Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झी च्या नव्या मॅट्रीमोनी साईट
झी च्या नव्या मॅट्रीमोनी साईट ची अॅड मुळीच आवडली नाही. त्यातला मुलगा मान आखडल्यासारखा वाटतो.
सध्याच्या फ्लिपकार्टच्या
सध्याच्या फ्लिपकार्टच्या जाहिराती अजिबात आवडल्या नाहीत.
लहान मुलांना मोठ्यांचे रोल्स देऊन, मोठ्यांच्या आवाजातलं डबिंग करून काय साधलं ते कळत नाही.
त्यातल्या काही जाहिरातींचे संवाद मी लक्षपूर्वक ऐकले, यासाठी की त्यातून तरी किमान काहीतरी बोध होईल. पण नाहीच!
सध्याच्या फ्लिपकार्टच्या
सध्याच्या फ्लिपकार्टच्या जाहिराती अजिबात आवडल्या नाहीत.
लहान मुलांना मोठ्यांचे रोल्स देऊन, मोठ्यांच्या आवाजातलं डबिंग करून काय साधलं ते कळत नाही. Uhoh त्यातल्या काही जाहिरातींचे संवाद मी लक्षपूर्वक ऐकले, यासाठी की त्यातून तरी किमान काहीतरी बोध होईल. पण नाहीच! >>> +१११
सूलू_८२
सूलू_८२
"फोटो पाहून वस्तू कशा घेणार"
"का?? मी तुम्हाला फोटो पाहूनच पसंत केलं"
किती सुंदर करतात मुलं अभिनय.
हं काही जाहीरातींत काय बोलतात ते कळत नाही हे खरं आहे.
लहान मुलांना मोठ्यांचे रोल्स
लहान मुलांना मोठ्यांचे रोल्स देऊन, मोठ्यांच्या आवाजातलं डबिंग करून काय साधलं ते कळत नाही >>> + १०० .पण तरीही मला फार आवडतात Flipkart च्या जाहिराती .
मला आवडल्या त्या
मला आवडल्या त्या फ्लिपकार्टच्या जाहिराती.
हा त्रीवागो वाला कोण आहे? >>
हा त्रीवागो वाला कोण आहे? >> अभिनव कुमार (India Head) as per Google.
त्याला जाहिरातीत पाहणं इरिटेटिंग असलं, तरी वेबसाइट खूप छान आणि तो जाहिरातीत जे बोलतो त्याच्याशी तंतोतंत जुळणारी आहे ..
रच्याकने, त्रिवागो हा शब्द ही जाहिरात पहिल्यांदा पाहिल्यापासून कुठेतरी आधी ऐकल्यासारखा वाटत होता. काल याचा उलगडा झाला. आर डी च्या'सनम तेरी कसम ' मधल्या 'जाना ओ मेरी जाना' ह्या गाण्यात सुरुवातीचं संगीत संपतं आणि अचानक आरडी 'त्रि वा गो' असं काही तरी ओरडतात आणि मग गाणं सुरु होतं !!
पण तरीही मला फार आवडतात Flipkart च्या जाहिराती . +१
ट्रिवागोची जाहीरात बघताना
ट्रिवागोची जाहीरात बघताना जाणवले ते म्हणजे "हा कोण नॉन-मॉडेल चेहरा घेतलाय" जाहीरातीत. पण त्यामुळेच आणि ट्रिवागो या विचीत्र नावामुळे ती जाहीरात लक्षात रहायला लागली.
त्या माणसाचा आवाज आणि तो देत असलेला मेसेज इतका क्रिस्टल क्लिअर आहे (आणि सुरुवातीला त्यात कसला अॅटीट्यूडही नसायचा. ही बाब पण खूप वेगळी होती) की जेंव्हा मला हॉटेल बुकींगची गरज पडली तेंव्हा ट्रिवागो वापरून बघितलेच. (आणि त्याने त्या वेळेस फायदाही झाला होता).
ग्राहकाच्या डोक्यात प्रॉडक्ट / सर्व्हिस चे नाव कोरणे हा जाहीरातीचा उद्देश आणि माझ्यामते तो नक्कीच सफल झालाय.
flipkart च्या जाहिराती
flipkart च्या जाहिराती आवडणाऱ्यांंच्या रांगेत मी पण!!!
