मैत्री भाग - 16

Submitted by ..सिद्धी.. on 25 April, 2018 - 13:11

आधीच्या भागांसाठी खाली दिलेल्या लिंकवर जा......

भाग-1
https://www.maayboli.com/node/65783

भाग-2
https://www.maayboli.com/node/65793

भाग-3
https://www.maayboli.com/node/65800

भाग - 4
https://www.maayboli.com/node/65807

भाग - 5
https://www.maayboli.com/node/65818

भाग - 6
https://www.maayboli.com/node/65825

भाग - 7
https://www.maayboli.com/node/65829

भाग - 8
https://www.maayboli.com/node/65844

भाग - 9
https://www.maayboli.com/node/65853

भाग - 10
https://www.maayboli.com/node/65859

भाग -11
https://www.maayboli.com/node/65867

भाग -12
https://www.maayboli.com/node/65871

भाग - 13
https://www.maayboli.com/node/65878

भाग - 14
https://www.maayboli.com/node/65890

भाग - 15
https://www.maayboli.com/node/65901
 ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
  मागील भागात:-
रात्री उशीरा महंतांनी तिला बोलावून घेतलं. तिने राजेशने सांगितलेली सगळी माहिती महंतांना सांगितली. महंतांनी तिला शाबासकी दिली. थोड्या वेळाने तीही निघून गेली. महंतांनी डोळे मिटून अभ्यासाला सुरूवात केली. आता काय करायचं याची योजना ते आखू लागले....
आता इथून पुढे:-
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
महंत रात्रभर अभ्यास करत होते. त्यांना आता अघोरीच्या ताकदीचा अंदाज आला होता. तसंच त्यांना इतरही अनेक गोष्टी कळल्या. त्याने आपल्या गुरूंकडून ही विद्या प्राप्त करून घेतली होती. त्यानंतर अजून मेहेनत घेऊन त्याने आपल्या शक्तींची तीव्रता वाढवायला सुरूवात केली होती. या बाबतीत तो लवकरच त्याच्या गुरूंच्या पुढे गेला होता. एक दिवशी त्याने आपल्या विद्येचा गैरवापर करायला सुरूवात केली. वाईट लोकांना मदत करून विध्वंस करण्यात त्याला मजा येऊ लागली. त्याच्या गुरूंनी त्याला रोखण्याचे लाख प्रयत्न केले. लोकांच्या मदतीसाठी दिलेल्या विद्येची काळी किनार तो लोकांना दाखवून देत होता. एके दिवशी गुरूंनी त्याचा विनाश कसा करायचा याची प्रक्रीया शोधून काढली. त्यासाठी लागणारं शस्त्रही तयार करून ठेवलं. तसंच एक मंत्रही लिहून ठेवला होता. जो कोणी तो मंत्र वाचेल त्याला गुरू दृष्टांत देवून अघोरीच्या अंताची प्रक्रीया सांगणार होते. गावाच्या प्रमुख देवीच्या मंदीरात असलेल्या जुन्या आरशाच्या मागे एका कप्प्यात ते शस्त्र आणि तो मंत्र सुरक्षित होते.तो कप्पा बर्याच वर्षांची साधना असणार्या व्यक्तीला दिसणार होता. सुदैवाने महंतांच्या पाठीशी पंचवीस वर्षांची साधना होती. त्यामुळे त्यांनी प्रयत्न करायचं ठरवलं. गुरूंचा अंत कशामुळे झाला हे महंतांना कळलं नाही. पण उद्या सकाळी उठून ते स्वतः तिथे जाणार होते. पहाटे पाच वाजता महंत आपला अभ्यास संपवून झोपायला गेले.

