बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

by प्राजक्ता
>>>>

तुझ्या मताशी पुर्ण सहमत...
एकतर अस वागायच वर मी लक्षात ठेवेण वगैरे म्हणायच.... तिच उत्तर मस्त होत त्यावर..
"हो मला वाटत तु हे लक्षात ठेवायलाच हव"... असच काहीतरी म्हणाली ती...

स्मिता तशी शांतपणे बोलली. एखादीने लगेच प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून लाथ मारली असती. पण तीने त्याच्या पायावर पाय ठेवले.
हे सगळ झाल्यावर सु सई-मेघाकडे बघून म्हणतो, 'याला म्हणतात टायमींग चुकणे'

"हो मला वाटत तु हे लक्षात ठेवायलाच हव"... असच काहीतरी म्हणाली ती...>>>हो. पुढे ...मला आवडेल तू लाक्षात ठेवले तर असे म्हणाली.

आज मेघा सगळ्यांवर आणि विशेषतः सई, पुष्कर आणि आउंवर चिडली होती. कारण सगळे जण मिळून ती खूप बडबडते यावरून तिची खेचत होते. फार वाईट वाटलं मेघाचं. अशा बंदिस्त घरात आपले म्हणवणारे मित्र मैत्रीण देखिल दुसर्‍या टीम बरोबर आपली खेचत आहेत ही जाणीव दुखावणारी ठरणारच. बिचारी बाथरूममध्ये जाऊन खूप रडली.

सईचं काही सध्या कळतंच नाहीये. ती काहीही आणि कशीही वागतेय. जरा कोणी (खरी असो वा खोटी) आपुलकी दाखवली की लगेच खरी मानून बसते आणि तिचा फोकस ढळतो. मेघा तिला किती परोपरीनं समजवायचा प्रयत्न करतेय पण ही ऐकायलाच तयार नसते. असा का बावळटपणा करायला लागलीये?

आज पुष्की मात्र मेघाला फुल्ल आणि अ‍ॅक्टिव सपोर्ट करत होता. कॅप्टन्सीच्या खेळात सईनं च आधी काड्या करायला सुरुवात केली. खरंतर यावेळी पहिल्यांदा मेघाकडे जास्त समर्थक होते पण तरीही या लोकांनी नीट स्ट्रॅटेजी आखलीच नाही.

लसूण खाऊन यायची भूषणची आयडिया मस्त होती. पण ती आउ लगेच त्यानिमित्ताने कार्याबाहेर जाऊन बसल्या. अजिबात स्पोर्टिंग स्पिरिट नाहीये आउला. इथे बघावं तेव्हा सगळ्यांचा मेघाभोवती गराडा होता. अरे, तुम्ही जास्त जण आहात तर दोन्ही ठिकाणी नीट विभागून रहा आणि एकाच वेळी मेघाचं रक्षण करा आणि सुशांतला जेरीस आणा की. डोकी वापरा लेकानो.

सईची सिगारेट फुकून दाखवण्याची आयडिया झक्कास होती. त्यामुळे सुशांत इरिटेट होतोय हे पाहिल्यावर त्याच्या समर्थकांना हुडुत करून तसंच ते पुढे रेटत राहिली असती तर सुशांत चिडून उतरलाच असता. पण समर्थकांनी हरकत घेतली आणि ती कल्पना ढुस्स झाली.

आज स्मितासाठी एजोटाझापा!!!! आज ताई एकदाच्या लाईनीवर आल्या. आता मेघाच्याच पार्टीत रहा म्हणावं.

त्यागराज खाडीलकर गायक आहे ना? तो आला, तो बेसूर गायला आणि गाणंही विसरला. आणि जरा जवां मर्द, डोळ्यांसाठी सुखदायक असे पुरुष सदस्य पाठवा ना बिग बॉस. एक पुष्की किती नजरा सांभाळणार! बाकी नर्मदेतले गोटे आम्ही सहन करतच आहोत (ते घराबाहेर गेले तर बरं)

सुशांत आता अतिच मूर्ख चिडचिड आणि बकबक करतोय. त्याला परत पाठवा. तो महाराष्ट्राचा राजा आहे हे माहित नव्हतं मला.

