बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>वाढतं वय + मधुमेह हे खुप वाईट combination आहे हे परत एकदा कालच्या थत्तेंच्या बोलण्यावरून प्रकर्षाने जाणवलं. त्यांच्या असण्या-नसण्यावरून कुणाला काही फरक पडत नसला तरी माझ्या अपेक्षेपेक्षा खुपच लवकर ते तुटले. हा

हा हा! फसलात...! तुम्ही पण... थत्ते सॉलीड गेम खेळत आहेत.. जितक्या शिव्या त्यांना घरात मिळतील तितकी प्रक्षकांची सहानुभूती मिळणार. आणि त्यात हे रडायचे नाटक करून आता ते हहळुळु घरातील काही मुख्य सदस्यांना स्वतःकडे वळवतात कसे ते पहा..
I wud say wahct out Thatte--- he is very very shrewed journalist. He has figured out 'strategy' here and will make thers so called celebs look like apprentice in front of him.

उनाला नॉमिनेट केलेले हे जिव्हारी लागलेले दिसतेय त्यात त्यांना क्लोज असणारी आरती बाहेर गेली त्यामुळे त्या गप्प गप्प असाव्यात.

>>उनाला नॉमिनेट केलेले हे जिव्हारी लागलेले दिसतेय त्यात त्यांना क्लोज असणारी आरती बाहेर गेली त्यामुळे त्या गप्प गप्प असाव्यात.
आऊ आणि थत्ते शेवटचे दोन, बीग बॉस च्या घरात ऊरलेले...? काय म्हणता? तिसरे महायुध्द! Happy आजवरच्या इतीहासात सर्वाधिक टिआरपी चा विक्रम!
[थत्ते आता चित्रपटांमधून झळकणार असे दिसते... लय भारी अभिनय आणि मानवी संबंध मॅनिप्युलेशन एक्सपर्ट दिसतात..]
विनीत जे करतो ते 'मर्कट्चाळे' असे म्हणून आता थत्त्यांनी आपली तोफ विनीत कडे वळवली आहे.. आरती वरून धडा घेऊन विनीत सुधारला तर बरे नाहीतर पुढील नंबर त्याचा असेल..

मला तर थत्ते पेक्षा आऊ डोक्यात जातात...!

आऊंचा राडा केव्ह सुरु होईल
आणी स्वयंपाक करायला ईतका वेळ घेता आणी ती सुजलेल्या औठाची जाम डोक्यात जाते माझ्या
बिबाँ च्या घरात एकही मादक घालत नाहीत कदाची आऊंना घाबरत असतील बाकीचे सगळे फालतु

योग च्या प्रतिक्रियांशी सहमत . जितके घरातले लोक थत्त्यांना टाकून बोलतील त्यांचा राग राग करतील तितकी त्या थत्तेंना प्रेक्षकांची सहानभूती मिळणार आहे आणि तितके एपिसोड ते टिकून राहतील त्यामुळे घरातल्या सदस्यांनी त्यांचं वागणं बदललं पाहिजे नाहीतर ते काही जात नाहीत . त्यांची आणि उना ची भांडण पण प्रेक्षकांना आवडतात . त्यातून उना पण अतीच स्पष्ट बोलतात पण त्यांना सगळे लोक्स सांभाळून घेतात .

आस्ताद म्हणतो त्यांनी पाच लाख ( का पाच हजार ) लोकांना प्रत्येकी एक हजार रुपये मोजले असावेत म्हणून ते घरात टिकून आहेत . एकदमच झंगड बोलणं . पाच लाख लोंकाना मतांसाठी एवढे पैसे देण्याची त्यांची आर्थिक ताकद असेल तर ते कशाला आले असते बिग बॉस मध्ये . बाकी हेच थोड्या वेगळ्या पद्धतीने पुष्कर बोलला तर सगळ्यांना लागलं . आपल्या कडे कोणाकडे जास्त काही काम नाहीये म्हणून आपण बिग बॉस मध्ये आहोत . जर त्या सगळ्यांकडे काम असत तर एवढे तीन महिने तारखा अड्जस्ट करून ते कशाला आले असते बिग बॉस मध्ये . काही ठराविक लोक सोडली तर सध्या कोणाला काम नाहीये म्हणून ते बिग बॉस मध्ये

रेशम देखिल फालतुच वाटतीये मला सई बाईला काही ड्रेस घालण्याचा सेंस नाहीये
मागे कुणीतरी आऊंना आजीबाई म्हणाल होतं
आणी ती चिपड ओठांचीला बघुन जाम हसु येत
तो रंगीत कपड्यांचा बाबाजी काय काड्या

ह्या असल्या फेक लव्हस्टोरीज फार बोअर करतात मला, त्यामुळेच आणि ओव्हर ऑल अतिरेकीपणामुळे मी हिंदी बिग बॉस सोडलं होतं बघायचं.