   दुसर्या दिवशी महंत सकाळी लवकर उठले. स्नान आटपून त्यांनी समिधाच्या बाबांना देवीच्या मंदीराचा पत्ता विचारला. रस्ता समजल्यावर ते निघाले. अर्धा तास चालल्यावर ते मंदीरात पोहोचले. नुकताच तिथला पुजारी पुजा संपवून घरी निघाला होता. महंतांनी त्याला त्या जुन्या आरशाविषयी विचारलं. तो महंतांना तळघरात घेऊन गेला. त्याला त्याविषयी काही माहित नव्हतं. मंदीरातलं सगळं जुनं सामान तळघरात ठेवलं होतं. तिथे गेल्यावर एका कोपर्यात महंतांना तो आरसा दिसला. पुजार्याचे आभार मानून त्याला त्यांनी पाठवून दिलं. त्या आरशाच्या भोवती त्यांना निळसर वलय जाणवत होतं.तो प्रकाश फक्त महंतांना दिसत होता.ती विशिष्ट व्यक्ती आपण आहोत हे त्यांना पटलं. त्यांनी आरशाच्या मागच्या लाकडी भागात शोधायला सुरूवात केली. सर्वत्र एकसारखी नक्षी होती. तितक्यात त्यांना आरशाच्या वरच्या कोपर्यात एक फट दिसली. तिथे बसवलेला लाकडाचा तुकडा इतरांच्या तुलनेत मोठा होता. तो काढल्यावर त्यातून एक जुनाट कागद बाहेर आला. त्यावर लिहीलेलं होतं ;
{जेव्हा उगवणार्या सूर्याचं पहिलं किरण आरशाच्या मध्यभागी पडेल तेव्हा तो कप्पा उघडायला सुरूवात होईल.}
आता यासाठी एक दिवस थांबावं लागणार होतं. मग महंतांनी तो आरसा हळूहळू गाभार्यात आणून ठेवला. त्याचा पृष्ठभाग साफ केला आणि येणार्या दिवसाची वाट पाहू लागले.

त्या दिवशी महंत मध्यरात्री तीन वाजता उठले. प्रातर्विधी आटपून पाच वाजताच्या सुमारास ते मंदिरात पोहोचले. पूर्व दिशेला आकाश लालसर झालं होतं. सूर्यनारायणाच्या आगमनाला सुरूवात झाली होती. महंतांनी पटकन तो आरसा देवळामागच्या मोकळ्या जागेत आणला. काहीवेळाने त्यावर सूर्यकिरणांचा वर्षाव सुरू होताच आरशात कंपन जाणवू लागली. सूर्य पूर्ण उगवल्यावर त्या कप्प्याच्या कडा चमकायला लागल्या. महंतांनी तो कप्पा उघडल्यावर त्यात एक भूर्जपत्र सापडलं आणि रत्नजडीत हत्यार सापडलं. ते एका कवचात बंद होतं. या दोन्ही वस्तू आपल्या ताब्यात घेऊन महंतांनी तो आरसा जागेवर ठेवला.
तिथेच तळघरात महंत त्या भूर्जपत्रावरील मजकूर वाचू लागले. त्यांनी त्यावर दिलेला पहिला मंत्र वाचला आणि डोळे मिटून ध्यानस्थ बसले.
दोन मिनीटांनी त्यांच्या डोळ्यासमोर एका ऋषितुल्य व्यक्तीची प्रतीकृती अवतरली. ते बोलू लागले ;

