Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

"शर्मिष्ठा राऊत"

'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुशांत एकदम mannerless आहे.
सुशांत एकदम mannerless आहे. स्मिताशी त्याचं वागणे अतिशय disgusting होतं, तिने त्याला पाय मारणे हा बरोबर प्रतिकार होता आणि तिने जे उत्तर दिलं ते योग्य होतं.
रेशम mam आणि इतर जेन्ट्सनी सुशांतच्या हो त हो करून कोणीही सांगितलं नाही की हे चूक आहे, त्यात पुष्कर पण होता ह्याचं मला जास्त वाईट वाटतं. मेघा mam समजवायच्या ऐवजी आगीत तेल ओततील असं सर्व जेन्ट्स म्हणत होते. अतिशय चुकीची गोष्ट आहे. बिग बॉस आणि म मां नी दाखल घ्यायला हवीय.
सुशांतच्या या वागण्याचा
सुशांतच्या या वागण्याचा निषेध करणारे खूप सारे प्रतिसाद सोशल मीडीयावर आले तर नक्कीच ममा सुशांतला फटकारतील.
स्वतः चुकीचं वागून परत
स्वतः चुकीचं वागून परत सुशांतने धमकी देणे स्मिताला हे अति अयोग्य, गिरे तो भी टांग उपर असते नेहेमीच त्याची. स्मिताने बिग बॉस ना सांगायला हवं होतं.
स्मिताने bb ला नाही सांगितलं
स्मिताने bb ला नाही सांगितलं तरी bb चं घर आहेना मग त्यांनी चुकीच्या वागण्याला समज द्यायला नको का.
स्मिता बरोबर म्हणाली की उद्या
स्मिता बरोबर म्हणाली की उद्या कुणाचा पदर ओढशील. ती असंही म्हणाली की, आम्ही कसे कपडे घालतो त्यावरुन आम्हाला सगळं चालतं असा समज करुन घेणं बरोबर नाही. आणि रेशमला पण स्मिताची बाजु पटलेली वाटली पण सुशांतला दुर करणे परवडणार नाही तिला आता म्हणुन ती काही बोलली नाही. सुशांत तिच्या विरुद्द गेला तर मग बाकीची पिलावळ काही कामाची नाही हे माहितेय तिला.
अरे बाप रे इथवर झाली होय
अरे बाप रे इथवर झाली होय बोलाचाली! देखना पडेगा. सुशांत ला बिदा करण्याची वेळ आली वाटते एकूण. गुलाबी टॉवेल आणा.
काय माहिती सुशांतनेच धमकी
काय माहिती सुशांतनेच धमकी दिली तिला, तिने पाय लावल्यावर, हे लक्षात ठेवेन. तिलाच बाहेर काढतील नाहीतर nominate करून. ती शांत राहते म्हणून फावते, दुसऱ्या कोणी घर डोक्यावर घेतलं असते.
स्मिताऐवजी ऋतुजा असती तर मस्त
स्मिताऐवजी ऋतुजा असती तर मस्त तिने सरळ केलं असते सुशांतला.
शरा पण कसली ओव्हर ऍकटिंग
शरा पण कसली ओव्हर ऍकटिंग करतीये, काय तर म्हणे मी सगळे सिजन फॉलो केलेत >>>
. मी इतकी हसत होतेना म्हणे बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनपासून माझी यायची इच्छा होती.
अग्ग बाई, हा पहिलाच आहे असं मी म्हणाले.
हखाला माहित नव्हते का ती २
हखाला माहित नव्हते का ती २ आठव्ड्यांची पाहुणी आहे ते?! सारखे चालू होते "आपल्या दोघींना फायनल ला उभं रहायचंय" वगैरे. येडचाप कुठली.
हखाला माहित नव्हते का ती २
हखाला माहित नव्हते का ती २ आठव्ड्यांची पाहुणी आहे ते?! सारखे चालू होते "आपल्या दोघींना फायनल ला उभं रहायचंय" वगैरे. येडचाप कुठली. >> येडचाप म्हण्जे तिचा पोपट केला चॅनलने. ती हवी तशी वागत नाही, मेघा टीमला सपोर्ट करत नाही, पब्लिक शिव्या घालतं म्हटल्यावर पाहुणी करुन टाकली.
माहिती होतं तिला. पण ते
माहिती होतं तिला. पण ते गुप्त ठेवायचं असणार.