आज बाकी फार काही हॅपनिंग नव्हतं. जरा डोकेबाज खेळ आयोजित करा हो बिग बॉस!

पण कोण जिंकले टास्क?
एखाद्याला उचकवून वैतागून जागेवरून हलायला लावणे हे त्या पहिल्या खुर्चीवाल्या टास्क सारखेच झाले की. खेळण्यांच्या टास्क मधे पण तसेच होते, अशा रिपिटेटिव्ह गोष्टी का करतायत हे लोक?

सई सध्या बिथरलीय..... तिच काय बिनसलय काही कळतच नाहीये
मला वाटतय सई आणि मेघातला इमोशनल बॉन्ड खूपच स्ट्रॉन्ग झालाय.... त्यामुळे त्या एकमेकींकडून सहज दुखावल्या जातायत!
मेघा चांगलच खेळतीय आणि तिला कुठली गोष्ट किती ताणायची कळतय बहुदा!
शरा आजतरी बरी वाटली
स्मितापण पहील्यांदाच चांगली वाटली.... हा ग्रूप तिला जास्त सूट होतोय
जुई फक्त सईच्या विरोधात बोलणे या एकाच कारणासाठी तोंड उघडताना दिसते
पुष्कर गेले काही एपिसोड उतरला होता मनातून.... आज जरा बरा वाटला परत..... टास्क चांगला खेळतो तो!

ती चौकट धक्का देऊन जेव्हा रेशम आणि अस्तादनं पाडली तेव्हा मेघाच्या पाठीला दुखापत होऊ शकली असती. बिनडोक पणाचा कळस होता तो.

केबल बंद बरेच तास त्यामुळे शेवटी फक्त अर्धा तास बघायला मिळालं. आगाऊ आस्ताद चा आगाऊपणा मस्त उलटला, आपुन बहोत खुश. बिग बॉस ने मस्त चपराक लगावली आस्ताद, रेशम, भूषणला. मेघाला कॅप्टन करणे हा योग्य डिसिजन.

सई, भूषण डोक्यात जायला लागलेत.

प्राजक्ता पोस्ट मस्त तुझी, अगदी योग्य.

स्मिता बिचारी कशाचाच इश्यू करत नाही, तिचा बाप काढा नाहीतर वाटेल तसं वागा. स्वभाव तसा गरीब दिसतोय मुळात. म मां च्या समोर तरी बोलायला हवं तिने.

ती चौकट धक्का देऊन जेव्हा रेशम आणि अस्तादनं पाडली तेव्हा मेघाच्या पाठीला दुखापत होऊ शकली असती. बिनडोक पणाचा कळस होता तो. >>> अगदी अगदी मामी.

अरे काय हे , त्यागराज म्हणजे खात्या बिग बॉसमधे ???
गायकच हवा होता तर जसराज जोशीला बोलवायचे,थत्त्यां प्रमाणेच युनिक ड्रेसिंग सेन्स आणि गाणीही नव्या जनरेशनला आवडतील अशी असतात त्याची.
बाकी अमितवा संस्कृति रक्षणाशी का सबंध जोडतोय ?
मी किंवा इतर अनेक कंप्लिट नास्तिक / संस्कृति परंपरांशी सबंध नसलेल्यांनाही या गोष्टी ऑड वाटु शकतात.
असो, उलट आपल्या प्राचीन परंपरा /संस्कृति पहाता हे सगळं चालयचच त्यात , त्यामुळे उलट ते आवडण्याला संस्कृति रक्षण म्हणता येईल Proud

झुंज मराठमोळी मध्ये मेघा अजिबात आवडली नव्हती, अतिशय भांडखोर वाटलेली. इथेही तेच सुरुवातीला होतं पण आता हळूहळू एकंदर मेघाचे गुण जास्त दिसतायेत, जिद्द, लढाऊ वृत्ती. त्यामुळे रिस्पेक्ट निर्माण व्हायला लागलाय. भले तो तिच्या गेम चा भाग असेल पण रेशमपेक्षा कितीतरी उजवी वाटतेय ती.

