मैत्री भाग - 15

Submitted by ..सिद्धी.. on 24 April, 2018 - 13:19

  आधीच्या भागांसाठी खाली दिलेल्या लिंकवर जा......

भाग-1
https://www.maayboli.com/node/65783

भाग-2
https://www.maayboli.com/node/65793

भाग-3
https://www.maayboli.com/node/65800

भाग - 4
https://www.maayboli.com/node/65807

भाग - 5
https://www.maayboli.com/node/65818

भाग - 6
https://www.maayboli.com/node/65825

भाग - 7
https://www.maayboli.com/node/65829

भाग - 8
https://www.maayboli.com/node/65844

भाग - 9
https://www.maayboli.com/node/65853

भाग - 10
https://www.maayboli.com/node/65859

भाग -11
https://www.maayboli.com/node/65867

भाग -12
https://www.maayboli.com/node/65871

भाग - 13
https://www.maayboli.com/node/65878

भाग - 14
https://www.maayboli.com/node/65890
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■   
मागील भागात:-
ती सतत आपल्या डोळ्यापुढे रहावी आणि असंच तिचं रूप न्याहाळता यावं म्हणून आपल्या केबिनसमोरच तिची कामाची जागा ठेवली...
ती तरूणी दुसरी तिसरी कोणी नसून महंतांनी पाठवलेली मीरा होती.....
आता इथून पुढे...

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
राजेशशी गप्पा झाल्यावर या दोघी घरी यायला निघाल्या. बाहेर आल्यावर समिधाने मीराला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली;
" थॅक्स मीरा. मला वाटलं नव्हतं तु इतका चांगला अभिनय करशील. असं राजेशला जाळ्यात अडकवणं सोपं नव्हतं गं. पण तु लगेच करून दाखवलस. पहिला आणि सगळ्यात अवघड टप्पा तु सहज पार केलास. तुझे आभार कसे मानावे हेच कळत नाहीये. काम सोपं केलस बघ."

" थॅक्स कसले गं त्यात. जर या दुनियेत आलेच आहे तर मुक्ती मिळताना एक चांगल काम सोबत जोडून जाईन. बाकी आता पुढच्या कामाला सुरूवात करायला हवी.चल लवकर निघूया आता." मीरा गाडीत बसत म्हणाली. घराच्या थोडं आधी आल्यावर मीरा गाडीतून उतरली आणि एक मंत्र म्हणून लुप्त झाली. समिधा घरी आली. घरात सगळेच जण होते. म्हणून तीने महंतांना आणि संजनाला मोहीम फत्ते झाल्याचा मेसेज केला. तीघांनाही आनंद झाला.

त्या रात्री महंतांनी मीराला बोलावून घेतलं. समिधा झोपलेली. पण संजना जागी होती. ती सहजच टेरेसवर आलो तेव्हा तीला महंत कसलीतरी पूजा करताना दिसले. तितक्यात मीराही तिथे अवतरली. दोन मिनीटांनी त्यांनी डोळे उघडले. समोर दोघींना बघून ते चकीत झाले. त्यांनी संजनाला एका बाजूला बसायला सांगितलं. मीराला त्यांनी समोर बसवलं. तिला काही मंत्र त्यांच्या पाठोपाठ म्हणायला सांगितली .त्याबरोबर काही विशिष्ट गोष्टीदेखिल अग्नीत अर्पण करायला लावल्या. शेवटी त्यांनी एक मंत्र तिला सांगितला. तीनदा त्या मंत्राचा उच्चार करून तीने ती विद्या प्राप्त करून घेतली. त्या विद्येचं एक वैशिष्ट्य होतं. महंतांनी तीला एकदाच वापरण्यापुरतं मर्यादित ठेवलेलं. त्यामुळे एकच चान्स होता मीराकडे राजेशवर त्या विद्येचा प्रयोग करायचा. संजनाला हे काय चाललय ते कळत नव्हतं म्हणून ती शांत बसून होती. मीराला महंतांनी पुन्हा सगळी प्रक्रीया समजावली.
"महंत मला हे जमेलना? " काळजीच्या सुरात मीराने त्यांना विचारलं .
महंत म्हणाले;"काळजी करू नकोस बाळा. सगळं जमणारे तुला. तुझ्याठायी किंचीत अधिक सामर्थ्य आहे. तुझ्यातला शक्तींबद्दल कधीच मनात शंका ठेवू नकोस. कारण शंका आली की तिथेच आपला निश्चय डगमगतो आणि कार्याच्या पूर्ततेत विघ्नांना सुरूवात होते. मी हे करू शकते अशी सकारात्मक भावना मनात बाळग . " महंतांच्या शब्दांनी तीच्यातला आत्मविश्वास तीला परत मिळाला.
रात्री अडीच वाजताच्या सुमारास पूजा संपली. मीरा महंतांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकली. "यशस्वी भव!" म्हणत महंतांनी दोन मिनीटं तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि मनात एक मंत्रोच्चार केला. तीला एकदम मोकळं वाटू लागलं. मनावरचं सगळं मळभ दूर झालं आणि एक सकारात्मक उर्जा जाणवू लागली.