तसं पाहिलं तर ट्रिवागो च्या
तसं पाहिलं तर ट्रिवागो च्या जाहिरातीत काहीही गैर किम्वा अति नाही आहे. फक्त मला झी ची कोणतीही सिरियल ऑनलाईन पहात असताना ही जाहिरात लाऊडली अचानक सुरू व्हायची त्याचा त्रास व्हायचा. बस्स!
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=RIJrGzV70L4
बळंच डोळे मारतेय.... आता एकदा ती अदा फेमस झाल्यावर जबरदस्तीने करायला लावल्यासारखंच वाटतेय
मस्त आहे ही जाहिरात
https://youtu.be/enP09B7NlnU
मस्त आहे ही जाहिरात
Submitted by हजारो ख्वाईशे
Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 6 May, 2018 - 16:17 >>> खुप आवडली मलापण, मस्तच
बऱ्याच वर्षांपूर्वी
बऱ्याच वर्षांपूर्वी लंडनमध्ये होतो तेंव्हाची गोष्ट आहे. सकाळी सकाळी ऑफिसला जाताना ट्रेनमध्ये मध्येच कुठल्यातरी एका स्टेशनवर एकजण चढायचा आणि एका धर्मग्रंथाची जाहिरात करायचा. पण त्याची जाहिरात करण्याची पद्धत भयंकर होती. आपल्या चिरक्या आवाजात तो ओरडायचा,
"एक्क्युज मी सर, एक्क्युज मी म्याडम... उद्या सकाळी जेंव्हा तुम्ही जागे व्हाल तेंव्हा जर तुमच्या लक्षात आले कि तुम्ही जिवंत नाही आहात..."
अशी सुरवात केल्यावर मग पुढे तो मृत्यू या विषयवार बोलून जवळजवळ पाचेक मिनिटे त्या धर्मग्रंथाची माहिती सांगायचा. Excuse चा उच्चार तो एक्क्युज असा करायचा ते मला अजूनही लक्षात आहे. मी आधीच घरदार नातेवाईक हे सगळे सोडून तिकडे गेलेलो. इंग्लंडमधले सुरवातीचे दिवस अत्यंत एकाकी आणि उदासवाणे असायचे. त्यात आणि सकासकाळी याचे असले अभद्र डायलॉग ऐकून वीट यायचा.
एक दिवस गम्मतच झाली. याचे पहिले काही डायलॉग ऐकून झाल्यावर योगायोगाने एक स्टेशन आले हे पाहून मी पट्कन उतरून दुसऱ्या डब्यात गेलो. चला सुटका झाली म्हणून निश्वास सोडला. तोच त्याच्या पुढच्या स्टेशनवर हा त्या डब्यात हजर. तिथे पुन्हा पहिल्यापासून "एक्क्युज मी सर, एक्क्युज मी म्याडम..."
त्यानंतर मात्र मी कानाला इयरफोन लावून ऑफिसला जाऊ लागलो
मला आवडलेली जाहिरात, Barclay
मला आवडलेली जाहिरात, Barclay card contactless technology
https://www.youtube.com/watch?v=1WlRcXIO5ik
(सर्वप्रथम ही जाहिरात पहिली तेव्हा अंधेरीत मेट्रोचे काम सुरु होते, त्यामुळे घरी पोहोचायला खूप उशीर व्हायचा. त्यामुळे ही जाहिरात मनाला जास्त भावली!)
mla vodafone juju ani no one
mla vodafone juju ani no one yari ya jahirati avdtat..ajun ek ti dairy milk chi ahe na jyat te pargrahavarun aalele lok nachtana dakhavlay...
मायबोलि ओपन करताच नविन लेखन
मायबोलि ओपन करताच नविन लेखन Index बाजुला एक जाहिरात आहे, Amazon company मध्ये सुपरवायझर मुलाला वधु पाहिजे. ति for example म्हनुन दिलि आहे का ? खुप महिने बघतेय.
मी साधारण दिड वर्षापासून
मी साधारण दिड वर्षापासून बघतेय
मुलाला वधू मिळाली असेल, जाहीरात बंद करायचे विसरला असेल
mi_anu >>> actually मलाही
mi_anu >>> actually मलाही तेच वाटले होते कि साधारण दिड / एक वर्षापासून असावि पण मग कोण जुने जाणते लिखाणात खोड काढतिल वैगरे.