आधीचे काही बघितलं, सई टास्कमध्ये सुशांतला सिगरेट फुकण्याची acting करत चिडवत होती, तेव्हा म्हणे महाराष्ट्रात माझी प्रतिमा आहे एक. अरे तू तिकडे फुकत असतोस त्या smoking room मध्ये तेव्हा पूर्ण जग तुझी प्रतिमा बघत असतं रे, तू स्मिताशी परवा जे वागलास तेही महाराष्ट्रचं कशाला जगाने बघितलं की. Big joke.

मग माफी मागत बसला सई ची.

सई आज जाम म्हणजे जाम आवडली. त्या मेघाला अजिबात भाव देऊ नये. कटकटी आहे ती. सई इतकं करत्येय तरी एक्स्पर्ट ओपिनियन सांडत बसायचे तोंडातून. हसं करून घेते आहे मेघा.
शर्मिष्ठा पण आवडली. पुष्की, सई, शर्मिष्ठा आणि स्मिता आणि राहतील तितका वेळ आऊ असा ग्रुप बनला तर मजा येईल.
आस्ताद आणि शेलार टोटल डोक्यात गेले आज. आस्ताद इतका attitude कशाला फेकत होता कोण जाणे. रेशमने ती फ्रेम का म्हणून पाडली? सई च्या युक्त्या सही होत्या.
जुईला हाकला.

सईने फुकायची सुरवात केल्यावर आस्ताद रेशमला मिरच्या झोंबल्या, शेवटी एकाच माळेचे मणी. अखिल भारतीय रड्या संघटनेचा अध्यक्ष सुशांत सगळ्यांना बाहेर भेट बघतो ही धमकी देत फिरतोय,हा रड्या नक्की काय करणार याचं कुतूहल लागून राहिलंय. याच्या लग्नाच्या दिवशी बायकोपेक्षा हाच जास्त रडला असण्याची दाट शक्यता आहे. स्मिता नक्की मेघाच्या ग्रुपमध्ये आले की ह्या रड्यामुळे मेघाला सपोर्ट केला????

स्मिताने खरंच थोडा विचार करावा, त्या आडदांड शक्तीवाल्या लोकांबरोबर राहण्यापेक्षा मेघा grpकडे यावं. तो grp इतका आगाऊ, अतिशहाणा आणि स्वतः च्या हाताने स्वतः च्या पायावर धोंडा पाडून घेणारा आहे. स्मिताला डंब म्हणता म्हणता ह्या आगाऊ लोकांचा अतिशहाणपणा त्यांना तोंडघशी पाडतो. मजा आ गया कल लास्ट सीनको. असले झोडले bb ने की तोंडघशी पडले अतिशहाणे एका वाक्यात. जबरदस्त पचका पहिला आस्तादचा कारण त्याची स्वतःची ट्रीक होती ती आणि समर्थन देऊन करायला जाणारे रेशम आणि कडू हे अजून दोन जण.

ऋतुजा कधी परत येणार! येणार हे नक्की कारण सगळ्या बाहेर पडलेल्यांच्या टिव्हीवर मुलाखती झाल्या. अजूनपर्यंत ऋतुजाची झाली नाही.