रेशमची मैत्रीण म्हणून कानउघाडणी करणे आणि राजेशला हाकलवून देणे यासाठी आणले होतं बहुतेक
काही अर्थच उरत नाहे हखाच्या
काही अर्थच उरत नाहे हखाच्या येण्याला मग. तसेही ममां शिव्या घालणारच होता वीकेन्ड ला आणि एलिमिनेशन करणार होते राजेश चं तर तिला गाजावाजा करून आणले कशाला ? डझ नॉट मेक सेन्स अॅट ऑल!!
त्या म मां चं कुठे चालायचं
त्या म मां चं कुठे चालायचं जास्त त्या दोघांसमोर, ती महेश महेश करत गुंडाळून ठेवायची
पब्लिक ह्यावरून पण बोंबाबोंब करत होतं सोशल मिडीयावर आणि आरोप झाले ना सर्व मग जागे झाले bb, हर्षदा ला पुढे पाठवून वातावरणनिर्मिती केल्याने म मां ना चेव आणि आवेश आला.
https://divyamarathi.bhaskar
https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-IFTM-biggbossmarathi-ratnak...
रत्नाकर तारदाळकर यांचा आवाज, ते पण दूरदर्शनवालेच. ओळखीचा होता पूर्वी त्यांचा आवाज पण यावेळी नाही लक्षात आले नाव. मधेच प्रदीप भिडे आहेत का वाटायचं.
I thought Big boss voice is
I thought Big boss voice is Ajit Bhure.
मी विकडे एपिसोड बघतच नाही,
मी विकडे एपिसोड बघतच नाही, फक्त मामी च्या पोस्त वाचतो.
मग डायरेक्ट वीकएंड चा डाव बघतो ☺️
मामी भारी मांडलय..... आपण
मामी छान मांडलय..... आपण भारी आहोत या खुशीत हिरव्या वाटीतील पांढरा पातळ पदार्थ भुरकत राहिला. Hahahaha
मामी>>
मामी>>
सुशांतची बाजू घेत नाही, पण सगळे बसले होते तेव्हा नक्की काय झालं हेच समजलं नाही. सुशांत जेव्हा चिडून (?!) मी लक्शात ठेवीन म्हणाला तेव्हाच कॅमेरा ने क्लोज अप घेतला. मुळात स्मिता चिडली, रडली, हसली, काही केलं तरी चेहऱयावर एकच एक्सप्रेशन असतात , त्यामुळे कळलंच नाही तेव्हा नक्की काय झालं !
नंतर जेव्हा मेघा तिच्या कडे येऊन बसली, तेव्हा स्मिताने पूर्ण प्रसंग सांगितला तेव्हा कळलं काय झालं होतं. मेघाचं म्हणणं पटलं की त्याने माफी मागायला हवी होती. मेघा आपल्या जुन्या मित्राला डिफेंड करत होती की स्मि ला आपल्या ग्रुपमधे ओढायचा प्रयत्न करत होती हे कळलं नाही. पण भलतीच स्मार्ट आहे. हा खेळ तिच्या इतका कोणाला समजलाय असं वाटत नाही !
मग सर्वज्ञानी अस्ताद यांनी
मग सर्वज्ञानी अस्ताद यांनी कॉन्फिडन्टली सुमीत राघवनच येत आहे अशी गर्जना केली आणि आपण कित्ती भारी या विचारानं त्याच्या मनात पुन्हा एक लोळणफुगडी घेतली.>> मी प्रचंड हसले . मस्त रिव्हू लिहिलाय तुम्ही मामी
मामी, बेस्ट!
मामी, बेस्ट!
मामी २३:३१ ची पुर्ण पोस्ट
मामी २३:३१ ची पुर्ण पोस्ट
मामी भारी पोस्ट! हखा सारख एस
मामी भारी पोस्ट! हखा सारख एस.आर ने निदान आपण काय भारी अशी एन्ट्री तरी नाही मारली, रेशम म्हटली भुषण ला की माझा मराठी इन्डस्ट्रिशी आणी मराठी सिरियलशी काही सबध येत नाही तेव्हा मी पडायची बाकी होते , मी काय हिन्दी सुपरस्टार आहे की काय? का तेलगु-तमिळ?
सईला मेघाचा मुद्दा समजत होता पण बहुधा तिला आपण मेघाच्या इन्फ्ल्युन्स खाली खेळतो हे कुणीही म्हणू शकत ते नको असाव.मेघा इतकी सई चालबाज नाहिये,
पुश्कर चा आज रागच आला स्मिताच्या मुद्द्यावरुन त्याने सुशान्त ला एक्वायच सोडुन मेघालाच दोष देत बसला.