काल एक बिस्कीटाची जाहीरात
काल एक बिस्कीटाची जाहीरात बघितली....एक छोटा आईला काहीतरी सांगायला धावत येतो...तर आई लहान बाळाला झोपवत असते..

म्हणून ती " श्श...SS.." करुन त्याला थांबवते. तो बिचारा हिरमुसला होऊन आत जातो आणि एकटाच सोफ्यावर लोळत असतो.
बाळ झोपल्यावर आई त्याला आवडणारी चॉकलेट ची ती दोन बिस्कीटं आणते व त्याला म्हणते.. 'घे...कुठलं आवडतं ते बघ... ' त्यावर तो म्हणतो, " पर दोनो तो सेम है!".. ती त्याला जवळ घेत म्हणते.." वैसेही ...जैसे तुम दोनो मेरे लिये सेम हो! " ......
सुंदर !
हावरे इण्टेलिजिन्शिया च्या
हावरे इण्टेलिजिन्शिया च्या जाहिराती डोक्यात जातात
ती त्याला जवळ घेत म्हणते.."
ती त्याला जवळ घेत म्हणते.." वैसेही ...जैसे तुम दोनो मेरे लिये सेम हो! " ......
खरंच खूप चांगला संदेश दिला आहे!!!
" वैसेही ...जैसे तुम दोनो
" वैसेही ...जैसे तुम दोनो मेरे लिये सेम हो! " ......
खरंच खूप चांगला संदेश दिला आहे!!! >>>>> पाहिली ती जाहिरात छान आहे.
हावरे इण्टेलिजिन्शिया च्या
हावरे इण्टेलिजिन्शिया च्या जाहिराती डोक्यात जातात >>> + १
अजून एक छान जाहीरात....
अजून एक छान जाहीरात.... रात्रीची वेळ, अंधारात पत्र्याच्या शेड मधे एक कष्टकरी कुटुंब. आई पोळ्या भाजत्येय...तिचा हात निखार्यावर पोळतो आहे...ते पाहून तिचा लहान मुलगा धावत जातो व जवळच पडलेल्या तारांच्या वेटोळ्यातून तिला चिमटा करुन देतो ... पुढची पोळी चिमट्याने शेकली जाते व ती खूप प्रेमाने -पाणावलेल्या नजरेने त्याच्या कडे पहात त्याला पोळी वाढते.....कुठल्या तरी वायर्स ची जाहीरात!
(पण इतक्या सुंदर संकल्पनां मधे मूळ प्रॉडक्ट तितकासा हायलाईट होत नाही व आपण त्याचे नाव देखिल विसरुन जातो असे मला वाटते!)
ति जाहिरात Havells Wires and
ति जाहिरात Havells Wires and Cables ची आहे. https://www.youtube.com/watch?v=O1XJZsOJFqE
आणि एक आहे तमिल advt. tell of tigers. https://www.youtube.com/watch?v=qpDpAZmjImY tell of tigers.
ति जाहिरात Havells Wires and
ति जाहिरात Havells Wires and Cables ची आहे.>>> Gauri Shinde's brain child
वैसेही ...जैसे तुम दोनो मेरे
वैसेही ...जैसे तुम दोनो मेरे लिये सेम हो! " ......>>> बघितली नाहीये ही जाहिरात पण छान वाटतिये
हावरे इण्टेलिजिन्शिया च्या
हावरे इण्टेलिजिन्शिया च्या जाहिराती डोक्यात जातात >>> +१ पालक इतकेही Desperate नसतात की घर बघायला जातानाही मुलान्चा अभ्यास घेत असतील.
पी अॅन्ड जी शिक्षा ची नविन
पी अॅन्ड जी शिक्षा ची नविन जाहीरात फार आवडली.
छोट्या अप्पु ला शाळेत जायच आहे, रोज तो वडिलांच्या मागे लागतो.शाळेत जाऊया म्हणुन.पण तो जाऊ शकत नाही,किंवा वडिल त्याला नेऊ शकत नाही.पण का ?? आनि मग शेवटी काय होते.नक्की ही जाहिरात पहा.
छोटा अप्पु खुप क्युट आहे.
Pages