जबरदस्त पचका पहिला आस्तादचा कारण त्याची स्वतःची ट्रीक होती ती आणि समर्थन देऊन करायला जाणारे रेशम आणि कडू हे अजून दोन जण.>>>> तरीही जेव्हा बिबाॕ बुद्धिबळ,क्रिकेटचे उदाहरण देत होते तेव्हा रे चे एक्सप्रेशन 'अय्या असे कधी झाले ?' बरं झालं बिबाॕ तिघांचे नावे घेऊन बोलले.

मामीला अनुमोदन.
पहिल्यांदाच मेघाच्या टिम मधे इतके पब्लिक असून एकटी सई सोडता टास्कच्या नावाने आनंदी आनंद चालु होता मेघा सपोर्टर्सचा !
शर्मिष्ठा साथ देत होती पण अजुन मुरलेली नाहीये.
पुष्की थोडं फार अ‍ॅग्रेशन सोडून फार काही नाही , नशीब सुशान्तला बायकांना धमकी देण्यावरून बोलला.
सईची ट्रिक भारी होती सुशान्तला अनॉय करायची, तिने ते सिगारेट फुकायची अ‍ॅक्टींग चालु ठेवली असती तर तल्लफ येऊन उतरला असता फुक्या सुशान्त !
सईने उगीच गिव्हप केले आणि उगीच माफही केले त्या पालथा घडा सुशान्त आणि अस्तादला.
आउ असून नसल्यासारख्या नेहेमीप्रमाणे, टास्क मधे काहीच उपयोग नाही त्यांचा.
अस्ताद नुसता स्मोकिंग रुम मधून तरी ओरडतो नाही तर लाथा बुक्क्यांच्या भाषा करतो, अतिशय व्हॉयलेन्ट आणि असभ्य !
मेघाला धक्के मारत होता तो आणि भुषण पण चूक मेघा टिमची होती, कोणी जागेवरच नव्हतं, मग करणारच राडा हे लोक.
बाकी त्यागराज ची एंट्री अशक्य हस्यास्पद , काय तो अवतार आणि बेसुर गाणं, हे बिग बॉसचं घर एक लोणावळ्याच रिसॉर्ट झालय, कोणीही कधीही येऊन विसावा घेऊन जातं !
बाकी सई - मेघा दोघींनी आपण एकमेकींच्या बहिणी किंवा नवरा - बायको नाही, बिग बॉस घरातल्या मैत्रीणी आहोत लक्षात घेऊन फार पझेसिव न होता रुसवे फुगवे बन्द केले पाहिजेत, समोरच्या पालथ्या घड्यांना हवीच आहेत यांची भांडणं !
सुशान्तच्या असभ्य वागण्याचा आणि धमक्यांमुळे म.मां शाळा घेणार का पहायला हवं !

बादवे, कॕप्टनच्या नावाची घोषणा होण्याआधीच्या ब्रेकमध्ये बिबाॕ ' काही लोकांच्या एका चुकीची शिक्षा संपूर्ण घराला भोगावी लागेल' अशाप्रकारचे काही म्हणाले होते का? कारण ब्रेकला जाण्याआधी मला तसे ऐकू आले पण ब्रेकनंतर बिबाॕ तसे काही बोलले नाहीत.

मेघा उगाच चिडली आज! काहीही इतक झाल नव्हत चिडण्याइतक, खरच डिजे म्हणते तस या दोघीमधले रसवे फुगवे त्यानी बन्द केले पाहिजेत. सुशान्तला खरच कानउघाडणीची गरज आहे काहीही बोलतो, इतक चिप आणि खालच्या दर्ज्याच होत ते, सतत मुलिवर अरेरावीची भाषा... ममानी खरच झापायला पाहिजे दोघाना.

>>सई - मेघा दोघींनी आपण एकमेकींच्या बहिणी किंवा नवरा - बायको नाही, बिग बॉस घरातल्या मैत्रीणी आहोत लक्षात घेऊन फार पझेसिव न होता रुसवे फुगवे बन्द केले पाहिजेत,

एक्झॅटली!

.

Pages