" मी या अघोरीचा गुरू . हा माझा सर्वोत्तम शिष्य होता. एकपाठी होता. त्यामुळे त्याला मी ही विद्या शिकवली. लोकांच्या कल्याणासाठी तीचा वापर कर हे मी सुरूवातीच्या दिवशीच त्याला सांगितलं होतं. माझ्याकडून त्याने तल्लख बुद्धीमत्तेमुळे इतरांपेक्षा लवकर ही विद्या शिकून घेतली आणि लवकरच तो माझ्याही पुढे गेला. मला माझा शिष्य माझ्यापेक्षा हुशार आहे यातच आनंद होता. पण एके दिवशी मी एक साधना करताना मला या गोष्टीचा सुगावा लागला की मी दिलेल्या विद्येचा दुरूपयोग करायला याने सुरूवात केलीये. तेव्हा मी त्याला आवर घालायचा प्रयत्न केला. पण ते शक्य झालं नाही. शेवटी त्याला नष्ट करण्याशिवाय कोणताही उपाय माझ्यापुढे नव्हता. तो उपाय शोधून ते शस्त्र तयार करेपर्यंत माझ्या मृत्यूची वेळ जवळ आली होती. म्हणून मी हे लिहून ठेवलं. आता मी सांगतो त्या मार्गाने जा. त्या भूर्जपत्रावरील प्रत्येक मंत्र साठी एक विशिष्ट प्रक्रीया आहे. त्या ऐकून घे..."

जवळपास तीन तास गुरू महंतांना प्रक्रीया समजावत होते. शेवटी ते म्हणाले
" त्याचा मृत्यू तुमच्याकडून होणं ही त्या सर्वशक्तीमान परमेश्वराची योजना आहे. येत्या पौर्णिमेला पहिलं चंद्रकिरण त्या शस्त्रावर पडताच त्यावरचं कवच दूर होईल. मग त्याचा मृत्यू अटळ आहे...यशस्वी हो!"
गुरूजी अंतर्धान पावले. महंतांनी डोळे उघडले. त्याना प्रसन्न वाटू लागलं. तळघरातून बाहेर येऊन ते वस्तूंसह घरी यायला निघाले.

क्रमशः

-----आदिसिद्धी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा. कल्पनाशक्तीला दादच द्यायला हवी!

खूपच आवडलाय हा भाग!!!!! 10 पैकी 10 गुण देईन मी या भागाला...

आरसा, शस्त्र, ... वाह भारीच! उत्कृष्ट लिहिते आहेस तू!!

पुलेशु! पुढील भागाच्या प्रतिक्षेत. Happy

थॅक्स द्वादशांगुला...खरं तर मी विसरलेले ...मगाशी जेवताना आठवलं आजचं टाईप करायचं राहिलय....आत्ता अर्ध्या तासात टाईप केलय आणि पोस्टलय...पुन्हा चेक पण केलं नाहीये ...आता बघते काही चुका असतील तर करेक्ट करावं लागेल...

छान !
त्या शस्त्रावरून मला अरूंधतीची आठवण झाली..
अघोरींची किंवा इतर कुणाचीही मंत्रशक्ती निष्प्रभ करायला एक जालीम आणि ठोस उपाय असतो. जर तो केला गेला तर ते शक्तीहीन होतात. त्यांची विद्या चालत नाही.
पुभाप्र !

आनंदला अनुमोदन... शस्त्रामुळे अरुंधतीची आठवण आली...

कथा छान चालुये पण अघोरी vs महंत अस वळण घेतेय...
आधीच्या भागांमध्ये रोहन च्या मृत्यू मुळे महंत समिधाला मदत करत होते...ती लिंक थोडी तुटल्यासारखी वाटतेय...पुभाप्र

@ अधरा :- रोहनचा आत्मा अघोरीने त्या गवताच्या जुडीत बंदिस्त केलाय...त्यामुळे तो काढून घेण्यासाठी त्याचा पराभव करणं आवश्यक आहे....धन्यवाद...

धन्यवाद सायुरी आणि अजब.....काही तांत्रिक कारणामुळे {मांत्रिक नाही हं}
पुढच्या भागासाठी दोन ती दिवस वाट पहावी लागेल....साॅरी इन अॅडव्हान्स....

अजब Lol
आदी, यांत्रिक पण कारणं असतात त्या फिल्डमध्ये !

Penalty mhanun 2 diwas kase Tari kadhu pan plz lawkar Taka kiwa chalel lahan bhaag pan continuity break Nako whayla asa wattay .