ह.खा बद्दल माझही प्रेडिक्शन
ह.खा बद्दल माझ प्रेडिक्शन कर्रेक्ट
शर्मिष्ठा आत्ता तरी मेघा सईकडे आलेली दिसत आहे, तिचं स्क्रीन प्रेझेन्स मला अजिबात आवडत नाही पण एंट्री मधली पैठणी काय झळाळत होती !
सुशान्तचा मुद्दा स्मिताने बोलायला हवाय वीकेंडच्या वारी, अत्यंत असभ्य आणि गुंडगिरी करतोय, व्हिलनची जागा खाली झालेली भरून काढतोय !
मला खरं सांगायचं तर सईने भुषणच्या ब्लँकेटमधे जाणे वर वर फनी दिसत असल तरी तेही अयोग्य वाटले, हेच पुरुष सदस्यानी स्त्रीच्या ब्लँकेटमधे जाऊन केलं असतं तर ?
पण बहुदा त्या भुषणला घरात माकड/खेळणं असल्याचा दर्जा मिळतो , कोणीही येऊन पप्पी घेऊन जाते त्याची !
बाकी पुष्कीने गद्दारी करु नये.. डबल ढोलकी टायटल लवकरच त्याच्याकडे जाईल नाहीतर.. सुशान्तला सपोर्ट करण्याची
घोडचूक तर नाहीच करु त्याने.. स्मिताच्या बाबतीत तर मुळीच सुशान्तची बाजु घेऊ नये!
मुख्य म्हणजे स्मिताने अता तरी गेम मधे सरव्हाइव्ह करायला आणि कॉन्फिडन्स येण्यासाठी लवकरात लवकर मेघा सई शर्मिष्ठाला सपोर्ट करावे.
बघुया काय होतय, वीकेंडच्या डावात म्हणे म.मा फसवा एलिमिनेशन डाव मांडणारेत , ते उगीच सांगणारेत मेघा सईला कि त्या बॉटम २ मधे आहेत आणि मग कस फसवल, या आठवड्यात व्होटींगच झालं नाही असं सांगणार !
ख.खो बिगबॉस जाणे, पण हा व्हिडीओ सांगतोय हे.
https://youtu.be/00_2bkIBiJA
पुष्कर हि त्या दुसर्या गृपची
पुष्कर हि त्या दुसर्या गृपची रि ओडुन मेघाबद्दल उगाच गैरसमज करुन बसलाय अन मग तिच्याबाबतीत तिकडे त्यांच्याबरोबर मम म्हणत असतो.
पाण्याच्या गेमच्या वेळी ऋतुजा हि काहि वेळ त्या सुशांत पासुन लांब रहात होती कारण स्मिताचच होतं तेव्हाहि.. हा खरंतर लवकर निघावा बाहेर..
हो मलाहि त्या भुषणबरोबर सई मस्करी करत होती ती नाहि आवडली.. ते लोकं एकत्र असताना हा कमी नसतो तिला बोलण्यात..
नविन सदस्याचे नाव add करा
नविन सदस्याचे नाव add करा वरील लिस्ट मध्ये ..
सुशान्तचा मुद्दा स्मिताने
सुशान्तचा मुद्दा स्मिताने बोलायला हवाय वीकेंडच्या वारी, अत्यंत असभ्य आणि गुंडगिरी करतोय, व्हिलनची जागा खाली झालेली भरून काढतोय !>> + १००
सुशांत लवकरच राजेश पेक्षा जास्त शिव्या कमवून बाहेर जाणार !! राजेश याच्या इतका चीप , हलकट वाटत नव्हता नक्कीच. सुशांत नी स्वतःच्या चीप वागण्याने या शो मधे सध्या मोस्ट हेटेड मॅन चा किताब कमवला आहे. त्यामुळे अता जुई आणि रेशम सेफ होऊन नक्कीच हा बाहेर जाईल पुढच्या वेळी.
सुशांत लवकरच राजेश पेक्षा
सुशांत लवकरच राजेश पेक्षा जास्त शिव्या कमवून बाहेर जाणार !! राजेश याच्या इतका चीप , हलकट वाटत नव्हता नक्कीच. >>>. हो ना, जायलाच हवा तो बाहेर, खरेतर बिबॉने स्वतः लगेचच हकलायला हवे होते त्याला कारण हे दुसर्यांदा घडले
स्त्रियांशी कसे वागवे ह्याचे काहीतरी भान असायला हवे त्याला
एक धावता आढावा:
एक धावता आढावा:
she has peculiar likable and warm feeling with her presence, overall body language, and communciation. Comes across as very homely and humble. Never seen/hardly seen her in any arrogant or destructive mood. And always seen addressing others with respect. Great qualities, and maintaining them in such high stress and competitive environment.