दुसर्या दिवशी मीरा सकाळी सर्वांच्या आधीच ऑफीसमध्ये अवतरली. थोड्या वेळाने राजेशही आला.तिला "गुड माॅर्नींग" करून आत गेला. पंधरा वीस मिनीटांनी त्याने तिला आत बोलवलं आणि काम समजावून सांगितलं. दुपारी लंच ब्रेकमध्ये त्याने बाहेरूनच जेवण मागवलं. जेवताना तो तिच्याशी गप्पा मारत होता. मीराने आपल्या कामाला सुरूवात केली. राजेश तिच्या सौंदर्यावर आधीच भाळला होता. तीही त्याच्या डोळ्यात डोळे घालून बिनधास्त गप्पा मारत होती. हळूहळू तीने मनातल्या मनात मंत्र म्हणू लागली. राजेशही तिच्या निळ्या डोळ्यांच्या गर्तेत खोलवर जात होता. मीराने केलेल्या संमोहनाचा प्रभाव दिसायला सुरूवात झाली होती. मीरा हळूहळू त्याला बोलण्यात अडकवू लागली. तीला हव्या त्या विषयावर तीने बोलायला सुरूवात केली. हळूहळू तीने अघोरीचा विषय काढला. राजेशने सगळं तीला सांगितलं. शेवटी तीने गवताच्या जुडीबद्दल विचारलं तेव्हा ती त्या अघोरीकडे असल्याचं सांगितलं. तीने त्याच्याकडे कसं जायचं हे पण विचारून घेतलं. नंतर ती पुन्हा इतर विषयांवर गप्पा मारू लागली. पाच मिनीटांनी तीने संमोहन तुटण्यासाठी महंतांना सांगितलेला मंत्र म्हटला. थोड्यावेळाने राजेश भानावर आला. मागचा काही वेळ आपण काय बोलत होतो हे त्याला आठवत नव्हतं. पण त्याने तिथे दुर्लक्ष करत जेवण आटपून घेतलं. नंतर मीराही आपल्या जागी बसून काम करू लागली. संध्याकाळी ती सगळ्यांच्या नंतर निघाली आणि लिफ्टमधूनच अंतर्धान पावली.
रात्री उशीरा महंतांनी तिला बोलावून घेतलं. तिने राजेशने सांगितलेली सगळी माहिती महंतांना सांगितली. महंतांनी तिला शाबासकी दिली. थोड्या वेळाने तीही निघून गेली. महंतांनी डोळे मिटून अभ्यासाला सुरूवात केली. आता काय करायचं याची योजना ते आखू लागले......

क्रमशः

----आदिसिद्धी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा. भारीय हा भाग. मीराचा ट्विस्ट जमलाय.

आता महंत पुढे काय करतील, याची उत्सुकता लागलीय. पुभाप्र. Happy

मीरा हे भूत आहे ना.. भूताला मिठी मारता येते ही नवीन माहिती!! Happy Lol Proud Lol
आधी मला वाटायचं भुतांना स्पर्श करता येत नाही ते फक्त हवेसारखे इकडून तिकडे वाहतात Lol
मोहब्बते मधल्या ऐश च्या भूताने तर देवाला नमस्कार पण केला होता!! Proud Proud

उत्तम
तुझी भुतं पण भलतीच active आहेत

@ किल्ली :-ही काल्पनीक कथा आहे...त्यामुळे आमची मीरा काहीही करू शकते....त्यात परत ती सुंदर+हुशार+भूत याचा त्रिवेणी संगम आहे. दोन भाग आधी तीने महंतांकडून स्पेशल सिद्धी प्राप्त करून घेतली आहे....बाकी शाहरूखचीच all time fan असले तरी त्याचे चित्रपट जास्त नाही पाहिलेत...मला पिक्चर बघायला नाही आवडत त्यामुळे आतापर्यंत फक्त चारच पिक्चर पाहिलेत ते ही शाहरूखचेच....सो मोहोब्बते नाही पाहिलाय.....

@ गुगु वरच्या प्रतिसादातल्या पहिल्या तीन ओळी वाचा...परत लिहायचा कंटाळा आलाय....

@ angelica; sinintinia; किल्ली ; गुगु सर्वांचे धन्यवाद.....

आधी मला वाटायचं भुतांना स्पर्श करता येत नाही ते फक्त हवेसारखे इकडून तिकडे वाहतात>>>
जूनं भूत असल्यावर त्याला स्पर्श करता येतो.. Proud

I always wi8 for your next part adi siddhi...
N it's fruitful too...
Chan jamlay ha bhag pan...
Keep posting...