आहे. तू शेअर केलेल्या लेखात तसे काही नाही. कळकळ वाटते तर समंजसपणे उपाय सुचवावेत, सामान्यांना वर्तनात बदल कसा करावा यासाठी मार्गदर्शनपर लिहावे/ कार्यशाळा कशी घ्यावी ते सुचवावे, र्‍हास रोखण्यासाठी तक्रार कशी करावी, दाद कुठे मागावी, माहितीचा अधिकार वापरुन योग्य माहिती कशी मिळवावी, लोकशाही मार्गाने योग्य पॉलिसी तयार होण्यासाठी काय पाउले उचलावीत, यशस्वी संघटन कसे करावे वगैरे माहिती द्या. बालीश विधाने करुन अडीचशे वर्ष मागे जा सांगणे , यातून काय साध्य होणार? 'मागे जा' या विधानात नकारात्मकता आहे. लोकसहभातून चांगला बदल घडवायचा तर सकारात्मकता हवी. नुसती भीती नको तर मात करायचा आशावाद हवा. चांगले आयुष्य सगळ्यांनाच हवे आहे. पर्यावरणाचा र्‍हास टाळत ते कसे मिळवायचे हे सातत्याने शिकणे, शिकवत रहाणे, नवे उपाय शोधणे/ ते लोकांपर्यंत पोहोचवणे हे आपल्या हातात आहे.

मेधा, स्वा ती२, चिडकू पोस्ट आवडल्या.
विपूही केली आहे.
मेधा हे एकदम होणार नाही हे मी वर एका पोस्ट मधे लिहिले आहे.

There are people like Gole sir who have given good amount of thought on ecological economics. Ecological society has a really good view about this.

स्वाआती २, how do u manage to have such good calm, logical replies which understand all sides, including human angle? Its really admirable and inspirational everytime.
Btw, my origional plan is to publish various articles on topic of ecology/env - mine/others, not just the ones that are alarming, but also guiding. Something that readers should pondr on. I didnt give that in intro because i dont have luxury of committing on my time upfront.
But something is already getting discussed and if i get permissions - on its way soon.

Pages