पुष्करने नाही भरवलं तर रुसली, कित्ती बालिशपणा आणि स्मिता तिच्यापेक्षा बालिश आहे म्हणे. >>>किती लाडात येत होती ती! उना बरोबर बोलत होत्या तेव्हा.... भाऊ? खोटे भाऊ नका मानू बाय. Lol मग तिने स्वतःच घास घेतला तेव्हा पुष्कर ने म्हणायला हवे होते कि चमचा धूऊन दे Proud

आणि एकदा कप उष्टा ठेवून त्यात थोडं पेय तसंच ठेवून गेली होती पुष्क्या समोर. ( काय होतं त्यात नाही माहिती)
उरलेलं बहुधा त्याने प्यावं ही अपेक्षा... शी Sad

जुई फाल्तू पणा करत फक्त स्मिताला त्रास देतेय. इतका शॅम्पू ओतला, त्यावर लिम्बू पिळलं, खराटा आणून तिच्या जवळ ठेवला आहे.
राजेश सरकला आहे का? रेशम बरोबर सरळ सरळ फ्लर्ट करतो आहे.

ओके वर्क एक्स्पिरिअन्स , प्रोफेशनल योगदान असेल तर उषा नाडकर्णी नं १ मेक्स सेन्स.
पण मग राजेश तरी कोण आहे तो, कशात काम केलय ? डायरेक्ट नं २ ??
त्या पेक्षा मग रेशम टिपणीसला जास्त प्रोफेशनल एक्स्पिरिअन्स असेल.

रेशम ने तरी कुठे इतकं काम केलंय? नाहिच केलेलं.
मेघा धाडे अत्यंत धोंड बाई आहे. तिने अल्कोहोलयुक्त माऊथवॉश ओतला स्मिता च्या डोक्यावर. तिला अक्कल नको का? कुणाला अ‍ॅलर्जी वगैरे झाली तर? Angry

इतके सगळे बोलतायत तरी ती माफी मागत नाहिये. चिप बाई.

मी पाहतेय.
सामुहिक रूदन सुरू आहे. अ‍ॅक्चुली राईचा पर्वत झाला आज. सर्वानी टारगेट केल्यासारखं झालं आणि आवाज चढवून दंगा केला.
मेघा धाडे काय ऑव्हर कॉन्फिडन्ट आहे. आपल्याला १०० दिवस रहाय्चं आहे म्हणे इथे. Lol

रेशमचे विचार मला पटले, की टॉर्चर हा फक्त फिजिकल असतो असं नाही. मेन्टल टॉर्चर इज वर्स.

कोण कोण लाइव्ह बघतय बिबाँम>>>> लाइव्ह पण लागतं का? मध्यंतरी हिंदी बिबॉ लाइव्ह बघायचा १/२ दा प्रयत्न केला पण लईच बोर झालं...त्यापेक्षा १ दीड तासाचा एडिटेट पहायचं परवडलं.

मेघा धाडे अत्यंत धोंड बाई आहे. >>> याला +१००१
या बाईची ओळख काय आहे? कोणत्या एखाद्या फेमस शिरेलीत अथवा शिनुमात आहे का ही?

मेघा अतिशय खालच्या थराला गेली, अगदी रडीचा डाव खेळते ती. हेल्दी किंवा sportingly नाही.

स्मिता आणि जुईला target केलं फक्त. वाटेल तस. सर्व चिडले हे चुकीचं नव्हतं पण फार काही मनाला लागलं नाही मेघाच्या, तिला चुकीचं वाटलंच नाही.

राजेश रेशम चं कंटाळा येतो बघायला. उ ना यांचे डायलॉग पण दाखवायला नको होते बिग बॉस ने.

उगाच ओढुन ताणून कशाला प्रेम करुन दाखवतात. त्यांना प्रेम करुन दाखवाय्ला पण ऑकवर्ड वाटतेय आणि आम्हाला बघायला पण :रागः

Pages