कालचा भाग बघितला... सुशांत ने त्याच्या तपास्कार्याची बाजू चांगलीच मांडली. आपण बाहेरून सर्व बघत सल्यामूळे आपल्याला सगळे सोपे व तार्किक वाटत होते. पण सद्स्यांना खून नक्की कसे होणारेत याची काहीच कल्पना नसताना त्या पर्श्वभूमीवर सुशांत बर्यापैकी तपास करण्यात यशस्वी झाला असे म्हणता येईल. फक्त पुरावे सादर करू शकला नाही.
स्मिता ने मात्र बर्यापैकी त्याची री ओढली.. असो. तरिही ग्वाड वाटते.
पांढर्या ड्रेस मध्ये रेशम मॅडम अतीशय सुंदर दिसत होत्या!.. एरवी अगदीच तोंड फुगवून ही का बसते? her smile is very infectious.. she could make great use of the same.. somehow she continues/prefers to stay in her space which creates wall between herself and others. हखा म्हणली खरी रेशम सर्वांना दिसू देत.. I am sure she has better side to her personality which hasn't yet come out in full display.
भूषण कडे पाहिले की टिपीकल नाक्यावर कायम मजा मस्करी व नुसता टी पी करणारी काही नेहेमीची दोस्त मंडळी असतात त्यांची आठवण येते. these type of people don't hold any special importance or influence but somehow become enjoyable part of your life.
बाकी जसे दिवस जात आहेत तसे आऊ स्ट्राँग स्पर्धक वाटत आहे.. कुठे काय व नेमके बोलावे (थत्ते च्या विषयी चा अपवाद वगळता) हे वय व अनुभवाने कळले असल्याने त्या बाबतीत त्यांना कुणीच कात्रीत पकडू शकत नाहीत. आणि दुसरे म्हणजे त्या कुणालाच डायरेक्ट थ्रेट नसल्याने एकंदरीत त्यांच्यावर सध्या तरी कुणाचा डोळा [the evil eye] दिसत नाही.
पुष्कर भाऊ हळू हळू स्वताच्या अस्तित्वा बद्दल व खेळाबद्दल चांगले जागरूक झालेले दिसत आहेत.. good for him.
आस्ताद स्वताच्या टीम शी लॉयल राहण्याचे काम ऊत्तम करतो आहे.. कुठल्याही परिस्थितीत तो पहिला टीम सदस्यांचा विचार करतो हेच दिसून येते.
या सर्वात जुई पुन्हा एकदा inconsequential ठरत आहे एक स्पर्धक म्हणून. तीचा रोल हा मेघा, सई यांच्याशी पंगे घेण्यातच मर्यादीत दिसतो.
राहिला सुशांत. पुढील काही दिवसात सुशांत नक्की काय स्टॅटर्जी व फोकस ने खेळतोय याचा ऊलगडा होईल बहुतेक..since Rajesh's departure he is looking little more deteremined. मधून मधून त्याला 'गुलाबी' झटके येत आहेत हे खरे. तो, आस्ताद, भूषण.. एकूणात बी बॉ च्या घरात बायकांपेक्षा रडके पुरूष जास्ती दिसतात.
एकूणात या वेळी वीकेंड चा डाव मस्त रंगणार असे दिसते.
रच्याकने: ह.खा., श. रा. हे असे पाहुणे अधून मधून पाठवून घरातील डायनामिक्स ला वेगळी दिशा देण्याचा बि बॉ चा विचार दिसतो. हे चांगलेच आहे. फक्त हखा ने ज्या प्रकारे सेहवाग स्टाईल नुसतीच अंदाधुंद ठोकाठोक केली वर समनाही गमावला तशी शरा करणार नाही अशी आशा करूयात. नाहीतर हे IPL होणार. दर दोन आठवड्यानी नवा प्लेयर एका विशीष्ठ टीम कडून खेळणार. त्याचे काम झाले की पुन्हा नविन दुसरा.
आनंद मोडः
हम सब (सदस्य) रंगमंच की कठपुतलीया हैं.. .. यहां कब कौन कैसे ऊठेगा कोई नही जानता... हा हा हा..!
रेशम म्हटली भुषण ला की माझा
रेशम म्हटली भुषण ला की माझा मराठी इन्डस्ट्रिशी आणी मराठी सिरियलशी काही सबध येत नाही तेव्हा मी पडायची बाकी होते , मी काय हिन्दी सुपरस्टार आहे की काय? का तेलगु-तमिळ?>>>>>> ++++100000
resham tipnis Vadalvaat madhe hoti na bahutek?
Pages